मिपा वर टाईप करताना येणार्‍या अडचणी

Primary tabs

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
5 Mar 2019 - 10:39 am
गाभा: 

गेले अनेक दिवस मिपावर मराठी टाईप करताना एक ठरावीक अडचण जाणवतेय
म्हणजे आपण काही टाईप केले आणि त्यातले काही जर पोस्ट करण्यापूर्वी एडीट करावेसे वाटले आणि आपण ते बॅकस्पेस वापरून डिलीट केले तर
नव्या ने टाईप केलेल्या शब्दात भुताटकी व्हावी तशी डिलीट केलेली अक्षरे दिसायला लागतात.,फायर फॉक्स वापरताना ही अडचण येते
उदा : हल्क्फ्ल्स्क्फुदा: हा लिहीण्यापूर्वी मी फायर फॉक्स हा शब्द डिलीट केलेला होता.
आता दुसरे उदाहरण या इथे सरकार व्यवस्था हा शब्द लिहून तो ब्याकस्पेस वापरुन डिलीट करतो . आणि त्या नंतर त्या जागी इतिहासाचातास हा शब्द लिहीतो इतिहइतिहास्तिइतिसरकारववस्थाइतिहासाचातास आता हे असे दिसायला लागले आहे.
सरळ अक्षर असले तर फर फरक पडत नाही मात्र काना मात्रा वेलांटी असेल (तमातो ) ( हा शब्द तर मात्र हा शब्द खोडून त्या ऐवजी तर तो असा लिहायचा प्रयत्न केला) तर तो जाणवतो.
तुम्हाला याअद्डचणी ( या अडचणी हा शब्द अदचणी असा होततेतो दुरूस्त करण्यासाठी बॅकस्पेस ने खोडली होती. )
तुम्हाला या अडचणी येतात का?
इतर काही अडचणी असतील तर या धाग्यावर लिहूयात.
संपादक मंडळ / तांत्रीक मंडळ याची दखल घेईल.
वि.सू. : या धाग्यावर सध्या येणार्‍या तांत्रीक अडचणी याबद्दलच लिहावे.

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

5 Mar 2019 - 12:30 pm | चौथा कोनाडा

मलाहीअडाचण येतच आहे. नुकतीच एका धाग्यावर त्या संबन्धी कमेंट दिली होती.
हे क्रोम वापरून टंकले आहे. क्रोम मध्ये पण अश्याच बारिक सारिक अडचणी येत आहेत.

राजाभाउ's picture

5 Mar 2019 - 12:36 pm | राजाभाउ

हो हो मलाही हि अडचण येत आहे. मी क्रोम वापरतो. हि अडचण पूर्वीही आली होती आणि नंतर ते नीट झाल होत, पण ब्राउझर मध्ये काही केलं होत का साईट वर ते आठवत नाही. आत्तासुद्धा बॅकस्पेस दाबावी लागली आणि गोंधळ सुरु झाला शेवटी गूगल इनपुट टूल मध्ये टाइप केले आणि इथं येऊन चोप्या पस्ते केले .

पैलवान's picture

5 Mar 2019 - 1:14 pm | पैलवान

मोबाईलच्या क्रोम मध्ये टाईप करताना ही अडचण नाही येत.

कॉम्पुटरच्या क्रोममध्ये बॅकस्पेस दाबल्यावर गंडतं खरं, पण आता बॅकस्पेस दिल्यावर स्पेस देऊन लेफ्ट ऍरो की दाबून परत मागे यायचं याची सवय झालीय. आता टाईप करताना हे आपोआप होतं.

चौथा कोनाडा's picture

5 Mar 2019 - 5:02 pm | चौथा कोनाडा

मोबाईलच्या क्रोम मध्ये टाईप करताना ही अडचण नाही येत.

बरोबर.

महेश हतोळकर's picture

5 Mar 2019 - 2:48 pm | महेश हतोळकर

Back space दाबल्यावर edit boxच्या बाहेर क्लिक करून पुन्हा लिहायला सुरुवात करा.

शाम भागवत's picture

6 Mar 2019 - 12:36 pm | शाम भागवत

जर माऊसला हात लावायचा नसेल तर प्रथम स्पेस द्या मग नेहमीप्रमाणे बॅकस्पेस वगैरे जे काही वापरायचे असेल ते वापरा.

थोडक्यात कधीही, कुठेही केव्हाही बॅकस्पेस देण्याअगोदर स्पेस द्यायची सवय करून घ्या असे सुचवावेसे वाटते.

मी संगणक तज्ञ नाही. ;)

चौथा कोनाडा's picture

6 Mar 2019 - 12:41 pm | चौथा कोनाडा

झालं , म्हंजे या दोषांसाठी आपण आपल्या सवयी बदलायच्या !

शाम भागवत's picture

6 Mar 2019 - 1:48 pm | शाम भागवत

:))

मराठी कथालेखक's picture

5 Mar 2019 - 3:17 pm | मराठी कथालेखक

ही अडचण जर विंडोज ७ प्रणाली असेल तरच येते आहे. मग ब्राऊजर कोणताही असेल तरी येते (फायरफॉक्स, क्रोम, IE)
विंडोज १० वर काही अडचण नाहीये.

माझ्याकडे विंडोज १० आहे. आणि आत्ता सुद्धा मला ही अडचण येते आहे.
"आहमाझ्याझ्यादे" हे आत्ता टाईपतांना झालेले आहे.

शाम भागवत's picture

8 Mar 2019 - 1:10 pm | शाम भागवत

पण प्रथम स्पेसबार व नंतरच बॅकस्पेसअसं करून पहा.

माझ्याकडे तर गेले काही महिने मिपा चा कीबोर्ड चालतच नाही म्हणून त्यावर एक धागा पण काढला, मग तिथल्या प्रतिसादानुसार क्रोम एक्सटेंशन वापरतोय.

अभ्या..'s picture

6 Mar 2019 - 12:50 pm | अभ्या..

विजुभाऊ ममाझ्या मते तुम्हाला इनस्क्रिप्ट चांगले येत असणार. इनस्क्रिप्ट कीबोर्ड वापरल्यास वरील प्रॉब्लेम येत नाही. अवघड अक्षरे आरामसे करता येतात.

शाम भागवत's picture

7 Mar 2019 - 1:29 pm | शाम भागवत

स्पीडी टाईपिंगला हा मस्तच.

(मागे मी असच म्हटल होतं कोणीतरी दुखावल होतं. त्यांचेसाठी)
हे माझे वैयक्तिक मत आहे. दुसऱ्यांचा मताचाही आदर आहे.

अभ्या..'s picture

7 Mar 2019 - 3:46 pm | अभ्या..

सपीडी साठी असे नाही म्हणू शकत भागवत आण्णा,
हात बसलेला असेल तर स्पिडी अन्यथा ह्या कीबोर्ड वर हात बसायला वर्ष लागते.
आम्हाला ते श्रीलिपी मुळे सवयीचा झालाय इनस्क्रिप्ट. अन्यथा गमभन बराच म्हणायचा.

चौथा कोनाडा's picture

7 Mar 2019 - 4:37 pm | चौथा कोनाडा

इन स्क्रिप्टला जोडाक्षरे कशी टंकायची ?

शाम भागवत's picture

7 Mar 2019 - 8:47 pm | शाम भागवत

खर आहे. मी १९९५ ला सीडॅक ने बनवलेले जीस्ट वापरायचो. त्यावेळी हात बसला होता.

शाम भागवत's picture

7 Mar 2019 - 8:52 pm | शाम भागवत

पाय मोडायला लागतो. त्यासाठी डी बटण वापरा.

चौथा कोनाडा's picture

7 Mar 2019 - 9:10 pm | चौथा कोनाडा

वा, थान्क्स शामजी ! आता करेन सराव इन्स्क्रिप्टचा !
खुप खुप धन्यवाद !

धर्मराजमुटके's picture

6 Mar 2019 - 1:08 pm | धर्मराजमुटके

मला ही अडचण येत आहे. मी विन्डोज १०, क्रोम आणी फायरफॉक्स वापरतो आहे. ही अडचण पुर्वी नव्हती येत. आता काही दिवसांपासून यायला लागली आहे.

रविकिरण फडके's picture

6 Mar 2019 - 2:08 pm | रविकिरण फडके

I too have been facing this problem - for the past several months.

The bigger problem however is; English-Marathi transliteration stopped working. That's why I am typing this response in English. This constraint deters me from giving a response because I have to use Google facility, type whatever I want to say, copy-paste it here, format the text if I need to, and then publish. All that is a big hassle.

I wrote about it and was given some suggestions by the members as well as by Neelkant but none of those helped.

I have accepted this as inevitable and have been living with it.

विजुभाऊ's picture

7 Mar 2019 - 9:26 am | विजुभाऊ

रविकिरण साहेब

पूर्वी येथे कंट्रोल की + \ हे वापरले की इंग्रजी मराठी लिपीचा बदल व्हायचा.
आता तो तसा होत नाहिय्ये.

मराठी कथालेखक's picture

7 Mar 2019 - 12:13 pm | मराठी कथालेखक

Windows 10 मध्ये अजूनही होतो :)

शाम भागवत's picture

7 Mar 2019 - 12:47 pm | शाम भागवत

हो.
पण प्रथम स्पेसबार व नंतरच बॅकस्पेसने त्याला अटकाव होतो.
मग तुम्ही दुरूस्त्या वाक्याच्या शेवटी, मधे किंवा सुरवातीला करा.
जोडाक्षरे टाईप करताना त्याच्या मध्यावरसुध्दा हा उपाय लागू होतो.
यश मिळतच.

इंग्रजी टाईप करताना प्रत्येक अक्षर म्हणजे एक बाईट किंवा आठ बिटस् असते.
युनिकोड हे चार बाईटस किंवा बत्तीस बीटस् असते.

जेव्हा आपण इंग्रजी अक्षर खोडण्यासाठी बॅकस्पेस वापरतो तेव्हा अख्खा बाईट खोडला जातो.
या उलट मराठी खोडताना आपण जरी एक अक्षर खोडत असलो व पडद्यावर जरी ते खोडले जात असताना दिसत असले तरी प्रत्येक वेळेस चारही बाईटस खोडले जातीलच असे नाही.

मराठी अक्षर टाइप करताना युनिकोड व्हॅल्यू बदलणे शक्य असते. जोडाक्षरे, काना, मात्रा, वेलांट्या देण्यामुळे असे होत असते. इग्रजी टाईप करताना मात्र ते अक्षर वन्स फाॅर आॅल असे टाईप होते.

जेव्हा आपण स्पेसबार मारतो तेव्हा अगोदरच्या मराठी अक्षराची युनिकोड व्हॅल्यू निश्चीत होते त्यामुळे नंतर बॅकस्पेस मारल्यावर अख्खे अक्षर खोडले जाते.

थोडक्यात हा आॅपरेटिंग सिस्टिमचा प्रश्न नसून युनिकोड संबंधीत आहे.

हा माझा अनुभवावर आधारित तर्क आहे. कोणत्याही तज्ञाकडून ऐकलेले नाही.

आणि मी स्वत: तज्ञ नाही.
हेवेसान. :)

जयंत कुलकर्णी's picture

7 Mar 2019 - 3:18 pm | जयंत कुलकर्णी

माझा अनुभव.
हा प्रकार माझ्याबाबतीतही होत आहे. पण मला वाटते हा प्रकार जी कुठली प्रणाली मराठी टायपिंगसाठी मिपा वापरते आहे त्यात असावा. माझ्याकडे श्रीलिपी ७ आहे. कारण मला पुस्तकासाठी ते लागते. त्यात जर मी युनिकोड हा फाँट घेतला, मिपावर इंग्रजी हे निवडले तर मला काहीही अडचण येत नाही....
मी तज्ञ नाही फक्त एक निरिक्षण व तर्क..

जयंत कुलकर्णी's picture

7 Mar 2019 - 3:20 pm | जयंत कुलकर्णी

पण पूर्वी ही अडचण अजिबात येत नव्हती हेही खरेच !

राजाभाउ's picture

8 Mar 2019 - 9:21 am | राजाभाउ

पण प्रथम स्पेसबार व नंतरच बॅकस्पेसने त्याला अटकाव होतो.

हे बरोबर चालतय!!! धन्यवाद !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Mar 2019 - 2:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फायरफॉक्सात अशी अडचण येत आहे असे वाटते. आपण पुढे शब्द टंकत जातो आणि मागे काहीच्या काही शब्द उमटत जातात.
पण हेही कधीतरी होतं असं वाटतं. खफवर येते की प्रतिसाद लिहितांना येते हे काही समजत नाही. अ‍ॅटो गडबड होते असे वाटते.
संबंधितांनी लक्ष घालावे असे वाटते. मिपा संस्थळ खासगी आहे, हे मान्य. पण सदस्यांच्या सुविधेकडेही लक्ष दिलं पाहिजे असे वाटते.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Mar 2019 - 2:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विजुअभभौभभभभव विजुभौ असं टायपलं तर पाहा.... सुरुवातीचा शब्द.
पण काही तरी घोळ आहे. आपण परत मागे शब्द टंकायला गेलो की काहीही उमटतं.

-दिलीप बिरुटे

चंबा मुतनाळ's picture

7 Mar 2019 - 6:17 am | चंबा मुतनाळ

सेम हियर ,
सफारी वापरताना पण हाच त्रास होतो

चौकटराजा's picture

7 Mar 2019 - 5:21 pm | चौकटराजा

कलियुग आहे ! पापं वाढलीत !

मराठी कथालेखक's picture

8 Mar 2019 - 3:08 pm | मराठी कथालेखक

सध्या तर मोदी सरकार आहे ना ?

शाम भागवत's picture

8 Mar 2019 - 3:15 pm | शाम भागवत

या धाग्यावरपण मोदी आले का?
हम्म्.
कठीणेय.
:)

रविकिरण फडके's picture

7 Mar 2019 - 6:10 pm | रविकिरण फडके

मी Google Chrome वापरीत होतो आणि अजूनही वापरतो.
एकूण काय, आहे ही परिस्थिती स्वीकारण्यावाचून अन्य काही पर्याय नाही असे दिसते. ठीक आहे!

फायरफॉक्स - ६५ वर ही कटकट व्हायला लागली. परत ५६ वर आणल्यावर सगळं पूर्वीसारखं चालायला लागलं - कंट्रोल+\ ने english मराठी हा बदल सुद्धा. पण ६५ वरनं ५६ ला जाणे हा नाईलाज झाला, ईलाज नव्हे !!

नोट अॅपमध्ये लिहून इकडे पेस्ट करायचं.

चौथा कोनाडा's picture

8 Mar 2019 - 12:30 pm | चौथा कोनाडा

नोट अ‍ॅप मध्ये लिहून इकडे पेस्ट करायचं.

सध्या त्यावरच भागवून घेतोय.

सगळे सुचविलेले उपाय मान्य आहेत मात्र त्यामुळे टंकाळ्यात भर पडते. राजकीय धाग्यांवर लोक्स एवढे काय टायपतात ते राहूलजी / मोदीजी जाणे.

शाम भागवत's picture

8 Mar 2019 - 1:59 pm | शाम भागवत

:)

झेन's picture

8 Mar 2019 - 6:48 pm | झेन

;-)

बॅकस्पेस नंतर स्पेसबार वापरा मग परत शब्द लिहून पहा. तसे होणार नाही !

सौन्दर्य's picture

9 Mar 2019 - 7:05 am | सौन्दर्य

माझ्याकडे विंडोज १० आहे तसेच गुगल ट्रान्सलिटीरेट देखील डाऊनलोड केले आहे. मिपावर मराठीत लिहायचा पर्याय निवडला आहे. मला लिहिताना किंवा दुरुस्ती करताना कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही.

मिपा किंवा ( वाटसप/फेसबुक/इतर साइट्स) कुठेही टेक्स्ट बॅाक्स उघडून टाइप करत बसण्यापेक्षा इतर ओफलाइन नोट वापरणे हेच उत्तम. हे (बस/ रेल्वे) प्रवासातही उपयोगी पडते. मोठे स्टेशन आले, रेंज आली की ढकलायचे पटकन.

चौथा कोनाडा's picture

10 Mar 2019 - 8:20 pm | चौथा कोनाडा
उपयोजक's picture

10 Mar 2019 - 6:37 pm | उपयोजक

तांत्रिक सुधारणा कधी होणार? मिपा हा उपक्रम मोफत आहे.फार अपेक्षा ठेवता येणार नाहीत हे मान्य.पण हे बरीच वर्षे सुरु आहे.या तांत्रिक दुर्बलतेमुळे वाचक वाढले पण लेखक कमी झालेत.फेसबुकवर वाढलेत.

रविकिरण फडके's picture

10 Mar 2019 - 8:34 pm | रविकिरण फडके

पण हा उपक्रम मोफत का असावा? ह्याच्या सभासदत्वासाठी ५०० रुपये वार्षिक (रक्कम मालक/ संपादक मंडळ ठरवील ती) अशी फी का ठेवू नये?

चौथा कोनाडा's picture

10 Mar 2019 - 8:40 pm | चौथा कोनाडा
चौथा कोनाडा's picture

10 Mar 2019 - 8:41 pm | चौथा कोनाडा

आयडिया चांगली आहे.

याच सभासद फी मध्ये मिपा तर्फे वर्षाला १२ मिपाकट्टे फ्री कॉम्प्लिमेंटरी दिल्यास जबरा।प्रतिसाद लाभेल.

मराठी कथालेखक's picture

10 Mar 2019 - 11:25 pm | मराठी कथालेखक

किंवा मिपाला जाहिराती मिळू शकतील का ?
जाहिरातींच्या उत्पन्नचा मिपाने विचार केला नाही का अजून ?

उपयोजक's picture

10 Mar 2019 - 6:45 pm | उपयोजक

लिहून मिपावर पेस्टवतो.या पूर्वी लिंक दिली होती.पुन्हा एकदा सर्वांसाठी

https://play.google.com/store/apps/details?id=org.mightyfrog.android.sim...

कुमार१'s picture

4 Aug 2019 - 7:16 pm | कुमार१

तो प्रकार वापरून विंडोज १० असलेल्या लॅपटॉप वर ऑफ लाईन टंकन करता येईल का ?

पूर्वी विंडोज ७ मध्ये गूगल इनपुट टूल्स वापरून ऑफ लाईन टंकन करता येत होते , आता नाही येत . गूगल डॉक्स वापरून ऑनलाईनच करावे लागते .

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Aug 2019 - 10:42 am | डॉ सुहास म्हात्रे

तो प्रकार वापरून विंडोज १० असलेल्या लॅपटॉप वर ऑफ लाईन टंकन करता येईल का ?

गुगल डॉक्स सुरु करा -->
मेन मेन्यु (डविकडील वरच्या कोपर्‍यात असलेल्या तीन समांतर रेषा) उघडा -->
सेटिंग्ज उघडा -->
(वरून तिसरा असलेला) ऑफलाईन पर्याय स्विकारा
...झाले काम !

कुमार१'s picture

5 Aug 2019 - 12:26 pm | कुमार१

ते इतके सोपे नाही. मी थकलोय प्रयत्न करून.

ते सेटिंगमध्ये जाऊन ऑफलाईन पर्याय निवडून पाहिला. आता टंकन करताना मराठी शब्द दिसतो पण ‘एन्टर’ दाबले की शब्दच गायब होतो.

तज्ञांनी मार्गदर्शन करावे ही वि.

प्रकाश घाटपांडे's picture

13 Mar 2019 - 11:27 am | प्रकाश घाटपांडे

मी बराह वापरुन जर फेसबुक च्या टेक्स्ट विंडो मधे लिहिले तरी असेच होते. मग नोट पॆड मधे लिहून कट पेस्ट करावे लागते माझ्याकडे विंडोज 7 आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Aug 2019 - 11:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टंकायच्या अडचणी चक्क सुटल्या. आता कसं भरंभरं लिहिता येतंय.

नीलकांत आणि प्रशांतसेठ आभारी आहे.

-दिलीप बिरुटे

आज पुन्हा हा लिपिकार किबोर्ड वापरुन पाहातो.
____________________
आता गुगल इंडिक वापरतो। थोडं जमतंय. बघू किती लवकर लिहिता येतं. हे 'liha >> लिहा वापरून.
______________________________
आता 'लिहा' वापरून . हे मला सहज जमतं. फक्त यामध्ये
ॲपल लिहिता येत नाही ते मी वॉईस टंकनने लिहिले.

चौथा कोनाडा's picture

4 Aug 2019 - 11:18 pm | चौथा कोनाडा

अरे वा, खरंच प्रॉब्लेम सुटला की !
सर्व संबंधित कष्टकर्‍यांचे मनापासून अभार !

चौथा कोनाडा's picture

4 Aug 2019 - 11:19 pm | चौथा कोनाडा

अरे वा, खरंच प्रॉब्लेम सुटला की !
सर्व संबंधित कष्टकर्‍यांचे मनापासून अभार !

विजुभाऊ's picture

8 Aug 2019 - 10:52 pm | विजुभाऊ

मायक्रोसोफ्ट एज वापरले तर काही वेळाने खूप स्लो स्पीड होतो. टाईप केल्या नंतर जरा वेळाने अक्षरे उमटायला लागतात.
हेच जर फायरफॉक्स वापरले तर होत नाही.
कोणाला आलाय का हा अनुभव?
रच्याकने : टाईप करून डिलीट केले आणि पुन्हा टाईप केले तर आता पूर्वी यायचा तो प्रॉब्लेम येत नाहिय्ये.
धन्यवाद. नीलकांतआणि तंत्रमंडळास धन्यवाद.