कोजागिरी
लेखनविषय:
आतुरली यामिनी ही
उमलुनी पाकळ्यांना
मातलेल्या चांदण्याही
योजती बाहुपाशांना ।।१।।
गोडी जणु अमृताची
प्रसवे नभातुनी या
जोडी झुरे चातकांची
प्राशण्या ती शुभ्रमाया ।।२।।
अपूर्णता साहवेना
शश शोभे शशीदेहीं
काया छायेत मावेना
पूर्णता ये तिथीलाही ।।३।।
पौर्णिमेचा चांद भोळा
मनामनां मोहणारा
लाजताना तोळातोळा
कोजागिरी लुटणारा ।।४।।
वाचने
2090
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
वा वा .. मस्त लिहिले आहे
कविता आवडली.
व्वाह