दुरून डोंगर साजरे (लघुकथा)

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
29 Mar 2019 - 7:52 pm

अनंत आणि त्याची पत्नी अनन्या लग्नाचा पंधरावा वर्धापन दिन साजरा करायला न्यूझीलंडला गेले होते. एक चर्च बघायला गेले असताना साधारण त्यांच्याच वयाचं एक जोडपं त्यांना तिथे भेटलं. सहज गप्पा सुरू झाल्या; त्यात त्या परदेशी जोडप्याने सांगितलं की हे दोघांचंही दुसरं लग्न आहे आणि अफेअर्स त्यांनी फार लक्षात ठेवली नाहीत. अनंतने कौतुकाने सांगितलं की त्यांच्या लग्नाला पंधरा वर्ष झाली आहेत आणि लग्ना अगोदर चार वर्ष त्याची पत्नीच त्याची प्रेयसी होती. हे ऐकून ते परदेशी जोडपं काहीसं गोंधळल.

"Are you serious? You mean you both are styaing together for last ninteen years?"

"No! We know each other for last ninteen years. But we started staying together after we got married."

"How many kids you have? Do they stay with you?"

"We have two kids and of course they both stay with us. Infact we stay with my parents and our kids in one home."

"Good loard! That's a remarkable lifestyle!"

"I don't think so. That's a very normal and happily accepted lifestyle in India." अनंत अभिमानाने म्हणाला.

काहीवेळ गप्पा मारून दोन्ही जोडपी आपापल्या मार्गाने गेली. ते दोघे परत आल्यानंतर एकदा अनन्यायची मैत्रीण अजिता त्यांच्याकडे गेली असताना अनन्याने तिला ही घटना सांगितली. अजिता म्हणाली; "खरंच आहे न ग! आपल्याकडे कुटुंब म्हंटल की अजूनही आजी-आजोबा, आई-वडील आणि नातवंड हेच डोळ्यासमोर येतं. पूर्वी आई-वडील, दोन भावंड आणि त्यांचं कुटुंब असं असायचं; आता मात्र दोन भाऊ वेगळे राहातात."

अनन्या म्हणाली; "हे सगळं मला माहीत नाही का? माझी हरकत वेगळीच आहे. हा म्हणाला 'happily accepted lifestyle'.... कशावरून ग मी ही कुटुंब व्यवस्था happily स्वीकारली आहे?"

अजिता थोडीशी गोंधळली. कारण अनन्याची सासू तशी बरीच active होती. दोघींचं भांडण झालेलं कधी ऐकलं नव्हतं. थोडे मान-अपमान असायचे... पण अनन्यानेच अनेकदा म्हंटल होत की एकत्र असलं की भांड्याला भांड लागणारच. ते ना मी धरून बसत ना त्या. मग तिने हे असं अचानक का म्हणावं ते अजिताला कळलंच नाही. अजिता तिच्याकडे प्रश्नर्थक नजरेने बघितलं. अनन्या म्हणाली,"अग, आमच्यात काहीच प्रश्न नाहीत आता. उलट बरीचशी सवय झाली आहे. त्या कुठे आणि कधी कसं बोलतील हे मला माहीत असतं; आणि माझे शालजोडीतले त्यांना देखील कळतात. सवय झाली आहे आम्हाला एकमेकींची. पण खरं सांगू? नवीन लग्न झालं तेव्हा अनेकदा काही गोष्टी अजिबात पटायच्या नाहीत. पण तसं बघितलं तर त्या गोष्टी इतक्या शुल्लक असायच्या की ते विषय धरून ठेवले असते तर इतर अनेक गोष्टींमध्ये अडचण आली असती म्हणुन गप्प बसायचे."

तिचं बोलणं अजूनही अजिताच्या लक्षात येत नव्हतं. ती म्हणाली; "ऐ काय ते स्पष्ट सांग. हे तुझं कोड्यात बोलणं मला कळत नाही."

त्यावर अनन्या म्हणाली, "अग, मी लग्न करायच्या अगोदरच सांगितलं होतं की मी नोकरी कायम करणार आहे. सासूबाई फारच उत्साही होत्या. त्यामुळे त्यांची कधीच हरकत नव्हती माझ्या नोकरीला. रोज नवऱ्याच्या बरोबरीने त्या माझा डबासुद्धा भरायच्या. पण मग दर रविवारी किंवा कोणत्याही सुट्टीच्या दिवशी स्वयंपाकघराची सगळी जवाबदारी माझी असायची. त्यातच एप्रिल-मे मध्ये तिखट-हळद भरणे, गोडा-गरम मसाला करून ठेवणे ही कामं सुट्टीच्या दिवशी असायची. मला खूपदा वाटायचं ग की हे सगळे पदार्थ विकत आणावेत..... सुट्टीच्या दिवशी आरामात उठावं.... नवऱ्याबरोबर बाहेर जावं..... कधीतरी जीन्स आणि टॉप किंवा शॉर्ट वन पीस घालावा..... पण हे कधीच करता आलं नाही. तुझं बरं होतं. तू कायमच वेगळी राहिलास आणि हवं तसं जगलीस."

"अग, पण तुम्ही तर तुमच्या ऑफिस मधल्या पिकनिक्सना नेहेमी जायचात की. जोडप्याने जायचात. तू माझ्याकडे येऊन जीन्स आणि टॉप घालून जयचीस. आठवत न? तुझी मुलं देखील तुझी सासू सांभाळायची त्यावेळी. विसरलीस की काय?" अजिता म्हणाली.

"हो. अगदी शंभर टक्के मान्य! म्हणून तर म्हंटल की विषय शुल्लकच होते; त्यामुळे त्यावरून वाद-भांडण करावंसं वाटलंच नाही. अग, पण एखाद्या सुट्टीच्या दिवशी मला फक्त आम्ही दोघांनी बाहेर भटकायला जावं असं फार वाटायचं ग. मात्र फक्त आम्ही दोघेच गेलो तर आईला काय वाटेल? ती कायम घरात असते आणि आपण कामाच्या निमित्ताने बाहेर.... असं म्हणून सुरवातीला याने ते टाळलं.... मग मुलं झाल्यावर मुलांबरोबर अगदी नेमाने जायचो. पण ते दोघांनी हातात हात घालून भटकणं मी नाही कधी अनुभवलं. एक अजून सांगू? मी कधीच आळसावलेली सकाळ माझ्याच घरात नाही अनुभवली." अनन्या म्हणाली.

"अग, पण मग आता कर न हवा तितका आळशीपणा. आता तर तुम्ही चोवीस तासासाठी कामाला बाई ठेवली आहे. त्याव्यतिरिक्त स्वयंपाकाला बाई........." अजिता म्हणाली. तिला थांबवत अनन्या म्हणाली,"अग, आता सगळंच मी बघते. त्यामुळे साठवणीचे पदार्थ विकत, चोवीस तास बाई असली सुखं आहेत. मुलं आता आपलं आपण सगळं करतात. गेल्याच वर्षी मला चांगली पोस्ट मिळाली आणि पगार देखील वाढला आहे. अनंत देखील चांगलं कमावतो आहे. तसं म्हंटल तर आता सगळी सुखं हात जोडून समोर उभी आहेत. पण त्या वयातली ती काहीशी वेडी स्वप्न हरवली आहेत ग.... आणि आता कितीही पैसे दिले न तरी ना ते वय परत येणार आहे; ना त्यातलं थ्रिल." काहीशी उसासत अनन्या म्हणाली. अजिताला तिचं म्हणणं पटत होतं देखील आणि नाही देखील.

गम्मत अशी होती की अजिताला अनन्याच्या आयुष्याबद्दल कायम हेवा वाटत आला होता. अजिता लग्नाच्या पहिल्या दिवसापासून वेगळी राहिली होती. लग्न करतानाची तिची तीच तर अट होती. ती मोकळ्या वातावरणात वाढलेली मुलगी होती. त्यामुळे तिला एकत्रित कुटुंब नको होतं. वेगळं घर असल्यामुळे अजिताला मनाला येईल तस वागता यायचं. कधीही उठावं... मित्र-मैत्रिणींना कधीही बोलावता यायचं. उशिराची जागरणं आणि हवा तसा आळशीपणा. पण वेगळ्या घराबरोबर सगळ्याच जवाबदऱ्या देखील आल्या होत्या. सगळी बिले वेळेत भरली गेली की नाही ते बघणं. घर कामाची बाई आली नाही की एकटीने सगळं काम उरकणं. हे तर करावं लागायचं; पण स्वप्नालीच्या जन्मानंतर तर अनेकदा खूपच तारांबळ उडून जायची. तिचा नवरा केशव खूप मदत करायचा. तरीही अजिताची ओढाताण व्हायचीच. मुख्य म्हणजे स्वप्नाली जर आजारी असली आणि महत्वाच्या कामांमुळे दोघांनाही सुट्टी घेणं शक्य नसलं की आजारी स्वप्नाली तशीच डे-केअरमध्ये सोडली जायची. त्याची टोचणी अजूनही अजिताची मनाला होती. खर तर या अडचणींमुळेच केशव आणि अजिताने एकच बाळ पुरे असा निर्णय घेतला होता.

त्यामुळे अजिताला नेहेमीच वाटत आलं होतं की अनन्या तिच्यापेक्षा कितीतरी सुखी आहे. तिची मुलं सांभाळायला सासू आहे. अनन्या कधीही कुठेही फिरायला जाऊ शकते. काहीच बंधनं नाहीत तिला.

आज मात्र अनन्याच्या घरून बाहेर पडताना अजिताला मनात हसायला येत होत. अजिताला अनन्याच्या आयुष्याचा हेवा वाटत आला होता आणि अनन्याला मात्र कायम अजिताच आयुष्य हवसं वाटलं होतं. दोघींनाही एकमेकींचे डोंगर दुरून साजरे वाटले होते.

कथाविचार

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

30 Mar 2019 - 9:51 am | विजुभाऊ

टिपीकल विचारधारेची कथा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Mar 2019 - 10:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिहित राहा. लेखन आवडलं.

-दिलीप बिरुटे
मिपावर टंकनाच्या अडचणी सुटत नसतील, तर गप्प राहणेच बरं..

सुबोध खरे's picture

30 Mar 2019 - 11:38 am | सुबोध खरे

वेगळे राहणाऱ्या स्त्रियांना एकत्र कुटुंबात राहणाऱ्या स्त्रियांबद्दल हेवा वाटत असेल असे वाटत नाही. कारण राजा राणीच्या संसारात राणीची सासू हे पात्र कुठेही संभवत नाही.
बिलं वेळेत भरणे किंवा घरच्या कामाची बाई आली नाही तर एखादे दिवशी जास्त काम करायला लागतं या फारच क्षुल्लक गोष्टी आहेत. त्यासाठी कुणीही एकत्र कुटुंबात राहणार्या जोडप्या चा हेवा करेल असे अजिबात वाटत नाही.
या उलट एकत्र कुटुंबात रहायला जाणाऱ्या मुलीची फारच कुचंबणा होते. घरात एकच टीव्ही असतो आणि त्याचा रिमोट बहुतेक( कदाचित सर्वच) वेळेस सासू घेऊन बसलेली असते. आणि बाहेरच्या खोलीत मोठ्याने टीव्ही चालू असणे हि १०० टक्के एकत्र कुटुंबात दिसणारी स्थिती आहे. मग सुनेला नोकरीवरून परत आल्यावर "फक्त अर्धा तास शांतता" हवी असेल तरी. ( कारण बहुसंख्य एकत्र कुटुंबात सकाळचा स्वयंपाक मी करते तेंव्हा संध्याकाळचा सुनेने केलाच पाहिजे हि अपेक्षा असतेच)
त्यातून "आमच्या घरी असं असतं" हे पालुपद दिवसात ५० वेळा आळवलं जातंच. त्यातून कितीही प्रगतिशील (पुरोगामी हि शिवी झाली आहे म्हणून हा शब्द)
कुटुंब असेल तर सुनेला २४ तास व्यवस्थित पूर्ण कपड्यातच राहावे लागते. मग सुटी असो व नसो.
स्नानास जाताना सुद्धा पूर्ण कपडे घालूनच न्हाणीघरात जावे लागते आणि पूर्ण कपड्यातच बाहेर यावे लागते मग कितीही उकाडा असला तरीही.

त्यातून सून नोकरी करणारी असेल तर घर माझ्यामुळेच चालतंय पासून माझ्या मुलाला काय आवडतं हे माझ्या शिवाय कोणालाच कळत नाही हे धृपद सतत ऐकावे लागते.

एकंदर एकत्र कुटुंबात स्त्रीच्या( बहुतांशी सुनेच्याच) स्वातंत्र्याचा बराच संकोच होतो आणि ते स्वातंत्र्य मिळेपर्यंत वय निघून गेलेलं असतं हि शोकांतिकाच आहे.

आजच्या काळात (तसं कशाला जुन्या काळात सुद्धा) एकत्र कुटुंब हि "तडजोडच" आहे. त्याबद्दल हेवा वाटण्यासारखं काही आहे असं वाटत नाही.

एकत्र कुटुंब पद्धती, चाळीतील जीवन, जुने दिवस या लोकप्रिय जालावर फिरणाऱ्या गोष्टींबद्दल "गहिवर काढावा" अशी कोणतीही स्थिती नाही.

ज्योति अळवणी's picture

8 Apr 2019 - 9:11 am | ज्योति अळवणी

तुमचे सगळे मुद्दे मान्य. मात्र मी जे लिहिले आहे ते माझ्या अनुभवातून.

राजा राणीचा संसार असलेली माझी मैत्रीण नोकरी देखील करत नाही. मात्र मुलं लहान असताना तिला माझा हेवा वाटायचा

तुमचं लिखाण सहसा आवडतं पण ही गोष्ट फारशी आवडली नाही.

मराठी कथालेखक's picture

30 Mar 2019 - 7:10 pm | मराठी कथालेखक

प्रत्येक गोष्टीचे काही फायदे तोटे असतातच. आणि प्रत्येक कुटुंबाप्रमाणे / व्यक्तीप्रमाणे गोष्टी बदलतात.
एकच नियम सगळीकडे लागू होत नाही.. तेव्हा प्राप्त परिस्थितीत सगळ्यात हितकारक (वा सर्वात कमी त्रासदायक) जे आहे ते अवलंबणे ईष्ट.
विभक्त राहण्यात सगळ्यात जास्त त्रासाची गोष्ट म्हणजे मुलांना सांभाळणारे कुणी नसते. माझ्या मैत्रीणीचा मुलगा दहा वर्षांचा आहे पण तरीही जर तिचे सासू -सासरे घरी नसतील तर तिची फार तारांबळ उडते. ऑफिसमधले मिटींग वगैरेचे वेळापत्रक सांभाळत घरी लवकर पळणे पुन्हा घरुन उरलेले काम करणे ई.
तिचे तिच्या सासूशी फार छान जमते आणि त्यांचा आधार वाटतो हे तिने आम्हा मित्र-मैत्रिणींना मोकळेपणाने सांगितले आहे .
दूसरी एक मैत्रीण आहे, तिला स्वयंपाक करायला फारसे आवडत नाही आणि तिचे सासू-सासरे घरी असतानाही स्वयंपाकाची बाईच दोन्ही वेळेस स्वयंपाक करते .. नुकतीच तिने तिच्या घरी आम्हा सर्व सहकार्‍यांना पार्टी दिले त्यावेळी तिचे सासू सासरे होतेच. ती छान पाश्चात्य पेहरावात होती (वर एका प्रतिसादात सुनेला पुर्ण कपड्यांत राहण्याचा उल्लेख होता म्हणून हे आवर्जुन सांगितले). तरी हे कुटूंब उत्तर भारतीय (उत्तर प्रदेश) आहे जिथले राहणीमान महाराष्ट्राच्या तुलनेत जास्त पारंपारिक आहे.

आंबट गोड's picture

8 Apr 2019 - 2:28 pm | आंबट गोड

कथा रिलेट झाल्याने अधिक आवडली!
हे बहुतांश कुटुंबांत घडतेच. त्यात नवर्‍याला आई वडिल अतिशय प्रिय असतील तर मग विचारुच नका !

फिरायला जाताना आधी त्यांना विचारायचे चलता का....सिनेमा त्यांना आवडेल असा असेल तरच जायचे सगळ्यांनी...सणवार, पै पाहुणा, नणंदांचं माहेरपण (वरुन माझी मुलगी किती निरपेक्ष आहे व तिचे आपण काहीच कसे करु शकत नाही याचे उचकणे!)....
आता नाही काही वाटत..पण खंत मनात राहून जाते..... विशेषतः समवयस्क मैत्रिणी त्यांच्या स्वतंत्र फॅमिली बद्दल सांगायच्या तेव्हा....

आंबट गोड's picture

8 Apr 2019 - 2:30 pm | आंबट गोड

सुबोध खरे यांची प्रतिक्रिया अतिशय वास्तवाला धरुन व समर्पक आहे.

मराठी कथालेखक's picture

8 Apr 2019 - 7:50 pm | मराठी कथालेखक

एकूण तीन वेगवेगळे डोंगर झालेत का ?

डोंगर २
डोंगर ३

मालिका कलाकार स्त्रिया मात्र एकत्र, सासुसासरे असलेले कुटुंब आहे म्हणून आनंद व्यक्त करतात.

कमनशिबी काहींना फार स्वातंत्र्य नसले तर अधुनमधून एकत्र कुटुंबात राहतोय हे विसरून बाथरुम सीनची गम्मत अनुभवता येईल. किंवा अशा धाग्याची गरज आहे.

फिरायला गेल्यावर कधी हॅाटेलवाला सांगायचा की ही रुम घ्या यात प्राइवसी आहे पण थोडी महाग आहे तेव्हा सांगायचो "स्वस्त चालेल, प्राइवसीला कंटाळून आलोय इथे."

थोडी कल्पनाशक्ती चालवून मार्ग काढावा लागतो.