औरंगजेबाने शिरच्छेद केलेल्या सरमद कशिद बद्दल लिहिलेल्या प्रतिसादात, मध्ययुगीन (छ. शिवाजी कालीन) इतिहासाचे अभ्यासक मनो यांचाही अनुषंगिक विषयावर बर्यापैकी समतोल प्रतिसाद आला. मनोंना त्याच धाग्यावर प्रतिसाद देण्याचा मनोदय होता पण तेथिल इतरांच्या चर्चांनी वेगळी वळणे घेतली आणि मनोंच्या प्रतिसादास योग्य न्याय मिळावा म्हणून हा वेगळा धागा लेख काढला.
औरंगजेबाचा विश्वासू कारभारी हमीदुद्दीनखान याने लिहिलेल्या काही आठवणीतून मुस्लीम धर्म न स्विकारणार्या युद्धकैद्यांचे शीरच्छेद करण्या बद्दल तसेच काही मराठ्यांनी मन्सबीसाठी किंवा कैदेतून सुटण्यासाठी धर्मांतर केले, …..दरबारच्या बातमीपत्रावरून धर्मांतर करणारी बरीच माणसे कारकून अगर सैन्याच्या खालच्या थरातील दिसतात. ही धर्मांतरे बढतीच्या आशेने झाली असावीत. क्लचित प्रसंगी अफरातफरीची शिक्षा चुकविण्यासाठी धर्मांतर झाले…...यावरून औरंगजेबाच्या मनोवत्तीवर उत्कृष्ट प्रकाश पडतो. धर्मांतर घडवून आणण्याची तो संधी सोडीत नसे. पण तीहि एका मर्यादेत. मराठ्यांशी निकराचा लढा चाळू असताना धर्मप्रसाराचा आपला छंद फार महाग पडेल याची त्याला जाणीव असावी.
@ मनो, मध्ययुगिन इतिहासाचा आपला अभ्यास नक्कीच अधिक सखोल आहे. पण माझ्या मर्यादीत वाचनावरून मला काही गोष्टी वाटल्या त्या म्हणजे
औरंगजेब धार्मिक होताच त्या सोबत दारा शुकोहच्या विरोधात उभे टाकताना धर्मांध गोतावळा त्याने वापरून घेतला आणि एकदा धर्म वापरून घेतला की त्या वजना खाली येणे आपसूक होते तसे औरंगजेबाचेही झाले असावे
बादशहा झाल्यावर काजींच्या मदतीने धार्मिक पुस्तकांनुसार शरीयाची सक्तीने अंमलबजावणी चालू केली असावी.
औरंगजेबाची सर्वात प्रीय पत्नी शिया होती आणि ती इराणी राजकन्यांपैकी होती, दुसर्या बाजूला खलिफा मंडळी कर्मठ सुन्नी धर्मगुरुंना प्रतिनिधी म्हणून पाठवत असणार. या दोन्हींचा औरंगजेबाने सत्तेत येण्यासाठी उपयोग करून घेतला असेल.
औरंगजेबाच्या दरबारात सुरवातीस शिया धर्म मार्तंडाचे बर्यापैकी वर्चस्व असावे, पण नंतर औरंगजेबाने शिया आणि सुन्नी धर्ममार्तंडाच्या चर्चा घडवल्या आणि औरंगजेब कर्मठ सुन्नी पक्षाकडे झुकला यानंतरच त्याने आपल्या दरबारातून संगित-गायन हद्दपार केले आणि औरंगजेब अधिकच कर्मठ झाला.
तरीही औरंगजेबाला काही मर्यादा होत्या पुर्वाश्रमींप्रमाणे सरदार तसेच रेव्हेन्यू ऑडीट सिस्टीम मध्ये थोडेसे हिंदू ही होते - मधल्याफळीत हिंदूंशी काही प्रमाणात जुळवून घेण्याने मुघल सत्ता पॉप्युलर रिव्होल्टची लगेच टार्गेट होणार नव्हती , शिवाय दिलेल्या शब्दास, मीठास जागणे आणि हिशेब व्यवस्थेस लागणारी साक्षरता आणि प्रामाणिकता मधल्या फळीतील ब्राह्मण वर्ग पुरवत होता. जिथे त्याच्या घरातल्यांवर आणि स्वधर्मीयांच्या लॉयल्टी आणि सचोटीची शाश्वती नाही ती मुघलांना काफीर असलेल्या हिंदूंकडून मिळत होती. या मधल्या फळीतील हिंदू गोतावळ्यास बादशहाची मर्जी कशी राखायची याची माहिती होती. औरंगजेबाने काही ब्राह्मणांना दानेही दिलेली दिसतात पण प्रत्येक दानपत्रात मुघलवंशाची सत्ता चालू रहावी म्हणून प्रार्थना करणार अशी मखलाशी दिसते. हि मखलाशी नमेकी कशी करुन्न पदरात चारपैसे कसे पाडून घ्यायेचे यासाठी मधल्याफळितील दरबारी हिंदूनी थोडी फार प्रयत्न केले असू शकतात काही हेरगिरीसाठी माहिती देणारेही असू शकतील.
इथे औरंगजेबाची अजून एक अंधश्रद्धा लक्षात घ्यावी लागते ती म्हणजे त्याचा साधू लोकांच्या चमत्कार क्षमतेवर असलेला विस्वास. धर्मांतर करणार्यांच्या शिक्षा धर्मानुसार त्यास माफ कराव्या लागत पण चमत्कार क्ष्मता दाखवल्यास सोडून देण्याची आश्वासनेपण औरंगजेब देताना दिसतो. औरंगाबादच्या निपट निरंजनाशी त्याच्या स्पष्ट्वक्तेपणाकडे दुर्लक्षकरून जुळवून बहुधा त्याच्या चमत्कार प्रसिद्धीमुळेच घेतले असावे.
दरबारी सरदार आणि विशेषत" सैनिकांना पगार असत पण जनतेला लुटणे पैसा स्त्रीया न मिळाल्यास मुलूख बेचिराख करणे ते धर्मांतरे करवणे त्यांच्या लेव्हलवरही होत असावे. पण बादशहा मंडळी विशेषतः औरंगजेब शरिया आणि धार्मिक ग्रंथांच्या मार्गदर्शनावर अधिक अवलंबून दिसतात.
त्यांच्या पवित्रग्रंथातील काही ओळींचा कोणताही परधर्मीय दिसला तरी मारावे असा अर्थ घेऊन आजही दहशतवादी हिंसाचार करताना दिसले तरी बर्याच अभ्यासकांच्या मते युद्धात सापडलेल्या परधर्मीयांकडून जबर दंड घ्यावा किंवा धर्मांतर केल्यास सोडावे असे असावे अन्यथा मारावे. औरंगजेबाने गंभीर स्वधर्मीय शास्त्रार्थ केल्यानंतर धर्मांतर सक्ती कैदेतील लोकांपर्यंत मर्यादीत केली असण्याची बरीच शक्यता वाटते.
अर्थात युद्धबंद्यांवर सुद्धा धर्मांतराची जबरदस्ती न्याय्य ठरणारी नव्हती आणि नाही ह्याचे नीटआकलन अनेकांना होत नसण्याची आजच्या काळातही शक्यता असू शकते त्यामुळे यातील असहिष्णूतेला चटकन असहिष्णूता म्हणून लक्षात घेतले जात नसावे.
औरंगजेब असो, टिपू सुल्तान असो वा इतर अनेक शांततेच्या धर्माचे पायिक असोत त्यांनी काही ठिकाणी सक्तीने धर्मांतरे करवली पण सरसकट सर्वच जनतेचा धर्म बदलला नाही याचे रहस्य माझ्या व्यक्तिगत मतानुसार वरील प्रमाणे असावे.
त्यांच्या काही उदारपंथी विचारवंतानुसार तत्कथीत ग्रंथात परधर्मीयावर आक्रमणे केवळ करार मोडल्यावर, अन्याय कारणाने स्व-प्रदेश सोडावा लागणे तसेच दुसर्या बाजूने आक्रमणे झाल्यास करावयाची आहेत.
लेखन चालू
* अनुषंगिकाव्यतरीक्त अवांतरे तसेच मिपाकराम्ना उद्देशून व्यक्तिगत टिका आणि शुद्धलेखन चर्चा करु नयेत .
प्रतिक्रिया
18 May 2019 - 6:00 am | मनो
हा फार गहन विषय आहे. सर्वच गोष्टी तपशिलात इथे लिहिणे शक्य होणार नाही, म्हणून काही थोडे जे आता आठवते ते लिहितो.
औरंगझेब हा इतर बादशहापेक्षा कर्मठ अशी त्याची एक प्रतिमा तयार झाली आहे, पण शहाजहानच्या काळातही हिंदूंची अवस्था तशीच होती. किंबहुना संबंध मोगल राजवटीत गरीब हिंदूंना कोणीच वाली नव्हता. परकीय प्रवाश्यांच्या वर्णनात आपल्याला त्या काळाचे वर्णन सापडते. भारतातील जमीन सुपीक असूनही इथल्या शासनकर्त्यांच्या जुलूमामुळे प्रजा हैराण होत असे. गावाबाहेर रचलेले मुंडक्यांचे मिनार, झाडाला उलट टांगलेली प्रेते हे प्रकार नित्याचे होते. याउलट परकीय मुसलमानांशी वागणूक एकदम वेगळी होती. तो केवळ बाहेरून आला या कारणासाठी त्याला मनसब मिळू शकत होती. जहागिरीतून किती पैसे वसूल करायचे याला काही मर्यादा नव्हती. बादशहाची मर्जी हाच न्याय मग त्याला काही बंधन नव्हते.
18 May 2019 - 9:00 am | माहितगार
वस्तुतः शहाजहानची सख्खी आई 'जगत गोसाईनी' मूळची राजपूत राजकन्या होती, अर्थात 'जगत गोसाई' दुर्लक्षीत ठरली, अकबराच्या एका निपुत्रिक बायकोने जबरदस्तीने शहाजहानला बालपणीच ताब्यात घेऊन पालन पोषण केले. दुसरीकडे शहाजहानची पट्टराणी चा मान औरंगजेबाची सख्खी आई मुमताज महल ला होता त्यात हि मुमताज महल जहांगिराच्या पट्टराणी नूरजहांची भाच्ची होती मुमताज महल चा बाप म्हणजे नूर जंहाचा भाऊ असफ खान -शहाजहांनचा वझीर- याचा परिवार मूळचा ईराणी सरदाराचा होता औरंगजेबाच्या बालपणावर या ईराणी परिवाराचा काही प्रभाव होता का ? दारा शुकोह आणि अरंगजेबात दोन सख्ख्या भावात वयाचा फक्त ३ वर्षाचे अंतर असताना एवढा वैचारीक फरक होण्या इतके वेगळे प्रभाव का पडले असावेत हे मनो आणि इतर जाणकाराम्कडुन जाणून घेण्याची इच्छा आहे.
कट्टरतेची स्पर्धा ?
जर ते पुरेसे कट्टर वागले नाही तर धर्माचे पालन व्यवस्थित करत नाहीत हा आक्षेप ठेऊन प्रतिस्पर्धी सत्ता उलथवेल ही एक भिती असावी दुसरे; तुर्की खलिफा आणि ईराणी सत्ता यांचे अप्रत्यक्ष दबाव कार्यरत असावेत. आशिया ते युरोप मार्गावरील व्यापार यांच्या हातात होता. व्यापार्यांचे हित्संबंध जपले गेले नाही की सत्ता उलथवण्यासाठी प्रतिस्पर्ध्यांना हेरुन पडद्या आडून त्या काळातही प्रयत्न होत असावेत. आणि त्याचीही भिती दिल्लीतील सम्राटांनाही असावी. कारण अफगाणीस्तानातून होणारी काही इतिहासकालीन आक्रमणे अभ्यासली अगदी छोट्या टोळी प्रमुखाकडे अचानक मोठे सैन्य तेही चांगल्या शस्त्र सामुग्री आणि वाहन व्यवस्थेसह उपलब्ध होताना दिसते. नंतर युद्धखर्च लूटी करून भरता येतो पण सुरवातीस सैन्य उभे करण्यासाठीचा पैसा एक तर तुर्की इराणी सत्ता किंवा व्यापारी लावत असण्याची बरिच शक्यता वाटते. अर्थात पैसा लावून लॉयल्टी मिळत नाही त्या एवजी सोबत धार्मीक कारण उपयोगी पडत असावे यातून एकुणच कट्टरतेची स्पर्धा लागत असावी.
18 May 2019 - 10:20 am | मनो
शहाजहान आणि त्याची सावत्र आई नूरजहाँ यांचे वैर होते त्यामुळे जहांगीरच्या मृत्यूनंतर शहाजहानने नूरजहाँला कैद केले आणि बादशाहीचे इतर वारस म्हणजे स्वतःचे भाऊ आणि पुतणे यांचे वध केले. त्यामुळे औरंगझेबाच्या काळापर्यंत हे ठरले होते की एकच भाऊ जिवंत रहाणार आणि तोच राजा होईल. त्यामुळे ती अक्षरशः जीवन-मरणाची स्पर्धा होती.
18 May 2019 - 10:54 am | माहितगार
ओह ओके, १६३१ मध्ये नुरजहांची भाच्ची मुमताज निवर्तलेली दिसते म्हणजे १६३१ नंतरचा काळ शहजहानवर प्रभाव मर्यादीत झाला असावा पण १६४१ पर्यंत नूरजहांचा मोठाभाऊच शहाजहानच्या वजीर पदी दिसतोय म्हणजे अटकेमुळे राज्यकारभारातील प्रभाव अंशतःच कमी झाला असेल .
औरंगजेब २१ वर्षाचा होई तो त्याला शहाजंहाचा वजीर आजोबाची सोबत झाली असण्याची शक्यता असू शकेल ?
18 May 2019 - 9:30 pm | मनो
असफखान हा नूरजहाँचा भाऊ, इराणी पक्षाचा प्रमुख. आपल्या बहिणीविरुद्ध तो गेला आणि त्याने खुर्रम म्हणजे शाहजहानची बाजू घेतली. ते वातावरण कसे होते कल्पना करा - भाऊ बहिणीविरुद्ध आणि तिला कैद करतो, भाऊ आपल्याच भावांचे खून करतो, या परिस्थितीत दोन भावांमध्ये आपुलकीचे संबंध कसे जुळून येतील?
18 May 2019 - 7:56 am | चित्रगुप्त
औरंगजेबाने जिझिया कर वसूलीसाठी सधन हिंदूंना जिवंत ठेवले असावे, अशी शक्यता वाटते. जिझियाबद्दल मराठीत खालील माहिती मिळाली:
२ एप्रिल १६७९ :-
आलमगीर अर्थात औरंगजेबाने मोगल राजवटीतील मुस्लिमेतरांकडून जिझिया कर वसूल करण्यास पुनः चालू केले. आचार्य गोपालदास यांनी हा कर भरण्यास नकार दिला. त्यांना अटक करून औरंगजेबाच्या दरबारात आणले गेले. तिथेदेखील त्यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली आणि कर भरण्यास नकार दिला. औरंगजेबाने आपल्या मारेकऱ्यांना आचार्यांची हत्या करण्यास सांगितले.परंतु मारेकरी पोहोचण्यापूर्वीच गोपालदासांनी आपल्या कुबडीतील तलवार स्वतःच्या छातीत खुपसून आत्मसमर्पण केले.
जिझिया कर म्हणजे इस्लामिक राज्याने इस्लामेतर एकेश्वर धार्मिक लोकांवर लावलेला कर. इस्लामिक राज्यांत ख्रिस्ती किंवा जू लोक हा कर देऊन जिवंत राहू शकतात. मूर्तिपूजक, अनेक-ईश्वर धर्मीय लोक हा कर भरून सुद्धा जिवंत राहू शकत नाहीत. आमच्या डाव्या इतिहासकारांच्या मते औरंगझेब हा थोर राजा होता कारण त्याने हिंदूंना सुद्धा जिझिया भरून जिवंत राहण्याची सोय केली नाहीतर त्याच्या ४ पैकी ३ सल्लागारांनी हिंदूंना धर्मांतर किंवा मृत्युदंड हीच शिक्षा सुनावली होती.
इस्लामच्या सुरुवातिच्या काळात मुस्लिम राजवटीत राहणार्या बिगर-मुस्लिमांसमोर केवळ दोनच पर्याय असत. एक तर धर्मांतर करून इस्लामचा स्वीकार करणे अथवा मृत्यू. मात्र पुढील काळात अपवाद म्हणून जिझिया कर देऊन “जिम्मी” म्हणजे दुय्यम नागरिक म्हणून जगण्याची परवानगी दिली गेली.
शेख हमदानीने लिहिलेल्या “जसीरात-ए-मुल्क” प्रमाणे जगण्यासाठी खलिफ़ा उमरने मुस्लिमेतरांना इस्लामी देशात पुढील अटी घातल्या.
१) त्यांनी नवीन मंदीर अथवा प्रार्थनास्थळ बनवू नये.
२) तोडलेल्या जुन्या इमारतीचे पुर्निर्माण करू नये.
३) मुस्लिम यात्रेकरूंना मुस्लिमेतरांच्या मंदीरात रहाण्यावर बंधन राहणार नाही.
४) कोणताही मुसलमान कोणत्याही बिगर मुस्लिम व्यक्तीच्या घरी ३ दिवस राहू शकेल. त्या काळात त्याने केलेले कोणतेही कृत्य गुन्हा मानला जाणार नाही.
५) जर मुस्लिमेतरांची सभा असेल त्या सभेत मुसलमानांना भाग घेण्यास प्रतिबंध न करणे.
६) मुस्लिमेतरांनी मुस्लिमांसारखी नावे ठेऊ नयेत.
७)त्यांनी मुस्लिमांसारखा पोषाख वापरू नये.
८) लगाम, खोगीर असलेला घोडा वापरू नये.
९) धनुष्य बाण व तलवार वापरू नये.
१०) अंगठी वापरू नये.
११) त्यांनी दारू विकू नये वा पिऊ नये.
१२)त्यांनी जुना पोषाख बदलू नये.
१३) आपले रितीरिवाज व धर्म यांचा प्रचार करू नये.
१४) आपल्या मृतांची शवे त्यांनी मुस्लिम कबस्तानाजवळ आणू नयेत.
१५) आपल्या मृत व्यक्तीबद्दल शोक व्यक्त करू नये.
१६)त्यांनी मुस्लिम नोकर ठेऊ नये.
१७) त्यांनी हेरगिरी करू नये वा हेरांना मदत करू नये.
यातील एखाद्या जरी अटीचा भंग झाला तर भंग करणार्याला मृत्यूदंड व त्याची मालमत्ता एखाद्या युद्धकैद्याप्रमाणे जप्त केली जाई.
संदर्भ -पु ना ओक यांच्या पुस्तकातील जिझियाबद्दल संदर्भ
18 May 2019 - 9:01 am | माहितगार
@ मनो वरील आचार्य गोपालदास प्रसंगास ऐतिहासिक दस्तएवजातून काही दुजोरा उपलब्ध आहे किंवा कसे
18 May 2019 - 9:34 am | भंकस बाबा
पूर्वी तलवारीच्या जोरावर सक्तिची धर्मांतरण होई. आज मात्र ते शक्य नाही कारण बातम्या पसरण्यास लागणारा अत्यल्प कालावधी.
ओरंगजेबला महात्मा बनवण्याचा हेतु क़ाय असावा?
औरंगजेब हा शेवटचा मुघल बादशाह होता ज्याच्या कारकीर्दी नंतर मुघल साम्राज्याचा अस्त सुरु झाला. अतिशय तुटपुंज्या शस्त्रसामुग्रिने मराठा लश्कराने मुघल सैन्याला जेरिस आणले.
मागचा इतिहास बघितला तर अत्यल्प असलेले मुसलमान राज्य करत होते. हिंदुस्तानी जनतेने हा राज्यकारभार जुलमाने का होईना पण स्वीकारला होता. शिवाजी महाराजानी जेव्हा मुघलाविरुद्ध लढा दिला तेव्हा अफाट असलेली मुघल सत्ता अगतिक झालेली दिसली. यामधुन भारतीय जनतेला हा संदेश गेला की मुगलांचे पाय देखील मातीचे आहेत. शिवाजी महाराजानंतर देशील दुसऱ्या छत्रपतिनी मुघलाना वर्चस्व गाजवन्याची संधि दिली नाही. नंतर टिपू सुलतान वगळता कोणीही धर्मप्रसार करण्यास तलवार वापरली नाही. टीपुला पण मराठा, निजाम व इंग्रज यांच्या आघाडिने मारले. जर औरंगजेबला इस्लामी इतिहासकार खलनायक म्हणून रंगवते तर इस्लामी प्रसाराला बाधा आली असती. हेच कारण असावे की दारा शिकोव व शाहजहांचा खून करून देखील ओरंगया इस्लामी इतिहासकारानी हीरो म्हणून दाखवला असावा
18 May 2019 - 10:30 am | माहितगार
एक छोटी दुरुस्ती सुचवावी वाटते ती ही की निजामाने अगदीच टिपू प्रमाणे धर्मांतरे घडवली की नाही याची कल्पना नाही पण धर्मांतर केल्यास कैदेतून माफी असा काही प्रकार होता. माझ्या हैदेराबादेतील एका नातेवाईकांना . निजामाची मर्जी ठेवण्यासाठी धर्मांतर करावे लागले आणि शंकराचार्याच्या मदतीने ते हिंदू धर्मात वापस आले .
निजामी रजाकारांचा जुलूमही थोडा काळ होता तरी दाहक होता, निजामाकडून स्वातंत्र्य मिळताच हिशेब चुकते करण्याच्या प्रकारात दोन्ही कडून रक्तसांडले
18 May 2019 - 9:34 am | भंकस बाबा
पूर्वी तलवारीच्या जोरावर सक्तिची धर्मांतरण होई. आज मात्र ते शक्य नाही कारण बातम्या पसरण्यास लागणारा अत्यल्प कालावधी.
ओरंगजेबला महात्मा बनवण्याचा हेतु क़ाय असावा?
औरंगजेब हा शेवटचा मुघल बादशाह होता ज्याच्या कारकीर्दी नंतर मुघल साम्राज्याचा अस्त सुरु झाला. अतिशय तुटपुंज्या शस्त्रसामुग्रिने मराठा लश्कराने मुघल सैन्याला जेरिस आणले.
मागचा इतिहास बघितला तर अत्यल्प असलेले मुसलमान राज्य करत होते. हिंदुस्तानी जनतेने हा राज्यकारभार जुलमाने का होईना पण स्वीकारला होता. शिवाजी महाराजानी जेव्हा मुघलाविरुद्ध लढा दिला तेव्हा अफाट असलेली मुघल सत्ता अगतिक झालेली दिसली. यामधुन भारतीय जनतेला हा संदेश गेला की मुगलांचे पाय देखील मातीचे आहेत. शिवाजी महाराजानंतर देशील दुसऱ्या छत्रपतिनी मुघलाना वर्चस्व गाजवन्याची संधि दिली नाही. नंतर टिपू सुलतान वगळता कोणीही धर्मप्रसार करण्यास तलवार वापरली नाही. टीपुला पण मराठा, निजाम व इंग्रज यांच्या आघाडिने मारले. जर औरंगजेबला इस्लामी इतिहासकार खलनायक म्हणून रंगवते तर इस्लामी प्रसाराला बाधा आली असती. हेच कारण असावे की दारा शिकोव व शाहजहांचा खून करून देखील ओरंगया इस्लामी इतिहासकारानी हीरो म्हणून दाखवला असावा
18 May 2019 - 10:27 pm | जालिम लोशन
मुसलमानी आक्रमणाच्या कालावधी मधे साथारण ६% लोकांनी धर्म परिवर्तन केले. त्यामागे मुख्यत: मिळणारी पेशंन व स्वधर्मात नसलेली किंमत ही कारणे होती. इराण वरील ईस्लामी आक्रमणा नंतर दोन वर्षामधे पुर्ण इराण मुस्लीम झाला उरलेले भारतात व इतर देशात पळुन गेले. व त्यांचा धर्म जिवंत ठेवला. ऊदा. पारशी. भारतामथे हे शक्य झाले नाही या मागे मुख्य कारणृ लोकसंख्येचाृ आकार. हजार वर्षापुर्वीच्या आणी आत्ताच्या परिस्थ्तीत फारसा बदल नाही आहे. आरक्षणाच्या फायद्यासाठी आजही मराठा कुणबी जात प्रमाणपत्र वापरतात विशेषत: निवडणुकीमधे. त्यामुळे आर्थिक लाभ आणी सुरक्षतीता हे दोन धर्मातंराचे driving force असावेत.
18 May 2019 - 10:46 pm | जालिम लोशन
अ-ब्राम्हीक धर्मामधे हिंसेला अन्यन महत्व आहे. जुना करार मधे ज्याला तोराह पण म्हणतात त्यात एक वर्णन आहे जेव्हा इब्राहीम परमेश्वराच्या सात आज्ञा घेवुन डोंगरावरुन खाली आला तेव्हा त्याने पाहीले त्याचे लोक जुन्या धर्माचेच पालन करित आहेत तेव्हा त्याने त्यांना मारण्याची आज्ञा केली. त्या एका दिवसा मधेृ २५०० लोकृ मेले.
21 May 2019 - 9:22 am | मनो
दारा - औरंगझेबवर एक इंग्रजी लेख लिहितो आहे. प्रकाशित झाला कि इथे टाकतो.
21 May 2019 - 7:35 pm | माहितगार
मनो तुमच्या लेखाची प्रतिक्षा असेल.
सोबतच ऑड्री ट्रुश्के या आमेरीकन विदुषीच्या औरंगजेब प्रेमाची भुरळ सध्या दक्षिण आशियातील तथाकथित पुरोगामींवर पडत आहे. त्यांच्या लेखनाबद्दलचे तुमच्या सारख्या उर्दु फारसी अंशतः गम्य असणार्यांकडून मत माडले जाणे गरजेचे आहे असे वाटते.
11 Jun 2019 - 7:52 am | मनो
लेख इथे आहे
https://www.livehistoryindia.com/forgotten-treasures/2019/06/07/dara-shu...
11 Jun 2019 - 9:18 am | यशोधरा
सुरेख. कलाकृती अफलातून आहेत. भारताच्या ताब्यात नाहीत, हे जरा दुःखदायक आहे.
11 Jun 2019 - 11:01 am | मनो
आपल्याकडे याच्या दसपट चित्रांचा खजिना आहे. थोडा विस्कळीत आहे, पण इथे आता ऑनलाइन पाहता येईल
http://museumsofindia.gov.in/
हे दुसरे उदाहरण
https://www.amazon.in/dp/9383098279/ref=cm_sw_r_cp_awdb_t1_KXZ.Cb1H9VYGB
21 May 2019 - 1:20 pm | तनमयी
https://www.maayboli.com/node/48638
21 May 2019 - 1:26 pm | तनमयी
दार उल इस्लाम म्हणजे काय? ‘दार उल इस्लाम’ म्हणजे इस्लामची भूमी. ज्या प्रदेशावर इस्लामी कायदा म्हणजे शरियतचे राज्य आहे असा भूप्रदेश म्हणजे ‘दार उल इस्लाम’. ‘ईश्वर एकमेव आहे आणि तो म्हणजे अल्लाह, आणि मुहंमद पैगंबर हे त्या एकमेव ईश्वराचे शेवटचे प्रेषित आहेत’ यावर ज्यांची मनापासून श्रद्धा आहे असा ऐक्य असलेला समाज म्हणजे ‘दार उल इस्लाम.’ इस्लामच्या भूमीत मुसलमान माणसाचे सामाजिक, आर्थिक, राजकीय स्थान कोणतेही असेल तरी त्याला शरियत हा समान कायदा लागू होतो. इस्लामच्या राज्यात अशा श्रद्धावान माणसाच्या संपत्ती आणि धार्मिक संस्थांना राजाचे संरक्षण मिळते. इस्लामच्या भूमीत ‘इस्लामच्या आदर्श’ तत्वानुसार जीवन जगेल त्याला ‘स्वर्गाची’ हमी सुद्धा देण्यात आली आहे.
इस्लामी धर्मशास्त्राने जगाची वाटणी दोन गटांत केलेली आहे. पहिला गट म्हणजे ‘दार उल इस्लाम’ आणि दुसरा गट आहे ‘दार उल हरब’ (म्हणजे युद्धभूमी). कुराणात अशी आज्ञा ईश्वराने दिलेली आहे कि, ज्या प्रदेशात इस्लामच्या तत्वानुसार जीवन जगता येत नाही अशा ठिकाणी शक्य त्या सर्व मार्गांनी लढा देऊन (जिहाद करून) तो प्रदेश इस्लामच्या तत्वानुसार जीवन जगण्यासाठी अनुकूल बनवावा. असा लढा देणे कोणत्याही कारणाने शक्य नसेल तर जिथे ‘दार उल इस्लाम’ आहे तिकडे स्थलांतर (हिजरत) करू जाणे. सामर्थ्य असतानाही बिगर इस्लामी प्रदेशात राहिलात तर अल्लाह तुम्हाला जाब विचारेल. सामर्थ्य असतानाही इस्लामी तत्वानुसार जगण्यासाठी प्रतिकूल प्रदेशात राहणाऱ्या लोकांना नरकात जागा मिळेल असे सांगितले आहे.
एक हनाफी परंपरा सोडली तर शरियतचा अन्वयार्थ लावणाऱ्या सर्व परंपरा ‘दार उल इस्लाम’ च्या तीन अटी सांगतात. पहिली – राज्य इस्लामी कायद्यानुसार चालणारे असले पाहिजे, दोन - राज्य करणारा मुसलमान असला पाहिजे आणि तीन – राज्यात मुसलमान आणि झिम्मींच्या अधिकाराचे संरक्षण झाले पाहिजे. जो दरडोई कर देऊन स्वतःचे संरक्षण करून घेतो त्याला कुराणने ‘झिम्मी’चा दर्जा दिला आहे. परंतु ‘झिम्मी’चा दर्जा केवळ एकेश्वरवादी (ज्यू, ख्रिश्चन आणि पारशी) धर्मांनाच मिळू शकतो असेही इस्लामी धर्मशास्त्र सांगते. हनफी परंपरा म्हणते कि इस्लामी राज्यानुसार चालणारा प्रदेश आणि मुसलमान आणि झिम्मींच्या अधिकाराचे रक्षण करणारा प्रदेश जिंकून घेणारा श्रद्धाहीन असला तरी ती भूमी ‘दार उल इस्लाम’च राहते.
मुसलमानांना प्रेषित पैगंबर यांनी संपूर्ण जग ‘दार उल इस्लाम’ करण्याचे उद्दिष्ट घालून दिले आहे. संपूर्ण जगावर इस्लामचे राज्य स्थापन करावे याचा प्रेरणा मुसलमानांना प्रेषितांच्या हादीस मधून मिळतात. किंबहुन प्रत्येक मुसलमानाचे ‘दार उल इस्लाम’ साठी संघर्ष करणे कर्तव्य आहे.
21 May 2019 - 1:33 pm | तनमयी
शांततेचा अतिरेक ..
शांततावादी - सहिष्णू लोकांनी पंजाब मधे सत्याग्रह आंदोलन सुरु केले आहे .
ते तर त्यांचे धर्म कार्य करत आहेत . " जिहाद-बा-सैफ " हे तर श्रद्धाशील लोकांनी करावच लागत , तसेही " तबलीग " आणि " तरदीद " हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे . " दिने कामिल " अशा धर्मासाठी ते किती दिवस " सबर " करणार ? हे सगळ " कादिरे मुतलक " आहे ..
बाकी धर्मकार्य केल्याबद्दल कोणालाही कसलीही शिक्षा होता कामा नये , कारण सगळे धर्म सहिष्णू आहेत (" प्रेषिताला न्याय , समता , शांतता , बहुधर्मी राष्ट्र अभिप्रेत होते . पण तेराशे वर्षांची परंपरा असहिष्णूतेची , अन्यायाची , रक्तपाताची आहे " - मौलाना आझाद) . सध्या सुरु असलेल्या पंजाब मधील सत्याग्रही आंदोलनामधील आंदोलन कर्त्यांची नावे देखील जाहीर करू नयेत - त्यांनी केलेल्या धार्मिक कृत्यांबद्दल काहीही कुठेही आणि कोणीही लिहू - बोलू - दाखवू नये अशी मागणी करून लवकरच वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज सह्यांची मोहीम राबवणार आहेत . रात्री २ ह्या ध्यान-धारणेच्या वेळी समाधी अवस्थेत एखादा कलाकार देखील ह्या घटनेच आणि आंदोलनकर्त्यांच म्हणन प्रवक्ता म्हणून मांडू शकतो . त्यांनी केलेलं धर्मकार्य अन्यायी ठरवून शांततावादी आंदोलनकर्त्यांवर कोणतीही कारवाई करणे म्हणजे मध्ययुगीन न्याय झाला हे लक्षात घ्या .
----------*----------
हा देश काही शतकापूर्वी " दारेसलाम " ( जिंकलेला-राज्यकर्ते) होता , आपण सगळे " झिम्मी " असून देखील जगू शकतो हे त्यांचे उपकार आहेत आपल्यावर हे समजून घ्या . आता हा देश " दारूलहर्ब " (जिंकून हारलेला) आहे , आणि दारूलहर्बचे दारेसलाम मधे रुपांतर करणे हे ईश्वरी आज्ञेने प्राप्त झालेले पवित्र नैतिक कर्तव्य आहे . म्हणजे " फर्जे ऐन " आहे . " प्रथम तुम्हीच आक्रमण करा - मूर्तिपूजकांना लुटा - त्यांना संपवा " हा आदेशच प्रेषिताचा आहे . जिथे प्रेषितानेच तलवारीच्या जोरावर धर्मप्रसार केला तिथे तिथे अनुयायी काहीही वेगळे करत नाहीयेत .
----------*---------
औरंगजेबाला धर्मनिरपेक्ष ठरवणारे - आतंकवाद्यांची बाजू घेऊन लढणारे पुरोगामी म्हणून ओळखले जातात आपल्या इथे . चुका दाखवणे याला " ध्रुवीकरण " संबोधले जाते . शिक्षा दिल्याने गुन्हेगारी काही कमी होत नाही , अशा प्रकारचे युक्तिवाद केले जातात . अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली देशद्रोह्यांचे समर्थन केले जाते . कुठलेही संदर्भ कुठेही लावून देशद्रोह्यांचे वकीलपत्र घेतल्यासारखे प्रतिवाद केले जातात . हा देखील देशद्रोहच आहे . ( हे असे लिहिले-बोलले कि धर्मनिष्ठ मुसलमान किंवा सध्याचे विद्वान - विचारवंत - पुरोगामी असे लिहिणार्याला " जातीयवादी हिंदू " , बालीश , समज नसलेला वैगेरे ठरवून मोकळे होतात .. त्यांच्यासाठी नरहर कुरुंद्करांचे शब्द खाली वाचा )
( खालील भाग हा नरहर कुरुंदकरांच्या शब्दात )
मुस्लीम जातीयवादाला जर वेळीच आवर घातला नाही , तर मुसलमानांचे काय होईल , या चिंतेपेक्षा बदलण्यास अत्यंत कठीण असलेल्या स्थितिवादी हिंदू समाजातील सुधारणावाद जर कोलमडून पडला , तर दोन हजार वर्षांच्या गुलामीनंतर नुकत्याच स्वतंत्र झालेल्या बहुसंख्यांक हिंदूंचे काय होईल , हि चिंता मला जास्त आहे . शेवटी लोकशाहीला केंव्हाही काळजी सर्वांची घ्यावी लागते , हित सर्वांचेच पहावे लागते . पण चिंता बहुसंख्यकांची करावी लागते !
कडवे धर्मनिष्ठ मुसलमान (आणि आत्ताचे पुरोगामी-विद्वान-विचारवंत) तर मुस्लीम इतिहासाने बिगरमुसलमानांवर काही अन्याय केला आहे , हे मान्यच करत नाहीत . त्यांना असे वाटते कि , हे सगळे जातीयवादी हिंदूंचे पवित्र इस्लामला बदनाम करण्याचे कारस्थान आहे ! पवित्र धर्मग्रंथाचे अनुयायी धर्मग्रंथांचा अर्थ जिहाद , दिने कामिल , खातमुल नबुवत या सिद्धांतांच्या अनुरोधाने लावतात ; तोच त्यांच्या आचरणात आहे . याबद्दल दोषांचे मुख्य वाटेकरी मानवी गुलामगिरीचे प्रतिनिधी असणारे मध्ययुग हेच आहे , असे कुणी म्हटले , तर मी इतकेच म्हणेन कि , हि अंधारी गुहा सोडून तिचा धिक्कार करीत तू उजेडात येण्यास तयार आहेस का ? तसा ये . मग आपण दोघे मिळून परस्परांना निर्दोष ठरवू आणि भूतकालीन मृत गुहा दोषी ठरवू . कारण गुहेतून बाहेर आल्यानंतर शिल्लक राहिलेली गुहा अंधेरी असली , तरी निरुपद्रवी असते !
21 May 2019 - 7:39 pm | माहितगार
@ तनमयी नरहर कुरंदकरांचे या विषयावर इतर लेखनही आंतरजालावर नाही. त्यांची या विषयावरील इतर मतेही आपल्याकडे उपलब्ध असल्यास वेगळ्या लेखातून मांडावीत अशी विनंती आहे.
21 May 2019 - 1:58 pm | Rajesh188
मुस्लिम हे नेहमीच क्रूर पणे इतर धर्माशी वागले आहेत औरंगजेब पण त्यांचाच प्रतिनिधी.
अकबर आपण जसा समजतो तसा नक्कीच नसणार
पण त्या वेळी हिंदू मनानी पूर्ण खचले होते.महाराणा प्रताप,गुरु गोविंद सिंग यांनी प्रतिकार केला अन्यायाचा आणि हिंदूचा स्वाभिमान जगवण्याचा पाया रचला आणि महान मराठी योद्धा शिवाजी महाराजांनी त्या वर कळस चढवला . चारी patshahina हैराण करून सोडले .
त्या साठी त्यांनी जातिभेदाचा नायनाट केला .सर्व जातीच्या लोकांना सन्मान दिला आणि हिंदू ची ऐकी निर्माण केली .
आणि मुस्लिम राज्य सत्तेचा पूर्ण नायनाट त्यानंतर भारत मधून झालाच.ते अजुन 10, वर्ष जगले असते तर भारताचा इतिहास वेगळा असता .इंग्रज सुधा इथे राज्य करू शकले नसते.
डाव्या लोकांना मुस्लिम विषयी सुधा प्रेम नाही भारतीय लोकशाहीत मुरखांची कमी नाही त्यामुळं औरंगजेब चा उदो उदो करून मुस्लिम ,आणि इतर ह्यांची vote bank तयार करणे ह्या साठी सर्व धडपड
18 Jun 2019 - 10:30 am | विजुभाऊ
अकबराला " द ग्रेट" हे विशषण लागले कारण अकबर याचा शब्दाचा अर्थच " द ग्रेट / थोर " असा होतो.
अकबर हा तसा थोर नव्हता त्याने चित्तोडवर केलेला हल्ला / त्यातून म्हणे २४ मण जानवी वजन होईल इतक्या हिंदूंची राजपुतांची हत्या केली. व त्या जयाचे प्रतीक म्हणून फतेपूर सिक्रीला बुलंद दरवाजा बांधला .
अकबरा / जोधा हे प्रकरण सिनेमावाल्यांनी जितके ग्लोरीफाय केले त्यापैकी किती खरे हा संशोधनाचा विषय आहे.
शाहजहान ला औरंगजेबाने कैद केले याचे कारण आर्थीक होते. शहाजहान ने राज्याचा खजीना रीता केला .
मात्र औरंगजेबाने केले तसे शहाजहान किंवा अकबराने मथुरे च्या मंदीराची मशीद बनवली नाही. किंवा कैलास लेणे तोडले नाही.
औरंगजेबाच्या तुलनेत अकबर किंवा शहाजहान यांचा राजकीय वकूब कमीच असावा. भारताच्या इतिहासात औरंगजेब हा एकमेव राजा होता की त्याने अफगाण सीमेपासून ते म्यानमार पर्यंत भूभाग एका अमलाखाली आणला. मात्र तो गेल्या नंतर सारी व्यवस्था ढासळली.
याचे कारण धर्मांधता नव्हे तर उत्तराधीकारी योग्य प्रकारे जोपासले गेले नाहीत.
औरंगजेब हा त्याच्या इतर पूर्वजांप्रमाणे अय्याश नव्हता, तो राज्याच्या खजीन्यातून स्वतःच्या साठी कसलाही खर्च उचलायचा नाही.
त्याने ज्या साम दाम दम्ड पद्धतीने राज्य वाढवले त्या ला तोड नाही