वदनी कवळ.....

Primary tabs

फुंटी's picture
फुंटी in जे न देखे रवी...
29 May 2019 - 1:53 pm

वदनी कवळ घेता
फोटो काढा प्लेटचे
सहज हवन होते
अपलोडता स्टेटसे
व्हायरलं न होता नेटवरी
अन्न हे अपूर्णब्रम्ह
खाण्याआधी पोस्टणे
जाणिजे आद्यकर्म

विडम्बनविडंबन

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

29 May 2019 - 2:01 pm | अभ्या..

नाश्ता झाला, जमलाय.
आता जेवण येऊ द्या.

फास्ट फूड सेन्टर आहे हो हे...

जालिम लोशन's picture

29 May 2019 - 3:09 pm | जालिम लोशन

झकास

टवाळ कार्टा's picture

30 May 2019 - 3:49 am | टवाळ कार्टा

खिक्क

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 May 2019 - 9:55 am | ज्ञानोबाचे पैजार

जय जय झुकेरबर्ग समर्थ,
पैजारबुवा,

फुंटी's picture

31 May 2019 - 1:18 pm | फुंटी

धन्यवाद

चामुंडराय's picture

31 May 2019 - 7:41 pm | चामुंडराय

वदनि पेग घेता
चव घ्या चखण्याची ।

सहज किक बसते
मिळता पिण्या फुकाची ।

सातत्ये करि मैफिल
दारू हि झिंगब्रह्म ।

सुरापान नोहे
जाणिजे नशाकर्म ॥१॥

पेगवर पेग घेता
नाम घ्या साकियाचे |

पिताना स्मरण ठेवा
आम्हा बांधवांचे |

रम जीन व्हिस्की
सोनेरी पेय्य चषकात |

त्रास चिंता काळजी
विसरा या नशेत ॥२॥

वारुणी हि वैरिणी
असे जे सांगतात |

बियर वाईन टकिला
वर्ज्य मानतात |

स्मरण करुनी त्यांचे
दारू प्या खुशाल |

सुरापान करील
चित्तवृत्ती विशाल ॥३॥

विसू: Drink responsibly, Drive sober

नाखु's picture

31 May 2019 - 7:55 pm | नाखु

स्टेटस न बदलता स्टेटस जपणारी माणसे विरळ आहेत

मुदलात जालगंडरेला नाखु पांढरपेशा