नुकतेच सुप्रीम कोर्टाने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली म्हणुन बंगाल सरकारला झापले ! इतर कोणत्याही केस मध्ये " असहिष्णुता" सिध्द झाली नाही म्हणणार्या कोर्टाने ह्या केस मध्ये मात्र दीदींच्या सरकारला तब्बल २० लाख रुपायाचा दंड ठोठावला !
https://thewire.in/law/supreme-court-west-bengal-film-bhobishyoter-bhoot
वरील माहीती देण्यात आचारसंहितेचा भंग होत नाही कारण आहे ही वस्तुस्थिती आहे !
( अवांतर : तब्बल सहाशे कलावंत अभिजनांनी की ज्यामध्ये सुप्रसिध्द कलाकार नसीरभाई, पालेकर भाई, अनुराग कश्यप भाई हे देखील आहेत , सुप्रीमकोर्टाच्या निर्णयाचे जोरदार स्वागत केले वर ममता दीदींना मते देऊ नये असे आशयाचे पत्र सहाशे सह्यांसकट जाहीरेरित्या प्रकाशित केले !)
_____________________________________________________
हां तर ते असो. विषय निघाला कशावरुन तर ह्या धाग्यावरुन : डोक्यात घाणेरड्या कल्पना/विचार कुठून येतात ? त्यांचा मूळ स्रोत नक्की काय आहे ? https://www.misalpav.com/node/44376.
ह्या इथे फ्रान्सिस डे गोया चे सॅटर्न डिवॉरिन्ग हिज सन चे डोक्यात येणार्या घाणेरड्या कल्पनांचे एक प्रतिक म्हणुन हे चित्र दिले . सदर प्रतिसाद अनपेक्षितरित्या संपादित झाला . (ह्या सेन्सॉरिंगचाही निशेध करावा अशी मी नसीरभाईं अन पालेकर भाईंना विनंती करणार आहे.)
हां तर ते असो .
फ्रान्सिस्को डे गोया
https://en.wikipedia.org/wiki/File:Vicente_L%C3%B3pez_Porta%C3%B1a_-_el_...
फ्रान्सिस्को डे गोया अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात स्पेन मध्ये होऊन गेलेला एक महान चित्रकार ! १७९९ मध्ये हा माणुस स्पेन मधील चित्रकारांच्यातील सर्वोच्च पदाला जाऊन पोचलेला ! माणसाने खुप वेगवेगळे पैलु पाहिले आयुष्यात , नेपोलियनिक युध्द ही पाहिलं , आयुष्याच्या उत्तरार्धात निराश आणि आजारी होत गेला तशी त्याची पेंटिंग्स ही डार्कर होत गेली !
त्याचे ला माजा देस्नुदा La Maja Desnuda हे पेंटिंग वेस्टर्न आर्ट मधील पहिले फुल्ल साईझ न्युड पोर्टेट समजले जाते ! त्याचे पुढे त्याने कपडे घातलेले व्हर्जनही प्रसिध्द केले . आपल्याकडे चित्रपटाच्या नावात न्युड असले तरी राडा होते, चित्र टाकले तर दंगलच होईल म्हणुन इथे केवळ " संस्कारी" चित्र देत आहे . कलेला कला म्हणुन पाहणार्यांनी मुळ चित्र जरुर विकिपेडीया वर जाऊन पहावे, विकिपेडीयावर सेन्सॉरिंग होत नाही कारण ते कलेला कला म्हणुन पहातात , कोणत्याही पुर्वग्रहदुषित चष्म्यातुन पहात नाहीत !
https://en.wikipedia.org/wiki/File:Maja_vestida_(Prado).jpg
नंतर युध्दाच्या काळात गोयाने हिंसा , मानवी मुल्यांचे अधःपतन , माणासातील सुप्त सैतान अगदी जवळुन पाहिले असावे आणि ते तसेच त्याच्या चित्रांमध्ये उतरत गेले असावे . आपल्याला राजा रविवर्माची गुडीगुडी चित्रे पहायची किंवा शाळेतल्या पुस्तकातही रिनेसान्स म्हणजे लिओनार्डो दा व्हिन्ची चे एक मोनालिसा बस्स संपले त्या पुढे काही नाही ह्या विचारांची सवय झाली असल्याने खालील चित्रे पचवणे शक्यच नाही सामान्य बुध्दिमत्तेच्या लोकांना ! म्हणुन फोटो ना देता केवळ लिन्क्स देत आहे . ( कदाचित ह्या दिल्या म्हणुनही धागा उडु शकतो तेव्हा सदर लेख आमच्या फेसबुक वॉल वर उपलब्ध्द राहील )
The Third of May 1808 : https://en.wikipedia.org/wiki/The_Third_of_May_1808
The Second of May 1808 : https://en.wikipedia.org/wiki/The_Second_of_May_1808
पण गोया ने आयुष्याच्या अगदी शेवटच्या काळात काढलेली ब्लॅक पेन्टिंग्स म्हणजे अक्षरशः कहर आहेत ! सगळ्या चित्रात माणसामध्ये असलेली काळी बाजु उठुन दिसते. युदधाच्याकाळात हिंसा अत्यंत जवळुन पाहिल्याने गोयाचा माणुसकीवरचा विश्वासच उडाला असावा बहुतेक, त्याच्या ह्या चित्रां मध्ये माणसातली सैतान मनोवृत्ती दाखवण्याच्या प्रयत्न आहे की काय असे वाटते !
त्यातील सगळ्यात भीषण आणि हादरवुन टाकणारे चित्र म्हणजे सॅटर्न डोवॉरिंग हिज सन ! आता ग्रीक मायथॉलॉजीतला हा प्रसंग . गोयाने ह्याचे चित्र पहिल्यांदा काढले अशातला भाग नाही . आधी पीटर रुबेन ने देखील काढले आहे
रुबेन चे चित्र : https://en.wikipedia.org/wiki/Saturn_(Rubens)
गोयाचे चित्र : https://en.wikipedia.org/wiki/Saturn_Devouring_His_Son
गोयाच्या चित्रातील उग्रपणा अक्षरशः अंगावर येणारा आहे ! मी काही चित्रकला समीक्षक नाही , मी साधासा गणित आणि फायनान्स मध्ये खेळणारा अत्यंत नीरस माणुस आहे तरीही ह्या चित्रात काहीतरी वेगळे आहे हे माझ्या सारखा अरसिकालाही लक्षात येते . युट्युब वर ह्या चित्राची समीक्षा करणारा एक अतिषय सुंदर विडिओ आहे : The Most Disturbing Painting : https://youtu.be/g15-lvmIrcg
ह्या व्यतिरिक्त इतर जी ब्लॅक पेंटिंग्ज आहेत ती देखील अफाट आहेत . हे एक अजुन भारी
Man Mocked by Two Women : https://en.wikipedia.org/wiki/Man_Mocked_by_Two_Women
हा गोया माणुस काहीतरी वेगळ्याच लेव्हला जगलाय हे प्रत्येक पेंटिंग मधुन जाणवत रहाते .
तर असा हा गोया ! एकदम अभिजात कलाकार. ह्याला चित्रकलेतील मार्क्वेयस डी सेड म्हणावा की मार्क्वेयस ला रियल लाईफ मधला गोया म्हणावा असे वाटते ! . विकीच्या म्हणण्या नुसार हा गोया अठराव्याशतकातील प्रचंड यशस्वी , अभिजात कलाकार , ओल्ड मास्टर्स अर्थात रिनेसान्स चित्रकारांच्या परंपरेतील शेवटचा आणो मॉडर्न आर्ट च्या मधील पहिला कलाकार समजला जातो ! मी काही कलासमीक्षक नाही , पण अभ्यासु आहे, आपल्याला कळत नाही त्या गोष्टींचा अभ्यास करायला , त्यातील वेगळेपण समजुन घेण्याच्या प्रयत्न करायला मला आवाडते! कदाचित कोणी कला समीक्षक , चित्रकलेचा अभ्यास करणारा मिपावर कधी आलाच (आणि त्याचे लिखाण संपादित झाले नाही ) तर आपल्याला गोयाच्या चित्रकलेचा सर्वांगाने आणि तो क्लसिक का आहे ह्याचा सर्वांगाने अभ्यास करता येईल !
तो पर्यंत इत्यलम !
_________________________________________________
कला ही कला असते . कलेला उद्देश नसतो , पर्पज नसतो. रादर कलेसाठी कला असे असते तेव्हाच काहीतरी अभिजात बनण्याच्या संभव असतो. आपल्याला आपल्या वैयक्तिक धारणा , संस्कार , आपण पाहिलेली कला , ह्याच्याबाहेरही डोकाऊन पहाता आले पाहिजे , प्रत्येक गोष्टच गुडी गुडी नसणाराय. प्रत्येक चित्र राजा रविवर्माच्या लिथोग्राफिक प्रेस मध्ये छापलेले नसणार आहे. आयुष्याला सुख आनंद हा एकच गुडी गुडी पैलु नसतो. आयुष्यात दु:ख आहे , विवंचना आहे , राग आहे लोभ आहे द्वेष आहे , हिंसा आहे , आयुष्य हे असं बहुरंगी बहुढंगी आहे. "आम्हाला चित्रकलेत फक्त गुडी गुडीच ह्यॅप्पी ह्यॅप्पीच पाहिजे , अन जरा काही दुख , राग द्वेष हिंसा नको" हे म्हणजे एककल्लीपणाचा कहर झाला ! ह्या दोन्ही पैलुंकडे आपल्याला अलिप्ततेने पाहता आले पाहिजे. गोयाचा सॅटर्न असो कि राजा रविवर्माची सरस्वती , दोन्हीकडे तितक्याच अलिप्ततेने केवळ कला म्हणुन पाहता आले पाहिजे . एकक्कल्ली पणा काही उपयोगाचा नाही आणि हा नव्हताच मुळी आपल्या मुळ संस्कृतीत . ही बाहेरुन आलेली , एक म्हणजे एकच मी म्हणतो तेच खरे ह्या विचाराच्या लोकांनी आणलेली घाण आहे . इरव्ही आपल्या महाभारतात सगळ्याच पैलुंना स्पर्ष केलाय . त्यात जितकी भगवद्गीता आहे जितकी सनत्सुजात पर्व आहे , जितके शांतिपर्व आहे तसेच पराशरांनी मत्स्यगंधे सोबत काय केले तेही आहे, किंव्वा पांडुने माद्री सोबत काय केले तेही काहे किंव्वा भीमाने कीचकाला अन बकासुराला कसे अमानुष पध्दतीने मारले तेही आहे ! आम्हाला फक्त यदा यदाहि धर्मस्य म्हणणारा मणभर सोन्याचे दागिने घालुन युध्दभुमीवर मिरवणारा ईस्कॉनी गुडी गुडी कृष्ण हवा असेल तर खरेच अवघड आहे ह्या मानसिकतेचे.
अशा एकांगी मानसिकतेला असे सतराशे साठ सुप्रीम कोर्टाचे निर्णय आले तरी बदलणे शक्य नाही !
असो.
तुका म्हणे उगी रहावे | जे जे होईल ते ते पहावे ||
_____________________________________________________________________________
प्रतिक्रिया
17 Apr 2019 - 8:27 am | कंजूस
बरय. एका चित्राची लिंक चुकलीय.
17 Apr 2019 - 3:19 pm | खिलजि
मित्रा मला तुझ्या भावना समाजतायत .. किंबहुना मी हा लेख पूर्ण वाचून काढला ,, छान व्यक्त झालायस रे .. मजा आली हे सर्व वाचून आणि त्याचे संदर्भ पाहून .. मी काही चित्रकार किंवा कालापारखी नाही पण तुला झालेले दुःख ना समजण्याएवढा मूर्ख देखील नाही ... असो . आज बुधवारची रात्र आहे तर आम्ही हरियालीमध्ये बसणार आहोत .. स्थळ हरियाली बार , पहिला मजला , वडाळा , फाईव्ह गार्डन शेजारी , मुंबई ..आणि उद्या अमृतानुभव अध्यायाचे रसग्रहण ,, बोलायचंच काम न्हाय काय ..
17 Apr 2019 - 3:24 pm | खिलजि
"" कला ही कला असते . "" हे ठीक आहे, पटते आहे मला पण
" कलेला उद्देश नसतो , पर्पज नसतो. रादर कलेसाठी कला असे असते तेव्हाच काहीतरी अभिजात बनण्याच्या संभव असतो. " हे काही समजले नाही ..
मला वाटत प्रत्येक कलेला काहीतरी उद्देश्य असतो किंबहुना तो असावा तरच ती कला अभिजात बनते .. जर उद्देशच नसेल किंवा त्या कलाकाराला काही सान्गायचे किंवा सुचवायचेच नसेल तर त्याची कलाकृती कशी बोलणार इतरांशी किंवा ती अभिजात कशी बनणार .. हे माझे मत आहे . याला तू खोडून काढूही शकतो पण यावर तू तुझे मतप्रदर्शन करावे हि अपेक्षा ...
17 Apr 2019 - 3:36 pm | गोंधळी
https://www.youtube.com/watch?v=tDUZe55N1UU
17 Apr 2019 - 5:56 pm | गामा पैलवान
मार्कस ऑरेलियस,
तुमचे लेख वाचनीय व विचारप्रवर्तक असतात, असं माझं निरीक्षण आहे. प्रस्तुत लेख अपवाद नाही. फक्त एक विधान थोडं वेगळं वाटलं :
माझ्या मते विकीचं काम माहिती देणं आहे. कलेस कला म्हणून पाहणे हे नाही. मात्र असं असलं तरी तुमचा कलेकरता कला हा मुद्दा चिंतनीय आहे.
आपण सगळे विष्ठा निर्माण करतो. पण तिला स्वतंत्र अस्तित्व नाही. ती आहारातनंच येते. म्हणजे आपण दररोज विष्ठा खात असतो. फक्त ती सूर्यप्रकाशाचं आवरण लेवून समोर ताटात येते. त्यामुळे ती खावीशी वाटते. त्याच धर्तीवर कलेसाठी जी कला असते ती शुद्ध स्वरूपात म्हणजे अर्धीकच्ची असते. मग सामान्य माणसाला कुठल्याशा रूपात शिजवून खाल्लेली आवडेल, नाहीका?
आ.न.,
-गा.पै.
17 Apr 2019 - 6:33 pm | खिलजि
गा पै ,, तुमचे हे तत्वज्ञान वाचून एका सामोश्याला असेच्या असे डिशमधून बाहेर फेकून दिले आणि मळमळ होतेय ती वेगळी ..
17 Apr 2019 - 8:29 pm | सनातनी
गा.पै. एकच नंबर
19 Apr 2019 - 1:03 am | चित्रगुप्त
बर्याच दिवसांनंतर चित्रकलेविषयी मिपावर काही वाचायला मिळाले. लेख छानच आहे. गोयावर 'गोयाज घोस्ट' नामक छान चित्रपट आहे. पूर्वी तो यूट्यूबवर बघितला होता, आता सापडला नाही.
पाश्चात्त्य चित्रकलेचा अभ्यास करताना आणि संग्रहालयातील चित्रे बघताना अक्षरशः थक्क व्हायला होते. काय त्यांची तळमळ-निष्ठा, दीर्घ अभ्यासातून कमावलेले कसब, काहीतरी भव्य-दिव्य निर्माण करण्याची आस, अचाट-अतर्क्य जीवन ... सर्वच न्यारे.
गोयाचे अवघे जीवन आणि त्याची चित्रे याचे उत्तम उदाहरण आहे.
चित्र-मूर्ती वगैरे कलाकृतींच्या बाबतीत मिपा वा अन्य संस्थळावर संपादकांनी कात्री चालवू नये, असे सांगावेसे वाटते.