मधुराभक्ती

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
20 Mar 2009 - 7:49 pm

मज ध्यास दर्शनाचा रे, ना कसलीही आसक्ती
अंतरात माझ्या वसते, मीरेची मधुराभक्ती

मी गीत तुझे गुणगुणते
चैतन्य जणू रुणझुणते
गीतातून माझ्या करते तव प्रीतीची अभिव्यक्ती

तन राही जरी संसारी
मन घेते गगनभरारी
एकाच ठायी अनुभवते आसक्ती आणि विरक्ती

काळोख मनाला ग्रासे
हा जन्मही शापच भासे
तुजवाचून जगण्याचीही उरली ना इच्छाशक्ती

सर्वस्व तुला अर्पावे
आयुष्य इथे संपावे
तुजसाठी पुन्हा उमलाया, या जन्मि मिळावी मुक्ती

कविताप्रकटन

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

20 Mar 2009 - 7:51 pm | लिखाळ

सुंदर .. फार छान !
-- लिखाळ.

सूहास's picture

20 Mar 2009 - 7:57 pm | सूहास (not verified)

आज काही खर नाही !!!

"मिपा आज कान्हारसात न्हाउन निघतय की बुडतय बहुतेक

सर्वस्व तुला अर्पावे
आयुष्य इथे संपावे
तुजसाठी पुन्हा उमलाया, या जन्मि मिळावी मुक्ती

निरपेक्ष,निस्सीम भक्ती याला म्हणतात.आम्हाला हे धड गद्यरुपात म्हणता,लिहीता येत नाही

आज एकापेक्षा एक रचना वाचायला मिळताहेत

सुहास..
(द गुड)

प्राजु's picture

20 Mar 2009 - 8:03 pm | प्राजु

भक्तीरसात न्हाऊन निघाले. खूपच सुंदर..
मीरा के प्रभू गिरीधर नाघर..

तन राही जरी संसारी
मन घेते गगनभरारी
एकाच ठायी अनुभवते आसक्ती आणि विरक्ती

हे जास्ती आवडल. क्रान्ती.. जियो!!

सुरेख.- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

नितिन थत्ते's picture

20 Mar 2009 - 8:33 pm | नितिन थत्ते

सुंदर कविता आहे.
नाना, रंग्या, खोडसाळ व केशवसुमार (मदिराभक्ती) केव्हा पाडतात त्याची वाट बघतोय.
खराटा
(रंग माझा वेगळा)

शितल's picture

20 Mar 2009 - 8:38 pm | शितल

क्रान्ति,
सर्व कविताच आवडली. :)

विशाल कुलकर्णी's picture

21 Mar 2009 - 3:17 pm | विशाल कुलकर्णी

मस्त लिहीलेय. आधी प्राजुंची कृष्णमयी आणि आता मधुराभक्ती. छान, अजुन येवु द्या !!

सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

राघव's picture

23 Mar 2009 - 9:19 am | राघव

अगदी प्रसन्न वाटले सकाळी सकाळी ही कविता बघून! :)

राघव

llपुण्याचे पेशवेll's picture

23 Mar 2009 - 9:49 am | llपुण्याचे पेशवेll

सुंदर कविता. छान वाटले वाचून.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

विसोबा खेचर's picture

23 Mar 2009 - 9:57 am | विसोबा खेचर

सुरेख प्रासादिक कविता..!

जियो...

तात्या.

जयवी's picture

24 Mar 2009 - 12:08 pm | जयवी

खरंच अगदी पवित्र आणि प्रसन्न वाटलं :)
"मधुराभक्ती" हा शब्द पण फार गोड आहे गं...!!

चंद्रशेखर महामुनी's picture

24 Mar 2009 - 12:41 pm | चंद्रशेखर महामुनी

कविता खुप आवडली.... क्रांती....
शेवटचा अंतरा... टचिंग....

जागु's picture

24 Mar 2009 - 2:14 pm | जागु

तुजसाठी पुन्हा उमलाया, या जन्मि मिळावी मुक्ती

सुंदर.