आतुरली यामिनी ही
उमलुनी पाकळ्यांना
मातलेल्या चांदण्याही
योजती बाहुपाशांना ।।१।।
गोडी जणु अमृताची
प्रसवे नभातुनी या
जोडी झुरे चातकांची
प्राशण्या ती शुभ्रमाया ।।२।।
अपूर्णता साहवेना
शश शोभे शशीदेहीं
काया छायेत मावेना
पूर्णता ये तिथीलाही ।।३।।
पौर्णिमेचा चांद भोळा
मनामनां मोहणारा
लाजताना तोळातोळा
कोजागिरी लुटणारा ।।४।।
प्रतिक्रिया
14 Oct 2019 - 10:09 pm | गणेशा
वा वा .. मस्त लिहिले आहे
आतुरली यामिनी ही
उमलुनी पाकळ्यांना
मातलेल्या चांदण्याही
योजती बाहुपाशांना
17 Oct 2019 - 9:51 pm | यशोधरा
कविता आवडली.
17 Oct 2019 - 10:00 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
क्या बात!! सुंदर