कविता पिंपळपान

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
1 Jul 2019 - 3:24 pm

कविता सुचत नाही
मन ही रितेच काही
लिहू काय? म्हणता म्हणता
सापडले ओले पान.
ही कविता पिंपळपान!

थेंब थेंबा जाग आली
रेष रेषा बोलू लागली
ना लिहिता आले कैसे
मज लेखणिस भान?
ही कविता पिंपळपान!

हे असेच असते सारे
ना सुचता हलते वारे
पाचोळा नसता कोठे
गर्द जागे होते रान
ही कविता पिंपळपान!

घरट्याच्या अवती भवती
पाऊस थेंबांची गर्दी
मी मिटून घेता दारे
पाऊस करी मूकगान
ही कविता पिंपळपान!

म्हटले या पावसाला
मन हळवे नकोच सोडू
भिजवूनि जा चिंब मनाला
मग लाभे पाऊस-दान
ही कविता पिंपळपान!
===×====×====×===×===
अतृप्त...

https://scontent-sjc3-1.xx.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/65891576_2302597183159888_6148540301800636416_o.jpg?_nc_cat=108&efg=eyJpIjoidCJ9&_nc_oc=AQnWXRF_HhOj9XrJIBZf9b5pGvQkV5rnIpTXNvU_5h34rvIyasK7PwLlT3CN7jfuIPs&_nc_ht=scontent-sjc3-1.xx&oh=9c6292a5e8789277a8d3256b22183584&oe=5DB31DB1

शांतरसकविता

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

1 Jul 2019 - 3:26 pm | यशोधरा

घरट्याच्या अवती भवती
पाऊस थेंबांची गर्दी
मी मिटून घेता दारे
पाऊस करी मूकगान
ही कविता पिंपळपान!

म्हटले या पावसाला
मन हळवे नकोच सोडू
भिजवूनि जा चिंब मनाला
मग लाभे पाऊस-दान
ही कविता पिंपळपान!

वा! वा!

हळवे झालात गुरुजी आज.

छान जमून आलीय.

प्रचेतस's picture

3 Jul 2019 - 8:17 am | प्रचेतस

गवि यांचेशी सहमत
-बुवांच्या मार्मिक लेखणीचा फ्यान.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jul 2019 - 1:51 pm | अत्रुप्त आत्मा

आगोबाचा - पांडू प्रतिसाद! http://www.sherv.net/cm/emoticons/playful/blowing-raspberry-smiley-emoticon.gif

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jul 2019 - 3:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

''घरट्याच्या अवती भवती
पाऊस थेंबांची गर्दी
मी मिटून घेता दारे
पाऊस करी मूकगान
ही कविता पिंपळपान!''

केवळ सुरेख. लेखनाचा पोत सुधारतोय. लिहित राहा.

-दिलीप बिरुटे

अत्रुप्त आत्मा's picture

1 Jul 2019 - 7:09 pm | अत्रुप्त आत्मा

@केवळ सुरेख. लेखनाचा पोत सुधारतोय. लिहित राहा. --- धन्यवाद सर. __/\__

यशोधरा, गवि, जॉनविक - धन्यवाद.

जॉनविक्क's picture

1 Jul 2019 - 3:56 pm | जॉनविक्क

आवडली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Jul 2019 - 8:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर कविता ! लिहीत रहा.

नाखु's picture

2 Jul 2019 - 8:38 am | नाखु

भावविभोर कविता,आवडली आहे.
लेकाने कवीला नैसर्गिक कार्यापासून निसर्गाच्या सानिध्यात नेलेले आहे.

वाचकांची पत्रेवाला नाखु

अत्रुप्त आत्मा's picture

2 Jul 2019 - 9:50 am | अत्रुप्त आत्मा

@लेकाने कवीला नैसर्गिक कार्यापासून निसर्गाच्या सानिध्यात नेलेले आहे. - दुषषष्ट!

पावसाळ्यात काम नसल्याने कवीला व्यावहारीक कार्यापासून निसर्गाच्या सानिध्यात नेलेले आहे - दुष्ट दुम्न.

:-)

बाकी प्रा. डॉ. बोलले ते बरोबरच आहे. साहित्य संमेलनात वाचन करण्याच्या पातळीची कविता आहे. पुरस्कारप्राप्त वगैरे.
आणि पिंपळपानामुळे आध्यात्मिक बैठकदेखील मिळालेली आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Jul 2019 - 10:36 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>लेकाने कवीला नैसर्गिक कार्यापासून निसर्गाच्या.

सुचू द्या भो त्यांना दुसरं असंचं काही चांगलं.
ही पहिली कविता असावी ज्यात तांब्या पीतळ आणि 'विधी'विषयाचा उल्लेख नाही.

;)

-दिलीप बिरुटे

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Jul 2019 - 9:40 am | ज्ञानोबाचे पैजार

छान झाली आहे
पैजारबुवा,

लीलाधर's picture

2 Jul 2019 - 10:59 am | लीलाधर

विडंबन
ही कविता पिंपळपान याचे विडंबन करण्याचा प्रयत्न

कविता सुचत नाही
मन ही रितेच काही
लिहू काय? म्हणता म्हणता सापडले भोला पान
ही कविता पानच पान !

चुना चुना आग झाली
रेष रेषा बोलू लागली
न खाता आले कैसे
मज लेखणीस भान
ही कविता पानच पान!

हे असेच असते सारे
न खाता हलते सारे
पाचोळा नसता कोठे
गर्द लालच होते पान
ही कविता पानच पान!

टपरीच्या अवती भवती
खवय्यांची अतूट गर्दी
तो मिटून देता पाने
करीतो मूकगान
ही कविता पानच पान!

म्हटले या पानवाल्याला
पान हळवे नकोच सोडू
भिजवूनी दे खवय्याला
मग लाभे दानच दान
ही कविता भोला पान!
===×====×====×===×===
संत्रुप्त

यशोधरा's picture

2 Jul 2019 - 11:28 am | यशोधरा

अरे, काय हे! =)) पिंपळ पानाचे मघई पान करून टाकले होय! आता बुवा मारणार तुला!

लीलाधर's picture

2 Jul 2019 - 11:32 am | लीलाधर

बुवा कडून

आहेत पान"पराग"

खुलासा संपला

नाखु दुरुस्तीवाला
भाऊ रंगारी पथ, सदाशिव पेठ पुणे

अत्रुप्त आत्मा's picture

2 Jul 2019 - 12:21 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/jobs/fireman-smiley-emoticon.gif

अत्रुप्त आत्मा's picture

2 Jul 2019 - 11:29 am | अत्रुप्त आत्मा

अजून साफसफाई आणि भर अपेक्षित आहे. प्रयत्न उत्तम आहे.

लीलाधर's picture

2 Jul 2019 - 11:31 am | लीलाधर

तेव्हढे पानाचे लक्षात असू द्या

अत्रुप्त आत्मा's picture

2 Jul 2019 - 11:41 am | अत्रुप्त आत्मा

सँत्रुप्त लक दाद देणेत येत आहे!

महासंग्राम's picture

2 Jul 2019 - 12:58 pm | महासंग्राम

कविता सुचत नाही
पान ही रितेच काही
लावू काय? म्हणता म्हणता
सापडले ओले पान.
हे १२०-३०० फुलचंदपान!

थेंब थेंबा जाग आली
रेष रेषा बोलू लागली
ना लावता आले कैसे
या चुन्यास भान?
हे १२०-३०० फुलचंदपान!

हे असेच असते सारे
ना सुचता हलते वारे
किवाम नसता का कोठे
गर्द जागे होते रान
हे १२०-३०० फुलचंदपान!

ठेल्याच्या अवती भवती
पिचकाऱ्यांच्या थेंबांची गर्दी
मी मिटून घेता दारे
गिर्हाईक करी मूकगान
हे १२०-३०० फुलचंदपान!

म्हटले या काथ्याला
मन हळवे नकोच सोडू
भिजवूनि जा चिंब पानाला
मग लाभे तारेचे दान
हे १२०-३०० फुलचंदपान!
===×====×====×===×===
अतृप्त..पानवाला

पाषाणभेद's picture

3 Jul 2019 - 3:09 pm | पाषाणभेद

जमले हो जमले पान
बनवा एक कलकत्ता मिठा डबल, १२० ३०० नवरतन किमाम, तुकडा सुपारी, रजनीगंधा चुना एक्स्ट्रा.

कंजूस's picture

2 Jul 2019 - 1:45 pm | कंजूस

फोटोसहीत कवितेचे पान!
जमलं
जमलं
१२०% जमलं.

राघव's picture

2 Jul 2019 - 8:00 pm | राघव

हे असेच असते सारे
ना सुचता हलते वारे
पाचोळा नसता कोठे
गर्द जागे होते रान
ही कविता पिंपळपान!

आवडले. :-)

प्राची अश्विनी's picture

3 Jul 2019 - 10:57 am | प्राची अश्विनी

सुरेख!

पद्मावति's picture

3 Jul 2019 - 2:29 pm | पद्मावति

सुरेख आहे कविता.

विडंबनांंपेक्षा मूळ कविताच सरस वाटते.

विडंबनंसुद्धा मजेशीर!

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jul 2019 - 4:15 pm | अत्रुप्त आत्मा

सर्वेषाम् धन्यवादम्. http://www.sherv.net/cm/emoticons/flower/flower-pink-smiley-emoticon-animation.gif

सस्नेह's picture

4 Jul 2019 - 5:25 pm | सस्नेह

पावसाबरोबरच गुर्जींचीसुद्धा दमदार हजेरी !
बंधुद्वयांची जुगलबंदी फारा दिवसांनी पहायला मिळाली.
वेल्कम रे लीलाधरा

चामुंडराय's picture

5 Jul 2019 - 8:17 am | चामुंडराय

सुरेख, छान आहे कविता... आवडली

परंतु आत्मु बुवांची कविता आणि विधी नाही, कुंथणे नाही, तांब्या नाही ... छे चुकल्या चुकल्या सारखे वाटतेय.

थोडी कसर भरून काढावी म्हंतो

पिंपळाच्या पानावर तांब्या
अजून ओततो ग ...
डब्बा टाकताना मिरची
अजून सलते ग !

अभ्या..'s picture

5 Jul 2019 - 9:22 am | अभ्या..

गुर्जी नेहमीच छान लिहितात,
पिंपळपानापेक्षा नागवेलीत अधिक रंगतात हे सत्य.