जाईची कळी सायंकाळी उमलली
रात्र सुगंधी करण्या काळोखी जागली
वार्यांच्या मंद झुळकेने लाजली
दवबिंदुंच्या स्पर्शाने शहारली
चंद्रप्रकाशी पुलकीत झाली
रातराणी सखी जाहली
पक्षांच्या भुपाळी त डोलली
केशरी किरणांच्या कुशीत शिरली
अलगद परडीच्या कडेवरून
धन्य झाली इश्वरचरणी अर्पुन.
प्रतिक्रिया
24 Mar 2009 - 11:41 am | मृगनयनी
जागु.... तू ग्रेट्ट्ट्ट्ट आहेस!
किती सुन्दर वर्णन कर्तेस गं "जाई" चं...
खूप सुन्दर!!!
:)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
24 Mar 2009 - 2:25 pm | दशानन
24 Mar 2009 - 11:53 am | सँडी
प्रत्येक शब्द न् शब्द मस्तच!
24 Mar 2009 - 3:11 pm | सूहास (not verified)
तुमच्या साध्या,सोप्या सरळ भाषेत येणार्या प्रत्येक कवितेस आमचा सलाम!!!
केशरी किरणांच्या कुशीत शिरली
झकास...
सुहास..
(द गुड)
24 Mar 2009 - 7:24 pm | क्रान्ति
जाईच्या कळीसारखीच नाजूक आणि सुगन्धी कविता खूप आवडली.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
24 Mar 2009 - 8:40 pm | प्राजु
नाजूक कविता.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
24 Mar 2009 - 8:42 pm | मीनल
आवडली कविता.
मीनल.