कट्टा

वरुण मोहिते's picture
वरुण मोहिते in जनातलं, मनातलं
20 Apr 2019 - 11:20 pm

नमस्कार मिपाकरांना. खूप दिवस भेट झाली नाही. तर ह्या वेळी एक कट्टा करण्याचे ठरवले आहे. पुणे आणि मुंबई साठी मध्यवर्ती कर्जत बरे पडेल असे वाटते.
माझ्या घरी. व्हेज - नॉनव्हेज पर्याय आहेतच. व्हेज जेवणासाठी फक्त मेनू सांगावा. नॉनव्हेज चे पर्याय माझ्याकडे आहेतच.
जवळपास भटकता पण येईल. मोरबे धरण, एन डी स्टुडियो
इत्यादी. अष्टविनायक चा बाप्पा पण 10 किलोमीटर वर आहे.
बाकी ड्रिंक असेल तर खर्च ज्याचा त्याचा. घरची लोकेशन पाठवीन. बाबा डेरी पासून 1 मिनिटं वर. संपर्क करा. होऊन जाऊदे कट्टा एक. कुटुंबासाहित आलात तरी उत्तम. 25 किंवा 26 मे ला करायचा आहे. सूचनांसाठी धन्यवाद. बदल केला जाईल. भेटूया मग.

हे ठिकाणप्रकटन

प्रतिक्रिया

भीडस्त's picture

20 Apr 2019 - 11:45 pm | भीडस्त

पार्थदादांचा विजय साजरा करण्याची पूर्ण तयारी झाली आहे असं दिसतंय

येण्याचा नक्की प्रयत्न करेन

भीडस्त's picture

20 Apr 2019 - 11:50 pm | भीडस्त

चूलबंद आवातनं मान्य व्हनं आवघड ह्ये
पर करगोटबंदची सुपारी घेन्यात आलेली ह्ये

भीडस्त's picture

20 Apr 2019 - 11:50 pm | भीडस्त

चूलबंद आवातनं मान्य व्हनं आवघड ह्ये
पर करगोटबंदची सुपारी घेन्यात आलेली ह्ये

अरे व्वा, छान.
भटकंती, खादाडी आणि फोटू सहित कट्टा वृत्तांत आलाच पायजेले.

कट्टा आयोजक, लीला सह सहलीला जाऊ म्हणत येणारे कौटुंबिक (अँड अदर्वाइज अल्सो) मिपाकर्स, सडाफटिंग / बॅचलर् मिपाकर्स, बाळ गोपाळ चमू आणि केवळ वृत्तांत वाचून कट्टयाची मज्जा घेऊ असे म्हणणारे माझ्या सारखे इतर मिपाकर्स या सर्वांना कट्ट्यासाठी शुभेच्छा !

हे कट्ट्याचे आवताण एका मुंबईकराकडून आले असल्याने कट्टा पूर्णत्वाला न्यायला हा फक्त एक धागा पुरेसा होईल असे वाटते आहे :)

कंजूस's picture

21 Apr 2019 - 6:27 am | कंजूस

हिट्ट होणार कट्टा.
( पुण्याकडचे कट्टा धागे आणि कट्टे पण हिट्ट होतात. )

पुण्याकडचे कट्टे हिट्ट होतात कि नाही माहित नाही (कारण कधी अटेंड केला नाहीय्ये) परंतु कट्टा धागे हिट्ट झालेले बघितले आहेत ते पण एका कट्ट्यासाठी एकाधिक धागे :)

एक धागा एक कट्टा
हा आहे पुण्याला बट्टा

पुण्याला बट्टा नै काई. तो आत्मा आहे त्रुप्त.

गोरगावलेकर's picture

21 Apr 2019 - 4:34 pm | गोरगावलेकर

'बाबा डेरी पासून 1 मिनिटं वर'
हीच का ती जागा? २-३ वेळा येथून जाणे येणे झाले आहे.
कट्ट्याला येणे बहुतेक जमणार नाही.

सुबोध खरे's picture

22 Apr 2019 - 9:32 am | सुबोध खरे

25 किंवा 26 मे
एवढ्या दिवसानंतर?

कंजूस's picture

22 Apr 2019 - 9:54 am | कंजूस

हां, हेच म्हणणार होतो.
जरा अगोदर? २७ -२८ एप्रिलला नको. एसटीचे लाल डबे इलेक्शन ड्युटीला नेतील, बंद असतील.

विजुभाऊ's picture

22 Apr 2019 - 10:19 am | विजुभाऊ

मी येईन

सुनील's picture

22 Apr 2019 - 2:21 pm | सुनील

येण्याचा प्रयत्न राहील.

mayu4u's picture

22 Apr 2019 - 5:24 pm | mayu4u

नक्की करूया... 4था शनिवार असल्यानं बहुतेकांना जमेल.

भीडस्त's picture

25 Apr 2019 - 4:32 pm | भीडस्त

शनिवार असेल आणि तुम्ही असाल तर मी आहेच .. फक्त एक बारीकशी अडचण आहे. माझ्या गावावरून कर्जतला एस टी बस नाही ;)

ज्योति अळवणी's picture

22 Apr 2019 - 10:28 pm | ज्योति अळवणी

प्रयत्न नक्की करीन. खूप इच्छा आहे प्रत्यक्ष मीपाकरांना भेटायची

प्रचेतस's picture

22 Apr 2019 - 10:38 pm | प्रचेतस

कट्ट्यास शुभेच्छा.

शक्य झाल्यास अवश्य येईन.

मंदार कात्रे's picture

24 Apr 2019 - 8:11 pm | मंदार कात्रे

येण्याचा जास्तीतजास्त प्रयत्न करेन

तारीख लवकर ठरली तर नक्की येता येईल.
कट्ट्यास शुभेच्छा.

टवाळ कार्टा's picture

29 Apr 2019 - 7:55 pm | टवाळ कार्टा

जळजळ...कट्टा मिसणार पण कट्ट्याला शुभेच्छा

मुक्त विहारि's picture

2 May 2019 - 7:45 am | मुक्त विहारि

नक्कीच येणार...

माम्लेदारचा पन्खा's picture

8 May 2019 - 3:13 pm | माम्लेदारचा पन्खा

सहकुटुंब कट्टा आहे की फक्त एकेकटे मिपाकर....कुटुंब बरोबर असल्यास ड्रिंकचा उल्लेख अस्थानी वाटला....
एक दिवस की रात्र कट्टा ?

वरुण मोहिते's picture

8 May 2019 - 3:27 pm | वरुण मोहिते

सहकुटुंब चालेल. ड्रिंक असेल नसेल तरी काही हरकत नाही. डिटेल्स टाकतो काही दिवसात

मुक्त विहारि's picture

9 May 2019 - 9:37 am | मुक्त विहारि

वाट बघत आहे...

व्हॉटस अप वर मेसेज दिलात तरी चालेल.

भाते's picture

24 May 2019 - 10:57 am | भाते

९ मे नंतर या धाग्यावर काहिच नविन माहिती आली नाही आहे. या विकांताला आधी ठरलेला कट्टा रद्द झाला किंवा पुढे ढकलला गेला आहे का?

पद्मावति's picture

25 May 2019 - 2:16 pm | पद्मावति

आज किंवा उद्या असेल ना कट्टा? कट्ट्यासाठी शुभेच्छा. सविस्तर वर्णन आणि फोटोंची प्रतीक्षा आहे.

आजचा कट्टा फायनल केलाच नव्हता. कुठे यायचे, नकाशा वगैरे.
साधारणपणे थंडी /पावसातले कट्टे जमतात.

वरुण मोहिते's picture

26 May 2019 - 2:26 pm | वरुण मोहिते

खूप थकलोय निवडणूक मुळे आणि दुसरी गोष्ट तात्या गेल्यावर मला लगेच कट्टा नाही आवडणार काही दिवसांनी पावसाळ्यात करू

भाते's picture

27 May 2019 - 10:56 am | भाते

मला या विकांताला आणखी एका ठिकाणी बाहेर जायचे होते. डोंबिवलीमध्ये रहात असल्यामुळे नवी मुंबई किंवा पुण्यापेक्षा रेल्वेने कर्जतला जाणे सोपे पडते. गेल्या दोन तीन वर्षात एकाही मिपा कट्ट्याला हजेरी लावायला न जमल्यामुळे निदान यावेळी तरी मिपा कट्टा चुकवायचा नाही असे मी आधीच ठरवले होते. ९ मे नंतर या धाग्यावर काहिच नविन माहिती आली नसल्यामुळे कदाचित हा कट्टा रद्द झाला किंवा पुढे ढकलला गेला आहे याची अगोदरच शंका आली होती. पण तरीही एकदा खात्री करुन घेतली.
पावसाळ्यात मिपा कट्टा करायला नक्की आवडेल.

गोरगावलेकर's picture

27 May 2019 - 3:02 pm | गोरगावलेकर

तीन वर्षांपूर्वी जुलैच्या पहिल्या आठवड्यात बोका ए आझम, अजया ताई, टकाश्री, मूवी यांनी वाशी, नवी मुंबई येथे कट्ट्याचे अतिशय चांगले आयोजन केले होते. (दुर्दैवाने बोकाभाऊ आज आपल्यात नाहीत.) कट्ट्याची जागा निश्चित करण्यानिमित्त माझे पती 'विपा', मी व माझी लेक कट्ट्यास हजर होतो.
त्याच जागी परत कट्टा करण्यास उत्सुक असाल आणि कट्ट्याच्या आयोजनासाठी कोणी पुढे येत असेल तर आम्हा दोघांकडून संपूर्ण सहकार्य असेल.
नवीन वाचकांसाठी 2016 ला झालेल्या कट्ट्याबद्दलच्या लिंक खाली देत आहे.
http://www.misalpav.com/node/36460
http://www.misalpav.com/node/36559

बिझी असल्याने, कट्टा नामक (हव्या-हव्याशा) व्यसना पासून दूरच रहावे लागत आहे.

vcdatrange's picture

13 Jul 2019 - 11:18 am | vcdatrange

तात्याच्या एक्झिटने रहित केलेला हा कट्टा आता होणे नाही . . . वमोपा मजा करा असाल तेथे