फ्री चा फुगा!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
11 Jul 2019 - 5:34 pm

तीन संतूर साबणासोबत एक पेन फ्री अशी जाहिरात बघितली आणि मला वाटले, पेन आणि साबण यांचा काहीएक संबंध नसतांना एकावर दुसरे फ्री नेमके कोणत्या कारणास्तव देत असतील?

बहुतेक तीन साबण वापरून संपले रे संपले की ती साबण वापरणारी महिला वयाने इतकी लहान होऊन जाते की मग तिला नोकरी सोडून शाळेत जावे लागते आणि मग शाळेत जायला पेन नाही का लागणार? तेही स्वत:च्या मुलीच्या वर्गात जाऊन!

त्वचा से उम्र का पता नही चलता! काय कमी समजला की काय तुम्ही साबणाला? मम्मी!! मम्मी??

मागे एकदा टाईम्स ऑफ इंडिया वर्तमानपत्र क्लीन आणि क्लियर शाम्पू फ्री द्यायचे रविवारी! मुखपृष्ठाला चिकटवलेला असायचा! यामागचे कारण काय असावे?

रविवारी आळशी नवरे लोक टाईम्स वाचत पडत असतील तर त्यांना अंघोळीची आठवण करून द्यायला किंवा मग दर रविवारी शाम्पूने अंघोळ करायची असते याची स्त्रियांना आठवण करुन द्यावी म्हणून?

तसेच आमचे वर्तमानपत्र वर्षभर घ्या आणि काचेचे ग्लास, जेवणाचे डब्बे फ्री! वा! म्हणजे नुसते पेपर वाचू नका, जेवण पण करत जा असा मौलिक संदेश ते देत असतात.

मागे एका जाहिरातीत मोबाईल शॉपने एका विशिष्ट मोबाईलसोबत एल ई डी टीव्ही फ्री देऊ केला होता.

मला वाटते त्यांनी आता हेल्मेट सोबत एक हातोडा फ्री द्यायला हवा, म्हणजे तिथल्या तिथे दुकानावर हेल्मेट कच्चे की पक्के बघता येईल.

खरे तर ज्या गोष्टीवर एखाद्या दुसऱ्या गोष्टीची खरच गरज आहे ती मात्र कधीही कुणी फ्री देणार नाहीत.

म्हणजे बाईक सोबत हेल्मेट कुणी फ्री दिल्याचं ऐकलंय का कधी?

दुधाच्या पिशवीसोबत कधी बोर्नव्हीटा, चहा, कॉफी फ्री किंवा मग एक किलो चहा सोबत दीड लिटर दुध फ्री असं ऐकलंय का?

महिलांनी आरसा विकत घेतला की सोबत फेयरनेस क्रीम फ्री आणि पुरुषांना दाढीचे रेझर फ्री द्यायला हवं!

हॉटेल्समध्ये जेवण झाल्यावर हाजमोला फ्री, ज्वेलर्सकडे गेल्यावर प्रत्येक ग्राहकाला छोटासा हिरा फ्री द्यायला हवा नाही का?

अडकित्ता, सुरी, चाकू विकत घेतल्यावर बँडेजची पट्टी फ्री तसेच कैरी चिंचा विकत घेतल्यावर खोकल्याचे औषध फ्री, तिळाचे लाडू विकत घेतल्यानंतर दंतवैद्याची पहिली अपोइंटमेंट फ्री असे हवे!

ट्युब लाईट सोबत टॉर्च फ्री (लाईट वगैरे गेली तर), आरामखुर्ची विकत घेतल्यास एखादे लोकप्रिय पुस्तक फ्री द्यायला हवे,केशवर्धक तेलासोबत कंगवा फ्री द्यायला हवा, उन्हाच्या टोपी सोबत गॉगल फ्री द्यायला हवा, तीन प्लेट पाणीपुरी खाल्ली की पोटदुखीचे औषध फ्री, डेबिट कार्ड सोबत क्रेडिट कार्ड फ्री, महिनाभर पुण्याच्या पीएमटीने प्रवास करून दाखवल्यास अमेरिकेचा वर्षभराचा व्हिसा फ्री असे द्यायला हवे नाही का?

पण नाही! ते तसे देणार नाहीत.

हां, एक मात्र आहे! नेतेमंडळी कायम एक गोष्ट न मागता फ्री देत असतात! ते म्हणजे - आश्वासनं!

त्यापेक्षा दुष्काळग्रस्त भागात दुष्काळ संपेपर्यंत शेतीला आणि पिण्यासाठी पाणी फ्री असे कुणी नेता का देत नाही?

वस्तूंचे उत्पादनाकर्ते विजोड आणि विसंगत वस्तू मात्र फ्री देतील. याचे नक्की एक कारण आहे. एक तर जी वस्तू फ्री मिळते आहे त्या वस्तूची विक्री होत नसते किंवा मग मूळ वस्तू बाजारात चालत नसते म्हणून बाजारात चालत असणारी वस्तू त्या मूळ उत्पादनासोबत फ्री देतात. मग त्या दोन्ही वस्तूंचा परस्पर संबंध असो किंवा नसो. पण ग्राहकांना हे कळून पण वळत नाही.

बरेचदा काहीतरी फ्री मिळतंय म्हणून जी नकोय ती वस्तू सुध्दा ग्राहक विकत घेतात. नंतर कळतं की मूळ वस्तू सोबतच फ्री वाल्या वस्तूची पण आवश्यकता नव्हती. काही वेळेस तर मूळ वस्तू आणि त्या सोबत फ्री मिळालेली वस्तू दोन्ही मार्केट मध्ये फ्लॉप असतात पण फ्रीच्या आयडिया मुळे बरेचदा दोन्ही वस्तू खपतात.

अशा विजोड जोडींमुळे मग पुढे भविष्यात खालीलप्रमाणे वस्तू मिळतील जसे -

प्रिंटर विकत घेतल्यास कात्री फ्री (चुकीचे प्रिंट आले की फाड कात्रीने कराकरा)
कुत्रा विकत घेतल्यास दगड फ्री (जास्त भुंकल्यास..)
तुरडाळ विकत घेतल्यास काळे खडे फ्री (दया, जरूर दाल मे कुछ काला हैं)
बाटा बूट विकत घेतल्यास टाटा स्काय फ्री
सायकल विकत घेतल्यास मिसळ पाव फ्री (म्हणजे "पोटभरून" सायकल शिकता येईल)
आइस्क्रीम विकत घेतल्यास गरमागरम कॉफी फ्री
इक्लेयर्स विकत घेतले तर फेविकॉल फ्री (इक्लेयर्स आजपर्यंत मी दुसऱ्यांदा खाण्याची हिम्मत केली नाही, कारण मला दात तोंडात शाबूत असलेले आवडतात)
सैफचा चित्रपट पहिला तर लेज वेफर्स फ्री
कुकरसोबत बासरी फ्री (म्हणजे कुकरने शिटी मारली की आपण इकडे बासरी वाजवायची, म्हणजे खिचडी संगीतमय वातावरणात शिजेल!)
अनिल कपूरला चित्रपटात घेतलं तर माधुरी फ्री
गोविंदा घेतल्यास करिष्मा किंवा रवीना फ्री
भुतांचा चित्रपट बनवायचा असेल तर मुकेश भट सोबत राम गोपाल वर्मा फ्री
सनी देओल आणि सुनील शेट्टी यांचा नाच म्हणजे प्रेक्षकांच्या सहनशक्तीची परीक्षा असते, पण त्या सहनशक्तीचा अंत बघण्यासाठी काही निर्माते त्यांना डबल रोल घेतात, एकावर एक फ्री!

आजकाल हा फ्रीचा फुगा सगळीकडे फुगवून मिळतो पण तो थोडाच वेळ टिकतो आणि नंतर धाडकन फुटतो.

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

तुमच्या लिखाणात प्रचंड वैविध्य आहे आपण सिनेक्षेत्रात करिअर करायचा विचार कधी केला आहे का ? नसेल तर अवश्य करा.

निमिष सोनार's picture

11 Jul 2019 - 6:44 pm | निमिष सोनार

आभारी आहे. तसा प्रयत्न मी करतो आहे. तसेच माझी सिने टीव्ही क्षेत्रावर आधारित एक कादंबरी आहे: वलय. कृपया वाचून आपली प्रतिक्रिया कळवा.
Esahity.com
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/valay_nimish_sonar.pdf
Wattpad:
https://my.w.tt/UiNb/n9RG7u4ctK
OR
https://www.wattpad.com/story/134750755
Google Play Store App:
https://play.google.com/store/apps/details?id=com.marathi.novel.valay

अतिशय धन्यवाद.

सुबोध खरे's picture

11 Jul 2019 - 6:48 pm | सुबोध खरे

बरेचदा काहीतरी फ्री मिळतंय म्हणून जी नकोय ती वस्तू सुध्दा ग्राहक विकत घेतात.

आपल्या प्रश्नांचे उत्तर आपणच दिलंय कि.!

Namokar's picture

11 Jul 2019 - 7:00 pm | Namokar

भारीच लिहिलय .... :) :) :D

इरामयी's picture

11 Jul 2019 - 7:37 pm | इरामयी
इरामयी's picture

11 Jul 2019 - 7:37 pm | इरामयी

तिळाचे लाडू विकत घेतल्यानंतर दंतवैद्याची पहिली अपोइंटमेंट फ्री असे हवे!

:) :) :)

त्यांनी ग्राहकांची नस बरोबर पकडलेली आहे. काहीतरी फुकट मिळते आहे म्हणून नको असलेली वस्तू देखील खरेदी केली जाते.

उगा काहितरीच's picture

11 Jul 2019 - 10:03 pm | उगा काहितरीच

ठीक ठीक झालाय लेख. पुलेशु!

निमिष सोनार's picture

12 Jul 2019 - 10:59 am | निमिष सोनार

.

श्रिपाद पणशिकर's picture

12 Jul 2019 - 4:51 am | श्रिपाद पणशिकर
श्रिपाद पणशिकर's picture

12 Jul 2019 - 4:52 am | श्रिपाद पणशिकर
श्रिपाद पणशिकर's picture

12 Jul 2019 - 4:53 am | श्रिपाद पणशिकर
श्रिपाद पणशिकर's picture

12 Jul 2019 - 4:57 am | श्रिपाद पणशिकर
श्रिपाद पणशिकर's picture

12 Jul 2019 - 5:20 am | श्रिपाद पणशिकर
श्रिपाद पणशिकर's picture

12 Jul 2019 - 5:21 am | श्रिपाद पणशिकर
श्रिपाद पणशिकर's picture

12 Jul 2019 - 5:34 am | श्रिपाद पणशिकर
श्रिपाद पणशिकर's picture

12 Jul 2019 - 5:39 am | श्रिपाद पणशिकर
श्रिपाद पणशिकर's picture

12 Jul 2019 - 5:39 am | श्रिपाद पणशिकर

" फ्री चा फुगा "
अगं बया बया बया
अश्लील अश्लील

कुठे नेवुन ठेवलाय मिपा माझा :(
अहो अगदी चार वर्षापुर्वि काय एक से एक बाजिराव होते मिपा वर, काय लेख पडायचे, काय त्या राजकीय धाग्यांवरच्या तुफान हाणामार्या, ते अकाउंट सस्पेंड होणे, दोन तासांकरीता जरी मिपा बंद असले तर जिव नुसता कासाविस व्हायचा. ते कट्टे ते फोटु :)
कुठे गेले ते धुरंधर ?
डॉ खरे, डॉ म्हात्रे, अभ्या, पिंडा, धनाजिराव, क्लिंटन, श्री गुरुजी, टका, अजया, पिरा, त्रिवेणी, मुवि, गवि, संजय क्षिरसागर, मोदक, चिमण, नाखु, धन्या, सोन्याबाप्पु, होबासराव, डांगे, तो सहस्त्र अवतारी मोगा खान, ति माई, आणखी फारपुर्वि तो भयकथा लिहिणारा मुंबई चा आता नाव नाही आठवत, बर त्या टका चे लग्न झाले का? अणाहितां चा लाडोबा ;) ते तांब्यावर कविता पाडणारे गुरुजि....ब्ला ब्ला ब्ला
अजुन बरेच नावे आहेत पण काय उपेग नाय, सुतक लागल्यावानी झालय राव मिपा. हात्त लेको.

श्रिपाद पणशिकर's picture

12 Jul 2019 - 5:41 am | श्रिपाद पणशिकर

"The website encountered an unexpected error. Please try again later"

Why I am getting this error while posting the comment, same error on Android + Laptop and Chrome + FireFox and thats why the repeated commments

" फ्री चा फुगा "
अगं बया बया बया
अश्लील अश्लील

कुठे नेवुन ठेवलाय मिपा माझा :(
अहो अगदी चार वर्षापुर्वि काय एक से एक बाजिराव होते मिपा वर, काय लेख पडायचे, काय त्या राजकीय धाग्यांवरच्या तुफान हाणामार्या, ते अकाउंट सस्पेंड होणे, दोन तासांकरीता जरी मिपा बंद असले तर जिव नुसता कासाविस व्हायचा. ते कट्टे ते फोटु :)
कुठे गेले ते धुरंधर ?
डॉ खरे, डॉ म्हात्रे, अभ्या, पिंडा, धनाजिराव, क्लिंटन, श्री गुरुजी, टका, अजया, पिरा, त्रिवेणी, मुवि, गवि, संजय क्षिरसागर, मोदक, चिमण, नाखु, धन्या, सोन्याबाप्पु, होबासराव, डांगे, तो सहस्त्र अवतारी मोगा खान, ति माई, आणखी फारपुर्वि तो भयकथा लिहिणारा मुंबई चा आता नाव नाही आठवत, बर त्या टका चे लग्न झाले का? अणाहितां चा लाडोबा ;) ते तांब्यावर कविता पाडणारे गुरुजि....ब्ला ब्ला ब्ला
अजुन बरेच नावे आहेत पण काय उपेग नाय, सुतक लागल्यावानी झालय राव मिपा. हात्त लेको.

मुद्दाम काहीतरी टीका करायची म्हणून काहीतरी वाईट शोधून काढायचे हे मी मिसळपाव वर नेहमी बघतो आहे. माझे लेख आले की काही लोक त्यावर टीका न करता त्यातून काहीतरी बादरायण अर्थ शोधून भलतीकडेच तो धागा नेतात.

निमिष सोनार's picture

12 Jul 2019 - 8:33 am | निमिष सोनार

श्रीपाद पणशीकर जी, कृपया फ्री चा फुगा या लेखावर प्रतिक्रिया देताना वाचकांचे लक्ष मुद्दाम भलतीकडेच वळवून टीका करण्यापेक्षा लेख कसा वाटला त्याबद्दल तुमचे मत व्यक्त केले असते तर जास्त रास्त झाले असते. मला शिर्षकातून कसलाच द्वियर्थी संकेत अपेक्षित नसतांना सुद्धा कशाला मुद्दाम वाचकांची दिशाभूल करत आहात?

गड्डा झब्बू's picture

12 Jul 2019 - 1:24 pm | गड्डा झब्बू

कृपया फ्री चा फुगा या लेखावर प्रतिक्रिया देताना वाचकांचे लक्ष मुद्दाम भलतीकडेच वळवून टीका करण्यापेक्षा लेख कसा वाटला त्याबद्दल तुमचे मत व्यक्त केले असते तर जास्त रास्त झाले असते.

+१०० पूर्णपणे सहमत!
लेख आवडला कि नाही आवडला हे प्रांजळपणे सांगणे , त्यातल्या चुका कच्चे दुवे निदर्शनास आणून देणे, भाषा, लेखनशैली, अशुद्ध लेखन यावर टिकाटिप्पणी या गोष्टी प्रतिसादात येण्यात गैर काहीच नाही.
पण श्रिपाद पणशिकर साहेबांचा गेल्या सुमारे १० महिन्यात मिपावर कुठल्याही घाग्यावर संचार दिसत नसून अचानक तुमच्या धाग्यावर प्रकट होऊन दिलेले खोडसाळ प्रतिसाद व्यक्तिगत आकसातून दिल्यासारखे वाटत आहेत. दुसऱ्या संकेत स्थळांवरील राग लोभ इथे व्यक्त झाला असू शकतो.

कुठे नेवुन ठेवलाय मिपा माझा :(
अहो अगदी चार वर्षापुर्वि काय एक से एक बाजिराव होते मिपा वर, काय लेख पडायचे, काय त्या राजकीय धाग्यांवरच्या तुफान हाणामार्या, ते अकाउंट सस्पेंड होणे, दोन तासांकरीता जरी मिपा बंद असले तर जिव नुसता कासाविस व्हायचा. ते कट्टे ते फोटु :)
कुठे गेले ते धुरंधर ?

साहेबांना आवडणाऱ्या 'त्या राजकीय धाग्यांवरच्या तुफान हाणामार्या' सतत बोर्डावर बघून आणि वाचून कंटाळा आल्याने किती मिपाकर मिपापासून दुरावले असतील याचे त्यांना सोयरसुतक नाही. कदाचित त्यामुळेच कितीतरी सक्रीय लेखक आणि वाचक सदस्य वाचनमात्र झाले असतील हे मि स्वानुभवाने सांगू शकतो.
'हर हर ती पेशवाई गेली आणि ब्रह्मविद्या गेली' या थाटामध्ये 'हर हर ते लेखकू गेले आणि मिपाची रया गेली' , 'पूर्वीचे मिपा राहिले नाही' अशी वाक्ये प्रतिसादांमधे घालण्याची काही लोकांना सवय आहे. किती आले किती गेले पण मिपा अजूनही आपला दर्जा आणि लोकप्रियता टिकवून आहेच ना?
ज्याप्रमाणे श्रिपाद पणशिकरांचा इथला सदस्य्काळ १ वर्ष ११ महिने असूनही ते चार वर्षांपूर्वीच्या आठवणी काढत आहेत याचा अर्थ ते आधीपासून मिपाचे वाचक होते.
माझा इथला सदस्य्काळ २ महिने ४ दिवस असला तरी किमान गेली ५ वर्षे मिपाचा नियमित वाचक होतो. त्या राजकीय धाग्यांवरच्या तुफान हाणामार्या सतत वाचून सदस्य व्हावे अशी इछाच होत नव्हती. नियमित बदल हा सृष्टीचा स्थायीभाव आहे आणि मिपा त्याला अपवाद नाही. फार पूर्वीचे मिपा कसे होते मला माहित नाही पण आता ते जसे आहे तसे आवडले म्हणूनच सदस्यत्व घेतले.

डायरेक्ट मार्केटिंग या कन्सेप्टच्या तुम्ही पार चिंध्या करूनही मला वाटतं तुमचा ' फ्री चा फुगा हा 'लेख ठीकठाक जमला आहे.
पुलेशु.

पण तुमच्या बद्दल एक वाचक आणि मिसळपाव चे सदस्य म्हणून आदर आहे, पण माझ्या कोणत्याही लेखावर "फ्री चा फुगा" या माझ्या लेखाचा संदर्भ तुम्ही आणून काय साध्य करू इच्छिता? तुमची इच्छा असेल तर फ्री चा फुगा हा लेख काढून टाकू का? तुमच्या मुलांच्या वाढदिवसाच्या दिवशी फुगे फुगवंतांना सुद्धा तुमच्या मनात फुगा शब्दाचा तोच अर्थ असेल का? मिसळपाव चे संपादक इकडे लक्ष देतील का?

नमस्कार मिसळपाव सरपंच,

जाहिरातीत एका प्रॉडक्ट वर दुसरे प्रॉडक्ट फ्री देणाऱ्या विक्रेत्यांच्या आणि ग्राहकांच्या मानसिकतेचा मी विनोदी अंगाने एका लेखात परामर्श घेतला आहे. लेखाचे नाव "फ्री चा फुगा" असे दिले आहे म्हणजे तो फुगा वाटतो मोठा पण प्रत्यक्षात तो फुटतो. पण श्रीपाद पणशीकर नावाचे गृहस्थ सात ते आठ विचित्र प्रतिक्रिया देऊन त्या लेखाच्या शिर्षकाला अश्लील असे संबोधून मिसळपाव वाचकांची दिशाभूल करत आहेत आणि उगाच निष्कारण वाद वाढवत आहेत. कृपया यावर योग्य ती कारवाई करावी.

श्रिपाद पणशिकर's picture

12 Jul 2019 - 4:37 pm | श्रिपाद पणशिकर

तुम्हि पार कारवाई च्या मागणी पर्यंत पोचलात राव ;)
काहि तांत्रिक कारणांमुले हि गडबड झालिय. आपल्याला दुखवण्याचा माझा हेतु नव्हता. माझे ड्डिट्टेलवार स्पष्टीकरण मि लवकरच देतो.

नमस्कार मिसळपाव सरपंच,

जाहिरातीत एका प्रॉडक्ट वर दुसरे प्रॉडक्ट फ्री देणाऱ्या विक्रेत्यांच्या आणि ग्राहकांच्या मानसिकतेचा मी विनोदी अंगाने एका लेखात परामर्श घेतला आहे. लेखाचे नाव "फ्री चा फुगा" असे दिले आहे म्हणजे तो फुगा वाटतो मोठा पण प्रत्यक्षात तो फुटतो. पण श्रीपाद पणशीकर नावाचे गृहस्थ सात ते आठ विचित्र प्रतिक्रिया देऊन त्या लेखाच्या शिर्षकाला अश्लील असे संबोधून मिसळपाव वाचकांची दिशाभूल करत आहेत आणि उगाच निष्कारण वाद वाढवत आहेत. कृपया यावर योग्य ती कारवाई करावी.

अभ्या..'s picture

12 Jul 2019 - 10:27 am | अभ्या..

भाबडय गं लेकरू,
पदरात घे मिपामाय

जेम्स वांड's picture

12 Jul 2019 - 10:50 am | जेम्स वांड

भाड्या ही वस्ताद जीभ खास सोलापुरीच रे मेल्या

Rolling On The Floor Laughing

उपेक्षित's picture

12 Jul 2019 - 1:08 pm | उपेक्षित

दत्त दिसला ग लेकराला

आदिजोशी's picture

12 Jul 2019 - 7:44 pm | आदिजोशी

म्हणजे बाईक सोबत हेल्मेट कुणी फ्री दिल्याचं ऐकलंय का कधी?
बरेच डिलर्स देतात. मला स्वतःला मिळालंय.

दुसरं म्हणजे एखादी गोष्ट फ्री देण्यामागे मूळ वस्तू वापरायला उद्युक्त करणे हा उद्देश असतो. तसंच तुम्ही कुठल्या तरी मोहापाई एकदा ३ साबण खरेदी करून ते वापरले तर तुम्ही भविष्यात तेच साबण वापरणं सुरु ठेवायची शक्यता असते म्हणून अशा स्कीम्स काढतात.

तसेच घेणारं गिर्‍हाईक कोण आहे, कुठे वस्तू विकली जात आहे ह्याचाही सखोल विचार अनेकदा केलेला असतो. ते शास्त्र आहे.

उदा: काही वर्षापूर्वी अनेक बायकांनी तवे आणि कढई फ्री मिळतायत म्हणून लोकसत्ताची २ वर्षांची मेंबरशीप घेतली होती. आता ह्यातल्या बर्‍याच जणांनी २ वर्ष झाल्यावरही लोकसत्ताच सुरु ठेवला. तसं तवा आणि पेपरचा संबंध नाही, पण खप वाढतो तो असा.