सोनसंध्या
नाजूक, हळूवार गुलाब पाकळ्या
संथ, शांत, तरंगत
येतात जवळ, हलकेच्
माझी सुन्दर रेशमी त्वचा
नितळ, मऊशार, निरागस
दुधासारखी
छोटं का असतं सौदर्य?
का बोलावं लटीकं
फुकाफुकी?
सुन्दर क्षण नाहीत निसटत कधीच
गळून पडतात त्या आठवणी
आणि ध्यास भाबड्या स्वप्नांचे
मी बसूनच असते पाय सोडून
पाण्यात, माश्यांशी खेळत
ओंजळी ओंजळीने
त्याच्या बांसुरीचे स्वर का बरं खुणावतात?
आणि काय बरं सांगत असतात...
हळूवार - ओठाओठी?
मग पाणी होत जातं सोनेरी
आणि आकाश होतं वही
चित्रकलेची
पावलं परतत असतात, वाळू उडत असते
मी डुंबत असते, स्तब्ध नि:शब्द आनंदी
तंद्रीप्रदेशात
लांब कुठूनची मंद वार्याची झुळूक
सुखावते सर्व जाणिवा
मी रहाते तशीच - पहुडलेली !
छानच!