गाभा:
झैरात झैरात झैरात
मंडळी, कळविण्यास अत्यंत आनंद होतोय की आपल्या लाडक्या मिपाचा पहिलावहिला छापील दिवाळी अंक उद्या आपल्या भेटीस हजर होतोय.
आपला पहिलाच प्रयत्न असल्याने मर्यादित प्रती छापण्यात आल्या आहेत.
अधिक माहितीसाठी आणि आपली प्रत राखून ठेवण्यासाठी
मिपावर प्रशांत ला व्यनि करा
किंवा prashaant.tayade@gmail.com येथे थेट संपर्क साधा.
ऑनलाईन अंकापैकी निवडक लेख, दोन-तीन एक्स्क्लुसिव्ह कंटेंट आणि मिपावरची काही गाजलेली दर्जेदार पूर्वप्रकाशित गाळीव रत्नं असा हा संग्रह आहे. मुख्यतः स्मरणिका म्हणून संग्रही ठेवण्यासाठी. विशेषतः पहिला अंक, आणि कदाचित अग्रणी मराठी संकेतस्थळांपैकी छापील अंकाचा पहिलाच प्रयोग यासाठी या अंकाचं महत्त्व असेल.
प्रतिक्रिया
23 Oct 2019 - 4:25 pm | ज्ञानोबाचे पैजार
साधारण कधी उपलब्ध होईल?
माझ्या करता प्रत नक्की राखुन ठेवा
मिपाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो ही सदिच्छा...
पैजारबुवा,
23 Oct 2019 - 6:15 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
अगदी हेचं आणी असच म्हणतो.
व्यनि धाडलाय रे प्रशांत
24 Oct 2019 - 8:20 am | ज्ञानोबाचे पैजार
या दिवाळी अंक छापण्याच्या कटात अनेक जण सामिल असतील. त्या टोळीने अंक छापताना आलेल्या अनुभवांचा एक धागा काढावा.
या कल्पनेच्या उगमा पासून ते अंकाच्या वितरणापर्यंत झालेला प्रवास नक्की रोचक असेल यात काहीच शंका नाही.
पैजारबुवा,
23 Oct 2019 - 4:26 pm | तुषार काळभोर
अतिशय आनंदाची बातमी...!!
व्यनि पाठवलाय..
23 Oct 2019 - 4:32 pm | हस्तर
दुकानात येइल का?
23 Oct 2019 - 5:03 pm | प्रशांत
मर्यादित प्रती छापण्यात आल्या आहेत त्यामुळे दुकानात येनार नाहि.
23 Oct 2019 - 4:45 pm | कुमार१
हा अंक आणि इथला इ अंक हे एकच की वेगळे ?
23 Oct 2019 - 5:01 pm | प्रशांत
ऑनलाईन अंकापैकी निवडक लेख, दोन तीन एक्सकलुसिव्ह कंटेंट आणि मिपावरची काही गाजलेली दर्जेदार गाळीव रत्नं असा हा संग्रह आहे. मुख्यतः स्मरणिका म्हणून संग्रही ठेवण्यासाठी. विशेषतः पहिला अंक, आणि कदाचित अग्रणी मराठी संकेतस्थळांपैकी छापील अंकाचा पहिलाच प्रयोग. यासाठी या अंकाचं महत्व असेल.
23 Oct 2019 - 4:48 pm | पद्मावति
मिपाचा पहिला वहिला छापील दिवाळी अंक! खूप खूप अभिनंदन. अत्यंत आनंदाची बातमी.
व्यनी पाठवला आहे.
23 Oct 2019 - 4:55 pm | अनिंद्य
छापील अंक हे एक उत्तम सरप्राईझ ठरले.
माझ्या साठी प्रत राखून ठेवण्यासाठी व्यनि पाठवला आहे.
शुल्क किती ते कळवले तर भरण्याची व्यवस्था करतो.
23 Oct 2019 - 5:23 pm | पाषाणभेद
अरे वा! छान बातमी आहे की!
माझीही प्रत राखून ठेवावी हि विनंती. व्यनी करतोच आहे. अॅक्सेस डिनाय म्हणतो आहे. ईमेल करतो आहे मग. पैसे कसे द्यायचे ते सांगणे.
23 Oct 2019 - 5:28 pm | mayu4u
मात्र, इबुक्स च्या युगात छापील अंक म्हणजे "चुलीवरचं जेवण" वाढणारं हॉटेल असं काहीसं वाटलं.
23 Oct 2019 - 6:21 pm | पाषाणभेद
ऑनलाईन आहेच की अंक. आणि अॅप मध्ये जास्त वेगळेपण असू शकत नाही. कंटेट तेच राहणार. प्रेझेंटेशन बदलेल फार तर.
अन कागदावरचा दिवाळी अंक घरी आणणे असे बहुदा मराठी समूदायातच होत असावे. त्यामुळे हार्डकॉपी अंक समर्थनीय आहे.
रच्याकने, चुलीवरची मिसळ हा हाईप केलेला प्रकार आहे. चव धुरकटलेली असू शकते काय?
:-)
23 Oct 2019 - 5:32 pm | यशोधरा
मला एक प्रत प्लीज. व्यनी करते.
23 Oct 2019 - 6:05 pm | श्रीरंग_जोशी
अरे वाह, मिपाच्या छापील दिवाळी अंकाची संकल्पना अभिनव आहे.
छापील प्रति संपल्यानंतर काही कालावधीने किंडल प्रतही उपलब्ध करावी ही सुचवणीवजा विनंती.
24 Oct 2019 - 2:41 pm | नंदन
अगदी असेच!
ह्या कल्पनेला कृतीत उतरवणार्या मंडळींचे हार्दिक अभिनंदन आणि आभार!!
23 Oct 2019 - 6:13 pm | प्रचेतस
मिपाचे पहिल्या वहिल्या छापील दिवाळी अंकाचे मनःपूर्वक अभिनंदन.
कोऱ्या कागदाचा सुवास घेत अंक वाचण्याची मजा औरच.
प्रत राखून ठेवतच आहे.
23 Oct 2019 - 6:37 pm | हरिहर
माझीही प्रत राखून ठेवावी हि विनंती. व्यनी करतोच आहे. अॅक्सेस डिनाय म्हणतो आहे.
23 Oct 2019 - 6:49 pm | नाखु
केला आहे,
स्तुत्य उपक्रम
अर्थातच वाचकांची पत्रेवाला नाखु
23 Oct 2019 - 6:57 pm | गुल्लू दादा
व्यनि केलाय सर. फारच सुखद धक्का.
23 Oct 2019 - 7:11 pm | जॉनविक्क
की फक्त वाचायला छापील कागद ;)
राशी भविष्यकार कोण आहेत ? युयुत्सु जी ? मुखपृष्ठ अत्यन्त सुरेख
23 Oct 2019 - 7:41 pm | हस्तर
चकना
23 Oct 2019 - 7:44 pm | सुधीर कांदळकर
किंमत अकाउंट क्रमांक वगैरे मिपावर वा sudhir.kandalkar@gmail.com वर कळवणे किंवा मुंबईत/पुण्यात उपलब्ध असल्यास स्टॉकिस्टचे नावपत्ता देणे.
२. अभिनंदन. मुखपृष्ठ छान दिसते आहे.
23 Oct 2019 - 8:59 pm | जेम्स वांड
काय काय आहे हे सद्यांत देता येईल का?
ऑनलाईन अंकापैकी निवडक लेख, दोन तीन एक्सकलुसिव्ह कंटेंट आणि मिपावरची काही गाजलेली दर्जेदार गाळीव रत्नं असा हा संग्रह आहे.
ह्यावरून काही कल्पना येत नाही. नाही, मिपावर सगळेच लेखन दर्जेदार असतेच. फक्त काही पर्सनल फेव्हरेट्स असले तर कळावे म्हणून विचारतोय, जर इथे चालणार नसेल तर व्यनित सांगा, जर अगदीच गुपित ठेवायचं असलं तर मात्र बघा कसं काय सोयीचं पडतं ते...
23 Oct 2019 - 9:15 pm | उपेक्षित
+१ हेच म्हणतो
23 Oct 2019 - 10:03 pm | बिपीन सुरेश सांगळे
मला एक अंक हवा आहे .
कृपया डिटेल्स मिळतील का ?
23 Oct 2019 - 10:13 pm | गामा पैलवान
प्रशांत,
या धाडसी प्रयोगाबद्दल अभिनंदन. पुढील वाटचालीस शुभेच्छा.
आ.न.,
-गा.पै.
24 Oct 2019 - 12:04 am | मनिष
मलाही हवेत अंक, व्यनि पाठवलाय. :)
24 Oct 2019 - 4:27 am | जुइ
कल्पना अतिशय आवडली.
24 Oct 2019 - 6:37 am | Jayant Naik
आपल्याला मेल पाठवली आहे. व्यनी जात नाही. कृपा करून माझ्यासाठी एक कॉपी राखून ठेवा.
24 Oct 2019 - 7:41 am | सुमो
उपक्रमास अनेक शुभेच्छा आणिक अभिनंदन.
प्रशांत यांना व्यनि जात नसल्याचे अनेक जणांनी लिहिले आहे.
त्यांच्यासाठी...
प्रशांत यांना व्यनि करा.
24 Oct 2019 - 9:00 am | रणजित चितळे
बंगळुरला पाठवावा लागेल फक्त
24 Oct 2019 - 9:42 am | नूतन
अभिनंदन आणि शुभेच्छा
24 Oct 2019 - 9:56 am | मार्गी
छानच! सर्वांचे अभिनंदन!!!
24 Oct 2019 - 10:17 am | राजाभाउ
एक नंबर !!!!
मलाही अंक हवा आहे. व्यनी केला आहे. कृपया बाकी माहिती (किंमत, अंक कुठे मिळेल वगैरे) इथे टाकावी हि विनंती
24 Oct 2019 - 10:43 am | स्वप्निल दलाल
व्यनी जात नाही. आपल्याला मेल पाठवली आहे. कृपया माझ्यासाठी एक कॉपी राखून ठेवा. बंगळुरला पाठवाल का?
24 Oct 2019 - 12:10 pm | आदेश007
प्रशांत जी
व्यनी केला आहे.
धन्यवाद
24 Oct 2019 - 12:47 pm | नि३सोलपुरकर
कृपया माझ्यासाठी एक कॉपी राखून ठेवा.
24 Oct 2019 - 1:42 pm | राघव
हे तर ब्येष्टच झालंय! व्यनि केलाय सर! कृपया प्रत राखून ठेवावी माझ्यासाठीही. :-)
बाकी नंतर किंडल प्रत काढण्याच्या जोशीसरांच्या सुचनेशी त्रिवार सहमत!
अंक मिळणार कसा आणि कधी याबद्दल उत्सुकता आहे.
जर काही ठरलं नसेल तर एक कट्टा करून त्यात हा अंक वाटता आला असता.. अंकाचं विमोचनही झालं असतं आणि कट्टाही झाला असता.
अर्थात् दिवाळीच्या धामधुमीत ते शक्य नाही हे मान्य. पण जर प्रत दिवाळीनंतर मिळाली तरी हरकत नसावी कुणाची. :-)
24 Oct 2019 - 3:56 pm | इरसाल
एका मनुक्षास जास्तीत जास्त किती अंक मिळु शकतील ?
25 Oct 2019 - 12:27 pm | गामा पैलवान
एका द्विपादास एकंच अंक मिळेल!
-हुकुमावरून
टीप : दोन अंक मिळणार असतील तर मी स्वत:स इरसालपणे चतुष्पाद म्हणून घोषित करावे का ? ;-)
-गा.पै.
24 Oct 2019 - 5:53 pm | विजुभाऊ
मला एक प्रत हवी आहे. व्यनी केला आहे
26 Oct 2019 - 8:45 am | चांदणे संदीप
मालक, माझ्यासाठीही एक अंक राखून ठेवावा ही विनंती.
मिपाच्या पहिल्या दिवाळी अंकाचे स्वागत. मिपाचे पाऊल असेच सदैव पुढेच पडत राहो ही सदिच्छा!
सं - दी - प
26 Oct 2019 - 11:09 am | पाषाणभेद
एक करता येवू शकते.
एक शेवटची तारीख ठरवा. येथेच कळवा. अन त्या तारखेपर्यंत बुकींग घ्या. आधी पैसे घ्या. ( ते महत्वाचे आहे. परमार्थ नंतर.)
तेवढ्या प्रती छापा.
(आणि खूप विलंबही नको.)
अन मुंपुठानानाको ( मुंबई-पुणे-ठाणे-नाशिक-नागपूर) असा हब करा.
त्या त्या ठिकाणच्या मिपाकराला तेवढ्या प्रती पाठवा. (नाशकात मी जबाबदारी घेईन अन अंक द्यायला त्यांच्या घरीही जाईन (अन दिवाळीचा फराळ हादडेन!))
तो मिपाकर इतरांशी संपर्क करून एकमेकांत बोलणे होवून अंक हातोहात देतील.
आणि मिपाकरांच्या दिवाळी अंकाच्या हार्डकॉपीची पहिली खेप असल्याने मिपाकर तेवढे सहकार्य करतील.
बघा. कसं जमतंय ते!
27 Oct 2019 - 10:45 am | प्रचेतस
सांगलीत असलेल्या मिपाकरांसाठी ५ प्रती खालील दुकानात ठेवल्या आहेत. आदर्श न्यूजपेपर एजन्सी, विश्रामबाग चौक, सांगली इथून त्या खरेदी करता येतील.
27 Oct 2019 - 11:15 am | पाषाणभेद
अरे!
ज्यांनी मागणी केली त्यांना द्या ना!
दुकानात तर कुणी इतरही खरेदी करेल अन मग (सांगलीतल का होईना) ज्यांनी मागणी केली त्यांना भेटणार नाही.
वर माझ्या प्रतिसादात कसे न्याय्य वाटप करावे ते लिहीले आहे. मिपावरील लोभाने सभासद झळ सोसून एखाद्या सभासदाकडून घेवू शकतील.
27 Oct 2019 - 11:37 am | प्रचेतस
ज्यांनी मागणी त्यांना मिळणारच आहेत. एका मिपाकरांनी सांगलीमार्गे बाहेरगावी जाता जाता तिकडील मिपाकरांच्या सोयीसाठी अंक तिथे ठेवले आहेत.
27 Oct 2019 - 11:57 am | पाषाणभेद
मग नाशिकचे किती अंक आहेत? माझ्याकडे द्या पाठवून. मी वितरीत करेन.
27 Oct 2019 - 12:38 pm | प्रचेतस
प्रशांतशी बोलून सांगतो
27 Oct 2019 - 10:47 am | प्रचेतस
पिंपरी चिंचवडमध्ये राहणारे मिपाकर माझ्याकडून अंकाच्या प्रति घेऊन जाऊ शकता.
27 Oct 2019 - 12:19 pm | मनिष
अरे पुण्यातल्यांनी कुठून घ्यायचे? कट्टाही रद्द झाला ना भौ... :-)
27 Oct 2019 - 12:38 pm | प्रचेतस
त्याबाबत लवकरच अपडेट करतो
27 Oct 2019 - 12:11 pm | जॉनविक्क
गेला बाजार रसग्रहण तरी ?
27 Oct 2019 - 12:13 pm | पाषाणभेद
तुम्हीच शिवधनुष्य हाती धरा अन वाचकरूपी सितेच्या प्रतिसादांना वरा.
27 Oct 2019 - 8:37 pm | हरिहर
मला दिवाळीअंक मिळणारे का?
कधी, कुठे, कसा?
28 Oct 2019 - 5:04 pm | विजुभाऊ
मुंबईतल्या लोकाना अंक कोणाकडे मिळेल
29 Oct 2019 - 12:26 pm | सर्वसाक्षी
हाच प्रश्न
29 Oct 2019 - 12:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपाचे दिवाळी अंक प्रशांतकड़े पोहोचले आणि वितरणाचं प्लानिंग करतच होतो की त्यांच्या नात्यात असलेल्या जवळच्या व्यक्तिबद्दल दुःखद गोष्ट घडली म्हणून प्रशांतला तातड़ीने गावी जावे लागले त्यामुळे अनेकांना अंक मिळायला उशीर झालाय.
प्रशांत आला की पुन्हा नव्याने अंक कसे पोहोचतील यासाठी प्रयत्न करूत , आपण दिलेला प्रतिसाद खुप मोठा आणि उत्साह वाढवीणारा आहे म्हणून ही पोच. Thanks All
-दिलीप बिरुटे
29 Oct 2019 - 3:06 pm | गामा पैलवान
माहितीबद्दल प्राडाँचे आभार. प्रशांत यांचे सांत्वन असो.
-गा.पै.
29 Oct 2019 - 2:26 pm | सर्वसाक्षी
कारण इथे दिल्याबद्दल आभारी आहे. जर काही आकस्मात घडलं तर नाईलाज असतो.
सर्वांनाच उत्सुकता आहे आणि मर्यादित प्रती छापल्या म्हणताना आपल्याला मिळेल की नाही याची हुरहुर आहे, बाकी अंक चार दिवस उशीराने आला म्हणून हरकत नाही
29 Oct 2019 - 6:01 pm | चॅट्सवूड
या अंकाच्या खूप प्रती विकत घेऊन नंतर ब्लॅक मध्ये विकला तर चालेल का?
31 Oct 2019 - 2:38 pm | समीरसूर
मिपाची घोडदौड अशीच चालत राहो!!!
2 Nov 2019 - 4:06 pm | गुल्लू दादा
आत्ताच प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सरांच्या हस्ते मिपाचा पहिलावहिला छापील दिवाळी अंक मिळाला. सरांना भेटण्याची पहिलीच वेळ होती. खरं म्हणजे कोणत्याही मिपाकराला पहिल्यांदा भेटत होतो. खूप छान वाटले भेटून. वैयक्तिक कारणाने सरांकडे जास्ती वेळ नसल्याने अल्प मुलाखत झाली. निवांत भेटण्याच्या अटीवर सरांनी निरोप घेतला. आता आरामात वाचेन. पहिल्या अंकाचा साक्षीदार झाल्याने प्रसन्न वाटतंय. या अंकासाठी मेहनत घेतलेल्या सर्व मिपाकरांचे आभार... बिरुटे सरांचे परत एकदा हृदयस्थ आभार.
2 Nov 2019 - 7:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुल्लुदादा,आपणास भेटून मलाही खुप आनंद झाला. आज ज़रा गड़बड़ होती, फार वेळ बोलता आले नाही. पण तुम्ही मिपाकरमित्र म्हणून मला आवडलात, आपण जानेवारी नंतर दोघे मिळून कट्टा आयोजित करू जे येतील ते येतील ते येतील. नाय आले तर नाय आले आपण दोघे फिरू.
अंक आवडला ??
-दिलीप बिरुटे
4 Nov 2019 - 5:28 pm | गुल्लू दादा
सुरेख झालाय अंक...सर्वांचे अभिनंदन.
3 Nov 2019 - 8:29 am | प्रचेतस
आज सकाळी दहा साडेदहाच्या सुमारास पुण्यात अक्षरधारा, बाजीराव रोड येथे येत आहे, मजकडे २/३ प्रती असतील, इच्छुक मिपाकरांनी त्या सुमारास तेथे आल्यास दिवाळी अंक देणे सोयीचे ठरेल.
4 Nov 2019 - 2:21 pm | राजाभाउ
https://sukrutprakashan.com/books/misalpav-diwali-ank-2019 वरून अंक मागवला आहे. ७ ता. पर्यंत येईल म्हणे. वाट बघत आहे.
4 Nov 2019 - 4:43 pm | मनिष
अंक मिळाला, ऑनलाईन अंकाप्रमाणेच छापील अंकही सुरेख झालाय.
ह्यासाठी मेहनत घेणार्या सगळ्याच टीमचे मनापासून आभार. __/\__
10 Nov 2019 - 1:40 pm | कोमल
मिपा छापील दिवाळी अंकासाठी माझा लेख निवडला गेल्याचा व्यनि संपादकांनी पाठवला तेव्हा फार आनंद झालेला. अंकाबाबत उत्सुकता होती. छापील अंक प्रदर्शित झाल्यानंतर त्यात असलेल्या चुकांबाबत चर्चा पण सुरू झाली. पहिल्याच अंकात काना, मात्रा च्या चुका असतील तर विशेष नाही असा माझा विचार होता. पण छापील अंक हातात पडताच एक गोष्ट लक्षात आली. माझा लेख दुसऱ्याच लेखकाच्या नावाने छापला आहे. फक्त अनुक्रमणिकाच नाही तर मुख्य लेखाच्या खाली सुद्धा माझे नाव नाही.
फार निराशाजनक चूक. जबाबदारी कोणाची? आणि लेखात बदलाचे हक्क संपादक मंडळाला दिले होते, लेख दुसऱ्याच्या नावावर छपाईचे नाही. प्रूफ रिडींगला पार फाट्यावर मारल्याचे दिसत आहे.
काना, मात्रा, उकार वगैरेंच्या चुका इथे निर्देशनास आणून दिल्या जातात, या छापील चुकांचे काय?
10 Nov 2019 - 3:08 pm | गवि
या अंकात आपल्या लेखाबाबत ही गंभीर चूक झाली आहे. याखेरीज एक दोन लेखांत ऑनलाइन इमेज urlचे शब्द इमेजसोबत राहून गेले आहेत. शुद्धलेखन चुका मात्र अगदी किमान असतील असा प्रयत्न केला आहे.
आपण उल्लेख केलेल्या चुकीबाबत कोणतीही कारणे देणं किंवा सारवासारव करणं याला अर्थ नाही. या अंकाची व्यवस्था बघणाऱ्या टीमचा सदस्य म्हणून या चुकीची जबाबदारी माझ्यावर आहे. मी आपली बिनशर्त जाहीर माफी मागतो. यापुढे अधिक काळजी नक्की घेऊ.
10 Nov 2019 - 4:56 pm | कोमल
काही प्रश्न,
1. मी ही बाब समोर आणायच्या आधी माहीत झाली होती का?
- तसं असेल तर तसा जाहीर खुलासा याच्या आधीच का नाही केला गेला?
- तसं नसेल तर अंक छापून प्रकाशित होऊनही कोणीच नीट वाचला नाही का?
- की जोवर कोणाच्या नजरेस पडत नाही तोवर धकवून नेऊ असा विचार या मागे होता?
- अंकाची किंमत सुद्धा काही कमी नाहीये की या गोष्टी कडे कानाडोळा करावा. म्हणजे समजा वर्तमानपत्रात वगैरे असं काही झालं असतं तर दुर्लक्ष केलं गेलं असतं.
2. मिपाचा पहिला छापील दिवाळी अंक म्हणून मोठ्या उत्साहात वाचक वर्ग तो विकत घेणार, संग्रही ठेवणार, काही वर्षांनी परत वाचणार तरी त्यातील ही चूक तशीच राहणार ना. त्याला rectify कसं करणार तुम्ही? इथे 'संपादन' नाही शक्य.
3. तुम्ही माझ्या प्रतिसादाला प्रतिसाद देऊन त्यात माफी मागत आहात मग ती जाहीर कशी झाली? ती फक्त या धाग्यापुरती मर्यादित झाली.
4. काही काळाने ज्या लेखकाच्या नावाने तुम्ही माझा लेख छापला आहे त्यांनी मलाच लेखाधिकार हक्काने गोत्यात आणलं तर? उद्या माझ्यावरही वाङ्मयचौर्य वगैर ठप्पा लागायला हे पुरेसे आहेच.
5. तुमच्या इथल्या माफीचा प्रतिसाद उद्या डिलिट झाला तर?
10 Nov 2019 - 6:07 pm | गवि
ही बाब आगोदर लक्षात आली होती. छापील अंक अत्यंत मर्यादित लोकांमध्ये वितरित झाल्याने त्यातील ही त्रुटी नेमकी कुठे छापल्यास किंवा प्रकाशित केल्यास योग्य त्या समूहास तो खुलासा होईल हे आधी लक्षात आलं नाही. कोणाच्या नजरेस येत नाही तोवर धकवून नेण्याचा किंवा या चुकीबद्दल गप्प राहून ती दुर्लक्षित करण्याचा असा कोणताही उद्देश नव्हता.
अंकाची किंमत जास्त आहे हा मुद्दाही योग्य. या अंकाला कोणताही स्पॉन्सर किंवा जाहिरात याचा आधार नाही. कोणताही नफा यातून कोणालाच अपेक्षित नाही. किंबहुना तोटाच निश्चित अपेक्षित आहे. काही लोकांनी उत्स्फूर्तपणे आणि निरपेक्षपणे हा भार उचलला आहे. त्यांना कमीतकमी नुकसान व्हावं इतकी काळजी घेऊन अंकाची किंमत ठरली आहे. कमी प्रती हाही यातला एक भाग आहे.
अंकाची किंमत जी आहे ती आपल्याला परत करणं, आणि मिसळपाव वेबसाईटवर वेगळा धागा काढून माफी मागणं, आपण प्रशांतला नाव पत्ता दिला असल्यास लिखित माफीपत्र पाठवणे, असं आपल्याला जे योग्य वाटेल त्या मार्गाने हीच माफी परत मागण्याची तयारी आहे. कारण ती खरेच मनापासून मागण्याचीच इच्छा छापील अंक टीमची होती आणि आहे.
येथील प्रतिसाद देखील पुढे अप्रकाशित न करण्याची विनंती मिसळपाव प्रशासनाला छापील अंक गटातर्फे मी करतो. या छापील अंकाच्या निर्मितीत खुद्द मिपा व्यवस्थापनच पूर्णपणे सामील असल्याने हे सहज शक्य आहे.
मनिष या मिपावर परिचित आयडीचं नाव आपल्या लेखाशी लेखक म्हणून छापील अंकात जोडलं गेलं आहे. मिसळपावच्याच ऑनलाइन अंकात अर्थातच ते योग्य रीतीने आलं आहेच. मनिष या जुन्या जाणत्या मिपासदस्यांना मी विनंती करतो की या चुकीबद्दल माफी स्वीकारून कोमल यांना भविष्यात कोणतीही अडचण होणार नाही यासाठी सहकार्य करावे.
11 Nov 2019 - 12:41 am | जॉनविक्क
तुम्ही सदर चुकीची जाहीर कबुली नामांकित मराठी वर्तमानपत्रात दिल्याशिवाय मला वाटत नाही कोमल जी मॅटर सेटल करतील, ज्या लेव्हलवर त्या बॅटिंग करत आहेत ते पाहता हाच एक मार्ग आपल्यापुढे दिसतो ;)
11 Nov 2019 - 9:14 am | गड्डा झब्बू
झालेली चूक गंभीर आहे यात शंका नाही. आता ति सुधारणेही अशक्य आहे. तरी एक सूचनावजा विनंती करावीशी वाटते कि अजूनही वितरीत झाल्या नसतील अशा प्रतींमध्ये हाताने लिहून अथवा लेखिकेच्या नावाचे लेबल छापून अंकात ते चिकटवता येते का पाहावे. यापूर्वीच अंक हाती पडलेल्या मिपाकरांना एक स्वतंत्र खुलासा प्रसिध्द करून हि आणि आणखीन काही त्रुटी राहील्या असल्यास त्याविषयी सूचित करता येऊ शकेल. लेखिकेला झालेल्या मनस्तापासमोर किंमत, नफा तोटा हे मुद्दे गौण असून वरीलप्रमाणे काही केल्यास त्याची तीव्रता थोडी सौम्य होईल असे वाटते. चू.भू.द्या.घ्या.
19 Nov 2019 - 2:50 pm | मनिष
प्रवासानिमित्त गेले काही दिवस मिपापासून दूर होतो, इथे हे वाचले आणि माझे नाव दिसले म्हणून काही खुलासे -
कोमल यांचा 'To see my name in print' हा मुद्दा समजला आणि मनापासून पटला देखील. मी देखील माझ्या ग़ज़ल का सफ़र.. हा लेख छापील दिवाळी अंकात छापण्याची अनुमती देतांना माझे संपुर्ण नाव कळवले होते, पण कदाचित घाईगडबडीत ते प्रसिध्द झाले नाही. मिपाचा छापील अंक प्रकाशित करतांना सगळ्याच संबधित लोकांनी खूप मेहनत घेतली आहे, आपापला वेळ आणि पैसे खर्च केले आहेत. त्याबद्दल त्या टीमचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, पण त्याचबरोबर त्यांनी थोडे काळजीपुर्वक, जवाबदारीने लेखांचे सर्व अधिकार संबधित लेखकांकडे असल्याचे नमूद करणे गरजेचे होते (त्याच गृहितावर मी माझा लेख ग़ज़ल का सफ़र.. प्रसिध्द करण्यास परवानगी दिली होती). तसेच संबधित लेखक-लेखिकांचे संपुर्ण नाव किंवा इच्छित नाव लेखाबरोबर, कवितेबरोबर द्यायला हवे होते असेही वाटते. आई-वडिलांना (जे ऑनलाईन वाचू शकत नाही) छापील अंक दाखवतांना त्यांनीही 'तुझे पूर्ण नाव नाही का'? हा प्रश्न नाराजीने विचारला, पण त्याबद्दल माझ्याकडे काही उत्तर नव्हते. पुढच्या वेळेस आवर्जून ही काळजी घ्यावी अशी संबधित संपादकांना विनंती. असो.
इतक्या देखण्या, वैविध्यपुर्ण आणि दर्जेदार अंकात दृष्ट लागू नये म्हणून ही छोटीशी तीट लागली आहे असे मी समजतो. निदान माझ्या मनात तरी त्याबद्दल कुठलीही अढी नाही. आपल्याच लोकांनी हौसेने इतके सुरेख काम केले आहे, त्यांच्या काही चुका विसरून आपण त्यांना दाद देऊ शकतो ना?
20 Nov 2019 - 8:09 pm | कोमल
प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद मनिष.
दिवाळी अंक आणि छापील अंक दोन्ही वाचनीय आहेत यात शंकाच नाही.
याच्याशी पूर्णतः सहमत.
पुढील छापील अंकात अशा चुका होणार नाहीत हे धरून चालू. आणि त्यासाठी संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा.
10 Nov 2019 - 7:04 pm | नीलकांत
आपल्या पहिल्या दिवाळी अंकात लेखक म्हणून कोमल यांचे नाव न छापता मनीष यांचे नाव छापले गेले आहे. ही चूक आहे त्याबद्दल या प्रकल्पाचा संपादक म्हणून मी जाहीर माफी मागतोय.
हा प्रकल्प खूप कमी वेळेत पूर्ण करायचा असल्यामुळे सर्व टीम सदस्य यांनी खूप काम केले. त्यात अनेक गोष्टी राहून गेल्या. आपल्या समोर दोन पर्याय होते एक म्हणजे अंक रद्द करा आणि दुसरा म्हणजे खूप मेहनत घेऊन अंक प्रकाशित करा.
कमी वेळात आपण हा अंक आणला आहे. या अंकाच्या मागे नफा हा भाव नव्हता. तर मिपाकरांच्या संग्रही हा अंक असावा एवढचा विचार होता. आपण मिपा चालवतानाच कुठेही नफा पाहिला नाहीये. काही अंक छापताना असा विचार केला नाही. त्यातून ही मोठी चूक झाली हे मान्य आहे. त्याबात तसा खुलासा कुठेही देता येईल.
मिपाचा हा छापील अंक प्रत्यक्षात यायला अनेक सदस्यांनी खूप कष्ट घेतलेत. त्यातून कुणीही नफा या हेतूने काम केले नाही. अंक पाहिल्यास एकही जाहिरात नाही. त्यामुळे जो खर्च आला त्यासाठी किंमत तेवढी ठेवली आहे. अंकाच्या छपाईसाठी लागलेला अर्धा खर्च सुद्धा निघणे अपेक्षित नाही. तरी सुद्धा मिपा ज्या हौसेने चालवल्या जातंय त्याच हौसेने हा अंक काढलाय.
जी झाली ती चूक आहे हे आम्ही मान्य करतोय. कृपया याला अन्य भावनेने घेऊ नये अशी विनंती आहे.
10 Nov 2019 - 8:35 pm | कोमल
प्रतिसादाबद्दल आभार नीलकांत.
माझा अंकाच्या किंमतीचा मुद्दा मी चुकीच्या पद्धतीने मांडला असावा असं वाटतं. माझ्या म्हणण्याचा उद्देश होता की एका अंकाची किंमत जास्त आहे म्हणजे त्यामुळे संपूर्ण प्रोजेक्टची किंमत सुध्दा जास्त होते. मी प्रयत्न करते एक उदाहरण देण्याचा. समजा 1000 चा प्रोजेक्ट मध्ये एक वेबसाईट 5 पाने बनवून घेत असेल तर त्यात जास्त लक्षपूर्वक काम करावे लागते. तसेच जर दुसरी वेबसाईट 1000 मध्येच 50 पाने बनवून घेत असेल तर कामाची क्वालिटी आधी इतकी चांगली नाही राहत. त्याच प्रमाणे आपल्या अंकाची किंमत जास्त आहे, त्यात छोट्या छोट्या चुका राहू शकतात, पण ही चूक माझ्या दृष्टीने छोटी नाही. इतर कुठल्याही कमी किमतीच्या मासिकात लेखकाचे नाव चुकणे वगैरे झालं तरी मी हे म्हणून सोडून दिलं असतं की छोटं तर मासिक आहे, असं होणारच.
तुम्हाला कोणालाही किंमत जास्त किंवा कमी यावरून दुखावल्याचा माझा हेतू नव्हता आणि तो कधीही नसेल. नीलकांत, मिपासाठी तुम्ही जे करत आहात त्याबद्दल कायम आदर आहेच. आणि मिपा मलाही तितक्या जवळचं आहे म्हणूनही झाल्या प्रकारचं जास्त वाईट वाटत असेल.
अशीच गोष्ट आधीही माझ्या सोबत आकाशवाणी माध्यमातून झाली आहे, तेव्हा शाळेत लिहिलेली नाटिका हस्तलिखितातून परस्पर कोणीतरी घेऊन, कलाकारांसोबत ती बसवून आकाशवाणीवर प्रकाशित केली होती. त्यामुळे याचं दुःख मी ओळखून आहे.
तुम्हाला अंकाची किंमत किंवा मिपाचा खर्च याबाबत दुखावण्याचा कधीही हेतू नव्हता. तसा गैरसमज झाला असेल तर क्षमा असावी.
एक सजेशन फक्त होतं की वेळेअभावी असं होण्याच्या शक्यता असतील तर वेगळ्या एखाद्या सणाच्या दिवशी छापील अंक प्रकाशित केला असता तरी सगळ्या वाचकांनी तेवढ्याच आनंदाने तो डोक्यावर घेतला असता जेवढा आता घेतला आहे.
_/\_
11 Nov 2019 - 12:06 am | जॉनविक्क
प्रिंटिंग मिस्टक इज नॉट वांगमयचौर्य.
जिथे भले भले प्रकाशन समूह प्रोजेक्ट्स कमालीच्या व्यावसायिकतेने राबवून माती खाता आणी नंतर करेक्शन जाहीर करतात तिथे पहिल्या हौशी प्रयत्नात होणारी गफलत आपण समजून घ्यावी.
आता करायच्या गोष्टी ह्याच की
अजून एक आवृत्ती निघणार असेल तर चूक सुधारा व झालेल्या चुकीची जाहीर माहिती त्यात द्या.
पुढील दिवाळी अंकात सदरील चूक झाल्याचे नमूद करून त्यात लेखिकेची माफी मागा.
शक्य असेल तर अजून एक प्रत संबंधितांनी स्वखर्चाने चुकीची दुरुस्ती करून लेखिकेला संग्रहासाठी भेट म्हणून द्यावी.
11 Nov 2019 - 8:04 am | पाषाणभेद
तसे करण्यापेक्षा त्यांच्या लेखाखाली आलेल्या दुसर्या नावाचे एक पान पुन्हा छापून अन त्याला प्रस्तावना म्हणून दिवाळी अंकाच्या संपादकांच्या सहीनिशी त्यांना पाठवून द्यावे. कोमल यांनी ते पत्र असलेले पान त्यांच्या हाती असलेल्या अंकामध्ये डकवून घ्यावे.
दुसरे असे की ऑनलाईन अंकामध्ये कोमल यांचा जो धागा आहे त्याच्या सुरूवातीलाच ऑफलाईन अंकात झालेली गफलत जाहीर करावी. दिलगीरी व्यक्त करावी.
तसेही हा अंक माहितीतल्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त वितरीत झाला आहे. ते बहुतेक येथील सदस्य असावेत. त्यामुळे ऑनलाईन अंकामध्ये ते हा खुलासा वाचतीलच. अन दुसरे नाव असलेले सदस्य कॉपीराईट घेणार नाहीत. तेवढा सुज्ञपणा येथील सदस्य दुसर्या सदस्याप्रती दाखवतातच.
अंक खूप घाईत तयार केला आहे. वेळ, किंमत यांची सांगड घालत अन त्यांचा खाजगी वेळ या अंकासाठी मिपा तसेच अंकाच्या व्यवस्थापन सदस्यांनी यात घातला आहे. त्यांचे कौतूक आहेच. मोठ्यामोठ्या दिवाळी अंकांच्या प्रकल्पात तृटी असू शकतात. आता हार्डकॉपीतली चूक दुरूस्त करणे शक्यच नाही पण त्याबाबतचा खुलासा इतरत्र होवू शकतो.
11 Nov 2019 - 8:56 am | जॉनविक्क
एकच पान छापून मूळ मिपा अंक उसवून तो परत जोडून लेखिकेला द्यावा असा विचारही आला होता खर्च वाचवा म्हणून परंतु ते मला अंप्रोफेशनल वाटले. हौशी असले तर मंडळाने केलेली चूक काय मोलाची आहे हे समजून येण्यासाठी आख्खी एक प्रतच परत छापणे मला योग्य वाटले ज्यामुळे प्रथम आवृत्तीची सर त्याला कायम राहील.
11 Nov 2019 - 8:58 am | जॉनविक्क
म्हणून एक मिपाकर या नात्याने मला शरमही वाटते
11 Nov 2019 - 11:59 am | कोमल
प्रत्येकाच्या व्यक्त होण्याच्या, मतप्रदर्शन करायच्या मर्यादा असतात, किंवा कधी कधी बाकी काहो कारण असू शकते.
तुम्ही, पाभे, गड्डा झब्बू यांनी आपले मत व्यक्त केले त्याबद्दल छान वाटत आहे.
जाता जाता हॅरी पॉटर मधील एक संवाद आठवला, जिथे नामांकित पत्रकार रिटा स्किटर हॅरीची मुलाखत ल्युना लवगुडच्या वडिलांच्या मासिकात छापणार असते. ल्युना रिटा ला सांगते, "Daddy don't pay people to write for the magazine. They do it because it's an honour. And ofcourse to see their name in print."
माझीही तेवढीच अपेक्षा होती. To see my name in print. असो. :)
20 Nov 2019 - 8:55 pm | जॉनविक्क
पण मी फार आळशी माणूस आहे. आपण खरोखर आपल्या नावानिशी एक अंक छापून घ्यावा असे माझे प्रांजळ मत आहे त्यामधे दिलगिरी पत्रही छापून घ्यावे. जेंव्हा जेंव्हा संबंधीत मिपाकरांची भेट होईल त्यांची प्रत्यक्ष सही तेथे अवश्य घ्यावी. त्या अंकाचा खर्च मी करायला तयार आहे आपले ऑनलाइन ट्रान्सफर डिटेल्स व्यनीमधून कळवावेत.
11 Nov 2019 - 6:16 pm | स्मिताके
यापैकी काही करता येईल का?
पूर्वी "आहे मनोहर तरी" ची विक्री झाल्यानंतर आणखी चार पानं प्रकाशित झाली होती, आणि इच्छुकांनी पावती दाखवून ती घेऊन जावी असं निवेदन वृत्तपत्रांतून छापलं गेलं होतं, असं आठवतं. तसंच काहीसं सुचवते. सुधारित अनुक्रमणिका आणि दिलगिरी पत्र अशी एकत्रित पीडीएफ करून ती मिपाच्या सर्व सदस्यांना ईमेलद्वारे पाठवता येईल, मिपा संस्थळावरही दिवाळी अंकाबरोबर कायमस्वरूपी उपलब्ध ठेवता येईल. अजून काही अंक विकले गेले नसले तर त्या अंकांबरोबर तेवढं एक पान छापील स्वरूपात देता येईल.
11 Nov 2019 - 12:54 pm | शुभां म.
कालच आणला सुकृत प्रकाशनच्या ऑफिस मधून बाबांसाठी .
दिवाळी अंकाप्रमाणे मिसळपावचे काही निवडक लेखमाला पण मिळतील का छापील स्वरूपात ?
सतत ऑनलाईन वाचवत नाही म्हणून मी प्रिंट काढून वाचायचा प्रयत्न केला पण छापील पुस्तकच बरे वाटते वाचायला.
16 Nov 2019 - 2:14 am | गड्डा झब्बू
ते कोमल ताईंच्या बाबतीत झालेल्या गडबडी बाबत काही खुलासा होईल का? की पुढील वर्षीच्या अंकात देणार आहात ? म्हणजे पुढच्या वर्षी विचारावा म्हणतो..
20 Nov 2019 - 8:39 pm | सुमो
ज्जे बात ! जियो मनिष....
आणि कोमल यांनीही तितक्याच खुल्या मनाने पुढील अंकासाठी दिलेल्या शुभेच्छा पण भावल्या..
आभार दोघांचेही आणि पुढील दिवाळी अंकात तुम्हा दोघांचेही लेख वाचायला आवडतील.
(वाचक) सुमो