परात

Primary tabs

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
14 Apr 2019 - 4:45 pm

मागच्या उन्हाळ्याची गोष्ट आहे..कडक उन्हाळा चालू ..

फेसबुकावर एक पोस्ट वाचली ..

यावर उपाय म्हणून

परात घ्यायची त्यात गार पाणी ठेवायचे..

पंखा चालू असतो खोली छान पैकी गार रहाते ...

आयडियाची कल्पना बरी वाटली ,,व परात पाणी भरून पलंगाजवळ ठेवली

मध्यरात्री लघुशंकेस उठलो ..अंधार होता

पाय नेमका परातीच्या कडेला पडला

परात कलंडली मोठा आवाज झाला अन पाणी खोलीत पसरले ...

मोठा आवाज झाला हि उठली लाईट लावला घर भर पाणी होते ....

ती चिडली झोप मोड झाल्याने

तिला सांगत होतो..

म्हणाली त्या फेसबुकावर काही तरी वाचता अन प्रयोग करता ..

रात्र लादी पुसण्यात गेली वर हिचा ओरडा खाल्ल्ला तो निराळाच

नाट्यप्रकटन

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

14 Apr 2019 - 4:51 pm | यशोधरा

=))))))))

पाषाणभेद's picture

14 Apr 2019 - 6:26 pm | पाषाणभेद

हा हा हा
करुन बघायला हवे.

खिलजि's picture

15 Apr 2019 - 2:28 pm | खिलजि

घरात परात ठेवली

तर लघुशंका करायला उठू नये

लघुशंका करायची असेल तर

घरात परात ठेऊ नये

राघव's picture

15 Apr 2019 - 7:38 pm | राघव

=)))
शंका आणि संशय हे फार सांभाळण्याचे विषय असं ऐकून होतो.. या रचनेमुळं वेगळंच परिमाण मिळालंय... =)) =)) =))

विजुभाऊ's picture

17 Apr 2019 - 5:51 pm | विजुभाऊ

रात , परात आणि घरात या तीन गोष्टी एकत्र आणू नये

विजुभाऊ's picture

17 Apr 2019 - 5:51 pm | विजुभाऊ

रात , परात आणि घरात या तीन गोष्टी एकत्र आणू नये
नाहीतर वरात नक्की निघते.