नाही माझ्या आसवांना तुझ्या श्रावणाची सर
वाट चिंब ही भिजली आणि सजले अंतर
दारी निघताना होती पागोळ्यांची मध्यलय
जणू सोबतीला आले तुझ्या संतूरीचे स्वर
विसरलो गेला कसा सारा दिवस सरून
झाली दिवेलागणी अन्, मन कातर कातर
काजळले क्षितिज हे, मिटल्या पापण्यांसम
चमकत्या मोतियांची नवी लेवून झालर
प्रश्न नाही आला मनी, नाही यायचाही कधी
जाणशी तू सारे आणि मला ठाऊक उत्तर
मातीतून मातीकडे असा मृद्गंधी प्रवास
ज्यात एक एक झाला श्वास श्वास हा ईश्वर...
- कुमार जावडेकर
प्रतिक्रिया
6 Mar 2019 - 4:23 pm | राघव
विसरलो गेला कसा सारा दिवस सरून
झाली दिवेलागणी अन्, मन कातर कातर
ही द्विपदी आवडली! :-)
6 Mar 2019 - 5:55 pm | यशोधरा
वा, सुरेख. काही काही ओळी फार सुरेख जमल्या आहेत.
8 Mar 2019 - 1:24 pm | ज्ञानोबाचे पैजार
मस्त... आवडली
पैजारबुवा,
11 Mar 2019 - 10:50 am | मनिष
ह्या नासिर काज़मी यांच्या ओळी आठवल्या -
आणि ह्या ओळींसाठी प्र्णाम!
16 Mar 2019 - 1:08 pm | कुमार जावडेकर
मनीष,
धन्यवाद...
‘कंठतो दिवस मी व्यापात अपुल्या
सांज होता तुझी जाणीव होते’
असं मी त्या शेराचं भाषांतर पूर्वी केलं होतं.
- कुमार
16 Mar 2019 - 1:08 pm | कुमार जावडेकर
मनीष,
धन्यवाद...
‘कंठतो दिवस मी व्यापात अपुल्या
सांज होता तुझी जाणीव होते’
असं मी त्या शेराचं भाषांतर पूर्वी केलं होतं.
- कुमार
16 Mar 2019 - 1:09 pm | कुमार जावडेकर
मनीष,
धन्यवाद...
‘कंठतो दिवस मी व्यापात अपुल्या
सांज होता तुझी जाणीव होते’
असं मी त्या शेराचं भाषांतर पूर्वी केलं होतं.
- कुमार
16 Mar 2019 - 1:09 pm | कुमार जावडेकर
मनीष,
धन्यवाद...
‘कंठतो दिवस मी व्यापात अपुल्या
सांज होता तुझी जाणीव होते’
असं मी त्या शेराचं भाषांतर पूर्वी केलं होतं.
- कुमार
16 Mar 2019 - 1:09 pm | कुमार जावडेकर
मनीष,
धन्यवाद...
‘कंठतो दिवस मी व्यापात अपुल्या
सांज होता तुझी जाणीव होते’
असं मी त्या शेराचं भाषांतर पूर्वी केलं होतं.
- कुमार
16 Mar 2019 - 1:09 pm | कुमार जावडेकर
मनीष,
धन्यवाद...
‘कंठतो दिवस मी व्यापात अपुल्या
सांज होता तुझी जाणीव होते’
असं मी त्या शेराचं भाषांतर पूर्वी केलं होतं.
- कुमार
20 Mar 2019 - 2:28 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
सुंदर, फार दिवसांनी रेखिव रचना वाचायला मिळाली.