संदर्भ -
Photo Olkha 1
नमस्कार.
मिपाकर भरपुर फिरतात, फोटोही काढतात. असा एक धागा असावा का, जिथे आपण फोटो टाकु आणि इतरान्नी ते ओळखावेत?
थोडा डोक्याचा व्यायामही होईल, आणि नवीन जागा बघायला मिळतील.
काही सोपे नियम -
एका वेळेस एकच फोटो
उत्तर मिळाल्यावर फोटो टाकनार्याने नक्की करावे बरोबर आहे कि नाही.
फोटो ओळखुन झाल्यावर पुढचा फोटो टाकावा.
फोटो असे असावेत कि जागेचा अंदाज येइल.
प्रतिक्रिया
14 Mar 2019 - 8:16 pm | खंडेराव
< img src = "
" >
14 Mar 2019 - 8:19 pm | खंडेराव
14 Mar 2019 - 10:11 pm | गोरगावलेकर
छान फोटो. अजून ही जागा पाहिलेली नाही. पण गुगलवर पटकन सापडली. लगेच सांगत नाही. इतरांना न कळता कसे सांगता येईल?
14 Mar 2019 - 10:12 pm | गोरगावलेकर
छान फोटो. अजून ही जागा पाहिलेली नाही. पण गुगलवर पटकन सापडली. लगेच सांगत नाही. इतरांना न कळता कसे सांगता येईल?
14 Mar 2019 - 10:25 pm | गोरगावलेकर
सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी प्रसिद्ध जागा.
14 Mar 2019 - 11:12 pm | प्रचेतस
हंपी, अर्थातच.
मातंग टेकडी
15 Mar 2019 - 5:56 pm | खंडेराव
बरोबर आहे, पण मातंग टेकडी नाही. माझा हा सर्वात आवडता स्पॉट, मलायवंत रघुनाथ मंदिर, थोड्या आडबाजूला आहे पण थेट वरपर्यंत गाडी जाते आणि छान व्यु दिसतो..
15 Mar 2019 - 6:19 pm | प्रचेतस
बरोबर.
कमलापुराहून विठ्ठल मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर, कांपिल्य नगरीचा रस्ता सोडून वळल्यावर उजव्या बाजूला ही टेकडी आणि त्यावरचे हे मंदिर खुणावत असते.
15 Mar 2019 - 9:05 pm | खंडेराव
तेच...यावेळेस सकाळी बरोबर इडल्या आणि नाश्ता घेऊन गेलो आणि तिथे बसून खाल्लं, मजा आली..
15 Mar 2019 - 1:10 pm | दुर्गविहारी
मस्त धागा. मायबोलीवर मागे असा धागा आला होता. हा धागा वहाता रहावा अशी अपेक्षा.
17 Mar 2019 - 12:41 pm | अभ्या..
15 Mar 2019 - 4:19 pm | प्रचेतस
सिद्धेश्वर मंदिर हाय जणू
15 Mar 2019 - 4:32 pm | अभ्या..
नाहि. जवळ आलास.
17 Mar 2019 - 1:31 pm | तुषार काळभोर
चा बंद केलेलं बटन आता चालू झालंय.
जवळपास कुठं! उस्मानाबादमधी गेलास पार!
आई राजा उदो उदो!!
17 Mar 2019 - 1:49 pm | अभ्या..
उधे उधे
येळकोट येळकोट घे
19 Mar 2019 - 5:30 pm | चौथा कोनाडा
अभ्याशेट, सदरचा फोटो गुगल / गुगल फोटो वरून शेअर ऑल केला होता काय ?
मला गुगल फोटो वरून शेअर करायला गेल्या काही दिवसांपासून अडचण येत आहे.
ही समस्या गुगल / गुगल फोटो आणि मिपा संस्थळ यांची संयुक्त समस्या आहे काय ?
19 Mar 2019 - 5:50 pm | अभ्या..
हा, गुगल वरुनच शेअर केलेला, काय प्रॉब्लेम आहे काय कळत नाही गुगल्यासोबत.
आधी असे होत नव्हते कधी.
19 Mar 2019 - 8:27 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुरक्षिततेच्या अनेक समस्यांनी ग्रासलेली गुगल+ सेवा आता बंद होणार आहे, त्यामुळे तिच्यावरचे अनेक पर्याय एक एक करत बंद होत आहेत. २ एप्रिलला गुगल+ संपूर्णपणे बंद होईल.
पूर्वी, गुगल+ मध्ये अल्बम केव्हाही शेअर/अन्शेअर करता येत होता. आता, अल्बम बनवतानाच तो शेअर्ड की अनशेअर्ड आहे हे ठरवावे लागते, तरच तो पब्लिकली शेअर्ड होतो. अनशेअर्ड अल्बममधील फोटो केवळ वैयक्तिक इमेल अॅड्रेस देऊन प्रत्येकाशी स्वतंत्र शेअर करावे लागतात.
याला उपाय असा की, "एक स्वतंत्र नवीन शेअर्ड अल्बम" बनवा, त्यात मिपावर टाकायचे फोटो "अॅड" करा आणि मिपावर टाकायच्या चित्रांचे "इमेज अॅड्रेसेस" त्या अल्बममधून घ्या.
20 Mar 2019 - 1:23 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद, डॉसाहेब, बहुमोल माहिती साठी !
आपण सांगितलेल्या पद्धतीनं मी गुग ल फोटोज वरून एक चित्र शेअर केलं, पण समस्या कायम आहे.
(प्लिज मी टाकेलेली लेटेस्ट प्रतिसाद पहा)
(स्वचिंतन : आ य ल्ला, गुगल बंद पड लं तर आम्ही गरि ब मा णसांनी जागायचं कसं ? )
20 Mar 2019 - 4:36 pm | डॉ सुहास म्हात्रे
सर्व गुगल नाही फक्त "गुगल+" हा त्याचा एक भाग बंद केला जाणार आहे. बाकी सर्व गुगल उत्तमरित्या चालू आहे आणि चालू राहणार आहे.
२०१५ मध्ये सुरु केलेल्या गुगल+ या गुगलच्या सोशल मेडिया प्लॅटफॉर्ममध्ये असलेल्या काही तृटींमुळे वापरकर्त्यांचा डेटा चोरी होण्याची शक्यता होती व तो प्रकार बंद करणे गुगलला शक्य होत नव्हते. त्यामुळे, आता गुगल+ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
गुगल+ मध्ये वैयक्तिकरित्या व गृप बनवून फोटो/मेसेजेस/इ अनेक प्रकारचे शेअरिंग पर्याय होते, ते गायब झाल्याने आता फक्त (अ) बनवण्याच्या वेळेस '(पब्लिकली) शेअर्ड' असलेला अल्बम किंवा (आ) एक एक ईमेल अॅड्रेस वापरून शेअर केलेला अल्बम, असे दोनच पर्याय शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे, आताही वर दिलेल्या पायर्या वापरून मिपावर फोटो शेअर करता येतील.
मिपावर चित्रे टाकण्याची कृती या धाग्यातील पायर्या वापरून पहा.
15 Mar 2019 - 3:42 pm | श्वेता२४
फोटो
16 Mar 2019 - 9:47 am | संजय पाटिल
गॕस शेगडीचा बंद केलेला नॉब आहे तो
17 Mar 2019 - 9:58 am | अभ्या..
क्या पाटीलसाब, हमराच औषध हमकोच पिलाते क्या?
अच्छा नई हा ये.
फोटो सचमे दिखता नई क्या?
17 Mar 2019 - 11:57 am | यशोधरा
नाही.
18 Mar 2019 - 11:39 pm | चौथा कोनाडा
टू बी प्रासाईझ, प्रेसटीजच्या बंद पडलेल्या गॕस शेगडीचा बंद केलेला नॉब आहे तो ! :))
19 Mar 2019 - 12:29 pm | संजय पाटिल
=;))
15 Mar 2019 - 3:50 pm | ज्ञानोबाचे पैजार
पैजारबुवा,
15 Mar 2019 - 4:20 pm | प्रचेतस
लोहगड-विंचूकाटा
15 Mar 2019 - 8:54 pm | गोरगावलेकर
16 Mar 2019 - 9:52 am | प्रचेतस
कर्णाई देवी मंदिर, कर्नाळा किल्ला.
16 Mar 2019 - 10:12 am | गोरगावलेकर
बरोबर. यातील कर्णाई देवी (दुर्गादेवी) व हनुमान यांच्या व्यतिरिक्त आणखी तीन मूर्ती आहेत त्यांची नावे माझ्या माहितीकरिता सांगू शकाल का?
16 Mar 2019 - 10:21 am | गोरगावलेकर
नाही.मला वाटतं यात हनुमानाचीही मूर्ती नाही. इतर सर्व मूर्ती कोणत्या ते माझ्या माहितीकरिता सांगा.
16 Mar 2019 - 10:31 am | प्रचेतस
मुख्य मूर्ती दुर्गा, बाजूच्या दोन्ही महिषासुरमर्दिनी, इतर दोन्ही मूर्ती खण्डित असल्याने नीटश्या ओळखू येत नाहीत पण शक्यतो भैरव असावेत.
16 Mar 2019 - 10:44 am | गोरगावलेकर
धन्यवाद
16 Mar 2019 - 10:34 am | प्रचेतस
16 Mar 2019 - 10:43 am | गोरगावलेकर
परत एकदा?
16 Mar 2019 - 11:02 am | प्रचेतस
अर्रर्रर्र...मागच्या धग्यात हाच टाकलेला.
नवा देतो
16 Mar 2019 - 11:10 am | प्रसाद_१९८२
फोटो विशाखापट्टणमच्या RK बिच जवळचा आहे असे वाटते.
16 Mar 2019 - 11:28 am | प्रचेतस
होय
16 Mar 2019 - 11:06 am | प्रचेतस
16 Mar 2019 - 1:58 pm | ज्ञानोबाचे पैजार
आम्ही तुमचे सगळे लेख मनापासुन आणि पुन्हा पुन्हा वाचतो,
ह्या ठिकाणाला आम्ही तुमच्याच डोळ्यांनी इथे मिपावर पाहिले आहे.
प्रतेक्ष दर्शन झाले नाही
अंजनेरीच्या मंदीराचा फोटू आहे हा
पैजारबुवा,
16 Mar 2019 - 2:32 pm | प्रचेतस
_/\_
19 Mar 2019 - 12:26 pm | खंडेराव
19 Mar 2019 - 12:59 pm | खंडेराव
19 Mar 2019 - 1:16 pm | प्रचेतस
गंडीकोटचा किल्ला?
19 Mar 2019 - 1:23 pm | खंडेराव
तुम्हाला!
मला वाटले हा तसा अवघड असेल. गंदीकोटचा किल्ला - त्यातले धान्यभांडार..
20 Mar 2019 - 8:20 am | प्रचेतस
गंडीकोटच्या किल्ल्याबद्द्ल कुठेतरी काहीसं वाचलेलं होतं. शिवाय ग्रॅण्ड कॅनियन सदृश भुरुप येथेच आहे हेही माहीत होतं.
21 Mar 2019 - 3:25 pm | खंडेराव
छान जागा आहे. राहायचे पर्याय खूप कमी, एक सरकारी हॉटेल आहे. रात्री आकाश मस्त दिसते तिथून.
19 Mar 2019 - 2:34 pm | गोरगावलेकर
हे मंदिर ओळखा. डॉ. खरेंच्या एका प्रतिसादात या मंदिराचा उल्लेख आला होता तो वाचूनच हे मंदिर पहिले होते.
20 Mar 2019 - 10:12 am | प्रचेतस
नाही ओळखता येत ब्वा.
20 Mar 2019 - 2:08 pm | अर्पित
Kharpada aapta road war ek shivmandir aahe tech he.
kharpada pasun jawal aahe.
20 Mar 2019 - 2:31 pm | गोरगावलेकर
बरोबर ओळखले. जवळचे पर्यटन स्थळ:कर्नाळा
20 Mar 2019 - 12:26 pm | गोरगावलेकर
हे काही प्रसिद्ध पर्यटन स्थळ नाही. त्यामुळे ओळखणे कठीणच आहे.
मिपावर ४-५ महिन्यांपूर्वी दुसऱ्या एका मंदिराविषयी चर्चा सुरु असताना स्वच्छतेबद्दल या मंदिराचा उल्लेख डॉ. खरेंनी केला होता. तेव्हा त्यांनीच उत्तर दिलेले बरे. नाहीतर उद्या मी सांगतेच.
20 Mar 2019 - 1:17 pm | चौथा कोनाडा
LENIMG
20 Mar 2019 - 1:31 pm | प्रचेतस
लेण्याद्री :)
21 Mar 2019 - 11:08 am | चौथा कोनाडा
प्रचेतस, पर्फेक्ट !
आप तो बॉस् हो बॉस !
20 Mar 2019 - 4:49 pm | डॉ सुहास म्हात्रे
इथे तुम्ही फोटो अल्बम किंवा फोटोच्या थंबनेलचा "इमेज अॅड्रेस" वापरला आहे.
त्याऐवजी, पूर्ण आकारात डिस्प्ले केलेल्या फोटोचा "इमेज अॅड्रेस" वापरला की तो फोटो असा दिसेल...
21 Mar 2019 - 11:11 am | चौथा कोनाडा
धन्यू डॉसाहेब !ओपुड्
पुढच्या वेळी हे करून पाहतो.
इमे़ज साईझ द्यायची नसते ?
21 Mar 2019 - 11:12 am | चौथा कोनाडा
धन्यू डॉसाहेब !
पुढच्या वेळी हे करून पाहतो.
इमे़ज साईझ द्यायची नसते ?
21 Mar 2019 - 8:25 pm | डॉ सुहास म्हात्रे
प्रथम, रूंदी किंवा उंची यापैकी कोणताही आकडा न टाकता पूर्वपरिक्षण करावे, त्यात चित्र नीट दिसत असेल तर तसेच प्रसिद्ध करावे. वरच्या चित्रासाठी तसेच केले आहे.
पूर्वपरिक्षण पाहून चित्राचा आकार बदलण्याची गरज वाटल्यास, इमेज साईझ देताना रुंदी व उंची यापैकी फक्त एकच पर्याय वापरावा... लँडस्केप चित्रांसाठी फक्त रुंदी आणि पोर्ट्रेट चित्रांसाठी फक्त उंची टाकावी... तसे केल्यास, उरलेला आकडा मूळ चित्राच्या प्रमाणाप्रमाणे निवडला जातो व म्हणून चित्र प्रमाणशीर दिसते.
20 Mar 2019 - 4:05 pm | यशोधरा
20 Mar 2019 - 4:43 pm | प्रचेतस
=))
20 Mar 2019 - 5:01 pm | यशोधरा
नेहमी फक्त दर्पण सुंदरीचेच फोटो टाकावे असे आहे की काय? =))
20 Mar 2019 - 9:41 pm | नेत्रेश
20 Mar 2019 - 10:25 pm | डॉ सुहास म्हात्रे
तुम्ही फोटोच्या थंबनेलचा "इमेज अॅड्रेस" वापरल्यामुळे तो दिसत नाही. थंबनेलवर डबल क्लिक करून संपूर्ण / मोठ्या आकारात डिस्प्ले झालेल्या चित्राचा "इमेज अॅड्रेस" वापरल्यावर तो फोटो असा दिसतो आहे...
20 Mar 2019 - 10:27 pm | डॉ सुहास म्हात्रे
Catacombs of Paris मधील Heart of Skulls.
20 Mar 2019 - 11:20 pm | नेत्रेश
आणी धन्यवाद !
21 Mar 2019 - 12:29 am | नेत्रेश
22 Mar 2019 - 2:35 am | नेत्रेश
Answer
21 Mar 2019 - 12:54 am | नेत्रेश
21 Mar 2019 - 8:23 am | प्रचेतस
उटा
21 Mar 2019 - 9:41 am | चौकटराजा
अमेरिका
21 Mar 2019 - 10:32 am | नेत्रेश
फॉरेस्ट गंप जीथे धावायचा थांबतो ती जागा आहे.
21 Mar 2019 - 10:44 am | नेत्रेश
21 Mar 2019 - 11:16 am | चौथा कोनाडा
ओशो आश्रम ?
21 Mar 2019 - 1:46 pm | अनिंद्य
1 सफदरजंग रोड, नवी दिल्ली
(श्रीमती इंदिरा गांधी यांचे स्मारक)
22 Mar 2019 - 2:19 am | नेत्रेश
अगदी बरोबर आहे
21 Mar 2019 - 5:38 pm | चौथा कोनाडा
या फोटोत अश्या काय खाणाखुणा आहेत ज्यावरून हे (कु?)प्रसिद्ध ठीकाण ओळखू येईल ?
21 Mar 2019 - 7:59 pm | खंडेराव
+1
22 Mar 2019 - 2:25 am | नेत्रेश
रस्त्यावर ज्या ठीकाणी काच लावली आहे तीथे श्रीमती ईंदिरा गांधीना गोळ्या घातल्या होत्या. एकदा हे ठीकाण पाहील्यावर कधी विसरता येईल असे वाटत नाही.
22 Mar 2019 - 10:22 pm | चौथा कोनाडा
माहितीसाठी धन्यु, नेत्रेश !
महत्वाचे प्रसंग ठिकाण.
हे वाचण्यात किंवा पाहण्यात आलेले नव्हते !
22 Mar 2019 - 10:24 pm | चौथा कोनाडा
आणि त्या दिलेल्या लॉन्ग शॉटच्या फोटोत ओल्या कॉन्क्रिटचा स्लॅब वाटत होता.
22 Mar 2019 - 8:48 am | प्रचेतस
23 Mar 2019 - 10:06 am | ज्ञानोबाचे पैजार
इकडे प्रतेक्ष कधी गेलो नाही पण हा फोटू बी आधी नक्की पाहिल्याचे आठवते आहे .
तुमच्याच कुठल्या तरी जुन्या धाग्यात असणार.
थोडा वेळ मिळाला की जुने धागे उचकतो, १०१% याचे उत्तर तिकडेच मिळेल.
पैजारबुवा,
23 Mar 2019 - 1:23 pm | चौथा कोनाडा
:-)))
23 Mar 2019 - 1:58 pm | प्रचेतस
ह्या मंदिरावर अजून लिहिलेले नाही त्यामुळे हा फोटो असण्याची शक्यता कमी आहे. :)
23 Mar 2019 - 2:32 pm | गोरगावलेकर
हे सापडले
बालेश्वर मंदिर पेडगाव अहमदनगर
https://ahmednagar.nic.in/mr/tourist-place/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E...
23 Mar 2019 - 3:11 pm | ज्ञानोबाचे पैजार
वाटते तर तेच आहे पण वल्लींच्या फोटूत नदिच्या जागी हिरवळ दिसते आहे.
मला अजुनही वाटते की मी हा फोटो आधि पाहिला आहे कुठे पाहिला ते शोधतोच...
पैजारबुवा,
23 Mar 2019 - 4:10 pm | चौथा कोनाडा
गोरगावलेकर, मला ही हेच मंदिर वाटतंय. बरीच तुलना करून पाहिली. ९९.९९ % हेच असणार.
@ज्ञा पै, ती हिरवळ म्हणजे नदीतील जलपर्णी असावी.
23 Mar 2019 - 4:14 pm | प्रचेतस
होय.
तेच आहे हे :)