भाग १ जब वी मेट
काही दिवसापुर्वी म. टा. मधे जब वी मेट या सदरासाठी काही जीवनात घडलेल्या आठवणी लिहा म्हणून म्हटले गेले होेते. तो लेख पाठवून आता महिना झाला. कदाचित ते छापतील असे नाही असे वाटून इथे सादर करत आहे.
अचानक भेटीनंतर त्या एकमेकांचे जीवन कसे बदलले. हे सांगणाऱ्या आवडत्या सिनेमाची आठवण आली म्हणून चित्र सादर -
*कुठे कुठे शोधले नाही तुम्हांस!*
नाशिक येथे एका स्नेह्यांच्या चिरंजीवांच्या विवाह सोहळ्यात स्नेह भोजनासाठी वाट पाहत असताना एक जण सुगंधी तेलातील काही वस्तू आकर्षक पाकिटातून विकत होते. माझ्या पर्यंत त्यांच्या वस्तू हातोहात संपल्या. जवळपास राहात असल्याने 'आत्ता आणतो' म्हणून ते गायब झाले. बराच वेळ झाला ते का आले नाहीत म्हणून एकांनी मला बाईकवरून त्यांच्या घरी नेले. नेमके कोणी घरी भेटायला आल्यामुळे ते पटकन येऊ शकले नव्हते. मी पटापट पैसे देऊन सुगंधी पॅकेट घेऊन परतताना ते म्हणाले, 'आपले नाव नाही कळले? मी माझे नाव सांगितले. तेव्हा त्यांनी माझा हात हातात घट्ट धरून म्हटले, 'विंग कमांडर शशिकांत ओक? प्रत्यक्ष माझ्या घरी चालत आलेत? माझा डोळ्यावर विश्वास होत नाहीये हो!'' अहो तुम्हाला भेटायला मी काय केले नाही? पुस्तकातील पत्ते, फोन नंबर शोधून वरून मुंबई, नाशिक मधून खेटे मारले. तुमच्या कोरेगाव पार्क मधील फ्लॅटवर चकरा मारल्या. पण तुमची गाठ पडली नाही! आणि आज तुम्ही माझ्या घरात आपणहून मला भेटायला आला आहात! काय हा योगायोग!'
'असे काय कारण होते म्हणून तुम्ही मला शोधत होतात?' मी थक्क होऊन विचारले. यावर ते म्हणाले, 'तुमचे 'नाडी भविष्य - एक चक्रावून टाकणारा चमत्कार' पुस्तक वाचून होतो. चेन्नईच्या शंकर नेत्रालयात डोळ्याला इजा होऊन ठार अंध झालेल्या मित्राचा सहकारी म्हणून आलो होतो. तज्ज्ञांनी त्याला दृष्टी येणे शक्य नाही असे म्हटल्यावर विषण्ण होऊन मरीना बीचवर फिरत होतो. तेंव्हा तांबरम गावातील नाडी केंद्रात तुम्ही नाडी भविष्य पाहिल्याचे आठवले. तिथे मित्राची पट्टी मिळाली. 'अंधत्व आल्याने जीवनात अंधार वाटून तुला तुझा मित्र भविष्य पहाण्यासाठी घेऊन आला आहे! 'काळजी करू नकोस. सांगतो ती शांती-पूजा कर. कठीण शस्त्रक्रिया पार पडून पुन्हा दिसायला लागेल. नंतर तू हे विसरूनही जाशील की तुला पूर्ण अंधत्व कधी आले होते म्हणून!'
माझ्या मित्राला दृष्टी मिळून तो पुन्हा आनंदी जीवनयापन करू लागला. नाडी भविष्यातील ते कथन वेळीच ऐकून शांती-पुजा करून झाल्याने आम्हाला अगस्त्य महर्षींनी जो मानसिक आधार दिला. त्यामुळे त्यांचे आभार मानायचे होते. अगस्त्य महर्षींना भेटणे तर शक्य नाही. आपल्या पुस्तकातील माहितीमुळे नाडी महर्षींचे मार्गदर्शन शक्य झाले. हे सर्व आपल्याला प्रत्यक्ष भेटून सांगायचे होते म्हणून आपला शोध घेत फिरलो. निराश होऊन नाद सोडून दिला. मुंबईतील नोकरी सोडून नाशिकमध्ये हा व्यवसाय सुरू केला. आणि आज अचानक तुम्ही मला शोधत माझ्या घरी आला आहात...! माझा हात हातात धरून गहिवरत ते बोलत होते.
माझ्या डोळ्यातून अश्रु वाहात होते. 'हे महर्षी, आपली लीला अगाध आहे! योग्य वेळ आली की अशक्य ते शक्य करायला तुम्ही प्रेरित करता! जीवनात निराशा, असंतोष असेल तर तो दूर करता! उच्च विचारांच्या कार्याला प्रोत्साहन देता! आपल्याला प्रणाम!' मित्रा, तू हे कथन प्रामाणिकपणे सांगत आहेस ते ठीकच आहे. मी शोधक वृत्तीचा असल्याने सर्व घटना ज्यांच्या संदर्भात झाल्या त्यांच्याकडून ऐकून घटनेची खात्री करून घेणे मला आवश्यक वाटते. तुम्ही मला त्यांचा मो क्र देता का?
...
... 'हॅलो, आपण कोण?... बरं बरं बरं... हो तो मित्र माझा.... माझे शंकर नेत्रालयात ऑपरेशन झाले?... अं?... हो खरच की!... फार वर्षे झाली त्याला... आता मला व्यवस्थित दिसते. काहीच प्रॉब्लेम नाही! ....
*जब वी मेट* !
प्रतिक्रिया
5 Sep 2019 - 12:02 pm | जॉनविक्क
5 Sep 2019 - 2:43 pm | सर टोबी
आपल्या एक मिपाकरांना नाशिक रोडवर आल्याचे आठवते. त्यांनी एका गंभीर अपघातग्रस्ताला चांगली मदत केली. त्यामुळे भारावून जाऊन त्या अपघातग्रस्ताने मिपाकरांचा मोबाइल नंबर घेतला. पण बरं झाल्यानंतर आभार मानण्यासाठी फोन काही केला नाही. एकदा सहज आपल्या मिपाकरांनी त्या व्यक्तीला फोन केला तर पलीकडून अनोळखी नंबरवरून फोन आल्यासारखा तुटक बोलण्याचा अनुभव आला. इथेही ज्या मित्राला लेखक महोदयांबद्दल आपुलकी वाटली तितकी तीव्र भावना ज्याला स्वतःला अनुभव आला त्याला नव्हत्या. चालायचेच. अच्छे करम कर और दर्यामें डाल.
5 Sep 2019 - 7:28 pm | शशिकांत ओक
नाडी ग्रंथ भविष्यात जाणवते...
पती आणि पत्नीमधे एकाचे एक टोकाचे मत असते तर दुसर्याचे दुसर्या!
5 Sep 2019 - 5:34 pm | दुर्गविहारी
छान ! पुढचा भाग येउ द्यात.
5 Sep 2019 - 10:03 pm | शशिकांत ओक
मिळालेला प्रतिसाद पाहून पुढील भाग लवकर तयार करून सादर करतो.
5 Sep 2019 - 10:09 pm | तमराज किल्विष
खूप छान!! अत्तर वाल्यांचे नाव पत्ता देता येईल का. नाशिक ला जाणं येणं होत असते.
5 Sep 2019 - 11:12 pm | शशिकांत ओक
त्यांच्या अत्तरांचा गंध संपला नंतर त्या पाकीटांची घरच्यांनी सोईने विल्हेवाट लावली...
आता त्यांचे नाव आठवत नाही...ज्यांच्या मुलाच्या लग्नाला गेलो होतो ते ही आता नाशिकमधे राहात नाहीत. असो...
कदाचित शोध घेता घेता ते भेटतील ही ... जसा मी त्यांना बऱ्याच वर्षांनी अचानक भेटलो होतो...
5 Sep 2019 - 11:18 pm | तमराज किल्विष
धन्यवाद
6 Sep 2019 - 10:19 pm | सतिश गावडे
त्यांच्या मित्राची दृष्टी शांती-पूजा केल्याने आली की कठीण शस्त्रक्रिया केल्याने आली की दोन्हींच्या एकत्रित प्रभावाने आली?
रच्याकने, पुण्यात नाडी परीक्षा होते का? होत असल्यास कुठे होते? आणि महत्वाचे म्हणजे "दक्षिणा" किती द्यावी लागते?
6 Sep 2019 - 10:58 pm | जॉनविक्क
सांगतो ती शांती-पूजा कर. कठीण शस्त्रक्रिया पार पडून पुन्हा दिसायला लागेल.
म्हणजे शस्त्रक्रिया followed by Pooja से उन्हे राहत मिली हुई है ऐसा प्रतीत होता है.
6 Sep 2019 - 11:10 pm | सतिश गावडे
>> शस्त्रक्रिया followed by Pooja
याचा अर्थ "आधी शस्त्रक्रिया आणि मग पूजा" असा होतोना?
7 Sep 2019 - 12:13 am | जॉनविक्क
A is followed by B meaning A is After B
7 Sep 2019 - 12:21 am | जॉनविक्क
A, followed by B म्हणजे बी हा ए च्या नंतर आहे.
7 Sep 2019 - 5:24 pm | शशिकांत ओक
नमस्कार मित्रों, ज्यांना देशभरातील नाडी ग्रंथ भविष्य केंद्रांचे पत्ते हवे असतील त्यांनी 9881901049 वर रात्री ९ नंतर संपर्क साधावा. त्यांना त्यांच्या घराच्या आसपासचे ३ पत्ते फोन, मो क्र मिळतील. भेटीची वेळ, तारीख, फी, वगैरे त्यांच्या बरोबर बोलून ठरवावे.
7 Sep 2019 - 8:16 pm | शशिकांत ओक
नमस्कार मित्रों, ज्यांना नाडी ग्रंथ भविष्य केंद्रांचे पत्ते हवे असतील त्यांनी 9881901049 वर रात्री ९ नंतर संपर्क साधावा. त्यांना त्यांच्या घराच्या आसपासचे ३ पत्ते फोन, मो क्र मिळतील. भेटीची वेळ, तारीख, फी, वगैरे त्यांच्या बरोबर बोलून ठरवावे.
7 Sep 2019 - 9:33 pm | सतिश गावडे
>> त्यांच्या बरोबर बोलून ठरवावे.
Trucaller वर वरील भ्रमणध्वनी क्रमांकाची पडताळणी केली असता हा क्रमांक तुमचाच आहे असे कळले. "त्यांच्याबरोबर" म्हणण्यापेक्षा सरळ लिहायचे होते की माझ्याशी संपर्क करा.
काय काका, इथपासून खोटारडेपणा सुरु होत असेल तर ज्या पुढे ज्या गोष्टीची थोतांड म्हणून संभावना होते त्या गोष्टीवर तरी कसा विश्वास ठेवायचा? :)
7 Sep 2019 - 9:48 pm | जॉनविक्क
इथे ते म्हणजे ते नसून जे 3 घराजवळचे पत्ते, फोन वा मोबाइल नंबर तुम्हाला मिळतील तेथे बोलून घ्यावे असे वाटते. (अर्थात समजण्यात माझी चूकही होऊ शकते, उत्तरदायीत्वास नकार लागु.)
7 Sep 2019 - 11:11 pm | शशिकांत ओक
वाचून कसा अर्थ काढावा ही आपली चतुराईची आहे. मला संपर्क करून पत्ते मिळतील. नंतर तुम्ही नाडी केंद्र चालकांशी संपर्क करायचे सुचवले आहे.
जर थोतांड आहे असे वाटत असेल तर मग त्या वाटेला जाच कशाला?
9 Sep 2019 - 7:03 am | जॉनविक्क
त्यांना थोतांड वाटण्यापेक्षा थोतांड आहे हो अशी हाकाटी पिटण्यात फार रस दिसतो ;)