मंदीत संधी

रानरेडा's picture
रानरेडा in जनातलं, मनातलं
20 Aug 2019 - 12:35 pm

मंदीत संधी
लेखक हेमंत वाघे.

मी दुबईला जंबो इलेक्ट्रोनिक्स म्हणून कंपनीत काम केले होते . हि मनु छाब्रिया म्हणून एक अत्यंत श्रुड आणि धाडसी माणसा ने स्थापन केलेली कंपनी होती ,( मी होतो तेंव्हा तो मेला होता ) हा मनु कर चुकवून दुबईला पळाला होता व तिकडून तो त्याच्या भारतातील काही कंपनी चालवायचा ! ( तो दुबई मध्येच मेला ) त्याची एकदा एका अति सिनिअर स्टाफ ने त्याची गोष्ट सांगितली होती .

जंबो इलेक्ट्रोनिक्स हा सोनी जंबो चा फार फार मोठा डिस्ट्री ब्युटर होता ( बहुदा जगातील सर्वात मोठा ) आणि मोठ्या कम्पनी प्रोडक्शन प्लान करताना डिस्ट्री चा सल्ला घेतात .
तर अनेक वर्षा पूर्वी फार मोठे रिसेशन आले होते ( हे बहुदा ९५-२००० च्या मधले असावे ) आणि सोनी ने प्रोडक्शन कमी करायचे ठरवले . त्यांची एक मिटिंग मध्ये त्याची माहिती मनु छाब्रिया आणि जंबो च्या सिनिअर लोका ना दिली .

मग जम्बो मध्ये अंतर्गत मिटिंग भरली कि काय काय करावे , टार्गेट नवीन कशी ठरवावी, किती कमी करावी . कॉस्ट कटिंग कसे करता येईल . लेखक हेमंत वाघे.

मनु ने भलताच विचार मांडला - आता तर सोनी कडे कमी भावात माल मागितला तर सोनी भाव देईल . निचोड निचोड के भाव करेंगे . तगडा अडव्हांस मे ऑर्डर देंगे . त्यावर सोनी ला प्रचंड जाहिरात करायला लावायची , मार्केटिंग करायला लावायचे असा प्लान त्याने मांडला.

सर्व व्ही पी / जी एम / मॅनेजर बधिर झाले - कलकलाट झाला . लेखक हेमंत वाघे. कोणीतरी विचारले विकणार कोण तर त्याने सांगितले त्यासाठीच तुम्हाला घेतले आहे .

मनु प्रचंड हेकट होता आपलं तेच खरं करणारा , त्याने सोनी ला हि प्रचंड पुश करून भाव पाडला म्हणे . सोनी सर्व मार्केटिंग करायला तयार झाली . लेखक हेमंत वाघे. सोनी चा हि पूर्ण विश्वास बसला नव्हता . सोनी ने काही वस्तू चे भाव हि थोडे से कमी केले . ( सोनी भाव पाडण्याला विरोध करणारी कम्पनी होती )

माल आला , दोन्ही कंपन्या चिंतेत होत्या , फक्त मालक मनू सोडून . लेखक हेमंत वाघे. पहिले २-३ महिने वाईट गेले पण बाजारात फक्त सोनी जंबो चा भरपूर माल होता आणि बाकीच्या कंपनी नि कॉस्ट कटिंग केले तर जम्बो -सोनी ची भरपूर जाहिरात होती , माल प्रचंड त्यामुळे सेल्स मन , मार्केटिंग वाले पण जीव तोडून काम करत होते ,

२-३ महिन्या नंतर परिणाम दिसू लागला आणि जबरदस्त सेल होवू लागला . हा जो लीड मिळाला त्याचा खूप वर्ष फायदा मिळाला .

लेखक हेमंत वाघे.

शिक्षणमाहिती

प्रतिक्रिया

बबन ताम्बे's picture

20 Aug 2019 - 12:46 pm | बबन ताम्बे

लेख छान आणि माहितीपूर्ण आहे, पण मध्ये मध्ये "लेखक हेमंत वाघे" आल्यामुळे वाचताना खडा लागल्यासारखे वाटते. :-)

विनिता००२'s picture

20 Aug 2019 - 12:55 pm | विनिता००२

पण मध्ये मध्ये "लेखक हेमंत वाघे" आल्यामुळे वाचताना खडा लागल्यासारखे वाटते >> सहमत :हाहा:

उगाच सर्व समान आहेत हे फिलिंग दृढ होते अन कर्तुत्वाला धुमारे फुटू लागतात. जे काही प्रचंड फ़ायदेशीर हाती लागले ते कायम मंदी असतानाच मग ते साल 2000 -2002 असो, 2008 असो की आता येणारे 2020. आयाम लविंग इटम.

महासंग्राम's picture

20 Aug 2019 - 1:19 pm | महासंग्राम

शेवटून दुसऱ्या ओळीत "लेखक हेमंत वाघे" लिहायचे राहिले आहे

बोलघेवडा's picture

20 Aug 2019 - 1:32 pm | बोलघेवडा

लेखक हेमंत वाघे. छान आहे. लेखक हेमंत वाघे.

ऋतुराज चित्रे's picture

20 Aug 2019 - 1:55 pm | ऋतुराज चित्रे

हेमंत वाघे वॉटर मार्क म्हणून वापरला आहे का?

जव्हेरगंज's picture

20 Aug 2019 - 2:01 pm | जव्हेरगंज

लेखक कोण आहेत याचे?

महासंग्राम's picture

20 Aug 2019 - 2:12 pm | महासंग्राम

लेखक हेमंत वाघे हे या लेखाचे लेखक आहेत लेखक हेमंत वाघे

म्हणजे, या वाघाचे हेमंत आहेत लेखक लेखे. या लेखकाचे वाघ आहेत लेखे हेमंत. या हेमंताचे लेख आहेत वाघे लेखक, असं. ब्ला ब्ला ब्ला... =))

स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्यांडी

लेखातली संकल्पना, मुद्दा चांगला आहे. रोचकही आहे. पण वाक्यरचना जरा विस्कळीत वाटली. प्रतिसादलेखक गवि. घाईने लिहिला गेला असावा. वाक्ये नेमकी कोणी कोणास म्हटली हे काहीवेळा स्पष्ट होत नाहीये. प्रतिसादलेखक गवि. ज्यांना मार्केट, सप्लाय, त्यामागील अर्थचक्र यांची ओळख नाही प्रतिसादलेखक गवि त्यांना थोडं आणखी स्पष्ट करुन समजावलं असतं तर जास्त खुलून आलं असतं. आणि लेखकाचं नाव एम्बेड करण्याने नेमका काय इफेक्ट होतो ते उलगडावं म्हणून मी प्रतिसादात तोच प्रयोग करत आहे. प्रतिसादलेखक गवि. आता मी प्रतिसादात गांभीर्याने लिहिलेल्या मुद्द्यांकडेही काहीसं दुर्लक्ष होऊन केवळ मी वारंवार नाव एम्बेड केलं याकडेच लक्ष जाऊन वाचक मला उगीचच तिरकस, खवचट समजू शकतो. प्रतिसादलेखक गवि. आणि त्यामुळे मूळ विषय उगीचच डायल्युट होऊ शकतो. प्रतिसादलेखक गवि. तुमचा मूळ कन्सर्न वाङ्मयचौर्याबद्दल आहे हे समजू शकतो. पण त्यापायी मूळ लेखनातच असा बदल करणं हे वाचकाला त्रासदायक आहे.

नावातकायआहे's picture

20 Aug 2019 - 10:25 pm | नावातकायआहे

शेवट
"पण त्यापायी मूळ लेखनातच असा बदल करणं हे वाचकाला त्रासदायक आहे.प्रतिसादलेखक गवि"
असा हवा होता... :-)

म्हणजे वाचकांची चाँदीच होणार.

हस्तर's picture

20 Aug 2019 - 6:24 pm | हस्तर

अलोच

लेख आणि प्रतिसाद दोन्ही आवडले.

मला मनू छाबरिया जम्बोपेक्षा शॉ वॅलेसचा मालक म्हणून माहित होता :-) आता त्याची मुलगी कोमल वझीर चालवते म्हणे. मनूच्या हिंदुस्थान डॉर ऑलिव्हर आणि जम्बो कंपन्या अजूनही जिवंत आहेत.

मंदीत संधी मिळते - म्हणून मंदी यावी अशी प्रार्थना करणे म्हणजे सवतीला वैधव्य चिंतण्यासारखे नाही काय ?

रानरेडा's picture

20 Aug 2019 - 4:49 pm | रानरेडा

शॉ वॅलेस २००५ साली २ तुकड्यात विकली गेली . दारू चा बिझनेस विजय मल्ल्या च्या ( तत्कालीन ) यु बी ने विकत घेतला आणि बिअर बिझनेस स्याब मिलर ने . मनु आणि मल्ल्या एकेकाळचे मित्र होते आणि नंतर शत्रू , ओं शेवटी मल्ल्या ते डाव साधला

मस्त संधी साधली आहेत राव .. लेखक खिलजी .. छान होता लेख . लेखक खिलजी.. आवडला , याला म्हणतात डेरिंग .लेखक खिलजी. यालाच म्हणतात वाक्यातील बेरिंग .. लेखक खिलजी.. चालू द्यात असेच , मज्जा आणलीत राव ..लेखक खिलजी.. अजून एक येऊन द्या , पण पुढच्या वागायला दोन वेळा तरी नाव पाहिजे ..लेखक खिलजी.. लेखक खिलजी.. असे

सतिश गावडे's picture

20 Aug 2019 - 6:06 pm | सतिश गावडे

"लेखक हेमंत वाघे" हे सोळा ठिकाणी पेरले आहे लेखात.
लोकांचे उत्तमोत्तम लेख नामोल्लेख न करता पुढे ढकलत राहणाऱ्या लोकांची चांगली जिरवली आहे.

चौथा कोनाडा's picture

20 Aug 2019 - 6:17 pm | चौथा कोनाडा
चौथा कोनाडा's picture

20 Aug 2019 - 6:18 pm | चौथा कोनाडा


लोकांचे उत्तमोत्तम लेख नामोल्लेख न करता पुढे ढकलत राहणाऱ्या लोकांची चांगली जिरवली आहे.

हा ..... हा ...... हा ....... !

नाखु's picture

20 Aug 2019 - 7:40 pm | नाखु

आवडले आहे आणि अनुमोदीत केले आहे.

झुंडीबाहेरचा आणि सापेक्षी नाखु ऋणनिर्देश महत्व जाणणारा वाचकांची पत्रेवाला नाखु

उगा काहितरीच's picture

20 Aug 2019 - 9:21 pm | उगा काहितरीच

ज्याला खरोखरच कॉपी करायची आहे त्याने खालील स्टेप्स फॉलो कराव्यात. (लेख चांगला असला तरी मला कॉपी करून स्वतःच्या नावावर खपवावा असं अजिबात वाटत नाही. )
१) लेख वर्ड मधे पेस्ट करा.
२) कंट्रोल +F दाबा (find and replace window दिसेल)
३) त्यात लेखकाचे नाव टाका
४) रिप्लेस विथ स्पेस टाका (स्वतःचे नावही टाकू शकता ;) )
५) लेख स्वतःच्या नावावर खपवायला रेडी आहे.

हाकानाका !

(प्रतिसादकर्ता वाड़मयचौर्याचा कोणत्याही प्रकाराचा पुरस्कार
करीत नाही. किमपी उपरोक्त पद्धत किती तकलादू आहे हेच निदर्शनास आणण्याची इच्छा आहे. उत्तरदायीत्वास नकार लागू )

चांदणे संदीप's picture

21 Aug 2019 - 9:38 am | चांदणे संदीप

उत्तरदायीत्वास नकार लागू म्हणजे... लैच्च! =))

Sandy

नाखु's picture

21 Aug 2019 - 10:59 am | नाखु

नकार लागू म्हणजे मला रीमा लागू,श्रीराम लागू यांच्यासारखे वाटतात,एक दशकामागे बहुसंख्य नाटकात, सिनेमात असायचेच.
अगदी अमिताभ च्या लावारीस मध्ये छोटी भुमिका असो

चौथा कोनाडा's picture

21 Aug 2019 - 1:02 pm | चौथा कोनाडा


रीमा लागू,श्रीराम लागू यांच्यासारखे वाटतात,

:-)))))

सतिश गावडे's picture

21 Aug 2019 - 5:55 pm | सतिश गावडे

किमपी उपरोक्त पद्धत किती तकलादू आहे हेच निदर्शनास आणण्याची इच्छा आहे.

तुमचे विश्लेषण बरोबर असले तरी लेखकाची युक्ती इतके कष्ट घेणाऱ्या लोकांसाठी नाहीच.

लेखकाला समाज मनाची अचूक जाण असून त्याने ही युक्ती "आले आपल्याला की कॉपी पेस्ट करुन पाठव इतरांना" वृत्तीने वागणाऱ्या लोकांसाठी वापरली आहे.