मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कर्नाटका आणि महाराष्ट्रः सहोदर संस्कृती

रोहित रामचंद्रय्या · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी| मिसळपाव मध्ये हा माझा प्रथम लेखन आहे| नवंबरचा महिना म्हण्जे, कर्नाटका आणी भारत देशाचा बहुतेक दा़क्षिणात्य राज्यांचा स्थापना सोहळा आहे| तसेच महाराष्ट्राचा दक्षिणेत असणारा कर्नाटकवासियांना सुद्दा राज्योत्सवाचा समय आहे | कर्नाटका हा प्रदेशाचा उल्लेख पहिलच बार महाभारत काव्याचे भीष्म्पर्वात मिळतात| 'कर्नाटका' हा संस्कृत नावाचा मूळ शब्द 'कन्नडा' आहे| कन्नडा भाषेचा उपलब्द प्रथम लक्षण ग्रंथ 'कविराजमार्ग' मध्ये, कन्नडा हा शब्दाला इथल्या भाषा आणि भूप्रदेशाचा नाव असा वापर्ला गेला आहे| हेच ग्रंथात, कार्नाटकाचा सीमा कावेरी तून गोदावरी पर्यंत होता असा उल्लेख आहे| कन्नडा भाषा संबंधी काही विषय - १. प्रथम उल्लेखित शब्द - 'इसिला' अशोक चक्रवर्तीच्या ब्रह्मगिरी शासन मध्ये| २. प्रथम उपलब्ध शासन - क्रि.श ४५० च्या हल्मिडी शासन| ३. नर्मदा काटीवर उत्तरचा राजा हर्शावर्धन्ला हरावलेल्या प्रथम दाक्षिणात्य राजा म्हण्जे, चालुक्य राजा 'इम्मडि पुलिकेशी' हे कन्नडिगा होते| ४. प्रथम उपलब्ध गद्य ग्रंथ - क्रि.श. ८५० मध्ये शिवकोट्याचार्या लिखित वड्डाराधने| ५. आदिकवि - पंपा (क्रि.श ९५०) | 'ज्ञानेश्वरी' मधे 'तुप्प' 'पोट्टे' असा कन्नडा शब्दाचा वापर झालेला आहे असा संशोदकाचे मत आहे| आज सुद्धा पुणे, मुंबईचा एलिफेंटा, आणि एल्लोरा येथे, कन्नडा साम्राज्याचा साक्षीभूत लेणि देवळ बघायला मिळतात| मराठी संस्कृतीचे विद्यांस रा.चि.ढेरे यांने कन्नडा-मराठी संबंध विषयी खूप शोध केले आहे| काही शोधकांचे मत आहे की शिवाजी के मूलपुरुश 'बळियप्पा' नावाचा कन्नडा योद्धा होता| 'भोसले' हे कन्नडाचा 'होयसला' शब्दाचा अपभ्रंश आहे| माझा हा लेखाचा उद्धेश इतकच आहे की, मराठी आणि कन्नडिगां ऐतिहासिक कालातून सहोदर सारखे वाघळले आहे| आपल्या विश्वासी रोहित

वाचन 8871 प्रतिक्रिया 0