कधीकधी मी हळवा होतो , बघुनी देव दानवांत

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
11 Jul 2019 - 3:21 pm

कधीकधी मी हळवा होतो

बघुनी देव दानवांत

का उगविली हि बीजे तू ?

अर्धपोटी मानवात

कधीकधी मी कठोर होतो

बघून साऱ्या वेदनांना

भळभळ त्या वाहत असतात

पण पुन्हा करतो सुरुवात

कधीकधी मी हळहळतो

कोमेजल्या कळ्या बघुनी

नव्या उमलताना बघून

त्याला करतो कुर्निसात

कधीकधी मी बिथरतो

भविष्यकाळ चिंतूनि

कल्पनांच्या माध्यमातून

पेटवतो नवी वात

कधीकधी मी शोधतो

हरवलेली जुनी वाट

मिट्ट काळोख दूरदूर

आता हीच माझी वहिवाट

हीच माझी वहिवाट ....

{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}

समाजजीवनमान

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

11 Jul 2019 - 3:30 pm | जॉनविक्क

नैराश्य तर मला मी निराश असतानाही आवडलं नाही म्हणून...

मित्रा, नैराश्य कधी कधी दिशा दाखवतं

काही प्रश्न अनुत्तरित असतात

तरीही शोधतो उत्तरे त्यांची

त्यांच्याच शोधात ते जगायचं शिकवतं

काही जवळ येतात , काही दूर जातात

कधी मिळतात कुणाला तर कुठे झोळी रिकामी

नैराश्यच तारते , ठरवते किंमत जगण्याची

हे भौतिक सुख मात्र लय हरामी , लय हरामी

जॉनविक्क's picture

11 Jul 2019 - 5:57 pm | जॉनविक्क

नैराश्यच तारते , ठरवते किंमत जगण्याची

हि किमंत म्हणजे अजून नवे नैराश्य असाच बहुतेकांचा सूर असतो, म्हणून...

हे त्यांच्यासाठी लागू आहे , जे त्यात डुंबत राहतात .. जर माणसाच्या जवळची माणसे , त्याला यथायोग्य सोबत देणार असतील तर मला वाटत इतर गोष्टी गौण आहेत .. मी त्या वर बसलेल्याकडे फक्त एकच मागणे मागतो ते म्हणजे माझ्या कुटुंबाला सुखरूप ठेव आणि त्यांना निरोगी उदंड आयुष्य दे .. बाकी मी कुठल्याही समस्येवर चुकूनही बघत नाही रे .. मुळात समस्या हि कधी नसतेच .. मानवी मनाची कीड आहे ती . मुंगीच्या पावलाने शिरते आणि आत जाऊन हत्ती बनते .. अगदी त्या नालायक संशयाप्रमाणे