मोदी २०१९ - निर्विवाद! बर्‍याच अंशी अपेक्षित!

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
24 May 2019 - 2:20 pm

जवळपास दीड महिन्यापासून मी मोदी लाट अजूनही आहे हे सांगत होतो. २९-एप्रिल-२०१९ रोजी मी या वेबसाईटच्या एका धाग्यावर सांगीतले होते की नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आणि एनडीएला बहुमत मिळणार. मी बर्याच लोकांशी बोललो होतो - रिक्शा ड्रायव्हर, कॅब ड्रायव्हर, सामान्य माणसं, मध्यमवर्गीय, सुशिक्षित, निम्नमध्यमवर्गीय, आणि बरेच. स्वच्छपणे लोकांची पसंती मोदींना दिसत होती. मला आपल्या राजकीय निरीक्षकांचे आश्चर्य वाटते. बहुधा त्यांनी लोकांच्या मनाचा कानोसा घेण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. बेरोजगारी हा मुद्दा कधीच नव्हता. या मुद्द्यावरून कुठलेच सरकार यशस्वी किंवा अपयशी ठरत नाही. बेरोजगारी, गरीबी हे मुद्दे संपूर्णपणे सरकारच्या हातात नसतात. मला नोकरी मिळणे ही माझीदेखील जबाबदारी आहे. त्यासाठी मला कष्ट घ्यावे लागतील. यात सरकारची भूमिका मर्यादित असते. देशाचे संरक्षण, रस्ते, वीज, जागतिक पटलावर देशाची प्रतिमा, मोठ्या समस्यांशी मुकाबला वगैरे मोठ्या बाबी संपूर्णपणे सरकारच्या अखत्यारीत असतात. त्यामुळे आपल्या तथाकथित राजकीय निरीक्षकांनी बेरोजगारीवरून जी अनावश्यक राळ उडवली होती ती निरर्थक होती.

भाजप सरकारचा एक थोडक्यात आढावा घ्यायचा झाल्यास तो असा दिसेलः कुठल्याच प्रकारची भ्रष्टाचाराची प्रकरणं नाहीत, कुठलेच मोठे दंगे-धोपे नाहीत, पाकिस्तानला ठोस उत्तर दिले, देशाची मान सगळ्या जगात उंचावली, डिजीटल इंडियामुळे सामान्य लोकांचे आयुष्य बरेच सुकर झाले, जीएसटीमुळे सरकारचे उत्पन्न वाढले, चीनला डोकलाममध्ये जशास तसे उत्तर दिले, युनोमध्ये चीनकडून दहशतवादावर सहमती मिळवली, महागाई नियंत्रणात ठेवली, स्वच्छ भारत मिशनद्वारे भारतीयांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला, उघड्यावर शौच पूर्णपणे बंद केले, लाखो परिवारांना सुलभ गॅस कनेक्शन मिळवून दिले, रस्त्यांचे नवनवे प्रकल्प हाती घेऊन पूर्णत्वास नेले, ज्या देशांमध्ये समस्या होत्या त्या देशांमधून भारतीयांना सुखरूपपणे मायदेशी परत आणले, काश्मिरमध्ये जमात-ए-इस्लामीचे नेटवर्क कमजोर पाडले, शेतकर्यांना विविध प्रकारचे लाभ दिले, डिजीटल ट्रान्स्फरद्वारे सामान्यांना मिळणार्या मदतीत होणारा भ्रष्टाचार रोखला, भ्रष्टाचारी नेत्यांचा आणि पद्धतींचा योग्य बंदोबस्त केला, मुद्रा योजनेद्वारे कित्येक तरुणांना सुलभ अर्थसहाय्य मिळाले, जनधन योजनेचा लाभ लाखो लोकांना मिळाला, मोदी सरकारने आदर, प्रामाणिकपणा, सन्मान यावर आधारित राजकीय वातावरण निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, सरकारच्या कारभारात पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा आणण्याचा प्रयत्न केला, स्थिर, मजबूत सरकार देऊन विविध प्रकारच्या उद्योगांना भारतात येण्यास उत्तेजन दिले, आणि एकंदरीत एक सक्षम, निर्णयक्षम, दूरदृष्टी असणारे, मुत्सद्दी, जिगरबाज, देशाच्या भल्यासाठी कठोर निर्णय घेणारे सरकार भाजपाने दिले.

भारतीय जनतेने याच सरकारला पुन्हा निवडून दिले यात नवल ते काहीच नाही. शिवाय, नरेंद्र मोदी नाही तर दुसरा कोणता सक्षम पर्याय भारतापुढे होता? राहुल गांधी? स्वतःला प्रामाणिक प्रश्न विचारून बघा, ही व्यक्ती पंतप्रधानपद सक्षमपणे सांभाळू शकते? ममता बॅनर्जी? आपल्या आक्रस्ताळ्या आणि हुकूमशाही प्रवृत्तीने बंगालचे अपरिमित नुकसान करणार्या ममता बॅनर्जी? 'कधीकाळी' सुसंस्कृत आणि समंजस अशी प्रतिमा असलेले शरद पवार? आपल्या नातवाला निवडून न आणू शकणारे, आयुष्यभर विश्वासघाताचे, जातीय विद्वेषाचे, गुंडगिरीला पोसणारे राजकारण करणारे शरद पवार? वीस वर्षात ३-४ फुटकळ खासदार ही त्यांची कमाई आणि ते पंतप्रधान? कोण आहेत हे महाराष्ट्रातले राजकीय निरीक्षक ज्यांनी ही नावे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आणली? त्यांची राजकीय समज शून्य आहे असेच म्हणायला हवे. आपले सगळे राजकीय निरीक्षक अतिशय कुचकामी आहेत. कुणालाच काहीही कळत नाही असेच खेदाने म्हणावे लागते. गेले ७-८ महिने मी आपल्या राजकीय निरीक्षकांची वक्तव्ये, लेख, मुलाखती, चर्चा, फेसबुक पोस्ट्स, वगैरे बघतोय आणि वाचतोय. सुनिल चावके, विश्वंभर चौधरी, विजय कुवळेकर, मुग्धा कर्णिक आणि टीव्हीवर मते मांडणारे आपले सगळे निरीक्षक सतत गुळमुळीत बोलत होते. काहींनी भाजपची मोठी हार वर्तवली होती. मुग्धा कर्णिक सारखे मोदीद्वेषी तर अगदी हास्यास्पद पातळीवर जाऊन निरर्थक बडबड करत होते. विश्वंभर चौधरींचे फेसबुक पोस्ट्स बघून फक्त हसू येत होते इतके बालिश त्यांचे मुद्दे होते. आश्चर्य आहे; ही मंडळी स्वतःला राजकारणातली एक्स्पर्ट समजतात. या सगळ्यांनी राजकारणावर किमान पाच वर्षे काहीही लिहू, बोलू नये अशी यांची समज आहे. टाईम्स ऑफ इंडियाचे अय्यर वगळता कुणीही छातीठोकपणे सांगत नव्हतं की भाजप पुन्हा सत्तेवर येईल. महाराष्ट्रातल्या राजकीय निरीक्षकांनी तर निवृत्तीच घ्यायला हवी इतकी त्यांची समज कुचकामी ठरली.

आता ऑक्टोबर २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस पुन्हा सत्तेत येतील यात शंकाच नाही. त्यांची स्वच्छ, सुसंस्कृत, सभ्य प्रतिमा, महाराष्ट्रासाठी त्यांनी केलेले प्रामाणिक काम, सगळ्या विरोधकांना पुरून उरणारी त्यांची असामान्य राजकीय बुद्धिमत्ता, सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती, आणि राजकीय गुंडगिरीला अजिबात थारा न देण्याची त्यांची विलक्षण हातोटी हे त्यांचे प्लस पॉईंट्स आहेत. महाराष्ट्रातले लोकसभेचे घवघवीत यश त्यांच्या शिरपेचात अजून एक तुरा खोचून गेले आहे. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने धडा शिकायची वेळ आलेली आहे. ती २०१४ मध्ये देखील आली होती पण या पक्षांना ठाम वैचारिक बैठकच नाही; त्यामुळे या पक्षांचे असेच हाल होत राहणार हे नक्की. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सहकार क्षेत्राच्या नावाखाली बँका, साखर कारखाने, सूत गिरण्या, शिक्षणसंस्था, स्टार्च फॅक्टर्या, पतसंस्था आणि ऊस जमीनदारी, तालुका-जिल्ह्यात दहशत वगैरे याद्वारे जे भयानक वातावरण तयार करून ठेवले होते ते मोडून काढणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी या पक्षांना सतत पराभव चाखायला लावणे हाच एकमेव उपाय आहे. गेल्या वीस वर्षात राष्ट्रवादी पक्षाने तर महाराष्ट्रातले वातावरण पार गढूळ करून टाकले. सरळ सरळ जातींवर आधारित राजकारण करून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न या पक्षाने केला. अतिशय घाणेरड्या पद्धतीने मराठा-ब्राह्मण वाद विकोपाला नेऊन ठेवला. त्यात अर्थात ब्राह्मण समाजाचा हिस्सा शून्य होता कारण त्यांना गुंडगिरी जमत नाही. कित्येक जात्यांध मराठा संघटनांनी हा जातीचा द्वेष मोठ्या प्रमाणावर पोसला.

गेल्या पाच वर्षात काँग्रेस किंवा बाकी कुठल्याही विरोधी पक्षाने काय केले? काहीही नाही. त्यांच्याकडे काहीच कार्यक्रम नव्हता. कुठलाच ठोस प्लॅन नव्हता. त्यांनी फक्त नरेंद्र मोदींना शिव्या देण्यात धन्यता मानली. निव्वळ चिखलफेक केली. कुठलेच मुद्दे मांडले नाहीत. कुठलाच सज्जड डेटा दिला नाही. आपसूकच त्यांच्यात काहीही दम नाही हे सुज्ञ जनतेच्या लक्षात आले.

जनतेचा कौल स्पष्ट होता; सगळ्यांनीच डोळ्यांवर झापडं ओढून घेतली होती. जनता स्मार्ट आहे. कोई माई का लाल जनता को बेवकूफ नही बना सकता...

राजकारणविचार

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

24 May 2019 - 2:34 pm | महासंग्राम

असेच म्हणतो, फक्त या टर्मला उतमात म्हणजे मिळवलं

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 May 2019 - 4:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर विश्लेषण.

या निवडणूकीत जनतेकडून मिळालेल्या भरघोस पावतीच्या बळावर, येत्या पाच वर्षांत मोदी आपल्या मनातील अजून अनेक लोकोपयोगी आणि देशोपयोगी कामे वास्तवात आणतील यात संशय नाही. याशिवाय, गेल्या पाच वर्षांत विकसित केलेल्या दीर्घकालीन योजनांचे येत्या पाच वर्षांत दृष्य परिणाम दिसू लागतील. म्हणजे, सरकार विकासाच्या मार्गावर दुप्पट जोराने धावू लागेल असा अंदाज करायला हरकत नाही. त्यात, भ्रष्टाचारामुळे होणार्‍या पैशाच्या गळतीला पायबंद बसल्याने वाढलेला अर्थस्त्रोत भर टाकेलच. हे सर्व पाहता, पुढची पाच वर्षे भारताच्या विकासाच्या आणि आंतरराष्ट्रीय मानाच्या दृष्टीने उत्तम ठरली नाही तरच आश्चर्य आणि दु:ख वाटेल.

आंधळा, एकेरी आणि कर्कश्श विरोध करणार्‍यांतील काही जणांना उपरती झाली तर ते आपला चष्मा काढून उघड्या डोळ्यांनी वास्तवाकडे बघायचा प्रयत्न तरी करतील. तर इतर काहींना, तसे न करता, राजकिय-आर्थिक-सामाजिक-वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी, आपला मागच्या पानावरचा उद्योग पुढच्या पानावर चालू ठेवणे जास्त फायद्याचे वाटेल, यात शंका नाही. पण तरीही, भाषणे-लेख-माध्यमे वापरून केलेल्या भडक आरोपांचा जनमानसावर होणारा प्रभाव कमी होत चालला आहे, असेच दिसत आहे.

यापुढे, केवळ, चलाखी, आर्थिक फायद्याच्या भूलथापा, फुकटेपणाची आश्वासने, चारित्र्यहनहन करणारे विनापुरावा आरोप, पूर्वजांच्या नावाने केलेली आवाहने आणि (निदान लक्षणिय प्रमाणात) धर्म-जात-पंथ वापरून केलेले राजकारण, इत्यादी जुनी चलनी नाणी (काही जरा लवकर, काही जरा काळाने) बाद होत जातील, असे संकेत आहेत.

जनता हळू हळू का होईना पण सुजाण बनत चालली असल्याने, तिला आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढ्यांच्या फायद्याबद्दल पुरेशी जाणीव येत चालली आहे... आणि योग्य निवड करायला सांगताना तिला चलाखीने/खोटेपणाने उल्लू बनवणे अधिकाधिक कठीण होत जाईल, असेच दिसते आहे.

तेव्हा, मोठा पल्ला गाठायचा असला तरी, निदान आजच्या घडीला तरी, भारताची उज्ज्वल भवितव्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे, असे म्हणायला हरकत नाही.

जालिम लोशन's picture

24 May 2019 - 6:47 pm | जालिम लोशन

+1

ज्योति अळवणी's picture

24 May 2019 - 8:24 pm | ज्योति अळवणी

अचूक लिहिलं आहे

माझ्या मते सर्वच पक्षांना लोककौल कळला होता. म्हणून तर ममताचा आततायीपणा, राहुलचं उगाच सतत मोदींना आव्हान देणं चालू होतं.

मोदी आणि त्या खडूस अमित शहाला देखील उत्तम यशाची कल्पना असावी. पण कार्यकर्त्यांनी हवेत जाऊ नये, प्रामाणिकपणे काम करावं म्हणून त्यांनी सतत टेन्शन ठेवलं असेल. याचा प्रत्यय मोदींच्या भाषणात आलाच. म्हणलेच ते हुरळून नाही गेलो... कार्यकर्त्यांना जाऊ देणार नाही. जवाबदरीची जाणीव आहे. ती पूर्ण करीनच

ज्योति अळवणी's picture

24 May 2019 - 8:24 pm | ज्योति अळवणी
हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

24 May 2019 - 8:33 pm | हणमंतअण्णा शंकर...

बहुसंख्यांकांवर लादलेली धर्मनिरपेक्षता बहुसंख्याकांनी उधळून लावली आहे. लोक भोळे आणि उजवे आहेत म्हणून नाही, लोक चाणाक्ष आहेत म्हणून हे झालंय. पिढ्यांपिढ्यांत मुरलेला, जातीपातींत विभागलेला आणि तरीही घट्ट झालेला भारतीय धर्म गेली काही दशकं उपेक्षला जात होता. या धर्मानं सुधारणा पचवल्या, स्वीकारल्या आहेत याचा अर्थ त्याला स्वत:ची अस्मिता नव्हती असं कधीच नव्हतं. सगळ्या जगात दहशतवादाचा चेहरा म्हणून ज्या परक्या धर्माची बदनामी होते, त्याला भारतीय समाजमनानं कधीही स्वीकारलं नव्हतं. याचं कारण त्या परक्या धर्माच्या मूलतत्वांत 'भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे' अशी उत्कट वैश्विक हाकाटी नाही. गावोगावी पसरलेल्या त्यांच्या अनुयायांत मातृभूमीवर मातृभूमी म्हणून प्रेम करावं असं सांगितलं जात नाही. मातृभूमीहून महत्त्वाची अशी ठिकाणं आहेत आणि त्यांच्या यात्रा करणं ही आयुष्यातली सर्वोच्च ध्येयं आहेत असल्या शिकवण्या घटवून घेतल्या जातात. याला जाणून बुजून चुचकारणारं राजकारण, अभिजनांकडून दिला गेलेला दुजाभाव आता अशा जनादेशातून अधिक ठळकपणे वर येईल.
आपला दुश्मन काही ब्रिटीश सत्ता उरलेली नाही. बहुसंख्याकांनी या दुश्मनाची उणीव भरून काढायला परका धर्म आणि त्याला सरकारी पातळीवरून मिळणारं सोयीची प्राधान्य निवडलं. पाकीस्तान-द्वेष या दुश्मनाला क्रमाक्रमाने ठळक करत गेला. बीजेपीने या द्वेषाला वापरून घेतलं हे त्यांचं संधीसाधूपण नाही, तर व्यापक जनमानसात शतकानुशतके वाढलेल्या या द्वेषाने बीजेपीला वापरून घेऊन तो व्यक्त झाला आहे. हा शतकं साठलेला द्वेष आत्ताच का तीव्र होतोय याचं कारणही तो परका धर्मच आहे. मध्य-पूर्व आशियाची जी अभूतपूर्व वाट लागलेली आहे त्याला कोणतंही धार्मिक अस्तर नाही असं होऊच शकत नाही. तिथल्या भयानक हिंसक वार्तांनी एक त्या परक्या धर्माविषयी टोकाची भावना जगभर तयार झालेली आहे. हीच भावना फक्त सत्तर वर्षापूर्वी आपल्याइथे उत्पात घडवून गेली. त्या सगळ्या संचिताला आता तोंड फुटत आहे. एक राष्ट्र म्हणून आपल्या अभिजनांनी धार्मिक समानतेची भावना बहुजनांना अ‍ॅब्स्ट्रॅक्ट करून त्यांना पटवून दिली ती मुळातच बहुजनांमध्ये नसल्यामुळे तिचा असा उद्रेक झालेला आहे

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 May 2019 - 8:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

पाकीस्तान-द्वेष या दुश्मनाला क्रमाक्रमाने ठळक करत गेला.

हे वाक्य वस्तुस्थितीचा सरळ सरळ विपर्यास करणारे आहे. (अपेक्षा आहे की, ही वाक्यरचना हेतुपुर्र्सर केलेली नसावी.)

सत्य आणि फक्त सत्य (ट्रुथ अँड नथिंग बट ट्रुथ) सांगायचे झाले तर असे म्हणावे लागेल...

१. त्याच्या स्थापनेपासूनच, पाकिस्तानच्या कारवाया त्याच्याबद्दलचा द्वेष क्रमाक्रमाने ठळक होत जावा, अश्याच आहेत. त्यामध्ये इतर कोणाचा फारसा सहभाग नाही... किंबहुना, इतर सर्व त्या कारवायांचे बळी आहेत.

२. "धर्मनिरपेक्षपणा म्हणजे अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आणि बहुसंख्यांकाचे दमन", हा सोईस्कर अर्थ "तथाकथित भारतिय विचारवंत, राजकारणी आणि तद्दन संधीवादी" लावत असतात आणि ते करणे म्हणजेच न्याय असे उत्तम नाटकही वठवत असतात. ही पूर्ण जगतात केवळ भारत याच एका देशाची खासियत झाली आहे.

मात्र,

"वरील ढळढळीत सत्यांकडे सतत दुर्लक्ष करणे आणि सतत या ना त्या भूलथापांनी पाकिस्तानची तळी उचलून धरणे", हे तर आता खाडीदेशांसह बहुसंख्य मुस्लिम देशांनीही बंद केले आहे... कारण पाकिस्तानी कारवायांचा भस्मासूर, भावबंदकीतील मुस्लिम देशांसह, जगातल्या सर्व देशांना नाडू लागला आहे.

पण, तरीही, वैयक्तिक स्वार्थाने आणि अहंमन्यतेने अंध झालेले "तथाकथित विचारवंत, राजकारणी आणि तद्दन संधीवादी" सुधारण्याचे नाव घेत नाहीत, हे पण तितकेच खरे आहे... आणि त्यांच्या कळपामध्ये अनेक भारतीय पुढे आहेत, हे केवळ दुर्दैवी नाही तर अनैतिक व लाजिरवाणेही आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 May 2019 - 9:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

मुख्य म्हणजे कोणत्याही खर्‍या लिबरल (किंवा सत्यावर आधारीत इतर कोणत्याही) विचारसरणीत, खर्‍याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणायला हवे.

या विपरित असलेल्या सर्व विचारसरणी, असत्य आणि ढोंगी ठरतील, यात संशय नसावा. पूर्णविराम.

मित्रहो's picture

25 May 2019 - 12:07 pm | मित्रहो

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत लोक वेगळे मतदान करतात हे दिसून आले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, तेलंगणा इथे दिसून आले आहे. याचा अर्थ स्थानिक आमदार, खासदार त्यांची कामाची पद्धत याला किंमत राहत नाही का. आधी कॉंग्रेसच्या नावावर कुणीही निवडून यायचे आता मोदींच्या नावावर निवडून येतात. सांसदीय लोकशाहीत हे अपेक्षित आहे का. सांसदीय लोकशाही योग्य आहे का कि अध्यक्षीय लोकशाही हवी

सुबोध खरे's picture

25 May 2019 - 12:50 pm | सुबोध खरे

कायदे करणे किंवा घटना दुरुस्ती करणे या साठी किमान बहुमत अपेक्षित आहे.
ते न मिळाल्यामुळे अनेक लोकोपयोगी कायदे (उदा. तीन तलाक) बासनात पडून आहेत. हा विचार संकुचित वृत्तीचे लोक करतच नाहीत.
मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणावर किंवा महत्त्वाचे आहेत अशा १०१ मतदार संघांपैकी ६१ ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत.
याचे विश्लेषण करताना तज्ज्ञांचे मत असे आहे कि हा कायदा पास व्हावा अशी मोठ्या प्रमाणावर मुसलमान मतदारांची इच्छा आहे
मग असा कायदा पास होण्यासाठी होयबा खासदार असला तरी चालतो कारण लोकशाहीत संख्याबळ हे महत्त्वाचे आहे.
स्वघोषित पुरोगामी बुद्धिवंत हा मुद्दा बाजूला ठेवून लोकांच्या अकलेवर जेंव्हा प्रश्नचिन्ह उभे करतात त्यांची कीव करावीशी वाटते.

७० कोटी मतदार संख्येमधील ६०% मतदारांनी मोदींना/ भाजपला निवडून दिले आहे. या ४२ कोटी लोकांपेक्षा आम्हीच जास्त हुशार समजणारे असले स्वघोषित पुरोगामी बुद्धिवंत तोंडघशी पडले नसते तरच नवल.

राघव's picture

25 May 2019 - 11:58 pm | राघव

कायदे करणे किंवा घटना दुरुस्ती करणे या साठी किमान बहुमत अपेक्षित आहे.

थोडं करेक्षन - लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही ठिकाणी २/३ बहुमत हवं. सोबत एकूण राज्यांपैकी किमान अर्ध्या राज्यांनी अशा कायद्याला मान्यता द्यायला हवी. त्यानंतर राष्ट्रपतींकडून त्यावर मोहर उठवली जायला हवी.

सध्या राज्यं तर यांच्याकडे पुरेशी आहेत. लोकसभेत ३५१ म्हणजे २/३ [३६३] च्या पुष्कळच जवळ आहेत. राज्यसभेत फक्त कधी २/३ गाठता येईल ते बघायचे. अन्यथा काही इतर पक्षांना पटवायचे असे काहितरी डावपेच यांना कायदा बदलण्यासाठी करावे लागतील.

त्यातही वित्त विधेयक म्हणून जर एखादा प्रस्तावित कायदा आणला गेला तर केवळ लोकसभेची मंजुरी व राष्ट्रपतींची मोहर पुरेशी.

आर्थिक कायदा किंवा विधेयक पास करण्यासाठी राज्यसभेत बहुमत आवश्यक नाही. केवळ लोकसभेत बहुमत पुरेसे आहे.

इतर कायदे ( उदा. तीन तलाक विरोधी कायदा) करण्यासाठी दोन्ही सभागृहात साधे बहुमत (५० % पेक्षा जास्त) असणे आवश्यक आहे.

परंतु जर राज्यसभा सदस्य झारीतील शुक्राचार्य बनत असतील तर दोन्ही सभागृहांचे एकत्र अधिवेशन बोलवून तेथे साध्या (५०% पेक्षा जास्त) बहुमताने कायदा पास करून घेता येतो.

तर घटनादुरुस्तीसाठी दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश बहुमत आवश्यक आहे.

जर राष्ट्रपती झारीतील शुक्राचार्य बनत असतील आणि त्यांनी विधेयकावर सही करण्यासाठी मंजुरी दिली नाही आणि ते परत पाठवले तर दोन्ही सभागृहे ते विधेयक परत पास करून राष्ट्रपतींकडे पाठवतात अशा स्थितीत राष्ट्रपतींना सही करणे "आवश्यक" असते.

एवढे सगळे काथ्याकूट लिहून मूळ मुद्दा दुर्लक्षित होऊ नये म्हणून कायदे करणे किंवा घटना दुरुस्ती करणे या साठी किमान बहुमत अपेक्षित आहे असे मोघम लिहिले होते .

गैरसमज नसावा

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत लोक वेगळे मतदान करतात हे दिसून आले आहे.

नुकताच भारतातुन आमच्या इथे आलेला एक मारवाड़ी, मला बोलला, विधानसभेच्या टायमाला, ते लोक़्स म्हणत होते...

मोदी तुझसे बैर नहीं,
राजे तेरी ख़ैर नहीं

इरामयी's picture

25 May 2019 - 4:45 pm | इरामयी

खूप चान्गला लेख. भाऊ तोरसेकरांचा व्लोग आठवला. https://www.youtube.com/watch?v=srIWNIQpQpE&feature=youtu.be

अजित पवार, राज ठाकरे, सक्षणा, प्रकाश आंबेडकर, इ.च्या सभांना होत असलेली गर्दी बघून, विरोधकांची मोदीविरुद्ध सर्व अशी एक्जूट झाल्याने, आणि टिव्हईवर सततची मोदींवर्ची टीका ऐकून असं वाटलं नव्हतं की रालोआ एव्हढं घवघवीत यश मिळवेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 May 2019 - 11:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत...!

बाकी लेखन एकांगी आहे झाला आहे असे वाटले. अर्थात विद्यमान सरकारचा विजय झाल्यामुळे विजयी मुद्दे अपेक्षितच. त्यामुळे असंख्य उणीवा झाकल्या जातात असे वाटते. अर्थात हे चालायचंच...!!

-दिलीप बिरुटे

राघव's picture

26 May 2019 - 12:03 am | राघव

चांगले विवेचन.

मला धर्मनिरपेक्षता हा शब्द आणि त्यावरून भाजप ला नावं ठेवणारे लोक्स यांचं फार हसू येतं.

भाजपला धर्मनिरपेक्ष नसलेला पक्ष म्हणणारे सगळे पक्ष जातीय राजकारण करण्यास मोकळे असतात. जर धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व
धर्मियांना समान वागणूक असेल तर समान नागरी कायदा हा मुद्दा केवळ भाजपच्याच अजेंड्यात कसा? मग धर्मनिरपेक्ष खरे कोण? :-)

समीरसूर's picture

27 May 2019 - 10:45 am | समीरसूर

काँग्रेस, राष्ट्रवादी, टीएमसी वगैरे तर सगळ्या जगातील सगळ्यात ढोंगी पक्ष आहेत. याच लोकांनी जाती-धर्माचं अतिशय हिणकस असं राजकारण सगळ्यात जास्त केलं. म्हणून यांच्या सगळ्यांच्या पार्श्वभागावर एकदा नव्हे दोनदा सणसणीत लाथ बसली आहे तरी या माजोर्ड्यांच्या लक्षात येत नाहीये. ते अजूनही त्याच "जनता म्हणजे मुजरा करणारी मुकी मेंढरं" थाटाच्या बादशाही राजकारणाच्या दुनियेत आहेत. पार्थ पवार सपाटून आपटल्यानंतर तरी या घमेंडखोरांच्या लक्षात येईल अशी आशा आहे. तो पडणारच होता आणि पडायलाच पाहिजे होता. गुंडगिरीला व्यवस्थित जागा दाखवलीच गेली पाहिजे.

नाखु's picture

26 May 2019 - 9:27 am | नाखु

अन्य समूहावर आलेली सुंदर पोस्ट
*लोकसत्ता - गेट वेल सून*

लोकसभा निकालातील भारतीय जनता पार्टीच्या अभूतपूर्व यशाने जर सर्वात जास्त कोंडी कुणाची झाली असेल तर लोकसत्ता सारख्या स्वतः:ला बुद्धिप्रामाण्यवादी किंवा सामन्यांच्या भाषेत अतिशहाणे मानणाऱ्या वृत्तपत्रांची. पाच वर्षे सतत मोदी सरकारला टोचणी दिल्यानंतर हा फुगाच आहे व तो २३ तारखेला फुटेल या आशेवर ते देव पाण्यात ठेऊन बसले होते पण झाले ते त्यांच्या दृष्टीने अघटितच घडले.  एखादा मोठा माणूस आजारपणांत शेवटच्या घटका मोजत असतो तेव्हा "बातमी" कधीही येऊ शकते याकरता त्याचे चरित्र, मुलाखती इत्यादी मालमसाला छापायला तयार ठेवलेला असतो. एक्झिट पोलचे बहुतांशी आकडे जे एनडीएला बहुमत दाखवत होते ते बघताना सुद्धा ज्या दोन जनमत चाचण्या भाजपाला बहुमत दाखवत नव्हत्या  त्यांनाच लोकसत्ता निकालाआधी अधोरेखित करत होती. एनडीएचा पराभव व्हावा हि मनापासून आशा लावून बसलेला  लोकसत्ता मोदी आणि पर्यायाने भाजप सत्ता काबीज करणारच नाही या स्वप्नावर जगात होता. मोदींच्या पराभवाच्या कारणांवर तर कॉलम वर कॉलम भरून तयार ठेवले असतील. आता वर दिलेल्या उदाहरणातला जर मोठा माणूस जर टुणटुणीत होऊन रुग्णालयातून बाहेर पडला तर घेतलेली सर्व मेहनत फुकट कशी फुकट जाईल तशी अवस्था लोकसत्ताची गेले दोन दिवस झालेली दिसत आहे. 

याचे मुख्य कारण म्हणजे लोकसत्तेसारखा लोकशाहीच्या चौथ्या खांबाने जनमत काय आहे याचा जाणीवपूर्वक विचार न करता आपलेच मत लोकांवर लादायचा गेली पाच वर्षे केलेला प्रयत्न. मोदी सरकारमधील जे खरोखरच चांगले होते त्या एका तरी योजनेचे किंवा निर्णयाचे त्यांनी हातचे न राखता कौतुक केलेले तुम्हाला आठवते? या निवडणुकीतही लोकसत्ताचे तेच चुकले. जनमताचा अंदाज न घेता आपलेच मत लोकांवर रेटत मोदी सरकार कसे पडले पाहिजे हाच बहुतांशी अग्रलेखचा आशय होता पण जरी लोकसत्ताची इच्छा असली तरी भाजपा किंवा एनडीए पाच वर्षात कधीच रुग्णालयात नव्हते. स्किझोफ्रेनिया झालेल्या व्यक्तीला आपल्यातच एक दुसरी व्यक्ती भासायला लागते तसा लोकसत्ताला भाजपा पराभूत झालेला दिसत होता पण जेव्हा विजेचा झटका बसून वास्तवात आणले जाते तेव्हा त्यांना कदाचित कळून चुकले असेल कि गेली पाच वर्षे आपण जी गरळ ओकत होतो तो भास होता. लोकांना काहीतरी भलतेच दिसत आहे जे मतदानरूपाने दिसले. मग प्रश्न उत्तरी आता सत्य तरी स्वीकारायचे कसे? सपशेल चूक मानून का गिरे तो भी टांग उपर मानून? बुद्धिप्रामाण्यवादी असल्याने अर्थातच दुसरा पर्याय स्वीकारला गेला.

अगदी नाईलाज म्हणून त्यांना २४ तारखेच्या अंकात विशेष संपादकीय  म्हणून  "एक"मेवाद्वितिय लिहावे लागले पण निखळ कौतुक करणे म्हणजे आपली चूक मान्य करणे होते म्हणून मुख्य संपादकीय "पर्यायांचा पराभव" लिहावे लागले. हा पर्यायांचा पराभव का झाला किंबहुना लोकांना हे पर्यायच का वाटले नाहीत या वस्तुस्थितीवर आसूड ओढण्याऐवजी पर्याय कसे कमकुवत होते म्हणून मोदी जिंकले असा सूर किंवा गळा काढला गेला. या पर्यायांचा कैवार घेणारे लोकसत्तासारखे अनेक  विवेकबुद्धीने खरं तर हे पर्याय कमकुवत आहेत हे निवडणुकांच्या आधीच जाणत असले पाहिजेत पण या पर्यायांच्या कमकुवतपणाबाबत विस्तृत विश्लेषण सोडाच बाबत एकही चकार शब्द निवडणुकांच्या आधी आला नाही. कारण एकच आपल्या बुद्धीने लोकांना सत्याचे आकलन झाले तर काय? कावीळ झाल्यावर जसे सगळे पिवळेच दिसते तसे लोकसत्ताला दुर्दैवाने सगळे पिवळेच दिसत असल्याने अशा विश्लेषणाची अपेक्षाच नव्हती. पण हि कावीळ त्यांना का व्हावी?

निकालानंतरच्या अग्रलेखननंतर आजचा अग्रलेख "मोद विहरतो चोहीकडे" तर विनोदी लिखाण म्हणून मान्यता पावेल. लेखाला नाव मात्र मोदींचे पण कौतुक या विजयाचे स्वागत कसे लोकशाहीचे संकेत पाळून राहुल गांधी आणि केजरीवाल यांनी केले त्यांचे. निकालाच्या आदल्या दिवसापर्यंत ईव्हीएमच्या नावाने शिमगा करणाऱ्या या दोघांना (आणि त्यांच्या पिलावळीला) निकालानंतर अचानक लोकशाहीच्या संकेताचा साक्षत्कार झाला असावा. ईव्हीएमच्या नावे हंबरडा फोडला जात होता कारण काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष तुल्यबळ आकडा गाठतील आणि मग ईव्हीएमचा शिमगा उपयोगी पडेल. प्रत्यक्षात निकाल आल्यावर ना कुठे ईव्हीएमची रड ऐकू आली ना कुठे व्हीव्हीपॅटच्या पडताळणीची गफलत ऐकू आली. इतका दारुण अनपेक्षित पराभव पदरात पडल्यावर राहुल गांधींकडे मोकळेपणाने विजयाचे स्वागत करण्याशिवाय पर्याय होता? जनतेने त्यांना डोळा मारलाच आहे उद्या कदाचित ते पुन्हा मोदींना मिठीही मारतील.  जर हा पराभव निसटता असता तर हे लोकशाहीचे संकेत या मंडळींनी दाखवले असते?

हस्तिनापूरच्या भल्यासाठी जर महाभारत लढले तर भारताच्या भल्यासाठी या लोकशाहीच्या चौथ्या खांबानेही एकत्र आले पाहिजे. सत्ताधाऱ्यांचे चुकत असेल तर जरूर कान उपटा पण विरीधासाठी विरोध हा लोकसत्तासारख्या नामवंत आणि खरोखरीच बुद्धिवाद्यांनी भरलेल्या लोकांनी थांबवला पाहिजे. खरं  तर ब्रिटिश पार्लमेंटने आपल्याला लोकशाही देताना शॅडो गव्हर्नमेंटची कामे सांगितली नाहीत. दुर्दैवाने ते राबवायलाही तेवढा मोठा आज एकसंध विरोधी पक्ष नाही तेव्हा जे गेली पाच वर्षे झाले गेले ते विसरून सत्य नव्याने स्वीकारून लोकसत्तासारख्या नामवंत वृत्तपत्रांनी तरी हि जबाबदारी उचलली पाहिजे तेव्हा लोकसत्ता गेट वेल सून 

- निमिष वा. पाटगांवकर 
सौजन्य डॉ खरे सर

नाखु's picture

26 May 2019 - 12:27 pm | नाखु

लोकसत्ता ऐवजी फक्त मिपावर विचारवंत आणि उच्चशिक्षित असं बदललं तरी समयोचित आणि चपखल बसते

खरं सांगू का? सगळे मराठी लेखक, संपादक, निरीक्षक, पत्रकार वगैरे एकजात ढोंगी, बिनडोक, आणि एक नंबरचे भित्रट आहेत. धर्मनिरपेक्षवादाचा बुरखा पांघरला की हे मान ताठ ठेवून सभ्य लोकांच्या कळपात फिरायला मोकळे. एकाने कधी ठाम भूमिका घेतली असेल तर शपथ! सगळे कचखाऊ, मिळमिळीत, गिळगिळीत, आणि सदोदित बोटचेपे धोरण ठेवणारे! सगळेच एकदम पालापाचोळा. कणाहीन. कातडीबचाऊ. मटामध्ये अशोक पानवलकर एक असेच व्यक्तिमत्व. कुठलीच ठोस भूमिका नाही. कुठलीच योजना चांगली किंवा वाईट म्हणायची नाही. अतिशय पांचट काहीतरी लिहायचं आणि स्वतःची कातडी वाचवायची. सुनिल चावके, विजय चोरमारे, प्रताप आसबे वगैरे तर पवारांचे चमचे! एक शब्द प्रामाणिकपणे लिहितील तर शप्पथ! विश्वंभर चौधरी, सुहास पळशीकर वगैरे तसेच. वरवरंच लिखाण करणारे. कुठल्याच बाबीचा सखोल विचार करण्याची कुवत नसणारे. कमालीचा मोदीद्वेष हेच यांचे क्वालिफिकेशन! हे सगळे एकजात महाबिनडोक आहेत!

राष्ट्रवादीचा सुपडा साफ झाला. पवारांचे पुरते वस्त्रहरण झाले. तरी ही मंडळी त्यांचे गुणगान गाण्यात धन्यता मानतायेत. मूर्ख!

अभ्या..'s picture

27 May 2019 - 1:31 pm | अभ्या..

समीरदादा,
एक मोदी क्या निवडून आये, आप तो डॉन हो गये.
पार्श्वभागावर सणसणीत लाथा काय, गुंड काय, बिनडोक काय, कचखाऊ, मिळमिळीत, मूर्ख काय.
वावावा,
इतकी इम्पॉवरमेंट सामान्य नागरिकांची होत असेल तर मोदी चाहियेच सदा के लिये.

समीरसूर's picture

27 May 2019 - 1:45 pm | समीरसूर

मोदी से इसका कुछ लेना देना नही हैं. माझे जुने लेख किंवा प्रतिक्रिया वाचून बघा. कित्येक वर्षांपासून असेच आहेत. माझा मोदी किंवा भाजपशी दुरून दुरूनदेखील संबंध नाही. जो हैं सो हैं....

कालचा मटामधला आणि त्या आधीच्या रविवारच्या मटामधला असे दोन अशोक पानवलकरांचे लेख वाचून बघा. पाणी कमी पांचट असेल इतके ते लेख पांचट आहेत. सुनिल चावकेची मी मुलाखत पाहिली होती. एरवी त्यांच्या लेखातून मोदीद्वेष गळत असतो. मुलाखतीत मोदी येणारच चा धोशा लावला होत त्यांनी. हे सगळे असेच आहेत. गुळगुळीत. कुठलीच ठाम भूमिका नसणारे.

अभ्या..'s picture

27 May 2019 - 1:53 pm | अभ्या..

असु दे असु दे, काही हरकत नाही,
तेवढ्यासाठी मला मटा वाचायला किंवा कुणा चावकेंच्या मुलाखती वाचायला लावू नका.
त्यापेक्षा तुमचे प्रतिसाद वाचीन सारे. ठाम भुमिका फार आवडते आपल्याला. मिपावर असे पोटतिडिकेने लिहिणारे फार कमी आहेत.
भरपूर लिहा, मनोरंजन करा.
धन्यवाद

समीरसूर's picture

27 May 2019 - 2:02 pm | समीरसूर

असे वडिलकीच्या नात्याने उत्तेजन देणारे खूप कमी राहिलेत आजकाल....

अभ्या..'s picture

27 May 2019 - 2:10 pm | अभ्या..

धन्यवाद तुम्हालाच.
असे उत्तेजन तर द्यायलाच हवे.
पुढेमागे वडीलकीच्या नात्याने चार शब्द सुनावण्याचा अधिकारही मिळतो हो.
घेताल ना ऐकून?

समीरसूर's picture

27 May 2019 - 2:19 pm | समीरसूर

नक्की ऐकून घेऊ की! आणि नुसते ऐकून नाही घेणार; तुमच्या मतानुसार आचरणदेखील करू. आपुलकीने कान पिळणारे (कानाला दुखापत न करता) पाहिजेच आहेत आजच्या जगात!

अभ्या व समीरसूर यांच्यातला वरील संवाद , मला एका चित्रपटाची आठवण देऊन गेला

as

समीरसूर's picture

27 May 2019 - 2:42 pm | समीरसूर

हा चित्रपट विनोदी होता. आमच्यातला संवाददेखील फक्त कोपरखळ्या मारणारा होता; गंभीर दुखापत करणारा नाही. अर्थात, असे माझे मत आहे. अभ्यांचे मत काय आहे विचारयला पाहिजे. :-) शेवटी काय? 'अंदाज अपना अपना' हेच खरे! :-)

तेजस आठवले's picture

27 May 2019 - 9:45 pm | तेजस आठवले

कशाला लोकसत्ताकडून अपेक्षा करावी म्हणतो मी? मुळात ह्या सगळ्या फुरोगामी लोकांनी इतका टिपेचा आक्रोश केला की ते स्वतःच दमले आणि धाप लागली. मोदींना विशेष प्रयत्न करावे लागलेच नाहीत.
लोकशाहीचा चौथा खांब वगैरे कशाला म्हणता, लोकसत्तेची ती लायकी उरलेली नाही.

उपेक्षित's picture

26 May 2019 - 5:08 pm | उपेक्षित

हल्ली कुणीही उठून राजकीय तद्ज्ञ होतोय, गल्लीतल शेब्ड पोरग पण सांगत होत मोदी येईल म्हणून.

असो, फ़क़्त आता धार्मिक उन्मादावर वाचक ठेवला पाहिजे आणि वाचाळवीरांना आवरले गेले पाहिजे नाहीतर भाजपचा खान्ग्रेस व्हायला येळ लागणार नाही.

समीरसूर's picture

27 May 2019 - 10:40 am | समीरसूर

पोहोचवतो तुमचा 'मौल्यवान सल्ला' मोदींपर्यंत! ते अस्वस्थ होतेच...तुमच्या मार्गदर्शनाची वाट बघून बघून चेहरा काळवंडला होता त्यांचा. :-)

बाकी मागच्या ५ वर्षात धार्मिक उन्माद नव्हताच! धर्माचे आणि जातीचे सगळ्यात घाणेरडे राजकारण काँग्रेस, राष्ट्रवादी (पहिला क्रमांक), टीएमसी, सप, बसपा वगैरे टिनपाट पक्षांनीच सगळ्यात जास्त केले. बंगालमध्ये भाजपाने मुसंडी मारली कारण ममता बॅनर्जींनी स्थानिकांचा आक्रोश डावलून केवळ मुस्लिम मतांवर डोळा ठेवून बांग्लादेशातल्या बेकायदेशीर निर्वासितांना नोकर्‍या द्यायला सुरुवात केली होती. दिग्विजय सिंग सारखे उच्च दर्जाचे स्वार्थी राजकारणी काही वेगळं करत नव्हते. राजीव गांधींनी शहाबानो प्रकरणात काही वेगळं केलं नाही. भाजपने हे सगळं मोडीत काढलं.

एग्झिट पोलनंतर जरा थोड्याफार प्रमाणावर लोकं म्हणायला लागले की मोदी पुन्हा सत्तेत येतील. तोपर्यंत शेंबडं पोरगं सोडाच मोठे राजकीय निरीक्षकदेखील सांगू शकत नव्हते. कुणाची तेवढी कुवतच नव्हती. खूप आधीपासून फक्त अमित शहा सांगत होते की भाजप ३०० च्या वर जाईल. आणि टाईम्सचे अय्यर आणि स्वपन दासगुप्ता! बस्स! बाकी कुणीच म्हणत नव्हतं!

उपेक्षित's picture

27 May 2019 - 11:56 am | उपेक्षित

सल्ला पोहोचवल्याबद्दल "प्रसिध्द राजकीय तद्न्य समीरसूर" आभार.

उन्माद उन्माद म्हणतात तो हाच च्यायला चहा पेक्षा समीरसूर तुमची किटलीच लयी गरम आहे हो.
जरा विरोधी सूर दिसला कि आलेच अंगावर धावून, तुमच्यासारख्या लोकांमुळे खरे तर bjp ला जास्ती धोका आहे कारण तुम्ही लोक १% सुद्धा विरोधातले बोलणे ऐकून घेत नाही. हे म्हणजे बेगानी शादी मी अब्दुल्ला दिवाना.

इथे काही वयक्तिक भांडण नाही आपले कुणाशी सो चीलमाडी भाऊ.

(वाजपेयीवादी उपेक्षित)

समीरसूर's picture

27 May 2019 - 12:11 pm | समीरसूर

तुम्ही स्वतः फाल्तू सल्ले देताय आणि दुसर्‍याला हिणवताय...जरा स्वतः तपासून बघा कुणाची किटली गरम आहे ते...विरोध विरोधी बोलण्याला नाहीये; फाल्तू उद्दामपणाला आहे. अर्थात तो मराठी गुणधर्मच आहे म्हणा. नको तिथे उद्दामपणा करून बोलायचं. आणि फाल्तू सल्ले देत सुटायचं.

उपेक्षित's picture

27 May 2019 - 12:02 pm | उपेक्षित

एग्झिट पोलनंतर जरा थोड्याफार प्रमाणावर लोकं म्हणायला लागले की मोदी पुन्हा सत्तेत येतील. तोपर्यंत शेंबडं पोरगं सोडाच मोठे राजकीय निरीक्षकदेखील सांगू शकत नव्हते. कुणाची तेवढी कुवतच नव्हती. खूप आधीपासून फक्त अमित शहा सांगत होते की भाजप ३०० च्या वर जाईल. आणि टाईम्सचे अय्यर आणि स्वपन दासगुप्ता! बस्स! बाकी कुणीच म्हणत नव्हतं! >>>>>>>>>>>

याला म्हणत्यात माझा दिवा आन कुठबी लावा.

समीरसूर's picture

27 May 2019 - 12:12 pm | समीरसूर

तुमचा फाल्तू सल्ला दिवा नाही तर काय आहे हो? आणि तुम्हीदेखील तो लावता आहातच ना? :-)

उपेक्षित's picture

27 May 2019 - 12:01 pm | उपेक्षित

अरे हो अजून १ गोष्ट

जिंकल्यानंतरचे मोदींचे भाषण तसेच परवा सर्व निवडून आलेल्या खासदारांना मार्गदर्शन करताना मोदींचा टोन पहिल्यांदाच आवडला हे काबुल करतो.
पर्वाचे भाषण अगदी सहज वाटले त्यांचे कधी नव्हे ते, नाहीतर या आधी बळच चेहरा कठोर ठेवून तसेच आवाजात एक नको असलेला हेल असायचा पण पर्वाचे भाषण मनापासून आवडले.

समीर भाऊ हा पण निरोप पोहोचावा :)

समीरसूर's picture

27 May 2019 - 12:13 pm | समीरसूर

नक्कीच पोहोचवतो. एखादी शाल मिळाली त्यांचाकडून तर ती देखील आणतो तुमच्यासाठी...

उपेक्षित's picture

27 May 2019 - 1:24 pm | उपेक्षित

आज एक माणूस रुसलाय जणू आमच्यावर!!! :० :०

समीरसूर's picture

27 May 2019 - 1:48 pm | समीरसूर

रुसायला मी काय तुमची प्रेयसी आहे का? :-)

मिपावरची उद्धटपणाची, उर्मटपणाची, दुसर्‍यांना फालतू समजण्याची भाषा खटकते, एवढेच! इतरही काही लेखांवरच्या प्रतिक्रियांमध्ये मी या विषयावर मत मांडले आहे. बाकी वैयक्तिक काही नाही.

उपेक्षित's picture

27 May 2019 - 3:37 pm | उपेक्षित

रुसायला मी काय तुमची प्रेयसी आहे का? :-) >>>>>> अर्र् अर्र :)

मुद्दे ठीक आहेत. फक्त आता भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपमध्ये घेऊ नये. तशीही ती अर्धी जनता आता भाजपमध्ये आली आहेच. अजून आले तर भाजपची काँग्रेस होऊ शकते.

mrcoolguynice's picture

27 May 2019 - 7:52 pm | mrcoolguynice

बरोबर आहे, तसेच
इन्फोसिसने विप्रोच्या लोकांना आपल्याकडं घेऊ नये .