" एकदम आपल्या आजोबांवर गेलं आहे नाही बाळ, त्यांच्या सारखच नाक, त्याच्या सारखेच डोळे" - मावशी म्हणाली, मी जेव्हा जन्मलो तेव्हा. (हे परवा परवा मावशीने सांगितले व खालील मामाचा पण संवाद.)
" कार्ट, एकदम बाबाच्या वळणावर गेलं आहे, केसं बघ कशी आहेत ह्याची उंदरा सारखी, वसावसा अंगावर येतो, नाही जमनार, ह्याचं व माझं नाही जमणार कधी " मामा. जेव्हा मी ५ वर्षाचा होतो.
" राजा लेका, थोबाड रंगवीन तुझं एक कानाखाली वाजवली तर " बाबा जेव्हा त्यांचे चारमिनार सिगरेटचे पाकिट आपोआप मोकळं होऊ लागलं तेव्हा.
" थोबाड बघितलं आहे का आरसामध्ये कधी ?" पहिली मुलगी जीला प्रपोज केलं होतं ती (वय लिहायची गरज नाही ;) )
"
"किती काळवंडला आहे चेहरा माझ्या बाळाचा, कशाला उन्हात खेळतो रे " मोठी माऊशी.
" तोंडाला काय लावून घेतले आहेस बाळा ? आमचा राजा कुठे आहे ? " रंगपंचमीला ग्रीस कोणी तरी फासल्यामुळे चेहरा / केसं अनोळखी झाला तेव्हा आई म्हणाली.
"कुठ थोबाड फोडून घेतलं रे " माझा एक मित्र, जेव्हा मी मार खाऊन आलो होतो शाळेतून.
" अपना फेस देखा है क्या, साला तु पियेगा बियर, मेरे साथ ? " एका बियर पिण्याच्या पैजेच्या वेळी मित्र.
असं आयुष्यभर कोठे ना कुठे नेहमी तोंडाचा, थोबाडाचा माझ्या चेहराच्या उदोउदो होतच असे. कधी शाळेत, कधी हॉस्टेल मध्ये कुठल्यातरी सराने / बाईने वाजवल्यामुळे चेहराचा रंग बदलतच असे त्यात नवीन काही नव्हतंच मला, पण कधी खुप वेळ पंचगंगेत डुबक्या मारल्यामुळे तर रंगपंचमीला डोळ्यात रंग गेल्यामुळे ताबारलेले डोळे व त्यात आमचं चित्रविचित्र थोबाड बघून लहान मुले बघताच रडायला सूरु होतं. कधी काळी सायकल शिकताना पडलो त्यामुळे नाकाच्या सुरवातीलाच एक कच, चांगलाच मोठा, तर अक्काचे पुस्तक फाडले होते म्हणून तीने कानाजवळ आपल्या नखांनी केलेली नक्षी, भले मोठे डोळे व कधी काळी क्रिकेटचा बॉल लागल्यावर सुजलेले व वाकडे झालेले नाक, उजव्या होठावर तिळ , स्वर नलिका दोन इंच बाहेर आल्या सारखी दिसणे ! भुवयावर केसं देवानं जसे वरदान दिले असावे तसे दोन्ही सख्खे जुळे भाऊ असल्यासारखे जुडलेले, म्हणजे आमचं थोबाड. रंग तसा गोराच, जसं १००% पाढं-या रंगात ४०% काळा व ३०% ताबुस रंग मिक्स केल्यावर जसा रंग तयार होईल तसा, पण लहान पणी मी खुप गोरा होतो पण गल्लीतल्या काही मुलींची नजर लागल्यामुळे माझा रंग काळवंडला असं आई आज ही सांगते.
असो,
आता थोबाड आठवायचं कारणं म्हणजे, मागील आठवड्यापासून वेळ मिळाला नव्हता व हा आठवडा आजारपणात काढला त्यामुळे थोबाडा कडे बघायला वेळ मिळालाच नाही आज जरा कंटाळा आला होता टिपी करुन म्हनून विचार केला मोकळा वेळ सतकारणी लावावा, त्यासाठी जवळच असलेल्या माझ्या नावडत्या हजामाकडे कडे गेलो व म्हणालो " काट डाल सबकुछ... " तो दचकला व म्हणाला " क्या साहब ? सबकुछ सफाचट ? गंजा होणा है क्या ? " अरे लेका... " नाही यार, थोडा बाल कम कर बाकी दाढी, मुछे सफाचट."
तो आपला नेहमीचा कपडा माझ्या अंगावर ओढून गळाला फास बसावा ह्या हेतूने टाईट बांधत म्हणाला " साब, चार्-पाच दिन से दिखे नही आप" लेका मी मसनात गेलो होतो तु आपलं काम कर ना भाऊ.. हा उच्च विचार माझ्या मनात आला होता की बोलावं त्याला पण त्याच्या हातात माझी मुंडी व थोबाड दोन्ही होतंच तसेच एक कात्री व समोर ठेवलेला वस्तरा पण दिसत होता त्यामुळे मी त्याला एकदम संयमाने म्हणालो " बिझनेस मिटिंग मे बिझी था.. तु काटो बाल.. काटो.."
पंधरा मिनिटामध्ये त्यांने माझी केसं कमी कापली व मेंदुला बोलून बोलून झिनझिन्या जास्त आणल्या, आधीच आजारी त्यात जरा पण विचार केला की गुढगा दुखतो त्यात तो माझं नसलेलं डोकं खात होता भसा भसा.. पण आलीया भोगासी , कर्म. आपल्याच पापाची फळे ह्याच भुतलावर मिळतात असं कुठ तरी वाचलं होतं, त्याचं मुर्तीमंत उदाहरण माझ्यासमोर बोलत होतं, राजकारणापासून पाकीस्तान पर्यंत पाकिस्तान पासून हेमामालिनी पर्यंत अर्धा तासात त्याने सबसे तेज चॅनेलला पण लाजवेल ह्या स्पीड मध्ये बातम्या दिल्या, हिचं लग्न झालं, तीचं अफेयर झालं, तो मेला तो जगला. सर्व काही. घरा जवळ आहे व जास्त लाबं मी जाऊ शकत नाही त्यामुळे ह्याच्या कडे येण्याची बुध्दी झाली व मी माझ्या बुध्दी वर किव करत बसलो होतो.
फक्त एक तासात त्याने माझे केस कापले व पुढील अर्धातास त्यांने माझी दाढी व मिशी काढायला घेतली ह्यावरुन तुम्हाला त्याचा कामाचा वेग व बोलण्याचा वेग कळालाच असेल. असो, त्यांने तोडावर फसाफसा पाणी मारत माझ्या चेहरा निरखुन पाहात म्हणाला " साब, आप का फेशीयल कर दुं क्या ? चेहरा साफ हो जायेगा, रंग भी निखर जायेगा" मी त्याच्या कडे डोळे मोठे करुन बघीतले तेव्हा तो गडबडून म्हणाला " नहीं नहीं, आपका रंग तो साफ है ही, फेशीयल से निखर जायेगा, कंपनी गॅरेंटी देती है साब कलर गोरा होने की, बाल भी काले करा लो या गारनियर के यह रंग शेड देख लो जो पसंद हो वही तयार कर देता हूं" त्याच्या कामाचा वेग व बोलण्याचा वेग पाहून मी नकार देण्याचं ठरवलं होतं पण, समोर आरशामध्ये पाहिल्यावर मला माझा लहानपणाचा गोरा रंग आठवला व त्या नजर लावणा-या मुलींच्या नावाने बोटे मोडली व त्याच रागात मी त्याला हो म्हणावे की नाही ह्याचा मी विचार करत होतो तो त्याने काही ही विचार न करता त्याने सरळ माझ्या थोबाडाला कसलीशी क्रिम फासू लागला व दहा एक मिनिटात माझ्या थोबाडावर चांगलाच पांढ-या रंगाचा थर जमा करुन बाहेर गेला मला कळालेच नाही, मी त्याला शोधण्यासाठी , पाहण्याचा वळण्याचा प्रयत्न केला तर तो बाहेरुन ओरडला " हिल ना मत साब, क्रिम को सुख ने आराम से सिट पर बैठे रहो." मी जो हुकुम सरकार असं म्हणत चुपचाप बसून राहिलो.
काही मिनिटात तो आता ही क्रिम धुणार व माझा रंग एकदम उजळणार व आपला हरवलेला गोरा रंग सापडणार अशी काही दिवास्वप्ने मला त्या खुर्चीवर बसून पडू लागली ! पंधरा मिनिटाने तो आला व हळुहळु माझ्या चेह-यावरील ती क्रिम काढून लागला, मी एकदम काही तरी मी नवल पाहणार आज ह्या नजरेने समोर अरसामध्ये आपलं थोबाड पाहत होतो, पण कसले काय ०.००१% पण रंग गोरा झाला आहे असं मला तरी वाटलं नाही पण तो लेकाचा म्हणाला " देखा साब, कितना फरक पडा आप अगले हप्ते भी करा ले ना दो चार बार करोगे तो आप का रंग गोरा जरुर होगा. " आता चेह-यावर प्रयोग केलाच होतो आता केसांच्या कडे त्याचे लक्ष होते पण मी त्याच क्षणी भानावर आलो व म्हणालो " बाल कलर मत करना बाद में देखुंगा, जब टाईम होगा तब." त्याचं मन खट्टु झालं पण मी आपल्या निर्णयावर पक्का होतो पण त्याने ठरवलं असावं की अजून काहीतरी प्रयोग करायचाच माझ्या वर त्यासाठी त्याने पुन्हा माझ्या भुवया पाहत म्हणाला" साब, एक काम करता हूं, आप कि भोएं ठिक ठाक करता हूं.. ठीक है" त्याला केसाला कलर करुन नको असे सांगून त्याचं मन मी दुखावलंच होतं... आता चार भुवयावरील केसंच काढतो म्हणत आहे तर काढू दे बापडा हा उच्च विचार करुन मी त्याला बरं कर म्हणलो... थोड्या वेळाने कळालं कि तो माझा उच्च नाही तर हुच्च विचार होता.
त्याने कसलासा तरी धागा आपल्या ड्राव्ह मधून काढला व थोडी पावडर माझ्या भुवयाच्या मध्ये लावली व धाग्याचे एक टोक हातात व एक तोंडात पकडून त्याचे त्याचा काहीतर शस्त्रासारखा वापर चालू करुन अक्षरश: माझ्या भुवयावरील केसं उपटू लागला, मला वाटलं होतं कात्री ने नाही तर वस्तराने करेल केसं कमी तर हा लेकाचा एक एक केसांना उखडून काढत होता... भयानक त्रास होत होता एक केस जेथून निघे तेथे रक्त आलं की काय असं वाटतं होतो, तो आपलं ते शस्त्र चालवत म्हणाला "साब, अब देख ना आपका चेहरा आप को भी नया दिखेगा" माझ्या डोळ्यात आसवं जमा झाली होती व मी आता सुरवात झालीच आहे ह्याचा कुठे तरी अंत असेल असा विचार करुन त्याचे अत्याचार सहन करत राहिलो, थोड्यावेळाने त्याने आपले शस्त्र म्यान केले व माझं थोबाड परत साफ करत म्हणाला "देखो साब, हो गया कितना आसान था" मी माझ्या भुवया चोळत म्हणालो " बहोत आसान था... कितना हुवा "
खिश्यातून दिलेले अडीचशे रुपये, कोरलेल्या भुवया व माझा न उजळलेलं थोबाड घेऊन मी तेथून बाहेर पडलो. व शिकलेली अक्कल आपल्या मेंदुमध्ये कुठेतरी खुणगाठ बांधावी तशी बाधून स्वतःशीच निर्णय घेतला की आज पासून आपल्या थोबाडावर कुणालाच प्रयोग करुन द्यायचे नाहीत... जे आहे, जसं आहे तसं आपलं !
हा विचार करुन आपल्या घराकडे चाललो तर एक मित्र भेटला व म्हणाला " क्या हाल है, अच्छे दिख रहे हो, दाढी-मुछ कटवाई बढिया किया, एक काम कर ना जो तुम्हारा डॉक्टर दोस्त है ना, उसको बोल तेरी तेढीं नाक व सींधा कर दे! एकदम हिरो लगेगा भाई तु " माझ्या चेहराचा बदललेला रंग व मी माझं पायतान हात घेण्यासाठी खाली वाकलो.... हे पाहताच तो सुसाट सटकला तेथून !
माझं थोबाड समाप्त !
प्रतिक्रिया
21 Mar 2009 - 3:29 pm | अवलिया
चला !!!
राजे सुटलो !!
मला वाटले की दारु आणि सिगारेट प्रमाणे सहा महिने लेखनाला पण आराम की काय?
पण नाही, लेख पाहुन बरे वाटले.
आता, सहा महिने बाकीच्या उचापती बंद आहेत तर लेखन जोरात येवु द्या !!
आणि हो, थोबाड आता सुधारले आहेच.. तर गळ्यात न पडेल अशा बेताने चालु द्या डाव शोधणे !!!
बाकी लेख नेहमीप्रमाणेच मस्त !!
(डाव म्हणजे काय ते माहित नसणा-यांसाठी छावीचा समानार्थी शब्द आहे तो ...
छावी, डाव, आयटम, माल, प्रकरण, हिरोईन, गुळढेप, डेम, भजनकलाकार, पार्टनर, वगैरे वगैरे एकाच अर्थाचे अनेक शब्द... जाणकारांनी उपप्रतिसादात भर घालावी )
--अवलिया
21 Mar 2009 - 4:38 pm | टारझन
सेम हियर यार !!! :) चला मी दुनियेत एकटा णाही !!
असो .. बाकी तु काय त्या ण्हाव्याला रोज रिपोर्टिंग करतोस काय बे ? "चार पाच महिनोंसे दिखे नही" असं म्हंटला असता तर ठिक होतं ..
असो !!
काही ठिकाणी खुदकन हसू आले !!
21 Mar 2009 - 9:38 pm | छोटा डॉन
राज्या, लेख अतिशय उच्च आहे , बर्याच ठिकाणी मस्त हसु आले.
ज्याम मज्जा आली ...
सर्वात महत्वाचे म्हणजे तु पुन्हा फॉर्मात आल्याचे पाहुन बरे वाटले, असेच लिहीत रहा ... :)
>>.. बाकी तु काय त्या ण्हाव्याला रोज रिपोर्टिंग करतोस काय बे ? "चार पाच महिनोंसे दिखे नही" असं म्हंटला असता तर ठिक होतं
तेच तर म्हणतो मी ...
रोज जावेच कशाला न्हाव्याकडे , कय गरज त्याची ?
आम्ही बघ बरं कसे ५-६ महिन्यातुन एकदाच न्हाव्याला तोंड दाखवतो, तो म्हणतोसुद्द्घा " आप है क्या, मुझे लगा चले गये क्या पुना ? "
शिवाय आम्ही तिकडे "सफाचट" करण्यासारखे पालथे धंदे कधीच केले नाहीत ...
न्हाव्याने कात्री उचलली की आम्हीच "बास, बास, झाले" म्हणुन जाहीर करतो ... ;)
चालायचेच ..!
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
22 Mar 2009 - 2:18 pm | दशानन
>>रोज जावेच कशाला न्हाव्याकडे , कय गरज त्याची ?
तीन दिवसातून एकदा दाढी करावी लागते बॉस !
आधीच आम्ही कसे आहेत ते वर सांगितले आहेच, जरा का दाढी वाढली की सर्कस वाले पकडून नेतील ना राव ;)
22 Mar 2009 - 3:29 pm | टारझन
काहीही काय राजे ? सर्कस वाले कुठे पळवून नेतात ? उलट तुम्ही दाढी ठेवा .. नाय तर कुठे काही बाही करताना सापडलात तर पोलिस पकडून नेतील .. अल्पवयीन म्हणून ...
(काही बाहीचा अर्थ मद्यपाणाशी आहे, आंबटशौकीनांनी आम्हाला माफ करावे)
22 Mar 2009 - 3:31 pm | दशानन
=))
लेका तुला भेटून चुक केली काय असं वाटत आहे मला आता ;)
21 Mar 2009 - 5:33 pm | परिकथेतील राजकुमार
महत्वाचा शब्द राहीला 'सामान'.
वर्णन आवडले राजे. छान लिहिले आहे. ६ महिने दारु सिगारेट बंद म्हणजे आपल्या चेहर्यावरील 'तेज' पुन्हा नाहिसे होणार हे ऐकुन अजुन वाईट वाटले.
अवांतर :- सकाळीच "हे काय पालकाची भाजी?" असे विचारल्या बरोब्बर आमच्या राजमातांकडुन "मुस्काड्या, ते मिळतय हे नशीब समज." असे सुरेल उत्तर मिळाले आहे. मी 'माझे मुस्काड' असा लेख लिहु का ?
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
21 Mar 2009 - 5:35 pm | दशानन
>>"मुस्काड्या, ते मिळतय हे नशीब समज."
=))
माते ने "मुस्काड्या,ते मिळतय हे नशीब समज, गुमान गिळ " असं नाही म्हणाली का :?
लिव्ह... माझं मुस्काड, आम्ही वाचतोच ;)
21 Mar 2009 - 6:52 pm | भिडू
सामान
22 Mar 2009 - 10:26 pm | निखिल देशपांडे
आता, सहा महिने बाकीच्या उचापती बंद आहेत तर लेखन जोरात येवु द्या !!
असेच म्हणतो...
बाकि लेख मस्तच लिहला आहे
23 Mar 2009 - 1:30 pm | दशानन
नक्कीच !
21 Mar 2009 - 3:23 pm | महेश हतोळकर
चांगलीच भादरली की रे तुझी!
21 Mar 2009 - 3:47 pm | मृगनयनी
तो आपला नेहमीचा कपडा माझ्या अंगावर ओढून गळाला फास बसावा ह्या हेतूने टाईट बांधत म्हणाला " साब, चार्-पाच दिन से दिखे नही आप" लेका मी मसनात गेलो होतो तु आपलं काम कर ना भाऊ..
=)) =)) =)) =))
हे सगळ्यांत आवडलं!
बाकी चेहर्याची "वर्णनं" मस्त!!!!!! सुपर्ब$$$$$$
बाकी .... आवडला हा आख्खाच्या आख्खा लेख!
क्रमशः न टाकल्याबद्दल आभारी आहे! ;) अजून येऊ देत!
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
21 Mar 2009 - 3:34 pm | नरेश_
सगळ्यात अवघड काम आहे. जमलं तुम्हाला .
अभिनंदन :-)
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
21 Mar 2009 - 3:36 pm | यशोधरा
:D
21 Mar 2009 - 3:38 pm | सहज
बघा राजे ब्युटी इंडस्ट्री किती बिलीयन डॉलर्स टर्नओव्हर करते सांगा :-) तुम्ही एक पार्लर काढा.
हा लेख खूप आवडला. एकदम सफाईदार वेगळ्याच गप्पा :-)
21 Mar 2009 - 3:42 pm | मिंटी
:D
मस्त रे राज.
21 Mar 2009 - 3:59 pm | भडकमकर मास्तर
मस्त होता..
मला वाटलं आठ भागांची सणसणीत मालिका आहे की काय?
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
21 Mar 2009 - 4:40 pm | टारझन
आणि मला वाटलं होतं ... "माझं खोबार- " चं विडंबण आहे की काय ?
दातातातल्या दातात : च्यायला ते खोबार केवढं लिवलंय .. विडंबण करायचं म्हंटल्यावर विना न्हावी केसं गायब होणार
21 Mar 2009 - 4:47 pm | दशानन
>च्यायला ते खोबार केवढं लिवलंय .. विडंबण करायचं म्हंटल्यावर विना न्हावी केसं गायब होणार
१००% सहमत, येवढं लिहायची हिंमत नाय बॉ आपल्या कडे तरी !
21 Mar 2009 - 4:50 pm | मिंटी
टार्याशी सहमत
आधी मला पण वाटलं होतं की माझं खोबारचं विडंबन आहे की काय.......... ;)
21 Mar 2009 - 6:57 pm | धमाल नावाचा बैल
माजं खोबार <> तुमच थोबाड ...टार्या ह ह पु वा =)) =))
21 Mar 2009 - 4:41 pm | निखिलराव
तुमचं थोबाड ... भाग- ० आवडेश.......
21 Mar 2009 - 4:43 pm | बिपिन कार्यकर्ते
राज्या, अरे खूपच छान लिहिलं आहेस. क्या बात है!!!
अवांतर: शीर्षक वाचून मला अपेक्षित शंका आलीच. म्हणलं आता ललित लेखाचेही विडंबन की काय? पण नाही, ते फक्त शीर्षकाचंच विडंबन होतं. पण सही विडंबन आहे. :)
बिपिन कार्यकर्ते
21 Mar 2009 - 5:55 pm | स्वाती दिनेश
लेख आवडला, शीर्षकासकट मस्त आहे,:)
स्वाती
21 Mar 2009 - 7:14 pm | लवंगी
मस्त टाइमपास लेख
21 Mar 2009 - 7:38 pm | शितल
राजे,
तुम्ही स्वतःच्या थोबाडावर मजेशिर लिहिले आहे.:)
21 Mar 2009 - 7:55 pm | क्रान्ति
:)
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
21 Mar 2009 - 9:58 pm | प्राची
धमाल आली राजे लेख वाचून.
=)) =)) =)) =)) =))
21 Mar 2009 - 10:04 pm | पिवळा डांबिस
" साब, आप का फेशीयल कर दुं क्या ? चेहरा साफ हो जायेगा, रंग भी निखर जायेगा"
हाहाहा!!!!
आम्हाला लहानपणी एक कविता होती.....
कावळा म्हणे मी काळा, पांढरा शुभ्र तो बगळा, दिसतसे.....
पुढलं आठवत नाही पण तो कावळाही पैशाचा साबू आणून फेशियल करत बसतो असं काहिसं होतं....
कुणा मिपाकराला ती कविता आठवते का?
:)
त्याने कसलासा तरी धागा आपल्या ड्राव्ह मधून काढला व थोडी पावडर माझ्या भुवयाच्या मध्ये लावली व धाग्याचे एक टोक हातात व एक तोंडात पकडून त्याचे त्याचा काहीतर शस्त्रासारखा वापर चालू करुन अक्षरश: माझ्या भुवयावरील केसं उपटू लागला, मला वाटलं होतं कात्री ने नाही तर वस्तराने करेल केसं कमी तर हा लेकाचा एक एक केसांना उखडून काढत होता...
तुला पुरुषाला हे धंदे सांगितले होते कोणी करून घ्यायला? आता पुढल्या वेळेस बिकिनी वॅक्स करून घे. अगदी सोप्पं असतं असं ऐकलंय!!!!!
=))
अरे राजा, कशाला इतकं सहन केलंस? त्यापेक्षा तुझ्या माऊलीच्या बोलांवर विश्वास ठेवायचा नाय?
पण लहान पणी मी खुप गोरा होतो पण गल्लीतल्या काही मुलींची नजर लागल्यामुळे माझा रंग काळवंडला असं आई आज ही सांगते.
माऊलीची पॉलिग्राफ टेस्ट घ्यायची का रे?
=))
22 Mar 2009 - 4:37 am | प्राजु
जबरा प्रतिसाद..पिडा काका जिंदाबाद!!
बाकी, तुम्हाला पाहून तुमच्या मित्र मैत्रीणींना "चेहरा है या चांद खिला है..' ची आठवण झाली असावी. ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
22 Mar 2009 - 2:20 pm | दशानन
>>तुला पुरुषाला हे धंदे सांगितले होते कोणी करून घ्यायला? आता पुढल्या वेळेस बिकिनी वॅक्स करून घे. अगदी सोप्पं असतं असं ऐकलंय!!!!!
बरोबर ! आता नाय जाणार त्या वाटेवर पिडा आजोबा, पण हे वॅक्स काय लफडे आहे जरा क्लियर करता का :?
>>त्यापेक्षा तुझ्या माऊलीच्या बोलांवर विश्वास ठेवायचा नाय?
माऊली वर विश्वास आहे हो. पण मी करायला सांगायच्या आधीच त्याने प्रयोग चालू केला, भिडस्त स्वभाव त्यामुळे गप्प बसलो ;)
21 Mar 2009 - 10:06 pm | प्रकाश घाटपांडे
मुखकमलाला थोबाड असा शब्द कुणी बरे दिला असावा?
गृहपाठ-
तेरी प्यारी प्यारी सुरत को किसी की नजर ना लगे चष्मे बद्दुर या गाण्यात सुरत च्या जागी थोबाड म्हणुन पहा.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
21 Mar 2009 - 11:52 pm | भाग्यश्री
सही!!! फार हसले!! =))
22 Mar 2009 - 12:32 am | योगी९००
हहपुवा.
इतके कौतूक केलेले थोबाड कसे आहे ते दाखवाना आम्हाला..
खादाडमाऊ
22 Mar 2009 - 12:37 am | प्राची
आपल्या थोबाडाचा एक फोटो डकवा
=)) =)) =))
:)) :)) :))
=)) =)) =))
22 Mar 2009 - 3:22 am | टारझन
ते लोळणं थांबवा आधी !! म्हणजे दिसेल णिट =))
राजे .. चला आता आपल्या "थोबाडा"चा फोटू डकवा ! "पब्लिक लोक्स" .. सुट्टे १००/५०० णिकालो पटापट
23 Mar 2009 - 12:32 am | धमाल नावाचा बैल
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
:D :D :D :D :D :D :D :D :D :D :D :D
:D :D :D :D :D :D :D :D :D :D :D :D
:D :D :D :D :D :D :D :D :D :D :D :D
22 Mar 2009 - 3:19 am | शिवापा
राजे तुम्हि फार छान आणि १००% वास्तव लिहले आहे. तिन महिन्यापुर्वि पुणे स्टेशनच्या बाहेर दाढि करयला घुसलो होतो. (तिथे रेटस बाहेरच स्पष्ट लिहलेले आहेत) तर मोबाईल चार्जिंगला लावला आणि दाढि करायला बसलो. दाढि झाल्यावर थोडेफार नेहमिचे आयट्म लाउन झाल्यावर त्याने "चंदन लगावु क्या?" असा प्रश्न केला. मी हो म्हटलो. नंतर त्याने पुर्ण फेशियल प्रकार त्याचा त्यानेच केला. चंदन लावणे हि त्या प्रोसेसची पहिली स्टेप होती हे मला कळुन चुकले होते आणि पैसे किती लागतील हे विचारण्याचा चान्सच दिला नाहि त्याने. तुमच्यासारखेच मी ३५० रुपये देउन तिथुन सटकलो. पण "चंदन लावणे" या वक्प्रचाराचा उगम नेमका कुठे झालाय याचा साक्षात्कार झाला.
टिप:- हे कुठल्याहि शहरात नवख्या भोळ्या माणसाच्या बाबतीत घडू शकते.
22 Mar 2009 - 11:16 am | सुक्या
काय लिवलय राजे काय लिवलय . . एकदम झकास.
रंग गोरा करायला आम्ही पन खुप दमडा वाया घालवला आहे :-). बरेच दिवस फेयर अन्ड लवली वापरुन पाहीली. एका मित्राने ' तुम फेयर ऍन्ड लवली पे केस कर दो' असा सल्ला दिल्यावर वापरायचे बंद केली. शिवापा ने सांगीतलेला अनुभव मला पुण्यात आला आहे. वाईट इतकेच तो अन्हुभव यायला २०० रुपये मोजावे लागले. :-). बाहेर नळावर तोंड धुतल्यावर माझा रंग आहे तिथे आहे तसाच आहे हे कळाले ते वेगळे.
लहान पणी मी खुप गोरा होतो पण गल्लीतल्या काही मुलींची नजर लागल्यामुळे माझा रंग काळवंडला असं आई आज ही सांगते.
हे मात्र खासच.
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
22 Mar 2009 - 2:25 pm | देवदत्त
:)) =))
22 Mar 2009 - 7:19 pm | सँडी
मस्त हजामत करुन घेतलीत ;)
लेख आवडला!
22 Mar 2009 - 10:32 pm | स्वामि
(|: (|: (|: (|: (|:
22 Mar 2009 - 10:52 pm | चित्रादेव
ते संस्कृतात एकले नाही का?
काक कृष्णः पिक कृष्ण को भेदः पिकाकयो
वसंत समये प्राप्ते काक काक: पिक पिक:
(वरचा अर्थ कळला असेलच जंतेला,नसेल तर सांगा.थोबाडावर उगीच कोणी पैसे घालवू नका. वरची म्हण लक्षात ठेवा. कसं?).
असो, राजे तुमचे ('माझं) थोबाडं' (लिखाण)आवडलं. :)
22 Mar 2009 - 10:58 pm | चित्रादेव
ते काही आयांना लेकाच्या रंगाचे पण खूपच असते. माझी मावशी स्वताच्या काळ्या(कोळश्यापेक्षा एकच स्टेप कमी काळा रंग) कार्ट्याबद्दल असे म्हणाली ते पण एकदा इथे मॉल मध्ये एका गोर्याच्या लहान पोराला दाखवून, असाच होता हां पण नाही का गं(हे माझ्या आईला उद्देशून आणि स्वताच्या सुनेला एकू येइल इतके.) . आम्हा दोघींची हसून वाट. (मी अन माझी वहीनी).
23 Mar 2009 - 2:01 pm | अनिल हटेला
आमस्नी वाटायचं आमच एकट्याचच थोबाड षूंडर हाये ,
पण नाय "लोग मिलते गये ,कारवां बनता गया " ;-)
(वरीजनल कलरवालं थोबाड )
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
25 Mar 2009 - 10:54 am | घाशीराम कोतवाल १.२
मस्त माझ थोबाड-०
आता त्या तुमच्या थोबाडाचा फोतु लावा बर
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??