अशीच ही एक चीज असते ज्याला सत्य म्हणतात.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
23 Mar 2009 - 9:03 am

"सत्य हे सापेक्ष नसतं.ते व्यक्तिपरकही नसतं.ते कदाचीत दुग्राह्य असतं किंवा लपलेलं असतं.सत्याची उपेक्षा करावी असं कुणाला वाटेल ही.पण सत्य ही अशीच एक चीज आहे."

माझा हा वकिल मित्र पहिल्यापासून त्याच्या डोक्यामधे सत्याची सणक ठेवून आपल्या केसीस लढवायचा.मला वाटतं त्याच्या लहानपणापासून ही त्याच्यात म्हटलं तर खोड होती.तिचा फायदा त्याला त्याचा वकिली धंदा चालवताना बरेच वेळां उपयोगाला यायचा.
त्या दिवशी मी त्याला त्या पैजेची आठवण करून दिली.त्याचं खरं असून सुद्धा त्याला शंभर रूपये मिळाले नाहीत.ती गंमत मला त्याच्या तोंडून पुन्हा ऐकायची लहर आली.
मी त्याला म्हणालो,
"सत्याच्या मागे जाण्याची ही तुझी संवय तुला तुझ्या वकिली पेशात बरीच उपयोगी होत असेल."
मला म्हणाला,
" हो मला सत्याचा पाठपुरावा केल्याशिवाय चैन पडत नाही.ती पैज हरल्याचं अजून मला लागतं.पण त्यानंतर मी अयशस्वी झालो तरी सत्याचा पाठपुरावा सोडत नाही. "

मी काही तरी दहा वर्षाचा असेन.आमच्या शेजारच्या एका मुलाला जो माझ्यापेक्षा वयाने मोठा होता त्याला मी विचारलं,
"वेसावं हे ठाण्याच्या पश्चिमेला जास्त आहे की बोरिवली पश्चिमेला जास्त आहे?."
त्याचं म्हणणं बोरिवली.पण खरं उत्तर वेसावं आहे. त्याच्या उत्तराची त्याला इतकी खात्री होती की तो माझ्याशी पैज मारायला तयार झाला.
मला म्हणाला,
"लागली शंभर रूपयांची पैज"
मी घरातून नकाशा आणला.त्याकडे पाहून तो मला म्हणाला,
"हा नकाशाच चमत्कारीक आहे"
खरं तसं नव्हतं.
मी त्याला म्हणालो,
"अरबी समुद्राला उत्तर दक्षिण समांतर रेष काढलीस तर वेसावं,रेषेच्या समुद्राच्या बाजूला जास्त दिसतं.आणि समुद्र हा रेषेच्या पश्चिमेला आहे हे निश्चित.
त्याचं म्हणणं ती रेषा काही कामाची नाही.कारण ती समुद्रातून जात नाही.
मी त्याला म्हणालो,
" ह्या उत्तर दक्षिण समांतर रेषा असतात त्या दोन ठिकाणामधे कोणतं ठिकाण पूर्वेला किंवा पश्चिमेला आहेत ते दाखवतात.आणि ह्या रेषा जमिनीवर आहेत की समुद्रात आहेत याचा फरक पडत नाही."
मला एक दुस्तर अडचण होती. तो माझ्यापेक्षां गलेलठ्ठ होता.म्हणून मला चूप बसावं लागलं.
ह्या लहानशा गोष्टीतून मी बर्‍याच निष्कर्षाला आलो.
सत्य ही एक चीज आहे.परंतु,बरेच वेळां,त्याकडे आपण अबाधीत स्वारस्य ठेवून दुर्लक्ष तरी करतो किंवा सरळ सरळ त्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहतो.दूसरं म्हणजे एखाद्दा गोष्टीवर विचार केला म्हणून ती गोष्ट खरी होत नाही.
सत्य हे सापेक्ष नसतं.ते व्यक्तिपरकही नसतं.ते कदाचीत दुग्राह्य असतं किंवा लपलेलं असतं.सत्याची उपेक्षा करावी असं कुणाला वाटेल ही.पण सत्य ही अशीच एक चीज आहे आणि सत्याला मागोवा असतो.खरंच काय झालं?.खरंच जे आहे ते किती खरं आहे?.असा तो मागोवा असतो.त्याचा पाठपुरावा करावा लागतो.

पंधरा वर्षापूर्वी मी अशाच एका निरपराध व्यक्तिच्या कथेवर लडखडलो होतो.वकिली हा माझा पेशा असल्याने त्याला मरणाच्या दाढेतून ओढून काढायाला यशस्वी झालो.ते जरी माझं हार्डवर्क होतं,तरी त्यात माझं थोडं लक होतं आणि रोगविज्ञान संबंधी एक डोक्यात सणकही होती. शेवटी त्यात मी यशस्वी झालो.
मी त्या गोष्टीच्या मागे लागण्याचं कारण मला वाटायचं सर्व प्रश्नांना उत्तरं असावीत."त्यानेच ते केलं काय?","तो अपराधी होता की निरपराधी?" "त्याने ते केलं नसेल तर कुणी केलं?"
अशी सर्व छान-बिन केल्यावर मला यश मिळालं.आपण छान-बिन करतो त्यात कधी यश येतं कधी येत नाही. अगोदरचं कळायला काही मार्ग नसतो.प्रश्नांना उत्तरं असणार असं मनात आणून मार्गस्थ व्हावं लागतं.उत्तर मिळेल अशा तत्वावर भरवंसा ठेवून पुढाकार घ्यावा लागतो उत्तर जरी मिळालं नाही तरी. उत्तराला पर्याय मात्र अस्वीकारणीय असतो.
मला कधीच माहित होणार नाही की त्या शेजारच्या मुलाला वेसावं,बोरीवलीच्या दिशेच्या संबंधाने माझ्या भावार्थाचं तर्कट खरं कळलं की नाही.किंवा त्याला सर्व कळलेलं होतं पण तो कबूल करायला तयार नव्हता.किंवा ते त्याला कळलं असेल पण त्याला पैजेचे पैसे द्दायचे नव्हते.मला हे कदापीही कळणार नाही.
एव्हडंच मला कळलं होतं की माझे शंभर रूपये मला मिळाले नाहीत.

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

आनंद घारे's picture

23 Mar 2009 - 5:46 pm | आनंद घारे

आणि पश्चिमेकडे सरकत जातो. हे सत्य कां असत्य?
ही गोष्ट सापेक्ष की निरपेक्ष ?
यातले जे डोळ्याला दिसते ते सत्य की जे बुद्धीला पटते ते सत्य?

आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/

सत्यच नव्हे तर प्रत्येक गोष्ट सापेक्ष आहे.
डोळ्याला दिसते ते सत्य असेलच असे नाही अन बुद्धीला पटते ते सत्य असेलच असेही नाही.
खर तर सत्यही काहीच नसत अन असत्यही काहीच नसत.. सर्व काही आपल्या मानण्यावर आहे..
उदा: - ही लिन्क पहा..(अवान्तर )
http://www.portraitswithhorses.com/blog/?p=1017&akst_action=share-this

कळस
थोड फार जाणूनही शून्य उमगल्यामुळे अहंकाराचा कळस !!