Skip to main content

मिपाचा पहिलावहिला छापील दिवाळी अंक

लेखक प्रशांत यांनी बुधवार, 23/10/2019 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
झैरात झैरात झैरात 1 मंडळी, कळविण्यास अत्यंत आनंद होतोय की आपल्या लाडक्या मिपाचा पहिलावहिला छापील दिवाळी अंक उद्या आपल्या भेटीस हजर होतोय. आपला पहिलाच प्रयत्न असल्याने मर्यादित प्रती छापण्यात आल्या आहेत. अधिक माहितीसाठी आणि आपली प्रत राखून ठेवण्यासाठी मिपावर प्रशांत ला व्यनि करा किंवा prashaant.tayade@gmail.com येथे थेट संपर्क साधा. ऑनलाईन अंकापैकी निवडक लेख, दोन-तीन एक्स्क्लुसिव्ह कंटेंट आणि मिपावरची काही गाजलेली दर्जेदार पूर्वप्रकाशित गाळीव रत्नं असा हा संग्रह आहे. मुख्यतः स्मरणिका म्हणून संग्रही ठेवण्यासाठी. विशेषतः पहिला अंक, आणि कदाचित अग्रणी मराठी संकेतस्थळांपैकी छापील अंकाचा पहिलाच प्रयोग यासाठी या अंकाचं महत्त्व असेल.

वाचने 58985
प्रतिक्रिया 88

प्रतिक्रिया

साधारण कधी उपलब्ध होईल? माझ्या करता प्रत नक्की राखुन ठेवा मिपाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो ही सदिच्छा... पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

या दिवाळी अंक छापण्याच्या कटात अनेक जण सामिल असतील. त्या टोळीने अंक छापताना आलेल्या अनुभवांचा एक धागा काढावा. या कल्पनेच्या उगमा पासून ते अंकाच्या वितरणापर्यंत झालेला प्रवास नक्की रोचक असेल यात काहीच शंका नाही. पैजारबुवा,

In reply to by हेमंतकुमार

ऑनलाईन अंकापैकी निवडक लेख, दोन तीन एक्सकलुसिव्ह कंटेंट आणि मिपावरची काही गाजलेली दर्जेदार गाळीव रत्नं असा हा संग्रह आहे. मुख्यतः स्मरणिका म्हणून संग्रही ठेवण्यासाठी. विशेषतः पहिला अंक, आणि कदाचित अग्रणी मराठी संकेतस्थळांपैकी छापील अंकाचा पहिलाच प्रयोग. यासाठी या अंकाचं महत्व असेल.

मिपाचा पहिला वहिला छापील दिवाळी अंक! खूप खूप अभिनंदन. अत्यंत आनंदाची बातमी. व्यनी पाठवला आहे.

छापील अंक हे एक उत्तम सरप्राईझ ठरले. माझ्या साठी प्रत राखून ठेवण्यासाठी व्यनि पाठवला आहे. शुल्क किती ते कळवले तर भरण्याची व्यवस्था करतो.

अरे वा! छान बातमी आहे की! माझीही प्रत राखून ठेवावी हि विनंती. व्यनी करतोच आहे. अ‍ॅक्सेस डिनाय म्हणतो आहे. ईमेल करतो आहे मग. पैसे कसे द्यायचे ते सांगणे.

In reply to by mayu4u

ऑनलाईन आहेच की अंक. आणि अ‍ॅप मध्ये जास्त वेगळेपण असू शकत नाही. कंटेट तेच राहणार. प्रेझेंटेशन बदलेल फार तर. अन कागदावरचा दिवाळी अंक घरी आणणे असे बहुदा मराठी समूदायातच होत असावे. त्यामुळे हार्डकॉपी अंक समर्थनीय आहे. रच्याकने, चुलीवरची मिसळ हा हाईप केलेला प्रकार आहे. चव धुरकटलेली असू शकते काय? :-)

अरे वाह, मिपाच्या छापील दिवाळी अंकाची संकल्पना अभिनव आहे. छापील प्रति संपल्यानंतर काही कालावधीने किंडल प्रतही उपलब्ध करावी ही सुचवणीवजा विनंती.

In reply to by श्रीरंग_जोशी

अरे वाह, मिपाच्या छापील दिवाळी अंकाची संकल्पना अभिनव आहे. छापील प्रति संपल्यानंतर काही कालावधीने किंडल प्रतही उपलब्ध करावी ही सुचवणीवजा विनंती.
अगदी असेच! ह्या कल्पनेला कृतीत उतरवणार्‍या मंडळींचे हार्दिक अभिनंदन आणि आभार!!

मिपाचे पहिल्या वहिल्या छापील दिवाळी अंकाचे मनःपूर्वक अभिनंदन. कोऱ्या कागदाचा सुवास घेत अंक वाचण्याची मजा औरच. प्रत राखून ठेवतच आहे.

माझीही प्रत राखून ठेवावी हि विनंती. व्यनी करतोच आहे. अ‍ॅक्सेस डिनाय म्हणतो आहे.

की फक्त वाचायला छापील कागद ;) राशी भविष्यकार कोण आहेत ? युयुत्सु जी ? मुखपृष्ठ अत्यन्त सुरेख

किंमत अकाउंट क्रमांक वगैरे मिपावर वा sudhir.kandalkar@gmail.com वर कळवणे किंवा मुंबईत/पुण्यात उपलब्ध असल्यास स्टॉकिस्टचे नावपत्ता देणे. २. अभिनंदन. मुखपृष्ठ छान दिसते आहे.

काय काय आहे हे सद्यांत देता येईल का? ऑनलाईन अंकापैकी निवडक लेख, दोन तीन एक्सकलुसिव्ह कंटेंट आणि मिपावरची काही गाजलेली दर्जेदार गाळीव रत्नं असा हा संग्रह आहे. ह्यावरून काही कल्पना येत नाही. नाही, मिपावर सगळेच लेखन दर्जेदार असतेच. फक्त काही पर्सनल फेव्हरेट्स असले तर कळावे म्हणून विचारतोय, जर इथे चालणार नसेल तर व्यनित सांगा, जर अगदीच गुपित ठेवायचं असलं तर मात्र बघा कसं काय सोयीचं पडतं ते...

उपक्रमास अनेक शुभेच्छा आणिक अभिनंदन. प्रशांत यांना व्यनि जात नसल्याचे अनेक जणांनी लिहिले आहे. त्यांच्यासाठी... प्रशांत यांना व्यनि करा.

एक नंबर !!!! मलाही अंक हवा आहे. व्यनी केला आहे. कृपया बाकी माहिती (किंमत, अंक कुठे मिळेल वगैरे) इथे टाकावी हि विनंती

व्यनी जात नाही. आपल्याला मेल पाठवली आहे. कृपया माझ्यासाठी एक कॉपी राखून ठेवा. बंगळुरला पाठवाल का?

हे तर ब्येष्टच झालंय! व्यनि केलाय सर! कृपया प्रत राखून ठेवावी माझ्यासाठीही. :-) बाकी नंतर किंडल प्रत काढण्याच्या जोशीसरांच्या सुचनेशी त्रिवार सहमत! अंक मिळणार कसा आणि कधी याबद्दल उत्सुकता आहे. जर काही ठरलं नसेल तर एक कट्टा करून त्यात हा अंक वाटता आला असता.. अंकाचं विमोचनही झालं असतं आणि कट्टाही झाला असता. अर्थात् दिवाळीच्या धामधुमीत ते शक्य नाही हे मान्य. पण जर प्रत दिवाळीनंतर मिळाली तरी हरकत नसावी कुणाची. :-)

In reply to by इरसाल

एका द्विपादास एकंच अंक मिळेल! -हुकुमावरून टीप : दोन अंक मिळणार असतील तर मी स्वत:स इरसालपणे चतुष्पाद म्हणून घोषित करावे का ? ;-) -गा.पै.

मालक, माझ्यासाठीही एक अंक राखून ठेवावा ही विनंती. मिपाच्या पहिल्या दिवाळी अंकाचे स्वागत. मिपाचे पाऊल असेच सदैव पुढेच पडत राहो ही सदिच्छा! सं - दी - प

एक करता येवू शकते. एक शेवटची तारीख ठरवा. येथेच कळवा. अन त्या तारखेपर्यंत बुकींग घ्या. आधी पैसे घ्या. ( ते महत्वाचे आहे. परमार्थ नंतर.) तेवढ्या प्रती छापा. (आणि खूप विलंबही नको.) अन मुंपुठानानाको ( मुंबई-पुणे-ठाणे-नाशिक-नागपूर) असा हब करा. त्या त्या ठिकाणच्या मिपाकराला तेवढ्या प्रती पाठवा. (नाशकात मी जबाबदारी घेईन अन अंक द्यायला त्यांच्या घरीही जाईन (अन दिवाळीचा फराळ हादडेन!)) तो मिपाकर इतरांशी संपर्क करून एकमेकांत बोलणे होवून अंक हातोहात देतील. आणि मिपाकरांच्या दिवाळी अंकाच्या हार्डकॉपीची पहिली खेप असल्याने मिपाकर तेवढे सहकार्य करतील. बघा. कसं जमतंय ते!

सांगलीत असलेल्या मिपाकरांसाठी ५ प्रती खालील दुकानात ठेवल्या आहेत. आदर्श न्यूजपेपर एजन्सी, विश्रामबाग चौक, सांगली इथून त्या खरेदी करता येतील.

In reply to by प्रचेतस

अरे! ज्यांनी मागणी केली त्यांना द्या ना! दुकानात तर कुणी इतरही खरेदी करेल अन मग (सांगलीतल का होईना) ज्यांनी मागणी केली त्यांना भेटणार नाही. वर माझ्या प्रतिसादात कसे न्याय्य वाटप करावे ते लिहीले आहे. मिपावरील लोभाने सभासद झळ सोसून एखाद्या सभासदाकडून घेवू शकतील.

In reply to by पाषाणभेद

ज्यांनी मागणी त्यांना मिळणारच आहेत. एका मिपाकरांनी सांगलीमार्गे बाहेरगावी जाता जाता तिकडील मिपाकरांच्या सोयीसाठी अंक तिथे ठेवले आहेत.

In reply to by प्रचेतस

मग नाशिकचे किती अंक आहेत? माझ्याकडे द्या पाठवून. मी वितरीत करेन.

In reply to by प्रचेतस

अरे पुण्यातल्यांनी कुठून घ्यायचे? कट्टाही रद्द झाला ना भौ... :-)

In reply to by जॉनविक्क

तुम्हीच शिवधनुष्य हाती धरा अन वाचकरूपी सितेच्या प्रतिसादांना वरा.

मिपाचे दिवाळी अंक प्रशांतकड़े पोहोचले आणि वितरणाचं प्लानिंग करतच होतो की त्यांच्या नात्यात असलेल्या जवळच्या व्यक्तिबद्दल दुःखद गोष्ट घडली म्हणून प्रशांतला तातड़ीने गावी जावे लागले त्यामुळे अनेकांना अंक मिळायला उशीर झालाय. प्रशांत आला की पुन्हा नव्याने अंक कसे पोहोचतील यासाठी प्रयत्न करूत , आपण दिलेला प्रतिसाद खुप मोठा आणि उत्साह वाढवीणारा आहे म्हणून ही पोच. Thanks All -दिलीप बिरुटे

कारण इथे दिल्याबद्दल आभारी आहे. जर काही आकस्मात घडलं तर नाईलाज असतो. सर्वांनाच उत्सुकता आहे आणि मर्यादित प्रती छापल्या म्हणताना आपल्याला मिळेल की नाही याची हुरहुर आहे, बाकी अंक चार दिवस उशीराने आला म्हणून हरकत नाही

आत्ताच प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सरांच्या हस्ते मिपाचा पहिलावहिला छापील दिवाळी अंक मिळाला. सरांना भेटण्याची पहिलीच वेळ होती. खरं म्हणजे कोणत्याही मिपाकराला पहिल्यांदा भेटत होतो. खूप छान वाटले भेटून. वैयक्तिक कारणाने सरांकडे जास्ती वेळ नसल्याने अल्प मुलाखत झाली. निवांत भेटण्याच्या अटीवर सरांनी निरोप घेतला. आता आरामात वाचेन. पहिल्या अंकाचा साक्षीदार झाल्याने प्रसन्न वाटतंय. या अंकासाठी मेहनत घेतलेल्या सर्व मिपाकरांचे आभार... बिरुटे सरांचे परत एकदा हृदयस्थ आभार.

In reply to by गुल्लू दादा

गुल्लुदादा,आपणास भेटून मलाही खुप आनंद झाला. आज ज़रा गड़बड़ होती, फार वेळ बोलता आले नाही. पण तुम्ही मिपाकरमित्र म्हणून मला आवडलात, आपण जानेवारी नंतर दोघे मिळून कट्टा आयोजित करू जे येतील ते येतील ते येतील. नाय आले तर नाय आले आपण दोघे फिरू. अंक आवडला ?? -दिलीप बिरुटे

आज सकाळी दहा साडेदहाच्या सुमारास पुण्यात अक्षरधारा, बाजीराव रोड येथे येत आहे, मजकडे २/३ प्रती असतील, इच्छुक मिपाकरांनी त्या सुमारास तेथे आल्यास दिवाळी अंक देणे सोयीचे ठरेल.

अंक मिळाला, ऑनलाईन अंकाप्रमाणेच छापील अंकही सुरेख झालाय. ह्यासाठी मेहनत घेणार्‍या सगळ्याच टीमचे मनापासून आभार. __/\__

मिपा छापील दिवाळी अंकासाठी माझा लेख निवडला गेल्याचा व्यनि संपादकांनी पाठवला तेव्हा फार आनंद झालेला. अंकाबाबत उत्सुकता होती. छापील अंक प्रदर्शित झाल्यानंतर त्यात असलेल्या चुकांबाबत चर्चा पण सुरू झाली. पहिल्याच अंकात काना, मात्रा च्या चुका असतील तर विशेष नाही असा माझा विचार होता. पण छापील अंक हातात पडताच एक गोष्ट लक्षात आली. माझा लेख दुसऱ्याच लेखकाच्या नावाने छापला आहे. फक्त अनुक्रमणिकाच नाही तर मुख्य लेखाच्या खाली सुद्धा माझे नाव नाही. फार निराशाजनक चूक. जबाबदारी कोणाची? आणि लेखात बदलाचे हक्क संपादक मंडळाला दिले होते, लेख दुसऱ्याच्या नावावर छपाईचे नाही. प्रूफ रिडींगला पार फाट्यावर मारल्याचे दिसत आहे. काना, मात्रा, उकार वगैरेंच्या चुका इथे निर्देशनास आणून दिल्या जातात, या छापील चुकांचे काय?

In reply to by कोमल

या अंकात आपल्या लेखाबाबत ही गंभीर चूक झाली आहे. याखेरीज एक दोन लेखांत ऑनलाइन इमेज urlचे शब्द इमेजसोबत राहून गेले आहेत. शुद्धलेखन चुका मात्र अगदी किमान असतील असा प्रयत्न केला आहे. आपण उल्लेख केलेल्या चुकीबाबत कोणतीही कारणे देणं किंवा सारवासारव करणं याला अर्थ नाही. या अंकाची व्यवस्था बघणाऱ्या टीमचा सदस्य म्हणून या चुकीची जबाबदारी माझ्यावर आहे. मी आपली बिनशर्त जाहीर माफी मागतो. यापुढे अधिक काळजी नक्की घेऊ.