सांगावयास गेलो,
ऐकून काय आलो?
सुनावलेस तू, मी
बिल देऊन आलो..
सैराट पावसाने
पुरता.. भिजून आलो.
त्या गोठल्या दुपारी
बिल देऊन आलो..
हात होता तुझा
अन कानशील माझे
लोकां उमजण्याआधी
बिल देऊन आलो.
चालते होणे त्वरे
सोपे गेले तुला
वेटराने हटकले, मी
बिल देऊन आलो.
डोळे भरून आले..
पावसाच्या भरवशावर
ना रोखले तयांना, अन
बिल देऊन आलो.
प्रतिक्रिया
1 Jul 2019 - 11:06 am | टर्मीनेटर
चार दिवसांत चार कवींना विडंबन करण्यास प्रवृत्त करणारी प्रेरणा जबरदस्तच म्हणायला पाहिजे :)
मजा आली वाचायला.
1 Jul 2019 - 11:11 am | ज्ञानोबाचे पैजार
भावना सखोल पोचल्या,
अर्थात या नंतर निराश न होता तुम्ही नव्या दमाने कामाला लागला असाल याची खात्री आहेच.
पैजारबुवा,
1 Jul 2019 - 11:12 am | गवि
बिले भरायची तर काम केलेच पाहिजे ना?
1 Jul 2019 - 12:32 pm | नाखु
तो बिल पचास ही म्हण त्यावरुनच अस्तित्वात आली आहे.
विडंबन झकास
1 Jul 2019 - 12:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडले.
-दिलीप बिरुटे
1 Jul 2019 - 12:45 pm | गवि
देता का मग बिल? कुठे फाडूया बिल?
1 Jul 2019 - 12:54 pm | प्रशांत
+१
+ गविशेठ असेच लिहत रहा
1 Jul 2019 - 12:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पावसाळा कट्टा करू आमच्या औरंगाबादला या तुम्ही तुमचे मित्र घेऊन.बील देण्यात येईल.
-दिलीप बिरुटे
1 Jul 2019 - 1:52 pm | प्रचेतस
गविंच्या मित्रांमध्ये आमचा समावेश असला तर आम्हीही येउ. (वेरूळला जाउ).
1 Jul 2019 - 1:55 pm | गवि
उगीच माझ्या नावावर बिल फाडू नको. त्यांना डायरेक विचार फ्रेंडशिप देतात का ते.
1 Jul 2019 - 2:24 pm | प्रचेतस
ओळखलंत का सर मला मिपावर आला कोणी
द्याल का हो फ्रेंडशिप मला लावून तूप लोणी
1 Jul 2019 - 2:29 pm | यशोधरा
=)) =))
1 Jul 2019 - 1:21 pm | डॉ सुहास म्हात्रे
=)) =)) =))
1 Jul 2019 - 1:48 pm | जॉनविक्क
आता खुदकन हसू आलं नाही
1 Jul 2019 - 5:45 pm | नावातकायआहे
+ १
बाडिस
1 Jul 2019 - 3:13 pm | यशोधरा
तुम्ही, ज्ञापै, नाखु, गड्डा झब्बू सगळ्यांनी प्राचीतैला रॉयल्टी द्यायला हवीये खरतर! वर्षभराचा तिच्या आवडीच्या कॉफीचा पुरवठा करा तिला! =))
1 Jul 2019 - 3:17 pm | गवि
नको.
कॉफीत ट्यानिन नावाचं विष असतं.
-गवि मास्तर
1 Jul 2019 - 3:23 pm | यशोधरा
असूदे. त्या डोळ्यांतून टिपं गाळता, भांबावल्या दुपारी पितील कॉफी.
1 Jul 2019 - 3:24 pm | यशोधरा
टिपं ना गाळता हो.
1 Jul 2019 - 10:27 pm | नाखु
कुठले कुठले आजार उद्भवतात याची यादी शोधायला घेतली आहे.
तरीही आपल्या जबाबदारीवर कॉफी घेणे
कॉपीराइट बाहेरचा वाचकांची पत्रेवाला नाखु
3 Jul 2019 - 11:00 am | प्राची अश्विनी
अर्रर्रर्र
1 Jul 2019 - 3:52 pm | चंद्र.शेखर
ओरिजिनल पेक्षा जास्त वास्तववादी वाटलं.
1 Jul 2019 - 4:14 pm | जालिम लोशन
+1
1 Jul 2019 - 5:14 pm | कंजूस
बिल व टिपही दिलीच असणार
1 Jul 2019 - 10:26 pm | सस्नेह
दासता-ए-दिलसे दर्दभरी है ...दासता-ए-बिल =))
3 Jul 2019 - 11:01 am | प्राची अश्विनी
बिल शेट झालात की हो.
3 Jul 2019 - 1:15 pm | विजुभाऊ
लय भारी गवि षेठ
तुम्ही कवितेच्या प्रांतात पण चौकर षटकार हाणता
3 Jul 2019 - 4:29 pm | खिलजि
आवडली गेलेली आहे ,, भारी..... दुसरी एक भयानक सुचत आहे ...
3 Jul 2019 - 5:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेखनावर किती प्रतिसाद आले ते बघायला आलो होतो, किती अवांतर.
आमच्या वेळी असं नव्हतं.
अशा अवांतर प्रतिसादामुळे लेखकाला खुप त्रास होतो. रात्री अपरात्री आपल्या लेखनावर कोणी छान छान म्हटलंय, कौतुक केलंय हे बघायला यावं आणि अवांतरमुळे लेखकाचा लिहिण्याचा मूड जातो.
-दिलीप बिरुटे
-दिलीप बिरुटे
3 Jul 2019 - 5:34 pm | गवि
म्हणजे साठ सत्तर वर्षांपूर्वी ना?
कसं होतं तेव्हा, ? सांगा ना सर.
3 Jul 2019 - 5:46 pm | यशोधरा
म्हणजे सर सत्तर वर्षांचे आहेत तर. आय सी.
3 Jul 2019 - 9:01 pm | डॉ सुहास म्हात्रे
जन्मल्यापासून मिपा वाचत असल्यास सत्तर वर्षांचे, नाहीतर अधिक काही (?दहा-पंधरा) वर्षे वाढवावी लागतील. यु सी. ;) :)