गेटिसबर्गचा कसाई

प्रलयनाथ गेंडास्वामीं's picture
प्रलयनाथ गेंडास... in जनातलं, मनातलं
18 Jun 2019 - 7:43 pm

कोलोरॅडोच्या त्या भयाण वाळवंटात दिवसभर फिरून फिरून अगदी वैतागून गेलाअसता एखादा… रणरणत ऊन भाजून काढत होतं…
उष्ण हवा तर सतत वाहत होती…कुठे निवाऱ्याला सावली सापडत नव्हती…ध्यास होता तो एकाच गोष्टीचा…औषधाच्या कुपीचा... "फार फार तर तीन किंवा चार दिवसच आपल्या हातात आहे आता ..." हुंदका आवरता आवरता तिचे ते शब्द त्याच्या कानात घुमत होते निघाल्यापासून ... जेव्हा त्याची मुलगी आजारी पडली तेव्हा तो औषध आणायाला, घोड्यावर दोन दिवस प्रवास, मधे एक रात्री मुक्काममार्गावर . त्या रात्री, त्यांला सेंट लुईस येथुन जमानिम्यासह निघालेला पायोनियरांचा एक गट मिळाला...

अगदी काही वर्ष्यापूर्वीच कॉन्फेडरेट घोड्यांच्या टापांनी हादरून उठणारा हा परिसर ! टेक्सासमधला छोटासा प्रदेश, ह्या वाळवंटात कुठेतरी लपल होत रॅटवॉटर ! रॅटवॉटर हे गाव समोरचा नाला ओलांडून पलिकडे एक दिवसाच्या प्रवासानंतर आहे असे पायोनियरांच्या म्होरक्याला त्याच्याकडून कळले...
एका सत्वशील ख्रिश्चनाप्रमाणे त्याने घोडेस्वाराला, दोन घास अन्न, रात्रीला शेकोटीची ऊब देऊ केली....दिवसभराच्या प्रवासानंतर घोड्याला विश्रांती देणं गरजेचं होत म्हणा ... जरासा कारण रात्री तिथेच मुक्काम करून, त्या दिशेने दुसऱ्या दिवशी उरकावुन आरामात कूच करण्याचा इराद्यानेच पायोनियरांनी तंबू टाकला…

काही वर्षांपूर्वी तो देखिल ह्याच रस्त्याने घोड़दौड़ करीत आपल्या छावणीत गेला होता कैक वेळेला ! एक क्षणभराच्या तंद्रीत, अचानक अवतीभवती सेना सागर उभा राहिला....ऑफीसरांचे डेरे, सैनिकांची चाललेली धावपळ आणि आपल्या डे-यात मसलती करीत बसलेला एक दिमाखदार मेजर ! कॉन्फेडरेट सैन्याची धार असलेला हाच तो......मेजर विल्यम...

त्याची तंद्री भंग पावली जेव्हा म्होरक्याने त्याचं मत विचारलं, "संधी आणि स्वातंत्र्य असलेलं हे पश्चिम प्रदेश .. ईश्वराची स्वर्गीय नेमत आहे .. नाही का ?"

विल्यमच्या तंद्रीत अजूनही भूतकाळातले युद्धाचे वाहत होते. पडघम – ढोल वाजताहेत .. रणभेऱ्या तुताऱ्या फुंकल्या जातायत .. वातावरण तापलेलं आहे .. दोन्ही दृष्ट्या .. राजकीयदृष्ट्या आणि नैसर्गिकदृष्ट्याही .. उन्हाचे चटके बसताहेत. सूर्य वरतून आग ओकतोय.. उभय पक्षी युद्धाची जोरदार तयारी चालू आहे.. कुंपणाच्या आजूबाजूचे खंदक खणले जातायत.. खंदकातून साधनसामुग्री ठेवली जातेय.. कॉन्फेडरेट आर्मीच्या ४ व्हर्जिनिया इन्फंट्री, छोट्या – छोट्या चार चार सहा जणांच्या तुकडीचं एकेक खंदकातून पोस्टिंग केलं जातंय.. खंदकात पुरेसा दारुगोळा, अन्नपाणी यांची तरतूद केली जातीये..

"पश्चिम म्हणजे ईश्वराची स्वर्गीय नेमत नक्कीच नाही" तो रुक्षपणे उत्तरतो ...

युद्धानंतर, विल्यम एका स्त्रीच्या प्रेमात पडला आणि अखेर त्याच्या आयुष्यात शांतता प्रस्थापित झाली होती. दोघांनी मुलीला वाढवले. आज तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली त्याची मुलगी आजारी आहे ... याक्षणी तीच आजारी रुपड आठवून त्याला त्याही स्थितीत गलबलून आलं. आपल्या जीवनाच्या रणरणत्या वाळवंटात त्याला परत पत्नी व मुलीची आठवण झाली. ... खळखळ वाहणाऱ्या त्या निष्पाप चैतन्यस्त्रोताची आठवण देखील वाळवंटात त्याला चिंब करून गेली. ही आहे वात्सल्याची ताकद. हे आहे त्याच्यातील चैतन्यदायित्व. हे चैतन्यत्व आपण जपलं पाहिजे… तिला जपलं पाहिजे. फक्त आपल्यासाठी निश्चितच नव्हे… तर आपल्या आत्म्यासाठी… तंबूतली वस्ती पहाटे गाढ निद्राधीन होती ... आपल्याजवळ वेळ कमी आहे हे जाणून तो मध्यरात्रीनंतरच्या एखाद्या प्रहरानंतर उठून बसला.. रॅटवॉटरच्या दिशेनं त्यानं
प्रवास सुरु केला..

विलियम, एकेकाळी युद्धात युनियन आर्मीचा गड असलेल्या, रॅटरवॉटरवर पोहोचला. ऍपोथेकरी बाहेरील रेलिंगला घोडा बांधून, तो काउंटर च्या दिशेनं चालू लागला.. एपोथेकरीमधून निराश भाव तोंडावर ठेवून एक कुटुंब नुकतंच बाहेर पडत होतं ... कधी नव्हे ते आता काउंटर पलीकडला रिकामा झाला होता.. विल्यमला पाहताच त्यानं कुजबुजत विचारलं, तुझ्यावर अजून कोणाची नजर पडली नाही हे नशीब ... त्याने हव्या असलेल्या औषधांची मागणी केली.. "आजच्या आज नाही होणार हे .. " काउंटर पलीकडला... आताच्या परिस्थितीत आईमाईवरून शिव्या जरी देता येत नसल्या, तरी समोरच्याला 'शरम' वाटेल , त्याच्यातला जर 'माणूस' जागा असेल तर अस्वस्थ होईल .. इतपत 'लागट' बोलावं असा एक सणसणीत विचार, आणि मनात तयार केलेली कडक शब्दांची वाक्यांची रचना ... त्याने महत्प्रयासाने मागे ढकलली ..
"लवकरात लवकर उद्या सकाळी देतो " हे शब्द कानी पडल्यावर विलियम गावातील सलूनच्या दिशेनं निघाला..
"मला रात्रीपुरती रूम हवीये".. सलून काउंटरच्या मागे असलेल्या माणसाने एक कटाक्ष पुढ्यातला विलियमवर फेकला .. लोट्यासारखं गोल डोकं ... भरगोस दाढी मिशांसह सव्याज असलेले दोन्ही कानावरचे केसांचे झुपके .. जाडजूड मानेखालचा त्याचा तितकाच विशाल रेडनेक देह, बराचसा काउंटरमुळे झाकला गेला होता, बिनबाह्यांच्या जीन्सशर्ट वरचे व्हिस्कीच्या डागांचे थर त्याच्या धंदेवाईकतेची ग्वाही देत होतं... चिपडं बसलेल्या त्याच्या निळ्या डोळ्यांवर, कठडा असल्या सारख्या जाड भुवया वर गेल्या. गोल डोकं हाललं .. त्याने विलियमच्या जॅकेटकडे, नाण्यांनी किंवा रिव्हॉल्वरमुळे एखादा फुगवटा तर नाही ना हे निरखून पाहिलं... कसलाच फुगवटा नव्हता ... भुवया आक्रसल्या गेल्या, घाणेरडं मिचकूट झालेल्या फडक्याने त्याने , ग्लास आतून पुसणं न थांबवता .. विचारलं ... कुठली रूम पाहिजे ? रांडेसकट रात्रभर रूमचे ४ डॉलर होतील , बिनारांडेच्या रूमचे २ डॉलर होतील ...
विलियम म्हणाला "फक्त रात्रीपुरती रूम विश्रांतीला हवीये"... उत्तर आलं "बिनारांडेची कोणतीही रूम रिकामी नाही "... विलियम वळून जाऊ लागताच तो म्हणाला ... "फक्त १ डॉलर देऊन, एका व्हिस्कीच्या बाटलीच्या सोबत, तु व्हरान्ड्यात खुर्चीवर झोपू शकतो"...
लॉबीमध्ये एक प्रिचर व्हिस्की पीत पीत, आजूबाजूंच्या धटिंगणा समोर पांचट विनोद करत होता... तो हळूच आपल्याकडे निरखून पाहत आहे की काय असा त्याला भास झाला.. व्हऱ्यांड्यात खुर्ची टाकून त्याने व्हिस्कीची बॉटल अर्धी संपवली, ... नजरेच्या एका कोपऱ्यातून बॅकमरुममध्ये .. विलियमने एपोथेकरीमध्ये पाहिलेल्या कुटुंबाच्या प्रमुखाला तिथल्या रेडनेक गुंडानी संपवलं होत ... आता त्यातील एक कुटुंबातल्या स्त्रीवर बळजबरी करत होतं .. पण तिचं व्हीव्हळणं सलूनमधल्या नेहमीच्या गदारोळांपैकी एकमय झालं होत.. कुटुंबातल्या मुलाला दुसऱ्या गुंडाने केसांना धरून ... त्याच्या आईवर होणाऱ्या यातनांना जबरदस्तीने पाहायला भाग पाडत होता... प्रवासाच्या थकव्याने म्हणा, किंवा अर्ध्या बॉटल व्हीस्किने आपलं काम चोख केलं म्हणा .. विलियम फक्त आणि फक्त सकाळ उजाडायची वाट पाहत होता... दुसऱ्या दिवशी, सकाळी सकाळी तोच कालचा प्रिचर विल्यमला आडवा आला, नम्रतेने म्हणाला "माफ करा पण आपण आधी कुठं भेटलोय का ?" त्याच्याकडे ढुंकूनही न बघता विल्यम एपोथेकरीमध्ये गेला, तिथे आपले औषध उचलले, घोड्यावर मांड घातली व रॅटवॉटर सोडलं ...
सूर्य आता थोडा वर आला होता ... समोरून त्याला चिरपरिचित पायोनियरांचा लवाजमा दिसत होता. त्यांनी त्याला अभिवादन केले... विशेषतः त्यांच्यातला घोडागाडीमागे बसलेला छोटा मुलगा तर हसून अभिवादन करत होता... त्याला पाहून का कोणास ठाऊक विल्यमला त्याच्या छकुलीची आठवण झाली. ...
पायोनियर आता रॅटवॉटरच्या दिशेनं निघाले होते.. मन कठोर ठेवून विल्यम तास दोन तास आपल्या परतीच्या मार्गावरून ढळला नाही.. पण का कोणास ठेवून, त्या लहानग्यांच्या "बाय बाय मिस्टर" अभिवादनाचे आणि कालच्या स्त्रीच्या विव्हळण्याचे, प्रतिध्वनी त्याच्या कानात वारंवार उमटत राहिले, तो विचलित झाला ... काही क्षण त्याने विचार केला ... आपला घोडा त्याने परत रॅटवॉटरच्या दिशेनं फिरवला ...
घोडा बांधून सलूनच्या बॅकरूमच्या दिशेने झपाझप पाऊले उचलत निघाला... लांबून त्याला रक्ताचे ओघळ रूमच्या लोटलेल्या दारापासून निसटलेले दिसले..
तेव्हड्यात तोच कालचा प्रिचर, परत त्याच्या मार्गात आला, म्हणाला "थांब, मी तुला आठवतोय का ?"... विल्यमने एक ठोसा त्याला लगावून बाजूला सारून बॅकरूमच्या दिशेने धाव घेतली... पुढील दृश्य पाहून एक क्षणभर तो थबकला ... पायोनियर अनेक रेड इंडियन लोकांची, लांब केस असलेली डोक्याची शकले ... आपल्या सोबत आणली होती आणि मोबदल्याची घासाघीस चालू होती ...विकत होते ते रेडनेक्सना ... त्या लहानग्याने विल्यमकडे पाहून परत ओळखीचे हास्य दिले "हॅलो मिस्टर"...
विल्यमच्या खांद्यावर एक हात पडला ... मगाचाच प्रिचर दोन तीन रेडनेक धटिंगणाबरोबर होता ... त्याने जीव खाऊन विल्यमला तोंडावर ठोसा लगावला.
विल्यम अडखळला पडला , त्याच्या खिशातली औषधही शिशी , बाहेर लाकडी पटांगणावर पडली. ... घरंगळत पूढे जाऊ लागली... विल्यम आता पूर्ण भानावर आला ... वरून लाथा बुक्क्यांचा वर्षाव होत असताना ... तो दोन्ही हाताच्या कोपऱ्यावर गुढग्यावर सरपटत पुढे जाऊन , स्वतःच्या प्राणापेक्षाही महत्वाची शिशी त्याने मुठीत घट्ट पकडली... लाथा बुक्क्यांची सर ओसरल्यावर .. कण्हत तो घोड्यापाशी गेला ..बेदम मारहाणीनंतर घोड्याला टाच मारणार इतक्यात प्रिचरने त्याच्या घोड्याचा लगाम एका हातात पकडला ...त्याच्या दुसऱ्या हातात रिव्हॉल्वर होती ... प्रिचर म्हणाला "मी तुला ओळखलंय भडव्या ... गेटिसबर्गचा-कसाई आहेस तु"... म्हणत त्याने रिव्हॉल्वर घोड्याच्या डोक्याजवळ चिकटवून विल्यमकडे रोखून पाहत उभा राहिला.. "थांब" असं विल्यम ओरडणार त्या आधीच त्याने चाप ओढला .. घोडा उभ्याउभ्या विल्यमसकट जमिनीवर कोसळला ...
विल्यम चौथ्या व्हर्जिनिया इन्फंट्रीमध्ये कॉन्फेडरेट आर्मीमध्ये मेजर असताना, गेटिसबर्गच्या लढाईत त्याने 77 युनियन सैनिक आणि अनेक घोडे मारले होते त्याला "गेटिसबर्गचा कसाई" असे नाव मिळाले होतं तेव्हा.

आता त्या वाळवंटात विल्यमने पायदळी घराच्या दिशेनं लॉन्ग मार्च सुरु केला, त्याच्या दुनियेचे पार स्मशान झालं होतं, त्याच्या या स्मशानात माणसाने माणसुकीला
धगधगत्या आगीत जाळून टाकलंय. मेलेल्या….. नव्हे मारलेल्या मनानं, रोज कितीतरी कलेवर जगण्याची धडपड करत रोज मरत होती !
डोळ्यादेखत अबलांच्या अब्रूची राखरांगोळी होतेहोती , विखारी वासनेच्या चितेवर ! अन्याय ,अत्याचार...
इतकी वर्ष्ये सांदीकोपऱ्यात दबा धरून बसलेली भेसूर भुतं आता त्याच्या जीवाला भेडसावत होती, आणि त्याचे डोळे भिरभिरत होते स्वतःच मनं ओल करण्यासाठी, पण जिकडे नजर जाईल तिकडे वाळुच वाळु. उन्हं तापलेलं. तप्त उन्हाच्या ज्वाळा वाळूवरून परावर्तीत होत जमिनीच्यावर धग दिसू लागली होती. चालताना त्याच्या पायांची कोण आग होत होती. पायात बुट होते पण त्यांचा काही फारसा उपयोग होत नव्हता. अवघं वाळवंट भयाण तापलेलं होतं. उन्हाच्या झळांनी त्याचे डोळे कोरडे पडले होते. ओठ सुकले होते. मनात तर कुणीतरी आगीचा जळता निखारा ठेवल्यागत परिस्थिती निर्माण झाली होती. अजुन किती चालायचं होत त्याला माहिती नव्हतं, पण चालायचं होतं हे मात्र नक्की. अशा या रणरणत्या समयी त्याला मुलीची बायकोची कोण आठवण येत होती…मग त्याला आठवू लागले… घरात असतानांचे चित्र त्याच्या डोळ्यासमोर साकारू लागलं. घर . त्याचं घर . छानसं, टुमदार...
पाच दिवस अहोरात्र पाय तुडवत तो एकदाचाघरी पोहोचला ... स्वतःच्या हाताने त्याने कबरी खणल्या ... आणि
आपल्या अपुऱ्या स्वप्नांनासकट निष्प्राण देहांना त्याने मूठमाती दिली ….नाइलाजाने! पहिल्यांदा घरात पाय ठेवल्यावर, कानावर पडणाऱ्या बडबड गीतांचा, गुढग्याला पडलेल्या मिठीचा, तळपायापासून ते थेट मस्तकापर्यंत थंड प्रेमाच्या स्पर्शाचा जो काही आनंद लहरत जायचा त्याचं वर्णन कसं करणार… कोणत्या शब्दांत त्याची मांडणी करणार… तर मुलीचा तो थंड स्पर्श सर्वांगाला जसा भिजवून जायचा तसा तो मनाला देखील चिंब चिंब करून जायचा. मनही आनंदात चिंब ओलं व्हायचं. ओलेपणाची ही तृप्तता आता मात्र आठवणींच्या खोलकप्प्यात जाऊन बसली होती.
भयानक अंधकार ,हाहाहाकार …भेसूर ….भयाण ….नजरेला न राहणार …मनाला न पटणार …त्याने मनोमन शपथ घेतली ...एक दिवस असा येईल…
बघता बघता उभं रॅटवॉटर पेट घेईल.

सूर्याचा मळकट गोळा दूर क्षितिजाला जावून टेकला.संध्याकाळ झाली. वाळूच्या लाटांमधून टापांची नक्षी उमटवत एक घोडा क्षितीजाकडून, सूर्याच्या घरंगळणाऱ्या गोळ्याच्या बाजूने जोरात येत होता. त्याच्या पाठीवर जीनच्या उंचवट्याला पाठ टेकवून, फेल्ट हॅट टाकून एक घोडेस्वार होता. मळकट तपकीरी रंगाचा कातडी कोट आणि घट्ट तुमान, पायात कातडी चढाव असा त्याचा वेश होता. कमरेच्या दोन्हीबाजूच्या होलस्टर मध्ये रिवॉलव्हर लटकत होती .पाठच्या बाजूला जीनच्या कातडी पट्ट्यात जमीनीकडे तोंड करून एक बंदूक तिरकी खोचली होती. अंगाभोवती गोळ्याच्या कातडी पट्ट्यांची दोन चार वाटोळी लगडलेली होती, उजव्याबाजूला ४ व्हर्जिनिया इन्फंट्री ऑफिसरची मानवंदनेची सेबर होती. ताज्या घोड्याला मैलो न मैल चालायची, वेळ पडली तर, वरच्या स्वाराला पाठीवर घेवून वाऱ्यासारखे उधळायची, न थांबता अंतर कापायची त्या अश्वाची अजब क्षमता होती…..
…….सलूनमधल्या नेहमीच्या गण्याबजावण्याच्या वातावरणात अचानक कसलीतरी चाहूल लागून एकदम सर्वजण स्तब्ध होऊन, जागेवरच, दरवाज्याकडे पाहू लागले ... विल्यमने दाराच्या चौकटीत स्वतःला ठेवून डाव्या हाताने आपली फेल्ट हॅट थोडीशी तिरकी केली.समोर नजर टाकली.
ज्या प्रिचरने त्याचा घोडा मारला होता, तो आपल्या बेसावधपणाबद्दल मनातून स्वतःला शिव्यांची लाखोली वाहत असतानाच , बाह्यकारणी त्याने विल्यमला एका सत्शील ख्रिश्चनाप्रमाणे येशूबरोबर त्याचे प्रेम घोषित करण्यास सांगितले. त्यावर विल्यमने सर्वांना सांगितले की जन्मात, त्याने फक्त त्याच्या कुटुंबावर आणि घोड्यावर प्रेम केले होते. ...

त्यानंतर मात्र पुढचा तासभर मात्र, विल्यम होल्सटर मधून दोन्ही हातात आलेल्या दोन्ही रिवॉलव्हर च्या नळीतून आग , धूर , कानठाळ्या बसण्याचे आवाज येतंच राहिले.... वाळूच्या टेकड्या कोसळाव्यात तसे रॅटवॉटरमधले सगळे पुरुष स्त्रिया मुले जनावरे खाली कोसळत राहिले होते .... आणि उभं राहील एक भयाण वाळवंट …तिथल्या मेलेल्या माणुसकीला वाकुल्या दाखवत!

-------------------------------------------
प्रलयनाथ मोक्षगुंडम गुंडास्वामी

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

18 Jun 2019 - 7:53 pm | जॉनविक्क

त्यामुळे कॉवबॉय मोडमधेच होतो... आणि हे वाचायला मिळाले कॉवबॉय जॉन विक अशी थीम नजरेसमोर साकार झाली :)

प्रलयनाथ गेंडास्वामीं's picture

18 Jun 2019 - 8:08 pm | प्रलयनाथ गेंडास...

o

कदाचित वाईल्ड वेस्ट कल्चरसंबंधी इतकी माहिती नसल्यामुळे मला काही टोटल लागली नाही. फक्त विल्यम हा कन्फेड्रेट्स मध्ये अधिकारी/शिपाई होता अन त्याने केलेल्या हत्यांचा त्याला नंतर पश्चाताप होत असावा इतपत कळलं.

हीच थीम असेल तर रसेल क्रो अभिनित ग्लॅडीएटर सिनेमातला एक डायलॉग आठवतो "Many times I think my sins would come back to me in this life itself" , थोडा वेगळा प्रयोग म्हणून आवडला पण आमच्यासारख्या अनभिज्ञ लोकांना कळेल इतपत सुटसुटीत थोडं असतं तर मजा आली असती.

ता.क.- लेखनात निःशब्दता मांडणे कठीण असते पण पॉज किंवा सायलेंट पॅच दर्शवायला इलेप्सीस (......) भरभरून देणे हे वाचणाऱ्याचा रसभंग करतात. तितके शक्यतो टाळता आले तर पहा.

त्यांना बहुदा ही थीम लिहायची असेल कदाचित.

https://youtu.be/qMoni2nosD4

प्रलयनाथ गेंडास्वामीं's picture

20 Jun 2019 - 2:27 pm | प्रलयनाथ गेंडास...

बर्रोब्बर व्हिडीओ शोधून काढलास रे नाईसगाया !

लई भारी's picture

20 Jun 2019 - 8:50 am | लई भारी

विंग्रजी भाषांतराचा फील वाटला काही ठिकाणी.
थोडं क्लिष्ट झालं आमच्यासाठी.