मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रात्र थोडी..

जव्हेरगंज · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
"अब बोल भी कुत्ते" चकचकीत रिवॉल्व्हर माझ्या छाताडावर रोखत तो उग्रपणे म्हणाला. अशावेळी भल्याभल्यांची फाटते. नव्हे फाटायलाच पाहिजे. कपाळावर घाम जमा होतो. आणि भरपूर तहान लागते. "आपण बस यहापे पिक्चर देखने आया था" नुकताच मारलेला गांजा अशावेळी कामाला येतो. "मुझे नही लगता.." रात्रीच्या एक वाजता हा माणूस गॉगल घालून बोलतोय. हि गोष्ट खरं बघितलं तर डोक्यात तिडीक जाणारी आहे. "ये सुलेमान का आदमी है साब.." जीपमध्ये बसलेला लुकडा हवालदार माझ्याकडे हात दाखवत जोरात म्हणाला. खरं तर तिथे दोन हवालदार होते. दुसरा मिशावाला होता. जाडजूड. बहुतेक त्याला झोप वगैरे आली असावी. "गांजा तो हम भी पीते है. चलो एक एक हो जाये.." काळ्या गॉगलवाल्या इन्स्पेक्टरने आता रिवॉल्वर कमरेला अडकवली. आता तो रंगात आला होता. खांद्यावर हात टाकून मला तो जीप कडे घेऊन गेला. "क्या मजाक कर रहे हो साब, आपन किसी सुलेमान को जानता तक नही. हा आपुन छोटामोठा झमेला जरूर करता है. लेकीन इसमे आपुनको मत घुसेडो साब.." मिशावाल्या जाड्या हवालदाराने गाडी सुरू केली तेव्हा आपनही थोडं गयावया केलं. "इसको ऑफर दो साब.." लुकडा हवालदार तसा बारीक अंगकाठीचा होता. पण बराच मुरलेला दिसत होता. "हा.. ऑफर... " इन्स्पेक्टर जरा सावरून बसला आणि सरळ माझ्याकडे बघत म्हणाला "देख दस पेटी देगा, बस आपुनको सुलेमानका पता दे. लाईफ बन जाएगी तेरी.." गाडी मुंबई सोडून हायवेला लागली होती. जीप असली तरी झरझर पळत होती. रस्त्यावरचं बेफाम वारं आत घुसंत होतं. "जब आपुन इस च्युतेको जानताही नही तो पता कैसा देगा.." यावर तिघेही खळखळून हसले. "भरोसा नहीं साब, पुलिस पे भरोसा नही है" लुकडा हवालदारा चिलीम पेटवत म्हणाला. मग त्यानं एक झुरक मारला. धूर सोडत त्यानं चिलीम इन्स्पेक्टरकडं सोपवली. "ठिक है, ठिक है... " इन्स्पेक्टरनं हळूवार झुरका मारत धूर छातीत भरुन घेतला. आहाहा. जन्नत. "अब दुसरा ऑफर... तू हमे सुलेमान का पता दे.. हम तुझे जिंदा छोड देंगे.." "ये मस्त ऑफर है साब.." लुकडा हवालदार जोरजोरात हसायला लागला. मिशावाल्या हवालदाराला तर ठसका लागला. हा साला गाडी ठोकेल कुठेतरी. "आपन उसको जानता है मगर मालूम नही वो किधर मिलेगा" आणि अचानक गाडीला ब्रेक लावून ड्रायव्हरने गाडी उभी केली. रात्रीच्या दोन अडीच तरी वाजल्या असतील. कुठल्यातरी घाटात आम्ही पोहोचलो होतो. दूरून दिसणारे मुंबईचे लुकलुकते दिवे सोडले तर तिथे वर्दळ अशी नव्हतीच. "सुसू करने का है. आयेगा?" इन्स्पेक्टर बाहेर होत म्हणाला. मग आम्ही चौघांनी मिळून तिथे सुसू केली. "वो.. चित्रा टॉकीज के सामने क्या करने आया था.." इन्स्पेक्टरनं चैन लावत विचारलं. "वो.. पार्सल लेने आया था.." मी चैन लावत सांगितलं. "कैसा पार्सल?" लुकड्या हवालदाराची चैन बहुतेक अटकली होती. तिला खालीवर करत तो म्हणाला. "आपन कोना गोवा मे एक घर मंगता है साब. छोटासाच. बीच के आसपास.." मी सौदा करायला प्रारंभ केला. "मिलेगा.." इन्स्पेक्टरनं डिल फायनल केली. " और साथ मे एक रशियन आयटम भी मिलेगी, अग सच बोला तो" डोंगरउतारावरच्या थंडगार हवेने मन प्रफुल्लित झाले होते. अंधारात पण निसर्ग किती सुंदर दिसतो. साला इथं कोणी राहत कसं नाही. "वो पार्सल कोकेन का था." मी महत्वपूर्ण माहिती पुरवली. इन्स्पेक्टर खूश झाला. "और सुलेमान..?" लुकड्या हवालदार जीपच्या बोनेटवर रेलून बसला होता. त्याची चैन आता बहुतेक लागली होती. "उसने ही बुलाया था. चित्रा टॉकीज के सामने. वो खाली फोन करता है. और पार्सल कीसी कचरे के डब्बे मे रख देता है." "मतलब उसे कभी मिला नही तू..?" इन्स्पेक्टर इथे थोडा नाराज वाटला. "नही, कभी नही.." इथे मी पण थोडा नाराज झालो. "कहापे ले जाना था ये पार्सल..?" सांगू की नको अशा पेचात मी जरा गोंधळूनच गेलो. "अब बोल भी कुत्ते" चकचकीत रिवॉल्व्हर माझ्या छाताडावर रोखत तो उग्रपणे म्हणाला. "होटेल मेरीडीयम. कमरा नं.२३० , आपन उधर काम करता है. सफाई का" एकदाचा सांगून मोकळा झालो. इन्स्पेक्टरनं रिवॉल्वर खाली घेतलं. कपाळावर जमा झालेला घाम डोंगराच्या हवेत गारठू लागला. हात वर करून मी आळस झटकला. नाही म्हटलं तरी छातीची धडधड वाढलेलीच होती. इन्स्पेक्टर चालत जीपकडे गेला. सीटखाली लपवलेली प्लास्टिक पिशवी माझ्याकडे देत म्हणाला, "क्या वो पार्सल यही था?" च्यायला. डिट्टो. हे काय? आणि एवढा वेळ शांत बसलेला मिशावाला जाड्या हवालदार हातातले पिस्तूल रोखत माझ्याकडे चालत आला. "आपन सचमे तुझपे बहोत भरोसा करता था." याचा आवाज तर सेम टू सेम सुलेमान सारखा आहे. " लेकीन तू तो सबकुछ यहा बक रहा है यार, आपुनको ऐसा आदमी मंगताइच नै." धडाम.

वाचन 20609 प्रतिक्रिया 0