मूळ बातमी
Britain now has the most 'desi' Cabinet in its history
ऑक्टोबर २०१९ मध्ये स्थापित होणार्या बोरीस जॉन्सन या ब्रिटनच्या आगामी पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात अनेक भारतीय वंशाच्या मंत्र्यांचा समावेश असेल. त्यात महत्त्वाची पदे अशी...
१. प्रीती पटेल : गृहमंत्री (home secretary): ब्रिटनच्या इतिहासात प्रथमच, एवढ्या मोठ्या महत्त्वाच्या पदावर, भारतीय वंशाच्या व्यक्तीची नेमणूक होत आहे. पंतप्रधानांनंतर, गृहमंत्री आणि विदेशमंत्री ही दुसर्या क्रमांकाची व समान महत्त्वाची पदे समजली जातात.
२. अलोक शर्मा : secretary of state for international development.
३. रीशी सूनक : chief secretary to the treasury : हे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत.
***************
अवांतर :
तुर्कस्थानचा बदला
एक शतकापूर्वी अली केमाल बे (Ali Kemal Bey) नावाचा एक पत्रकार आणि राजकारणी तुर्कस्थानचा गृहमंत्री होता. त्याने तुर्कस्थानामध्ये Anglophile Society ची स्थापना केली. तुर्कस्थान "ब्रिटनचे संरक्षित राष्ट्र (British protectorate)" व्हावे यासाठी तो प्रयत्नशील होता. त्याऐवजी, अतातुर्कने तुर्कस्थानाला ब्रिटन, फ्रान्स, इटली, ग्रीस आणि आर्मेनियाच्या जोखडातून स्वतंत्र केला आणि अली केमालचे स्वप्न पुरे झाले नाही. जनरल नुरेद्दीनने अली केमालला बंदी केले व त्याचा वध करून त्याचे प्रेत झाडाला टांगले.
या अली केमालचा मुलगा ओस्मान विल्फ्रेड केमाल याने ओळख लपविण्यासाठी विल्फ्रेड जॉन्सन असे नाव बदलले. जॉन्सन हे त्याच्या आईच्या आईचे आडनाव होते. विल्फ्रेड जॉन्सनचा मुलगा स्टॅन्ली जॉन्सन आणि त्याचा मुलगा आहे बोरीस जॉन्सन... हाच बोरीस जॉन्सन आता ब्रिटनचा नवनिर्वाचित पंतप्रधान आहे.
तुर्कस्थानच्या ऑटोमन घराण्याच्या (Ottoman Turks) काळात तुर्कांनी युरोप जिंकण्याचे खूप प्रयत्न केले होते. त्यांनी हंगेरी व ट्रन्सिल्व्हानिया हे प्रदेश जिंकलेही होते. मात्र, सन १६९९ च्या कार्लोविट्झ शस्त्रसंधीनंतर तुर्कांचे युरोप जिंकण्याचे स्वप्न भंगले.
मात्र, आता एका तुर्कीवंशियाची (बोरीस जॉन्सन) ब्रिटनचा पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे... त्याच्या पंतप्रधानपदाच्या शपथेनंतर, "शेक्स्पियरच्या ऑथेल्लोमधील 'तुर्कांचा बदला' पुरा होईल", असे गमतीने म्हटले जात आहे. :)
***************
अतीआवांतर
भारताचा बदला
बोरीस जॉन्सन यांच्यानंतर प्रीती पटेल पंतप्रधान होतील म्हटले जाते (सद्य पंतप्रधान थेरेसा मे ह्यासुद्धा पंतप्रधान होण्याअगोदर गृहमंत्री होत्या.)... हे व्यवहारात खरे झाले तर, एक भारतीय वंशाची व्यक्ती ब्रिटनवर राज्य करेल आणि "भारताने 'ब्रिटिश राज'चा बदला घेतला" असे म्हटले जाईल ! ;) :)
प्रतिक्रिया
25 Jul 2019 - 3:11 pm | महासंग्राम
अवांतर चा इतिहास भारीच आहे कि
25 Jul 2019 - 3:23 pm | जॉनविक्क
।
25 Jul 2019 - 7:11 pm | कुमार१
भारीच !
25 Jul 2019 - 7:50 pm | Rajesh188
तुर्कस्तान वंशाचे पंतप्रधान आणि भारतीय वंशाची गृहमंत्री झालेत ते त्यांच्यात चांगली गुणवत्ता आहे म्हणून ते कोणत्या वंशाचे आहेत हे बघून नाही .
मला वयक्तिक असेच वाटत भारतात सुधा जगभरातील गुणवत्ता असणाऱ्या लोकांना प्रशासन मध्ये समाविष्ट करून घेतले पाहिजे तर देश वेगाने प्रगती करेल
25 Jul 2019 - 10:37 pm | डॉ सुहास म्हात्रे
त्याच्या पंतप्रधानपदाच्या शपथेनंतर, "शेक्स्पियरच्या ऑथेल्लोमधील 'तुर्कांचा बदला' पुरा होईल", असे गमतीने म्हटले जात आहे. :)
तुम्ही प्रतिसाद लिहिण्यापूर्वी, लेखातल्या वर उधृत केलेल्या वाक्यातील (इथे ठळक केलेले) काही शब्द आणि त्यापुढील स्मायलीदर्शक चिन्हे पाहिलेली नाही असे दिसत आहे ! ;) :)
25 Jul 2019 - 8:21 pm | धर्मराजमुटके
बोरीस जॉन्सन बद्द्ल आज लोकसत्तात अग्रलेखच छापून आला आहे. ह्या संपादक मंडळींना सर्व जगाची अक्कल कुठून बरे मिळत असेल असा मला नेहमी प्रश्न पडतो. बोरीस जॉन्सन हे ब्रिटनचे स्वःतचे डोनाल्ड ट्रंप आहेत असा उल्लेख आहे. बघू या ब्रेग्जिट चे काय होते ते. मात्र ब्रिटन जरी एकेकाळी महासत्ता असले तरी आता अमेरीकेच्या सावलीने त्यांच्या सुर्य झाकोळला गेलेला आहे त्यामुळे तेथे कोणी ही सत्तेत आले तरी भारतास काय जास्त फरक पडेल असं वाटत नाही. राहिला प्रश्न भारतीय वंशाच्या नेत्यांचा, आपल्याला उगाचच त्यांच्याबद्द्ल लै भारी वगैरे वाटते. प्रत्यक्षात त्यांच्या अस्मिता स्वतःच्या पुर्वीच्या देशाबद्द्ल तितक्या टोकदार राहिलेल्या नसतात. शेवटी वेळ पडली तर ज्याची पोळी खातात त्याचीच टाळी वाजवणार ( आणि ते गैर देखील नाही.) शेवटी माणुस म्हणायला कितीही ग्लोबल झाला तरी तो तिथला तिथला देशीच असतो.
26 Jul 2019 - 11:38 am | सुबोध खरे
आता अमेरीकेच्या सावलीने त्यांच्या सुर्य झाकोळला गेलेला आहे
ब्रिटन ला अमेरिकेचे ५१ वे संस्थान ( ५१st STATE OF UNITED STATES) म्हटले जाते इतके ते अमेरिका धार्जिणे झालेले आहेत.
26 Jul 2019 - 1:55 pm | जालिम लोशन
मुळच्या ब्रिटीशांनी स्थापिलेल्या देशांना किंवा ब्रिटीश वंशाच्या देशांना फाईव आईज किंवा जगावर नजर ठेवणारे पाच डोळे म्हटले जाते. आणी जगावर अजुनही राज्य करत आहेत. त्यात युके, कॅनडा, अमेरिका, न्युझिलंड व अॅास्ट्रेलिया हे जगातील पाच मोठे देश येतात. सैनिकीदृष्ट्या पुर्ण जगातील बाकीच्या ऊरलेल्या देशांच्या शक्तीपेक्षा यांची एकत्रीत numerical fire power कैक पट जास्त आहे. प्रतिस्पर्धी म्हणुन फक्त रशिया व चीन यांना ते पहातात. व या सैनिकीबळावर ते त्यांना फायदेशीर धोरणे जगभर राबवत असतात. ह्याचे ऊत्तम उदाः म्हणजे चलन विनिमयाचा दर ह्यात काहिही न करता त्यांना प्रचंड नफा होत असतो. त्याला आव्हान फक्त युरोने ऊभे केले होते ते पण ईराणला वाळीत टाकुन त्यांनी मोडुन काढले. त्यामुळे वरवर जरी युके, युएसए धार्जिणे वाटत असले तरी तसे नसुन ते एकच आहे आणी सर्वांची हेड आॅफ स्टेट emporess Elizabeth आहे.
26 Jul 2019 - 6:19 pm | कुमार१
** सर्वांची हेड आॅफ स्टेट emporess Elizabeth आहे. >>>
१६ राष्ट्रकुल देशांच्या त्या प्रमुख आहेत; त्यात अमेरिका अर्थात नाही.
https://en.m.wikipedia.org/wiki/Head_of_the_Commonwealth
26 Jul 2019 - 9:02 pm | जालिम लोशन
वेगळ्या आहेतच. काॅमन वेल्थ हि फाॅर्मल संघटना आहे, आणी फाईव आईज ईनफाॅर्मल नाव आहे, आणी नाटो सारखे संरक्षण करार पण काॅमन वेल्थ देशांमधे नाही. बहुतेक आॅस्ट्रेलीया पण हेड आंॅफ स्टेट म्हणुन क्विनचे नाव काढत आहे. मी ईनफाॅर्मल पाॅलिसीज बद्दल बोलत आहे. ऊदाः रशियन फितुर गुप्तहेरावर आणी त्याच्या मुलीवर जेंव्हा ब्रिटनमधे खुनी हल्ला झाला तेंव्हा ह्याच देशांनी रशियन राजदुतांना बाहेर काढले.
25 Jul 2019 - 9:57 pm | तेजस आठवले
म्हंजे आता केबाबच्या(कबाब) सुवासाने आणि फाफडा गाठी ह्यांच्या कुरकुर आवाजाने टोपीकरांची संसद भरून जाईल असे दिसते.
भारताच्या ढोकळा गँगने ब्रिटिशांचा बदला खालच्या गाण्यात घेतलेला आहे, तन्मयतेने नाचणारी मानववंशातल्या प्रत्येक शाखेतली वंशावळ नक्कीच पाहण्यासारखी आहे.
https://www.youtube.com/watch?v=Du7BKkIojGE
26 Jul 2019 - 8:03 am | फारएन्ड
इन्टरेस्टिंग माहिती. याची कल्पना नव्हती.
26 Jul 2019 - 11:03 am | हस्तर
जसे सोनिया गांधी पंत प्रधान होण्यास विरोध केला तसे तिकडे कोणी भारतीय वंश नाही म्हणून विरोध करत नाही ?
30 Jul 2019 - 11:43 pm | मराठी कथालेखक
ब्रिटनमध्ये कॉमनवेल्थ देशामधील कोणताही नागरिक निवडणूक लढवू शकतो, खासदार पंतप्रधान ई होवू शकतो असे मी वाचले आहे. कायदेशीर भाषेत नेमके कलम काय आहे ते माहीत नाही. दादाभाई नौरोसजी भारतातून ब्रिटनमध्ये गेलेले पहिले खासदार होते असे वाचले आहे ( काही दुरुस्ती असल्यास सुचवावी - धन्यवाद)
31 Jul 2019 - 10:27 am | डॉ सुहास म्हात्रे
खालील दुव्यावर संपूर्ण माहिती मिळेल...
https://www.electoralcommission.org.uk/sites/default/files/pdf_file/UKPG...
26 Jul 2019 - 11:44 am | विजुभाऊ
भारतीय वंशाचे लोक जगभर आहेत. कोणत्याही आंतराष्त्रीय अपघातात एखादेतरी भारतीय नाव आढळतेच.
हे लोक जर एखाद्या देशाचे वैधनीक नागरीक असतील तर ते लोकप्रतिनीधी ठरु शकतात.
आपण किती दिवस ते भारतीय वंशाचे आहेत याचा आनंद मानायचा?
कल्पना चावला अंतराळात गेली ती भारतीय म्हणून नव्हे तर तीच्या ज्ञानाच्या जोरावर .
बाकी जोपर्यंत आजम खान आणि तत्सम स पा वाल्या मेंटॅलिटीची मंडळी या देशात आहेत तोपर्यंत ते अंतराळवीर / शास्त्रज्ञ असलेल्या स्त्रीयांना फक्त मादी या नजरेनेच पहाणार . ती घाणेरडे विचारसरणी नष्ट होत नाही तोपर्यंत भारत मागासच रहाणार
26 Jul 2019 - 11:49 am | सुबोध खरे
भारत हा २१ व्या शतकाच्या प्रगती पासून ६ व्या शतकाच्या मागासलेपणा पर्यंत पसरलेला आहे.
दुर्दैवाने जशी एखाद्या अजगराची शेपटी पुढे जात नाही तोवर त्याचे संपूर्ण शरीर पुढे गेले असे म्हणता येत नाही तशीच स्थिती भारताची आहे.
26 Jul 2019 - 11:49 am | हस्तर
आणि मिसळपाव वर कंपूबाजी ,ट्रोल्स पण कमी व्हायला पाहिजे
26 Jul 2019 - 1:44 pm | कंजूस
कुठेत कंपूबाज?
----------
आता भांडवलदार ग्लोबल झाले आहेत . बदला/सूड घेतलात तर तुमचेच लोक बळी पडतील.
27 Jul 2019 - 6:48 pm | श्रीनिवास टिळक
"बोरीस जॉन्सन यांच्यानंतर प्रीती पटेल पंतप्रधान होतील म्हटले जाते (सद्य पंतप्रधान थेरेसा मे ह्यासुद्धा पंतप्रधान होण्याअगोदर गृहमंत्री होत्या.)... हे व्यवहारात खरे झाले तर, एक भारतीय वंशाची व्यक्ती ब्रिटनवर राज्य करेल आणि "भारताने 'ब्रिटिश राज'चा बदला घेतला" असे म्हटले जाईल ! ;) :)"
खरे तर असा बदला घेण्याची सुरवात डॉक्टर लिओ वराडकर (अशोक आणि मिरियम वराडकर यांचे सुपुत्र) हे आयर्लंडचे पंत प्रधान २०१७ मध्ये झाले तेव्हाच झाली आहे .
27 Jul 2019 - 9:48 pm | डॉ सुहास म्हात्रे
ब्रिटनमध्ये भारतिय वंशाचे लोक मोठ्या संख्येने असल्याने तिथल्या बातम्या इथे सहजपणे येतात. पण, इतरही युरोपियन देशांतील उच्च राजकारणी पदेही भारतिय वंशांच्या व्यक्तींनी पटकावलेली आहेत...
* २६ नोव्हेंबर २०१५ पासून, (भारतिय गोव्यातून पोर्तुगालमध्ये स्थलांतरीत झालेल्या Orlando António Fernandes da Costa यांचा पुत्र) António Costa हे पोर्तुगालचे पंतप्रधान आहेत. त्यांनी २००५ पासून अनेक मंत्रीपदे भूषविलेली आहेत.
* १३ एप्रिल २०१२ ते १६ ऑक्टोबर २०१३ या कालखंडात, भारतिय वंशाचे अरविन् ऐकेलान्ड गाडगिळ (Arvinn Eikeland Gadgil) हे नॉर्वेच्या परराष्ट्र खात्याचे मिनिस्टर ऑफ स्टेट होते. त्यांनी पुण्याजवळील Mahindra United World College मध्ये १९९७ ते १९९९ या काळात शिक्षण घेतले आहे.
इतर शेकडा-दोन शेकडा नावांसाठी इथली यादी पहा. :)
31 Jul 2019 - 5:37 pm | गामा पैलवान
डॉक्टर सुहास म्हात्रे,
यादीबद्दल धन्यवाद. अर्थात सगळी नावं सापडणं शक्य नाही. यादीत नसलेलं चटकन आठवलेलं नाव म्हणजे मराठीसंवर्धनार्थ झटणाऱ्या मॉरीशसच्या माजी (उप?) पंतप्रधान शीलाबाय बापू. तसंच सदर यादीत इस्रायलचा उल्लेख नाही. तिथे अनेक मूळचे शनवारतेली सापडायची शक्यता आहे.
आ.न.,
-गा.पै.
31 Jul 2019 - 7:18 pm | डॉ सुहास म्हात्रे
मॉरिशसच्या लोकसंखेत २/३ लोक भारतिय वंशाचे (आणि बहुसंख्य लोक हिंदू धर्माचे) आहेत. तेव्हा, तेथिल महत्वाच्या भारतिय वंशाच्या राजकारणी/व्यापारी व्यक्तींची यादी मारुतीच्या शेपटीइतकी मोठी आहे. :)
27 Jul 2019 - 11:46 pm | Rajesh188
गरीब आणि कमजोर घरातील मुलगा श्रीमंत व्यक्तीच्या आधाराने मोठा झाला तरी त्याची किंमत काही नसते .
हे सत्य आहे ..भारत कमजोर असेल ,गरीब असेल आणि एकदा भारतीय चांगली कामगिरी केली तरी व्यवहारिक जगात त्याला जास्त किंमत नाही
27 Jul 2019 - 11:49 pm | जॉनविक्क
पण भक्त भक्त गणले जाईल म्हणून तो विषयच सोडून देतो
28 Jul 2019 - 9:52 am | डॉ सुहास म्हात्रे
=)) बरोबर आहे.
"सॉफ्ट पॉवर" हा विषय समजायला सोपा असला तरी त्याबद्दल अनास्था/अज्ञान वारंवार दिसत असते ! ;)
बहुदा, कोणत्याही गोष्टीचा विचार करताना, "त्यामुळे आजच्या घडीला माझ्या खिशात काय पडतेय/पडेल?", या केवळ एकाच प्रश्नाचे उत्तर शोधण्याची कुपमुंडक वृत्ती, या अनास्था/अज्ञानामागे कारणीभूत असते.
28 Jul 2019 - 12:44 pm | नाखु
जिथे मोदींच्या मंत्रीमंडळात कोण असेल त्याचा मला फायदा काय? अशे उच्च विचार मिळाले आहेत तिथे सातासमुद्रापार असलेल्या ब्रिटनच्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांनी आमच्या पिंपरी-चिंचवड भागातील पाणि दिवसाआड येते ते सुरळीत होईल का??
नाही ना मग आम्ही धागा ओलांडून पुढे जाण्याऐवजी एखादी फर्मास पिंक टाकू की!!
29 Jul 2019 - 4:52 pm | हस्तर
बाकी सगळं जाऊ द्या
मिपा सारखे कोलमडते ते तरी.........पळतो
31 Jul 2019 - 10:30 am | डॉ सुहास म्हात्रे
जिथे मोदींच्या मंत्रीमंडळात कोण असेल त्याचा मला फायदा काय? अशे उच्च विचार मिळाले आहेत तिथे सातासमुद्रापार असलेल्या ब्रिटनच्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांनी आमच्या पिंपरी-चिंचवड भागातील पाणि दिवसाआड येते ते सुरळीत होईल का??
+१००
31 Jul 2019 - 3:46 pm | इरामयी
या घटना भारतीयांच्या दृष्टीने चांगल्या आहेत. या घडामोडींचा परिणाम म्हणजे परकियांचा भारतीय वंशाच्या लोकांकडे बघण्याचा दृष्टीकोण हळूहळू अधिकच, अधिकच व्यापक होत जाईल.
31 Jul 2019 - 1:06 pm | मराठी_माणूस
असे म्हणण्या साठी , कमीत कमी, त्यांनी आपल्या इथुन जेव्हढे लुटून नेले ते सव्याज परत आणावे लागेल.
31 Jul 2019 - 7:08 pm | डॉ सुहास म्हात्रे
लेखात म्हटल्याप्रमाणे "बदला घेणे" हे गमतीने म्हटले जाते... त्यासाठी रुपये-आण्यांचा हिशेब लावणे आता अव्यावहारीक होईल. :)
"एकेकाळी ब्रिटिश सत्तेखाली असलेल्या भारताशी वांशिक संबंध असलेली एखादी व्यक्तीने ब्रिटनच्या सर्वोच्च कार्यकारी पदावर बसणे, ही परिस्थिती नक्कीच गमतीदार आहे." असा त्याचा अर्थ आहे. (लईच इस्काटून सांगावं लागलं राव !)
काही काळापूर्वी, टाटा गृपने जग्वार ही ब्रिटिश मानदंड समजली जाणारी कंपनी, जोरदार ब्रिटिश विरोधानंतर, विकत घेतली तेव्हाही, "एका भारतियाने ब्रिटनचे नाक कापले" असे म्हटले गेले होते, तेव्हाही त्याचा अर्थ "प्रत्यक्ष सुरी घेऊन नाक कापले" असा नव्हता. :)
1 Aug 2019 - 11:29 am | मराठी_माणूस
ते लक्षात आले होते. पण गमतीत सुध्दा, "त्यांनी" आपल्याला कीती लुटले आहे हे आपण विसरायला नको असे सुचवायचे होते, इतकेच.
31 Jul 2019 - 3:34 pm | इरामयी
छान, माहितीपूर्ण लेख.
विकिपिडियावर भारतीय वंशाच्या नेत्यांची यादी आहे. हे बहुतेक नेते आफ्रिका आणि द. अमेरिकेतल्या काही देशांचे नेते असले तरी यात आयर्लंडच्या लिओ वराडकर, सिंगापूरच्या हलिमा याकोब आणि पोर्तुगालच्या अंतोनिओ कोस्टा यांचाही समावेश आहे.
https://en.wikipedia.org/wiki/List_of_heads_of_state_and_government_of_I...
31 Jul 2019 - 6:56 pm | डॉ सुहास म्हात्रे
सिंगापूरच्या सद्य राष्ट्राध्यक्ष हलिमा याकोब यांच्या पूर्वीच्या कालात तेथे, देवन नायर (ऑक्टोबर १९८१ ते मार्च १९८५) आणि सेल्लापन रामनाथन (ऑगस्ट २००५ ते ऑगस्ट २०११) या भारतिय वंशाच्या व्यक्ती राष्ट्राध्यक्ष होत्या.