भंडारदरा

vcdatrange's picture
vcdatrange in जनातलं, मनातलं
22 Sep 2019 - 11:30 am

भंडारदराला जेव्हा कधी जाणं झालयं प्रत्येकवेळी काहीतरी नविन विषय वळवळतो डोक्यात. मागे प्रवरा मेडिकल ट्रस्ट करिता आदिवासी आरोग्याच्या उपक्रमांची आखणी, नियोजन केले होते. त्यातले एक प्रोडक्ट होते "मोटारसायकल अॅम्ब्युलन्स". अहमदनगर जिल्ह्यात, विशेषत: भंडारदरा धरणक्षेत्रातील काही दुर्गम, अतिदुर्गम गावं जेथे रस्तेच काय पण पायवाटाही नाहीत, अशा ठिकाणच्या नागरिकांना आपत्कालीन प्रसंगी वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी आणि त्यांच्या जीवावरचे संकट टळावे, या हेतूने या मोबाईल रुग्णवाहिका प्रस्तावित केली.


Ambulance

"आदिवासी आरोग्य राष्ट्रीय संमेलनाच्या" निमित्ताने आता प्रत्यक्षात आलेले विविध आरोग्य उपक्रम अटेंड करुन मी आपलं परतीला निघालो होतो. कळसुबाईपर्यंत आलो तर फोन आला की कार्यक्रमाला पाहुणे म्हणुन आलेल्या प्रशासकिय अधिकार्‍यांना बोलायचं आहे, भेटायला या!

मग परत गेलो, तर तिकडे साम्रद गावातील काही अोळखीचे ट्रेकिंगची व्यवस्था करणारे स्थानिक मुलं अगोदरच थांबलेली होती. त्यांनी विनंती केली की आमचीही भेट घालुन द्या साहेबांची.

मग संधान व्हॅलीत येणारे ट्रेकर्स, त्यांची Hospitality Managment आणि या स्थानिक मुलांना प्रशिक्षक देवुन आणि गिर्यारोहणाचे सर्व साहीत्य पुरवुन गावातल्या गावात नविन व्यवसाय कसा सुरु होईल. संपुर्ण गाव प्रदुषण मुक्त , प्लास्टिक फ्री ठेवण्यासाठी काय करता येइल याच्यावरच चर्चा झाली.

वनविभागाच्या अधिकार्‍यांनी "काजवा महोत्सवाच्या" उपक्रमातुन आठ लाख रुपयाचे उत्पन्न मिळाल्याचे सांगुन पाठ थोपटुन घ्यायला सुरुवात केली. पण खरं चित्र वेगळचं आहे. काजवा महोत्सवात चालणाऱ्या धुडगुसामुळे तिथे फ्लॅस्टिकच्या बाटल्यांचा कचरा वाढला आहे.

आपला एकंदरच सोशल कोशंट गंडलेला असल्यानं वैयक्तिक आयुष्यात बाळगत असलेली नैतिक तत्वे आपण झुंडीत आलो की गुंडाळुन ठेवतो. स्वच्छता, पर्यावरण यासोबत जैवविविधता याची काळजी घेणे आवश्यक आहे नाही तर बाकीच्या ठिकाणांसारखे ईथेही वाट लागायची हीच मोठी भिती आहे.

येणार्‍या पर्यटक तसेच ट्रेकर्सला दर्जेदार सेवा उपलब्ध करुन देण्याच्या क्षमता बांधणी या स्थानिक आदिवासी युवकांमध्ये करण्याकरीता वनविभाग आणि आदिवासी विकास विभाग फंड्स द्यायला तयार आहेत. पेसा ग्रामपंचायत असल्यानं त्यांना स्थानिक कर आकारणी वैग्रे करुन बाहेरुन येणार्‍या सर्विसेस वर नियंत्रण ठेवता येईल. हे सगळं मोनोपली साठी नसुन त्यातुन जैव विविधता संवर्धनासोबतच उपजिविकेचे नवनविन पर्याय शोधणं, जेणेकरुन आदिवासी क्षेत्रातील शापित स्थलांतर टळुन गावाचा विकास व्हावा या समेवर ही भेट झाली. ©

डॉ. वैभव कीर्ति चंद्रकांत दातरंगे
सामाजिक आरोग्य सल्लागार
नाशिक 9422292335

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

भीडस्त's picture

22 Sep 2019 - 1:40 pm | भीडस्त

मनापासून शुभेच्छा.

जालिम लोशन's picture

22 Sep 2019 - 2:15 pm | जालिम लोशन

गुडलक!

छान उपक्रम.

*तुम्ही दिलेला फोटो लिंक थोडी दुरुस्त करुन.

यशोधरा's picture

22 Sep 2019 - 5:24 pm | यशोधरा

शुभेच्छा!

दुर्गविहारी's picture

22 Sep 2019 - 5:41 pm | दुर्गविहारी

साहित्य संपादक मदत करुन फोटो अपलोड करतील व वाचकांना अतिशय देखणे फोटो बघायला मिळतील अशी आशा करतो.
बाकी धागा आणि कार्य यांना सलाम !

फुटूवाला's picture

22 Sep 2019 - 11:39 pm | फुटूवाला

शुभेच्छा!!

तुमची #रंगपेटी #सुखवार्ता पण येउद्या इकडे__/\__

श्वेता२४'s picture

23 Sep 2019 - 11:08 am | श्वेता२४

शुभेच्छा

अल्पिनिस्ते's picture

5 Nov 2019 - 3:37 pm | अल्पिनिस्ते

मनापासुन शुभेच्छा !