काश्मिर भारताला लाभदायक आहे की तापदायक
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
आजकाल चाललेल्या घडामोडी पाहता काश्मीर चे विभाजन करून केंद्रशासित प्रदेशात रूपांतर करणे व उर्वरित भारताचा कायदा प्रस्थापित करण्यासाठी हालचाली झाल्या. यासाठी मुळ हेतू काश्मिरचे भले व्हावे, सैनिकांची हानी थांबून खोऱ्यात शांतता प्रस्थापित व्हावी हा आहे. पर्यायाने पाकिस्तान ची नांगी ठेचली जाईल व पुढेमागे पाकव्याप्त काश्मीर परत घेता येईल.
पण माझ्या बुध्दीच्या आकलनाप्रमाणे माझी मतं मांडत आहे. सहमत असण्याची अपेक्षा नाही. फक्त मला काय वाटतं ते सांगतो.
काश्मिर मध्ये जाऊन उद्योग धंदे उभारण्याचे स्वप्न पाहणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे. काश्मिर हे अफगाणिस्तान, पाकिस्तान यांचीच आवृत्ती आहे. त्यांना कितीही मदत केली तरी पायावर उभे राहणार नाही. दहशतवादाचे व्यसन लागले की त्या दुष्टचक्रातून सुटका नसते. बुमरॅंग सारखे त्यांच्यावर उलटते. आजपर्यंत काश्मिरींच्या नरड्यात फार पैसा ओतला आहे. अनंत काळ काश्मीर भारताला धरलं तर चावतंय नि सोडलं तर पळतंय हे आठवायला लावेल हे नक्की. काश्मीर वरचा हक्क सोडायला हवा होता हे भारताला कळायला पन्नास वर्षे लागू शकतील. लाखो हिंदूंना हुसकावून लावणाऱ्या काश्मिरींविषयी सहानुभूती बाळगणे मुर्खपणाचे आहे. अमेरिकेने व्हिएतनाम मध्ये जशी माती खाल्ली तीच गत भारताची काश्मिरमध्ये होईल
काश्मिर च्या तेव्हाच्या नेतृत्त्वाने ( राजाने) केवळ काश्मिर पाकिस्तान च्या घशात जावू नये या हतबलतेतून भारतात सामील होण्यासाठी संमती दिली होती. पण त्याबरोबरच काश्मीर हे बऱ्याच बाबतीत विशेष अधिकार राखून भारतात आले. भारतानं काश्मिर चा भूभाग कितीही ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही लोकमानस भारताच्या बाजूला आहेच याची खात्री देता येत नाही. भारत नेहमीच म्हणत आलाय की आम्ही कुणावर आक्रमण केले नाही. तर जम्मू, श्रीनगर व लडाख या भागात जनमताचा कौल संविधानिक मार्गाने घेऊन जनतेच्या इच्छेचा आदर करायला हवा होता.
इकडचे तिकडचे उपटसुंभ काश्मिर भारताचे अभिन्न अंग आहे, दुध मांगो खीर देंगे...... कितीही सांगत असले तरी माझे अतिशय मौल्यवान सैनिक तिथे रोज मरण पत्करताहेत. अगोदर माझ्या सैनिकांना दूर करा मग काय करायचे ते करा. जाणूनबुजून मृत्यूच्या दारात सैनिकांना कशाला ढकलायचे. सिव्हिलीयन्सना पाठवा तिकडे. सैनिकांच्या बलिदानावर काश्मिर भारतात ठेवून काहीच फायदा नाही.
प्रतिक्रिया
लज्जास्पद असावे अभिमानास्पद नसावे किंवा कसे
विलीनीकरणानंतर आपल्याला
सगळ्यांना धन्यवाद.
__/\__
नको. तुम्ही च खा तो. तुमची
देशप्रेमास यझ समजणार्यां देश विरोधी दृष्टीकोणांना तीखट
एक विचार मनात येतो तो असा:
रविकिरण जी प्रतिसाद एकदम पटला
विरोधक ही संज्ञा
तरीही त्यांचे हास्य असच राहील
रविकिरण फडक्यांच्या निसटत्या बाजू १
एक संदर्भ नोंद
उत्तम प्रतिसाद
हिकडं काय करायलाच? जावा की मग
कौतुक करताय
किल्विषजी,
गैरसमज झाला असेल तर
मान्य
माहित्गार आनी म्हात्रे काका
Pagination