मगं ! आज काय वाचताय ?

धर्मराजमुटके's picture
धर्मराजमुटके in जनातलं, मनातलं
17 Jul 2019 - 9:45 pm

नमस्कार,
आज काय वाचताय ? हा प्रश्न जरी इतरांना उद्देशून असला तरी तो तितकाच स्वतःला देखील आहे.
तर मग ! आज काय वाचलं ?

पुस्तकाचे नाव : द लास्ट माईल
मुळ लेखक : डेव्हिड बॅल्डासी
मराठी अनुवाद : सायली गोडसे
प्रकाशक : श्रीराम बुक एजन्सी पुणे
किंमत : मी वाचत असलेल्या प्रथम आवृत्तीची किंमत रु. ४५०.०० फक्त
----------------

द लास्ट माईल्स ही एका उदयोन्मुख फुटबॉलपटूची जीवन कहाणी आहे. मेलविन रॉय मार्स वयाच्या विसाव्या वर्षाच्या आतच अमेरिकेतील एक प्रसिद्ध फुटबॉलपटू बनतो. मात्र त्याच्या व्यावसायिक कारकिर्दिच्या सुरुवातीलाच त्याला आपल्या आई-वडीलांच्या हत्येप्रकरणी देहांताची शिक्षा होते. वीस वर्षे तुरुंगात घालविल्यावर जेव्हा त्याच्या देहांताची शिक्षा अंमलात आणण्याची वेळ येऊन ठेपते, त्याच्या काही सेकंद अगोदर कोणीतरी दुसराच ते खुन आपण केल्याची कबुली देतो आणि मेलविनची मृत्युच्या दारातून सुटका होते. मात्र टेक्सास राज्य आपल्याला तुरुंगाबाहेर जाऊ देणार नाही, काही ना काही कारण शोधून आपल्याला परत अटक करतील ह्या भितीच्या छायेखाली तो सतत जगत असतो. त्याच्या सुटकेची बातमी जेव्हा रेडीओवर ऐकवली जात असते तेव्हा ती नेमकी स्पेशल एजंट अ‍ॅमास डेकर याच्या कानावर पडते. तो या प्रकरणातील सत्य शोधण्याच्या कामी लागतो आणि तेथून पुढे ही कादंबरी वेगवेगळी वळणे घेत शेवटाला पोहोचते.

मेलविन निरपराध असतो काय ? जर तो निरपराध असेल तर त्याला यात कोणी गोवले ? अगदी शेवटच्या क्षणी मेलविनने केलेल्या खुनाची जबाबदारी दुसराच कोणीतरी घेतो पण तोही खरा गुन्हेगार नसतो. मेलविनच्या आईवडीलांचा भुतकाळ रहस्यमय असतो, तो कशामुळे ? शेवटी अशा काही गोष्टी उजेडात येतात ज्याची मेलविन आणि तपास अधिकारी डेकर ने कल्पना देखील केलेली नसते.

हे सगळे र हस्य जाणून घेण्यासाठी कादंबरी एक वेळा वाचण्याची शिफारस करतो.

धन्यवाद !

वाङ्मयआस्वाद

प्रतिक्रिया

पुस्तकाचे नाव लिहिण्यात चुक झाली आहे. संपादक मंडळा पैकी कोणी दुरुस्ती करेल काय ? योग्य नाव "द लास्ट माईल'

मुक्त विहारि's picture

17 Jul 2019 - 10:11 pm | मुक्त विहारि

मनापासून धन्यवाद. ..

ह्या धाग्याची हजारीच नव्हे तर दशहजारी व्हायला हवी.

मुक्त विहारि's picture

17 Jul 2019 - 10:12 pm | मुक्त विहारि

मनापासून धन्यवाद. ..

ह्या धाग्याची हजारीच नव्हे तर दशहजारी व्हायला हवी.

मी गेले काही दिवस कॉलिंग सहमत वाचतेय. छोटेखानी पुस्तक आहे. राजी सिनेमा ह्या पुस्तकावरून प्रेरित होता, ते पुस्तक. खरं तर एका बैठकीत वाचून होईल हे पुस्तक पण काही ना काही कारणाने राहून जाते.

आता ह्या धाग्यावर लिहायला म्हणून ( त्या मोटीवेशन ने) वाचून पूर्ण करेन.

मुक्त विहारि's picture

17 Jul 2019 - 10:07 pm | मुक्त विहारि

डॉ. बाबासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ, ह्यांची. ..."कृषी दैनंदिनी"...वाचत आहे.

सर्व प्रकारच्या पिकांची थोडक्यात तोंडओळख आहे.

आमच्या सारख्या अडाणी आणि वडीलोपार्जीत शेतकरी नसलेल्या लोकांसाठी उपयोगी आहे.

नुकतीच सुरुवात केली आहे. त्यामुळे जमेल तसे पुस्तका बाबत सांगत जाईन

मारवा's picture

17 Jul 2019 - 10:08 pm | मारवा

How to Stop Worrying and Start Living हे डेल कार्नेगी चे पुस्तक पुन्हा एकदा वाचतोय

Co-Operate With The Inevitable हा अप्रतिम धडा सध्या वाचतोय या विलक्षण समजुतदार प्रकरणात एका jujitsu मास्टर चे कोट "bend like the willow; don't resist like the oak." असे अनेक सुंदर कोट्स व विजडम या व एकुण पुस्तकात खचाखच भरलेले आहे.
फार सुंदर समजुतदार जुन्या वळणाच्या विजडम चे बायबल

जालिम लोशन's picture

17 Jul 2019 - 10:23 pm | जालिम लोशन

हे सर डेव्हिड अटेनबरोचे पुस्तक वाचतो आहे. त्यात वनस्पतीच्या बुध्दिमत्तेबद्दल ऊदाहरणासहित वर्णन आहे. त्यात मोजणे, बघणे. प्रवास करणे, स्वत:चा वंश वाढीचा प्रयत्न करणे, वगैरे अर्तक्य वाटतील अशा गोष्टींची तसबीरीसकट माहीती आहे.

ही गोष्ट सत्य असावी. ...

1. बांबू मरण्याआधी बिया देतो. एरवी कोंब देतो.

2. मिरचीला पाणी कमी मिळाले की रोपं जास्त मिरच्या देतात, हा अनुभव मुरबाड मधील एका शेतकऱ्याने घेतला आहे. .

पुस्तक वाचायला हवं ...पण आमचं इंग्रजी कच्चे आहे. ..

जालिम लोशन's picture

18 Jul 2019 - 8:49 pm | जालिम लोशन

जगभरातील वनस्पतींची त्यात माहिती आहे. आणी बर्‍याचश्या गोष्टी आपल्याला माहित असतात पण त्या दृष्टिकोनातुन आपण त्याकडे बघत नाही. ऊदाः गहु हा माणसांना वापरुन जगभरात सगळीकडे पसरलेली सगळ्यात यशस्वी अशी गवताची जात आहे. हे गहु खाद्य असलेली बी बनवुन साध्य करतो. ती बी मिळवण्यासाठी मनुष्य गव्हाची लागवड करतो. किंवा झाडे त्याचे बीज जो पर्यंत परिपक्व होऊन ऊगवणक्षम होत नाही तो पर्यंत त्यांचे फळ खाण्यायोग्य करत नाही. आणी बी तयार झाले की त्याचा लांब पर्यंत प्रसार करण्यासाठी फळाच्या रंगात, वासात आकर्षतता आणुन लांबपर्यंत त्याचा प्रचार करुन वानरे वगैरे प्राण्यांना आकर्षीत करुन लांब पर्यंत बियांचा प्रसार करतात. ऊदाः आंबा, पेरु व अनेक.

शास्त्रीय परिभाषा असेल तर मात्र कठीण जाईल. ..

उदा. मला बांबू समजेल पण. ...बांबूसा बांबूस...हे लगेच कळणार नाही...

त्या पुस्तकात असे शास्त्रीय शब्द आहेत का?

त्याच बरोबर लॅटिन शास्त्रीय नावे पण दिली आहेत.

मुक्त विहारि's picture

28 Jul 2019 - 11:27 pm | मुक्त विहारि

माझ्या सारखे गरीब शेतकरी हे पुस्तक विकत घेऊ शकत नाही.

जालिम लोशन's picture

28 Jul 2019 - 11:38 pm | जालिम लोशन

हवे असेल तर!

मुक्त विहारि's picture

29 Jul 2019 - 12:05 am | मुक्त विहारि

पण मी शक्यतो कुणाकडूनही पुस्तके परत बोलीवर घेत नाही आणि देत पण नाही.

पुस्तक घराबाहेर पडले की परत येत नाही. त्यामुळे तुमच्या घरी येऊन फोटो काढीन आणि वाचीन.

मी पण!

मित्रान्ना घरी बोलवून पुस्तक वाचायची ओफर देतो.

मुक्त विहारि's picture

29 Jul 2019 - 12:05 am | मुक्त विहारि

पण मी शक्यतो कुणाकडूनही पुस्तके परत बोलीवर घेत नाही आणि देत पण नाही.

पुस्तक घराबाहेर पडले की परत येत नाही. त्यामुळे तुमच्या घरी येऊन फोटो काढीन आणि वाचीन.

यशोधरा's picture

20 Jul 2019 - 9:01 am | यशोधरा

रोचक वाटते आहे. हे पुस्तक घेईन मी. अमेझॉन वर बघते मिळते का. माहितीबद्दल धन्यवाद!

उद्या पर्यंत संपवेन बहुतेक, परवाचे बघू परवा :)

गोरगावलेकर's picture

17 Jul 2019 - 11:07 pm | गोरगावलेकर

दिवाळी नंतर सिक्कीम सहलीस जायचा विचार आहे. माहितीकरिता एक मराठी पुस्तक मागवले. छोटेसेच आहे पण छान माहिती दिली आहे.

पुंबा's picture

18 Jul 2019 - 2:54 am | पुंबा

'लव्हाळी'
च्यायभले! उद्या ८ च्या ठोक्याला हाफीसला कडमडायचेय आणि हे पुस्तक हातातून ठेववत नाहीये!

प्रचेतस's picture

18 Jul 2019 - 5:49 am | प्रचेतस

रॉबिन कूकचे इंटरव्हेन्शन वाचतोय.

तुषार काळभोर's picture

18 Jul 2019 - 7:58 am | तुषार काळभोर

कॉलेजात असताना वाचलं अन आवडलं होतं.

तुषार काळभोर's picture

18 Jul 2019 - 7:56 am | तुषार काळभोर

बोकाशेठची स्केअरक्रो मालिका वाचून मायकेल कोनेली हे नाव बऱ्याच वर्षांपासून बादलीत होतं.
मग स्केअरक्रोचा नायक जॅक McEnvoy असलेलं पहिलं पुस्तक द पोएट गेल्या आठवड्यापासून बशीत येता जाता वाचतोय.


Denver Post crime-beat reporter Jack McEvoy specializes in violent death. So when his homicide-detective brother kills himself, McEvoy copes in the only way he knows how: he starts work on an investigative report about police suicides.
But soon his research reveals a sinister pattern—‘suicides’ by detectives in other cities that are strikingly similar to his brother's. McEvoy suspects a serial murderer is at work—a devious cop killer who's left a trail of poetic clues.
It's the news story of a lifetime—except that ‘the Poet’ already seems to know that McEvoy is trailing him. . . .

खिलजि's picture

18 Jul 2019 - 8:26 am | खिलजि

मी सध्या हैद्राबादी पेपर वाचतोकंआणि मिपा

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Jul 2019 - 12:01 pm | ज्ञानोबाचे पैजार

असे हवे का?
पैजारबुवा,

जेम्स वांड's picture

18 Jul 2019 - 12:15 pm | जेम्स वांड

पुन्हा एक पारायण करतोय रारंगढांगचे. मला वाटतं ह्या पुस्तकाबद्दल लिहायची काही गरज नाही इतकं सुप्रसिद्ध पुस्तक आहे ते.

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Jul 2019 - 12:20 pm | ज्ञानोबाचे पैजार

विनोबा भावेंची "गीता प्रवचने" वाचतो आहे.
अत्यंत सोप्या भाषेत केलेले गीते वरचे निरुपण खरोखर वाचनिय आहे.
पैजारबुवा,

अभ्या..'s picture

18 Jul 2019 - 12:21 pm | अभ्या..

काय नाय विषेष पेपरात.
ऑटोमोबाईलच्या जाहीराती वाढल्यात.
टू व्हीलरात सगळ्या गाड्या १०० सीसीच्या वर येण्याचा प्रयत्न करताहेत. प्रत्येकाची कॉम्बी ब्रेक सिस्टम कशी वेगळी हे सांगायचा प्रयत्न चालूय. तंत्र एकच आहे, नावे वेगवेगळी आहेत. सुधारलेले सस्पेन्शन हा एक मुद्दा सगळेच सांगताहेत. आधीचे मायलेज हा मुद्दा मागे पडलाय.
फोर व्हीलरात डिस्काउंटाचा पाऊस सगळीकडेच आहे. एसयुव्हीचे वेड भारतीयांच्या मनात भरवायला इंडस्ट्री सफल झालीय. इथेही मायलेज हा मुद्दा बराचसा दुर्लक्षित होतोय जाहीरातीत.
टाईम बदल रहा है, नये इंडीया हे साथ.

माकडतोंड्या's picture

18 Jul 2019 - 12:38 pm | माकडतोंड्या

बाराखडी वाचायला सुरुवात केली आहे

जेम्स वांड's picture

18 Jul 2019 - 3:46 pm | जेम्स वांड

बरीच प्रगती आहे म्हणायचं....

Sparta LOL

विशेषतः महाकाय समुद्री राक्षसाची गोष्ट अतिशय अदभुत व रंजक होती. उद्या 1984 पुन्हा एकदा वाचायचा विचार आहे, तो पर्यंत आज थोडं लिओ टोलस्टोय वाचावा म्हणतो.

प्रचेतस's picture

18 Jul 2019 - 7:19 pm | प्रचेतस

सिंदबाद कुठले वाचताय?
बर्टनच्या अरेबियन नाईट्स मधलं?

जॉनविक्क's picture

18 Jul 2019 - 7:38 pm | जॉनविक्क

म्हणजे ते लिखाण / भाषांतर लहानचं मोठं करतं कि मोठ्याचं लहान हेच समजेनासे होतं(वयाने). अकुशेठ आपल्याला झेपतात तरी पण बर्टनचे अरेबियन नाईट्स इस नाट मा कफोफ टी.

बर्टनप्रेमी असाल तर त्याचे डेथ राईड्स द कॅमेल जरूर वाचा आत्मकथा आहे.

बर्टनचं संकलित अरेबियन नाईट्स अफाट आहे, फूटनोट्स जबरदस्त आहेत एकदम.
बर्टनच्याच आत्मकथेवरून प्रेरित असलेलं बाळ भागवत ह्यांनी लिहिलेलं चरित्र मजकडे आहे पण अजून वाचलं गेलं नाही.

प्रचेतस's picture

18 Jul 2019 - 8:27 pm | प्रचेतस

शापित यक्ष हे ते चरित्र

तर डेथ राईड्स द कॅमेल हा आख्खा हिमनग आहे. माझ्या आयुष्यात जी इस्लाम बाबत जी काही चांगली मानसिकता निर्माण करणारे साहित्यवाचन झाले त्यात कॅप्टन रिचर्ड बर्टन याचा नंबर फार वर आहे.

सिंदबाद प्रोजेक्ट गुटेनबर्ग वरच वाचले, अरेबियन नाईट्सकडे वेळ मिळाला तर आपल्या शिफारशी मुळे आता नक्कीच लक्ष देईन, अर्थातच आसपास कोणी चिमुकले नसताना :)

धन्यवाद.

अवांतर:- डेथ रैर्ड्स दि फास्टस्ट कॅमेल हि मध्यपूर्वेतिल मृत्यू संदर्भातील प्रसिद्ध म्हण आहे

प्रचेतस's picture

19 Jul 2019 - 12:05 pm | प्रचेतस

भन्नाटच, नक्कीच वाचेन हे पुस्तक.

जेम्स वांड's picture

18 Jul 2019 - 11:30 pm | जेम्स वांड

रारंगढांग पारायण झपाट्याने उरकले, हाती काहीच नसल्याने ऍमेझॉन वर किंडलोपयोगी बुके चाळत असताना "मॅन इटर्स ऑफ त्सावो अँड अदर ईस्ट आफ्रिकन ऍडव्हेंचर्स" असे सणसणीत नाव असलेले पुस्तक सापडले, ह्या नावात काहीतरी ओळखीचे वाटले पण काय ते आठवेना. मग मेंदूवर जबर जोर देऊन बसलो अर्धा तास तसे आठवले "घोस्ट अँड द डार्कनेस" नावाचा एक इंग्लिश सिनेमा पाहिला होता कैक वर्षे आधी, त्सावो नदीवर पूल बांधायला आलेला कर्नल जॉन हेन्री पॅटरसन नावाचा अधिकारी अन त्याने त्सावोच्या गवताळ प्रदेशात केलेली दोन नरभक्षक सिंहांची कथा दाखवली होती.

हा तो सिनेमा :-
.

सिनेमात एकाच कथेभोवती कथानक फिरत असल्यामुळे असेल पण तो गडद वाटला, पुस्तक वाचायला आत्ता सुरुवात केलीये. उत्तम आहे, कर्नल पॅटरसन ह्यांची शैली अन अभिनिवेषहीन किंवा समकालीन इंग्रज लोकांइतका माज नसल्याने आलेल्या सहजपणातून बनलेले लिखाण आवडले. त्सावोच्या सिंहांची शिकार मोठा भाग असला तरी इतर सफारी, स्थानिक जीवनाच्या तपशीलवार नोंदी वगैरे मजेदार सुरस गोष्टी पुस्तकात सापडल्या आहेत (अनुक्रमाणिकेवरून तरी अदमास तसाच झालाय). हे पुस्तक पुढेमागे भाषांतरित करून मिपावर टाकायचे पक्के केलेच आहे ह्या निमित्ताने ग्रामीण लेखनाचा जॉनर सोडून इतर प्रयोगही करता येतील अन ते मिपाकरांना आवडतील अशी आशा आहे. :)

प्रचेतस's picture

19 Jul 2019 - 12:15 pm | प्रचेतस

सॅव्होचे नरभक्षक सिंह हे पुस्तक फार्फार वर्षांपूर्वी वाचलेले होते. अनुवाद बहुधा मनोहर दातार किंवा सुभाष भेंडे. नक्की आठवत नाही. आफ्रिकेतील रेल्वे कामगारांवर हे सिंह हल्ला करत असे वाचल्याचे स्मरते.

जेम्स वांड's picture

20 Jul 2019 - 3:17 pm | जेम्स वांड

आयाळ जवळपास नसलेल्या दोन नर सिंहांनी मिळून जवळपास गोरे काळे, कामगार मुकादम इंजिनीयर पाद्री डॉक्टर असे कैक लोक त्सावो मध्ये ठार मारले होते, शेवटी कर्नल पॅटरसन ह्यांनीच त्यांना गारद केले.

जॉनविक्क's picture

19 Jul 2019 - 2:48 pm | जॉनविक्क

नावामुळे भुताचा पिक्चर म्हणून बघायला गेलो अन मंत्रमुग्ध बनून गेलो. ओंमपुरीला बघून सुखद धक्का बसला, भारतीय जातीव्यवस्थेवर एक खुसखुशीत मार्मिक टिपण यात आफ्रिकन व ब्रिटिश व्यक्तींच्या एका संभाषणातून केले आहे. वर्षातून एकदा हा चित्रपट रिपीट होतोच.

तुमच्यामुळे पुस्तक परिचयही झाला याचे भाषांतर कराच हि आग्रहाची विन्नती आहे.

जेम्स वांड's picture

20 Jul 2019 - 3:10 pm | जेम्स वांड

काल पुस्तक डाउनलोड केल्यापासून खाली ठेववत नाहीये इतकं जब्बर लिहिलं आहे, सुरुवातीलाच मोम्बासा बंदराचे वर्णन, त्याचा इतिहास वगैरे उत्तम तपशिलांसाहित मांडला आहे कर्नल पॅटरसन ह्यांनी. काम प्रचंड मोठं असणार आहे, नोकरीधंद्यातून कधी वेळ मिळेल ह्याचे नियोजन करूनच हात घालायला हवाय ह्या कामात पण प्रयत्न पूर्ण करणारच असा मूड होतोय.

डायरेक्ट मराठीच वाचू. रच्याकने घोस्ट आणि डार्कनेस हि त्या नरभक्षक सिंहाची नावे आहेत, भुत आणि काळोखाचा त्यात काही प्रत्यक्ष संबंध नाही.

भंकस बाबा's picture

25 Jul 2019 - 11:14 pm | भंकस बाबा

भरपूर वाचल्या आहेत, पैटरर्सनच्या देखील , तरीही जिम कार्बेटचे 'देवळाचा वाघ' आणि 'कुमाऊँचा नरभक्षक' हि शिकारकथेवरिल पुस्तके भन्नाट आहेत. जिम कार्बेटची निरीक्षण शक्ति अफाट होती. अचूक आकलन करून निर्णय घेणे ही जिम कार्बेटची खासियत त्यांच्या लेखनातून पदोपदी जाणवते

जेम्स वांड's picture

29 Jul 2019 - 6:55 am | जेम्स वांड

काही लोक म्हणतात कॉर्बेट खूप जास्त गर्विष्ठ वगैरे होता, पण मला तरी असे काही लेखनात जाणवले नाही, नॉर्मलच वाटला कॉर्बेट मला तरी.

कुमार१'s picture

19 Jul 2019 - 11:34 am | कुमार१

ही ३ पुस्तके

माझ्या संग्रही असून त्यातील काही भाग मी नियमितपणे पुन्हा वाचतो.

१. एक शून्य मी - पुलं
२. लक्ष्मणझुला - लक्ष्मण लोंढे
३. कोसला - नेमाडे

संजय पाटिल's picture

19 Jul 2019 - 6:30 pm | संजय पाटिल

Jeffrey Archer च्या Clifton Chronicles पैकी Mightier Than the Sword पर्यंत आलोय.
कुणी वाचलेयत का? मला आवडले सगळे भाग! अजून दोन भाग शिल्लक आहेत.

प्रचेतस's picture

19 Jul 2019 - 7:36 pm | प्रचेतस

क्लिफ्टन क्रॉनिकल्स अजून वाचले नाहीत मात्र आर्चरची केन अँड एबल, नॉट अ पेनी मोअर नॉट अ पेनी लेस आणि प्रिझनर ऑफ द बर्थ ही पुस्तके भारी आहेत.

संजय पाटिल's picture

20 Jul 2019 - 10:04 am | संजय पाटिल

हि वाचून झालीयेत...

ह्या पुस्तकाची किती तरी वेळा पारायणे केली. .अर्थात मराठी आवृत्ती...

एखादा सुंदर सिनेमा पण ह्या पुस्तका वरून निघू शकेल. मालिका आहे. पण ती इंग्रजीत असल्याने पहिल्या 5-10 मिनिटात कंटाळा आला. मजा आली नाही. मग नाही बघितली. ..

खटपट्या's picture

19 Jul 2019 - 6:47 pm | खटपट्या

धर्मराज सर - वाचुन झाले असेल तर मला मिळेल का पुस्तक? त्यानिमित्ताने भेट होइल.

धर्मराजमुटके's picture

24 Jul 2019 - 8:49 pm | धर्मराजमुटके

माफ करा पण प्रतिसाद उशीरा पाहिला. पुस्तक परत दिले आहे पण दुसरे एखादे पुस्तक जमवता येईल. भेटायला कधीही वेळ काढू शकतो.

खटपट्या's picture

29 Jul 2019 - 6:10 pm | खटपट्या

ओसा, सांगतो

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

19 Jul 2019 - 8:33 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मी सध्या The Mahabharata Secret वाचतोय.
लेखकः Christopher C. Doyle
अत्यंत थरारक आणि वेगवान कथानक.
बाकी, वाचून पुर्ण झाल्यावर....

मिपावर रेकमंड झालंय म्हटल्यावर आता पहिलं तेच संपवतो

ठीक आहे, वेगवान आहे. पण अर्थात एकदा विंची कोड वाचल्यावर... असो.

सिक्रेट नाइन, गार्डिंग सिक्रेट वगैरे गोष्टीच इल्लोजिकल वाटतात, जी गोष्टच डीस्ट्रॉय केली पाहिजे ती पिढ्यान पिढ्या का प्रोटेक्ट होते वगैरे वगैरे वगैरे

कुमार१'s picture

24 Jul 2019 - 9:27 am | कुमार१

लक्ष्मण लोंढे लिखित 'लक्ष्मणझुला’ या पुस्तकाबद्दलचा माझा जुना प्रतिसाद इथे डकवतो:

हे पुस्तक हा ३० लेखांचा संग्रह आहे. मूळ लेख पूर्वी ‘अंतर्नाद’ मासिकात सदर रूपाने प्रसिद्ध झाले होते. हे पुस्तक म्हणजे ललितगद्याचा एक उत्कृष्ट आविष्कार आहे. त्यातील लेख हे निसर्ग, विज्ञान आणि सौंदर्य या त्रिमूर्ती भोवती गुंफलेले आहेत. ‘प्रकृती कडून संस्कृतीकडे’ या लेखात हे स्पष्ट केले आहे की उपाशी पोटाने संस्कृतीच्या गप्पा मारता येत नाहीत पण, निदान पोट भरल्यावर तरी माणसाने संस्कृतीकडे वळले पाहिजे आणि तिचा मूलाधार आहे ती प्रेमभावना.

माणसाने पर्यावरणाची जी नासधूस चालवली आहे त्यावरील मार्मिक टिपणी एका लेखात केली आहे. निसर्गाने माणसाला हवा, सूर्यप्रकाश, पाणी, जमीन यासारख्या गोष्टी अगदी फुकट दिल्या आहेत पण आपण त्यांची हवी तेवढी कदर केलेली नाही याची जाणीव त्यातून होते.

स्थापत्यशास्त्रातल्या प्रगतीचा माणसाला केवढा गर्व असतो. पण जेव्हा आपण सफेद मुंग्यांनी तयार केलेल्या ५-६ मीटर्सच्या उंचीची वारूळे बघतो तेव्हा या नैसर्गिक चमत्कारापुढे आपल्याला नतमस्तक व्हावे वाटते याचे भान आपल्याला एका लेखातून येते.

‘कांचनमृगाच्या शोधात’ हा आपल्याला आत्मपरिक्षण करायला लावणारा लेख. ‘प्रगती’ कशाला म्हणायचे या मुद्द्याभोवती गुंफलेला हा लेख. प्रगतीचा आपण लावलेला ‘सतत वाढ’ हा निकष लेखकाच्या मते चुकीचा आहे. वाढ आणि विकास यातील फरक अगदी चांगल्या प्रकारे समजावून लेखक सुचवतो की प्रगतीची एकमेव फूटपट्टी पैसा हीच नसली पाहिजे.

पुस्तकाच्या मध्यात असलेला ‘हृदया हृद्य येक जाले’ हा लेख तर खरोखरच कळसाध्याय म्हणावा लागेल. आता अतिप्रगत संगणक युगात माणूस माणसाशी ‘जोडला’ गेलेला आहे खरे पण तो केवळ मेंदूने. त्याबरोबर माणसे एकमेकांशी हृदयाने जोडली गेली आहेत का हा लेखकाने उपस्थित केलेला प्रश्न आपल्याला अंतर्मुख करून जातो, नव्हे, सतावतो.

‘एक टक्क्याचा खेळ’ हाही एक विचारप्रवर्तक लेख. आपला समाज हा असंख्य गटातटात विभागला गेला आहे. अशा विविध गटांची टक्केवारी काढून मग अल्पसंख्य गटांना कमी लेखण्याचे वा हिणवण्याचे प्रकार सतत चालू असतात. या संदर्भात एका मूलभूत शास्त्रीय सत्याकडे लेखक आपले लक्ष वेधतो. ते म्हणजे मानव आणि चिपांझी माकड या दोघांच्या ‘डीएनए’ मध्ये फक्त १ टक्क्याचा फरक आहे. म्हणजे, अखिल मानवी संस्कृतीच फक्त १ टक्क्याची संस्कृती आहे. तेव्हा अजून माणसामाणसांत भेद वाढवणारी टक्केवारी आपण गाडून टाकायला हवी आहे की नाही?

.. तर असे एकाहून एक सरस लेख असणारे हे पुस्तक. प्रत्येक लेख सरासरी ४ पानांचा. हेही एक आकर्षण. निसर्ग –विज्ञान- तत्त्वज्ञान यावरचे सोप्या भाषेतील सुरेख चिंतन. हे पुस्तक माझ्या संग्रही गेली १७ वर्षे आहे. साधारणपणे १०-१२ वर्षांनंतर आपल्या संग्रहातली काही पुस्तके ‘शिळी’ वाटू लागतात. पण हे पुस्तक त्याला नक्कीच अपवाद आहे. दर ३ महिन्यातून मी ते एकदा बाहेर काढतो, त्यातील एखाद्या लेखाचा मनापासून आस्वाद घेतो. आयुष्यभर जवळ बाळगावे असे हे पुस्तक आहे.

सतिश गावडे's picture

28 Jul 2019 - 11:51 pm | सतिश गावडे

सतरा वर्षांपूर्वीचे पुस्तक असूनही तुमच्या या छोटेखानी परीक्षणानुसार ते आजही सुसंगत वाटत आहे.

हे पुस्तक मिळाले तर नक्की वाचणार.

तेजस आठवले's picture

24 Jul 2019 - 4:14 pm | तेजस आठवले

सध्या "अर्थात" -अच्युत गोडबोले वाचून संपवत आणलेय. नंतर "समिधा"- साधना आमटे किंवा "पर्व" - भैरप्पा चालू करणार.

धर्मराजमुटके's picture

24 Jul 2019 - 9:14 pm | धर्मराजमुटके

भैरप्पा म्हणजे एक नंबर काम ! वाचनाची वेळ सत्कारणी लागण्याची १००% हमी.

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Jul 2019 - 9:32 am | ज्ञानोबाचे पैजार

भैरप्पा म्हणजे एक नंबर काम ! याला + ९९९९९९९९९९९९९९

इथे मिपावर कोणीतरी लिहिलं होतं ते वाचून "आवरण" वाचले. प्रत्येकाने वाचायलाच हवे हे पुस्तक.

या बद्दल मिपावर बरीच चर्चा झाली आहे त्यामुळे गोष्टी बद्दल लिहीत नाही. पण वाचताना बसलेल्या धक्क्यातुन सावरायला मला बरेच दिवस लागले होते. त्या नंतर परत एकदा वाचले तेव्हा पहिल्या वाचनात सुटलेले संदर्भ सापडत गेले.

आतापर्यंत त्याची चार पारायणे झाली आहेत. पण प्रत्येक वेळी वाचायला सुरुवात केल्या नंतर संपेपर्यंत हातातुन खाली ठेवता आले नाही.

पैजारबुवा,

धर्मराजमुटके's picture

24 Jul 2019 - 9:11 pm | धर्मराजमुटके


पुस्तकाचे नाव : डेव्हिल्स अल्टरनेटिव्ह
मुळ लेखक : फ्रेडरिक फोरसिथ
मराठी अनुवाद : रमेश जोशी
प्रकाशक : राजहंस प्रकाशन
किंमत : रु. ३२०.०० फक्त

कथा साधारण १९८२ च्या सालात सुरु होते. रशियात गव्हाच्या पिकावर चुकीची रसायने फवारली गेल्यामुळे संपुर्ण देशातलं गव्हाच पीक नष्ट होऊन दुष्काळ पडणार आहे. रशियाला अमेरिकेकडून अल्प दरात कित्येक टन गहू हवा आहे पण त्याबदल्यात त्यांना त्यांची लष्करी ताकद कमी करावी लागणार आहे, त्यात युक्रेन मधील काही राष्ट्रवादी मंडळी रशियन केजीबी प्रमुखाला ठार मारतात. ती बातमी त्यांना इस्त्रायलच्या भुमिवरुन जाहिर करायची असते. मात्र ते पळून जात असताना जर्मनी च्या ताब्यात सापडतात. रशिया ला त्यांना जर्मन तुरुंगातच ठार करायचे आहे पण त्या अगोदरच त्यांना सोडविण्यासाठी त्यांचे काही मित्र नेदरलँडमधे एक तेलवाहू नौकेचे अपहरण करतात. रशिया, अमेरिका, इंग्लंड आणि जवळपास १० युरोपियन राष्ट्रे या नाट्यात ओढली जातात.
शेवटपर्यंत उत्सुकता ताणून धरणारी कादंबरी एकदा वाचावी अशी नक्की आहे.

अभ्या..'s picture

24 Jul 2019 - 10:38 pm | अभ्या..

धर्मराजदादा,
वाचनाचा नाद आणि चॉईस जबरदस्त आहे बरका तुझा.
माझं आधीही नव्हतं वाचन, सध्यातरी खिळच बसल्यागत झालेय. त्यामुळे कौतुक आहे तुझं. डॉक्टर कुमारांचा पण चॉईस छान वाटला.
किपीटप ऑल.

धर्मराजमुटके's picture

25 Jul 2019 - 7:44 pm | धर्मराजमुटके

कस्ल काय भावड्या ! आता नाद कमी झालाय. एकेकाळी एखाद्या बेवड्याला एखादे दिवस दारु नसली तर चालेल पण मला पुस्तकाशिवाय होत नसे. जेव्हा जीवनातले अतिशय खराब दिवस चालू होते तेव्हा तर मी चक्क दोन वाचनालयांचा सभासद झालो होतो. रोज दोन पुस्तके संपवायचीच असा निश्चय केला होता आणि तो तडीस नेत असे.
पुस्तक निवडायची पहिली पायरी म्हणजे पुस्तकाला कमीत कमी २५०-३०० च्या वर पाने असली पाहिजेत. नंतर हळूहळू अशी पाळी आली की वाचनालयातील बरीचशी पुस्तके वाचून झाली. बरेचदा तेच पुस्तक परत घ्यायचो आणि दोन-पाच पाने वाचल्यावर लक्षात यायचं की अरे हे तर आपण वाचलेलं आहे.

आताही एका दिवसात एक पुस्तक वाचून होतेच पण वाचनालय घरापासून दूर असल्यामुळे रोज पुस्तक बदलून आणणे शक्य होत नाही. पुस्तकांचा घरगुती संग्रह देखील आहे पण त्यात गोनिदा, धारप, माडगूळकर वगैरे प्राचिन लेखकांचाच भरणा अधिक आहे. नव्या पिढीचे संग्रही बाळगण्याजोगते लेखक शोधतोय अजून ! कोर्टरुम ड्रामा टायपच्या कादंबर्‍या म्हणजे माझा विक पॉईट आहे. बघुया शेवटापर्यंत हा छंद जोपासायला जमते का ते !

लिस्ट टाका ना तुमच्याकडील पुस्तकांची.

धर्मराजमुटके's picture

25 Jul 2019 - 8:12 pm | धर्मराजमुटके

टाकतो एखाद दिवशी सवड काढून !

प्रचेतस's picture

27 Jul 2019 - 8:55 am | प्रचेतस

अगदी अगदी हेच.
त्याकाळच्या वाचनालयांमध्ये सुहास शिरवळकर, बाबा कदम, अरुण हरकारे, श्रीकांत सिनकर ह्यांच्या पुस्तकांबरोबरच सिडने शेल्डन, अर्ल स्टॅनली गार्डनर, अगाथा क्रिस्ती, आर्थर हेली, जेम्स हॅडली चेस ह्यांच्या कादंबर्‍यांचे अनुवाद मोठ्या प्रमाणात असत. ह्या सर्व पुस्तकांचा फडशा तेव्हा झपाट्याने पाडला जात असे. नंतर एका वाचनालयात गोनीदा, पेंडसे ह्यांच्या पुस्तकांची ओळख झाली आणि झपाटून गेलो. नंतर पुढे महापालिकेच्या वाचनालयात रामायण-महाभारताचे नवे कोरे खंड वाचण्यास मिळाले आणि त्यांची पारायणे झाली. आज आता वाचनालयांछे सदस्यत्व बंद असून वैयक्तीक पुस्तकांचा बर्‍यापैकी संग्रह झाला आहे.

जॉनविक्क's picture

27 Jul 2019 - 4:26 pm | जॉनविक्क

कोर्ट रूम ड्रामा फेवरीट म्हणजे आपल्यासाठी पेरी मेसन पात्र मस्टच . अपर्णा भावें यांनी त्यांच्या अनेक कथा अनुवादित केल्या आहेत(अल स्टॅंले गार्डनर मूळ लेखक), रहस्य, कोपरखळ्या, कोर्टरूम ड्रामा, कलगीतुरा अफलातूनच.

तुषार काळभोर's picture

25 Jul 2019 - 7:36 am | तुषार काळभोर

पुस्तक बादलीत टाकलंय.

प्रचेतस's picture

27 Jul 2019 - 8:50 am | प्रचेतस

फॉरसिथच्या कादंबर्‍या लै जबरदस्त. द फिस्ट ऑफ गॉड आणि त्याचा सिक्वेल द अफगाण, द डे ऑफ द जॅकल, द ओडेसा फाइल, द निगोशियेटर उत्तम. नो कम बॅक्स हा त्याच्या थरारकथांचा संग्रहही आवर्जून वाचावा असाच आहे.

भंकस बाबा's picture

27 Jul 2019 - 6:58 pm | भंकस बाबा

उत्तम रहस्यकथा
अनेकवेळा वाचल्या वाचल्या आहेत या कथा

जेम्स वांड's picture

29 Jul 2019 - 6:50 am | जेम्स वांड

द अफगाण

आणि

द डे ऑफ द जॅकल

अलटीमेट

साबु's picture

30 Jul 2019 - 4:42 pm | साबु

खूप आवडलेली ... त्याचा sequel आहे हे माहिती नव्हतं . विजय देवधरांचं seventh secret पण मस्त आहे . अनुवादामध्ये पॅपिलॉन ,कोमा , सेकंड लेडी , deserter आवडलेली आहेत.

भंकस बाबा's picture

18 Aug 2019 - 7:42 pm | भंकस बाबा

डेजर्टर व पैपिलोन ही पुस्तके खिळवून ठेवतात हो!

जॉनविक्क's picture

18 Aug 2019 - 7:47 pm | जॉनविक्क

दोज गुड ओल्ड डेज :)

धर्मराजमुटके's picture

25 Jul 2019 - 8:12 pm | धर्मराजमुटके

अ‍ॅलीस्टर मॅक्लीन यांनी लिहिलेले आणि अशोक पाध्ये यांनी अनुवादित केलेले मेहता बुक पब्लीकेशनने प्रकाशित केलेले हे पुस्तक नुकतेच वाचून संपविले. दुसर्‍या महायुद्धातील काही नाझी गुन्हेगार जर्मनीतून पळून इतर देशांत आश्रय घेतात. एक चित्रपट बनविणारी कंपनी स्थापन करुन तिच्याआडून उत्तर ध्रुवाजवळील बेअर आयलँड बेटावर चित्रपटाचे चित्रीकरण करण्याच्या मिशाने तेथे नाझींनी लपविलेला खजिना ताब्यात घेण्याची योजना बनविली जाते. मात्र ब्रिटीश ट्रेझरीचा एक अधिकारी डॉक्टर बनून त्यांच्याच जहाजावरुन प्रवास करतो, प्रवासादरम्यान आणि बेटावर पोहोचल्यावर ताफ्यातील बर्‍याच सदस्यांच्या हत्या होतात. शेवटी गुन्हेगार शोधला जातो.

अ‍ॅलीस्टर मॅक्लीन यांचे हे पुस्तक मला जरा रटाळच वाटले. खुनी शोधण्यासाठी डॉक्टर (ट्रेझरी ऑफीसरने) काही विशेष बुद्धीमत्ता पणाला लावली असे वाटत नाही. त्याल बहुतेक गुन्हेगार पहिलेच ठाऊक असतो. त्याचा मुळ उद्देश खजिना ताब्यात घेणे हा असतो. मात्र त्याने खुनी शोधण्यासाठी केलेली धडपड दाखविण्यातच बरीचशी पाने खर्ची पडली आहेत. मधेमधे कादंबरी अतिशय संथ झाली आहे.

अशा प्रकारचे लेखन आवडण्या र्‍यांनी ही कादंबरी एकदा वाचण्यास हरकत नाही. मात्र नाही वाचली तरी फारसे काही गमावण्यासारखे नाही.

प्रचेतस's picture

27 Jul 2019 - 8:47 am | प्रचेतस

मॅक्लिनची सुरुवातीच्या काळातली पुस्तके खूपच जबरदस्त आहेत. द गन्स ऑफ नॅव्हरोन, आईस स्टेशन झेब्रा, द लास्ट फ्रन्टियर, फिअर इज की, द गोल्ड्न रॅदेवू, द डार्क क्रूसेडर, व्हेअर इगल्स डेअर वगैरे. मॅक्लीनच्या कादंबर्‍यांत प्रणयला किंवा प्रेमाला अत्यंत गौण स्थान असून थरार हाच प्रामुख्याने येतो. त्याच्या बर्‍याच कादंबर्‍यांत खलनायक आधी माहिती असूनही वेगवान कथानकामुळे कादंबरी उत्कंठावर्धक ठरते.
त्याच्या नंतरच्या कादंबर्‍या मात्र काहीशा एकसुरी आणि रटाळ वाटू लागल्या. मॅक्लीन त्याच्या उत्तरार्धात मद्याच्या आहारी गेला होता आणि त्याचा प्रभाव त्याच्या कादंबर्‍यातही मद्याची घाउक प्रमाणात वर्णने सुरु होऊन पडत गेला. बेअर आयलंड हे त्याचेच एक उदाहरण. ह्या कादंबरीतही कधी कधी त्याचा पूर्वीचा क्लास जाणवतो पण एकूणातच कादंबरी रटाळच आहे.

जॉनविक्क's picture

27 Jul 2019 - 4:30 pm | जॉनविक्क

मेरे सपनोंकी रानी कब आयेगी तू गाण्यात शर्मिलाजी याच लेखक महोदयांचे पुस्तक वाचताना दाखवल्या आहेत

प्रचेतस's picture

27 Jul 2019 - 5:23 pm | प्रचेतस

a

अभ्या..'s picture

27 Jul 2019 - 5:36 pm | अभ्या..

हिची नात आली पिक्चरामध्ये,
तुम्ही किती दिवस म्हणणार अजून गाणं? ;)

एमी's picture

26 Jul 2019 - 7:50 am | एमी

चांगला धागा. वाचतेय.

अंबानी & सन्स - लेखक : हॅमिश मॅकडोनाल्ड.
गेल्या कित्येक दिवसांपासून हे ३६६ पानी पुस्तक वाचून पूर्ण करायचा प्रयत्न करतोय, पण १३५ पानांच्या पुढे जाता आले नाहीये अजून :-)

अंबानी & सन्स ही जगातील श्रीमंत कुटुंबाच्या संघर्षाची कथा आहे. शून्यातून आपले विश्व निर्माण करणाऱ्या धीरुभाईंची रिलायन्स ही कंपनी भारतातील प्रमुख उद्योगांपैकी एक आहे. २००२ साली त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांची मुले अनिल आणि मुकेश यांनी कंपनीची जवाबदारी आपल्या शिरावर घेत तिचा आणखी विस्तार केला.
अंबानी यांच्या कथेत आधुनिक भारताच्या विकासाची मोठी गोष्ट सामावलेली आहे. त्यात फक्त आर्थिक सत्तेबाबत माहिती नाही तर सरकार आणि मोठा उद्योजक यांच्यातील गुंतागुंतीच्या संबंधाबाबतही बरेच काही आहे.

अंबानी & सन्स

सतिश गावडे's picture

26 Jul 2019 - 11:11 am | सतिश गावडे

फावल्या वेळात अमेझॉनवर खिडकी खरेदी करत असताना हे पुस्तक नजरेस पडले. आपणच माणूस असताना लेखक "माणूस आपल्याला कुठे घेऊन जाईल" असा प्रश्न विचारतोय हे रोचक आहे.

पुस्तकाची तोंडओळख आणि अमेझॉन आणि गुड रिडसवर वाचकांचे अभिप्राय वाचले आणि लगेच ऑर्डर केलं.

माणूस आणि तंत्रज्ञान हा विषय आहे पुस्तकाचा.

Man

जॉनविक्क's picture

26 Jul 2019 - 3:54 pm | जॉनविक्क

Black Mirror हि नजरेखालून अवश्य घालावी

धर्मराजमुटके's picture

27 Jul 2019 - 11:00 pm | धर्मराजमुटके

पुस्तकाचे नाव : डॉ. नो.
मुळ लेखक : इयान फ्लेमिंग
मराठी अनुवाद : विजय देवधर
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
किंमत : रु २६०.०० फक्त

जनु बांडे उर्फ जेम्स बाँड मालिकेतला पहिला चित्रपट डॉ. नो. या पुस्तकावर आधारीत आहे. शॉन कॉनरी हा यात जेम्स बाँड च्या भुमिकेत आहे.
जमैका बेटावरील ब्रिटिश सिक्रेट एजंट जॉन स्ट्रेंजवेज आणि त्याची साहाय्यिका मेरी ट्रुब्लड एका संध्याकाळी अचानक गायब होतात. त्यांचे काय झाले हे शोधण्यासाठी जेम्स बाँडला जमैकाला पाठविण्यात येते तिथे त्याची गाठ डॉ. नो शी होते आणि मग पुढे काय काय घडतं ही मजा पुस्तक वाचण्यातच आहे.
बाँडपट म्हटला की उत्तम हत्यारे, वेगवेगळी चित्रविचित्र उपकरणे आणि अचाट साहसे हे ओघाने आलेच. मात्र या कादंबरीत चित्रविचित्र उपकरणांचा म्हणावा तेव्हढा सुळसुळाट नाही. बहुतेक ही नंतरच्या काळातली प्रगती असावी.

शत्रुच्या निर्दालनाबरोबर काही अतिमहत्त्वाच्या 'कामां'ची जबाबदारी देखील बाँडवर असते हे आपण सारे जाणताच. ही कादंबरी ३२२ पानांची आहे आणि ते महत्त्वाचे काम करण्यासाठी जेम्स बाँडला चक्क ३२० व्या पानापर्यंत वाट पहावी लागते. हे माझ्या दृष्टीने एक आश्च्यर्यच आहे. शिवाय ह्यातला बाँड चक्क दिलाने विचार करणारा देखील आहे. "एम" च्या पोस्टवर सध्या 'मॅडम सर' नाही तर केवळ 'सर' आहेत.

असो, पुस्तक एकदम मस्त ! एकदा नक्कीच वाचा !

जॉनविक्क's picture

27 Jul 2019 - 11:28 pm | जॉनविक्क

मेहता पब्लिशिंग ने अनुवादित बाँड कथांचा खजिनाच उपलब्ध करून दिला आहे च. पण एकदा वाचनालयात मी चक्क भा.रा. भागवतांनी भाषांतरीत केलेली बॉण्ड कथा वाचली होती आता नाव आठवत नाही पण अफलातून भाषांतर होते. त्यामधे बॉण्डचा चालत्या रेल्वेच्या टपावर गुंडाशी लढत देण्याचा प्रसंग भागवतांनी शब्दातून इतका अप्रतिम जिवन्त केला होता की मी प्रत्यक्ष घटनेचा साक्षीदार आहे की काय वाटू लागले होते... कादंबरी न्हवती दीर्घकथा होती पण नावच आठवत नाही :(

प्रचेतस's picture

28 Jul 2019 - 5:59 am | प्रचेतस

फ्रॉम रशिया विथ लव्ह मध्ये ओरिएंट एक्सप्रेसमधली फाईट आहे.

जॉनविक्क's picture

28 Jul 2019 - 2:21 pm | जॉनविक्क

रशिया विथ लव्ह जाड कादंबरी आहे, इतकं मोठं कथानक न्हवतं ते आणि जुनं प्रकाशन वाटत होतं चकचकीत मेहता पब्लिशिंग नक्कीच न्हवतं ते पुस्तक

प्रचेतस's picture

29 Jul 2019 - 8:20 am | प्रचेतस

मग तीच कादंबरी असणार. भा.रां.नी खूप पूर्वी ह्याचा संक्षिप्त अनुवाद केलेला असणार. नंतर ही कादंबरी पूर्णरुपाने मेहतातर्फे प्रकाशित झाली. बुडापेस्टमधील हेराच्या संदर्भावर ही कादंबरी बेतलेली आहे.