नकळत सारे घडले २

शाम भागवत's picture
शाम भागवत in जनातलं, मनातलं
5 Mar 2019 - 10:01 am

हे एक विडंबन आहे हे कायम लक्षात असू द्या!!!!

पहिला: सर, वैमानिकांच्या संख्येबद्दल काय जाहीर करायचे? आपण तीन तर जाहीर करून बसलोय.
दुसरा: होना.
तिसरा: विमाने पण तिनांची दोन करायला लागली.
पहिला: आपण आकडा फुगवून सांगतो व नंतर कमी करतो अस कोणाला वाटायला नको.
दुसरा: पण आपण मुद्दामहून तसं थोडंच केलंय?
पहिला: तेही खरंच म्हणा.
फुरफुर: जे झाले ते झालं. त्या बद्दल ताबडतोब चर्चा बंद करा. आता काय जाहीर करायचे त्याबाबत सांगा.
तिसरा: आपण एक सापडलाय तर एकच जाहीर करू. हातात जसजसे येतील तसतसे आकडे वाढवत जाऊ.
फुरफुर: (स्वगत) खरंच की. असच करायला पाहिजे. मी जरा जास्तच उतावीळपणा केला.
आपल्या बोलण्यात थोडंतरी "खरं" मिसळायला पाहिजे.

छे. त्याचाही उपयोग नाही. कालच थोडं खरं बोललो तर थेट अंगाशीच आलं.
भारतीय विमानांना अटकाव करायला आपली विमान का उडली नाहीत अस विचारलं तर खूप अंधार होता अस खरखर उत्तर दिल. काय उपयोग झाला?
परराष्ट्र मंत्र्यांनी तर नंतर मला झापडायला सुरवात केली.

मी पण त्याचं बारसं जेवलोय.
त्याला तोंडांवर विचारलं की, "मग मी काय सांगायला हवे होते?
ट्रंकसाहेब सद्या आमच्यावर नाराज आहेत. नवीन एफ१६ किंवा त्याचे सुट्टे भाग मिळणे अवघड झालंय. कोणतेही नवीन तयार विमान घेण्याची आमची ऐपत राहिली नाहीये. त्यामुळे आम्ही एफ१६ फारच जपून वापरत आहोत. अस सांगायला पाहिजे होते का?"
मग गप्प बसला.

फुरफुर: (विचारमग्न होत)
लांड्यालबाड्या करून एकवेळ विमानाचे सुट्टे भाग आणता येतील. नाही असे नाही. एवढे अणू तंत्रज्ञान आणले. त्यापुढे विमानाचे सुट्टे भाग ते काय?
पण त्यासाठी रोख रक्कम लागते. आहेत का आपल्याकडे पैसे आणायला?
त्या वेळेस लै डॉलर होते हो आपल्याकडे. अमेरिकाच देत होती की.
पण आत्ताचे काय? परराष्ट्र मंत्री म्हणे. जरा स्वराष्ट्रात पैसे किती शिल्लक आहेत ते पहा.

काय तर म्हणे आमची विमाने उडाली होती पण भारतीय विमानांचे फॉर्मेशन बघून परत आली.
म्हणजे आपण घाबरलो हेच सांगितले ना? त्यावरून आपण आपली विमान वाचवायचा प्रयत्न करतोय हे त्यांच्या लक्षात नाही का येणार?
गेली २० वर्षे निधड्या छातीचे म्हणून मिरवतोय. त्यामुळे आपला कच्चा दुवा फारच जाणवणार नाही का?

भारतावर हल्ला करायला २४ विमाने पाठवली. मोठा हल्ला करायला का?
डोंबल.
त्यातील २१ विमाने आपण आपल्याच हद्दीत ठेवली होती.
त्यातील ३ आपल्या काश्मीरमध्ये पाठवली.
त्यातील एकच पुढे भारतीय हद्द ओलांडायला पाठवलं.

का?
हे फॉरमेशन बघून भारतीयांना नक्कीच कळेल की हा सापळा आहे.
भारतीय विमाने आपल्या विमानाच्या पाठलागावर जरूर येतील पण चुकूनही हद्द ओलांडणार नाहीत.
पुढे आले की मरण निश्चित हे त्यांना फॉरमेशनवरून कळणारच आहे की हो.
व हे त्यांना कळावे व त्यांनी पुढे येऊ नये हेच तर आपल्याला साधायचाय.

एवढं मोठ्ठ फॉर्मेशेन पाहून भारतीय आपल्यावर विमान हल्ला करणार नाहीत. आपोआपच आपली विमाने सुरक्षित राहतील. हा आपला खरा हेतू साध्य होईल त्याचवेळेस तो लपवताईही येईल व एक रचलेला सापळा या स्वरूपात दाखवताही येईल.
पण परराष्ट्र मंत्र्याच्या कालच्या विधानामुळे, आपण आपली विमान वाचवायला बघतोय हे त्यांना जाणवले तर?

मी दिलेले उत्तरच बरोबर होते. अंधार होता हेच उत्तर बरोबर होते. फारतर या उत्तराने लोक माझी टिंगल करतील. करू दे ना. तुझी तर टिंगल करत नव्हते ना?
पण त्या टिंगलीच्या नादात आपला विमाने वाचवण्याचा हेतू लक्षात येत नव्हता. फारतर आपण सावध नव्हतो एवढेच त्यांच्या लक्षात आले असते.
एवढं साध कळत नाही आणि स्वत:ला परराष्ट्र मंत्री म्हणवतोय.

भारतातला एखादं शेंबडं पोर देखील सगळा अन्वयार्थ शोधून काढेल. लॉजिकली विचार करण्यात त्यांचा हात नाही कोणी धरू शकणार. भारत जगात सॉफ्टवेअर मध्ये बाप झालाय ते उगीचच की काय?

पहिला: सर, आपल्याला किती वैमानिक पकडले ते जाहीर करायचंय ना?
फुरफुर: (खडबडून जाग होत ट्विटरवर): आम्ही भारताची दोन विमाने पाडली आहेत व एका वैमानिकाला ताब्यात घेतले आहे. उरलेले दोन लवकरच ताब्यात येतील.

(थोड्याच वेळाने फोन खणखणतो)
दुसरा (आलेला फोन खाली ठेवत): सर, मार वाचविण्यासाठी तो वैमानिक, मी पाकिस्तानी आहे अस लोकांना सांगत होता.
(हशा)
दुसरा: सर, आपल्या ट्विटमुळे तो खोट बोलतोय हे लोकांच्या लागलीच लक्षात आले.
मग काय? आणखीनच बडवला.
(हशा)

तिसरा: सर, वाईट बातमी आहे.
फुरफुर: ऑ
तिसरा: त्या दोन विमानांची लोकेशन कळली आहेत. एक मिग२१ आहे. आणि....
फुरफुर: आणि काय?
तिसरा: दुसरं आपलंच आहे
फुरफुर: काय?
फुरफुर: (दिर्घश्वास घेऊन): ते दुसरं नक्कीच चिनी असेल. चिनी बनावट. चांगला माल व खराब माल एकत्र करून विकतात साले. मग परवडत स्वस्तात विकायला.

तिसरा (जरासं तोंडातल्या तोंडात बोलल्यासारखे): नाही. एफ१६ होत. आणि...
फुरफुर: आणि काय? यापेक्षा आणखी वाईट बातमी असूच शकत नाही.
तिसरा: .......
फुरफुर: अरे बोल ना, अजून वाईट बातमी आहे?
तिसरा: अं अं हो.
तिसरा: (थोडं थांबून व दीर्घ श्वास घेऊन) जुन्या मिग२१ ने आपलं अद्ययावत एफ१६ पाडलंय.
(सन्नाटा)

फुरफुर: (थोड्या वेळाने भानावर आल्यासारखे करत थोडेसे हताश आवाजात) आपल्याच परराष्ट्र मंत्र्यांनी आपला कच्चा दुवा उघडा केलाय.

आपली एफ१६ नष्ट करायला पाहिजेत हे भारताला कळलंय. आपल्या हद्दीत आगंतुकांचा समाचार घेण्यासाठी २१ विमानांचा ताफा आहे हे माहीत असूनही निव्वळ एफ१६ पाडायचेच या हेतूने मिग२१ सारखे विमान झेपावत असेल व यशस्वीही होत असेल तर कठीण आहे. मिराज, सुखोई यांचा तर आपला सामनाही झालेला नाहीये.

खरंच राफेल करार काही वर्षे अगोदर झाला असता तर आपले काय झाले असते याची कल्पनाच करवत नाहीये. जगातल्या देशांची संख्या तिनाने नक्कीच वाढलेली असती. केवळ आपले दैव बलवत्तर म्हणून पैसे नाहीत या नावाखाली, तेव्हा भारताने ती खरेदी पुढे ढकलली. खरचं त्यावेळच्या आपल्या भारतातील मित्रांनी आपल्याला मदत केलीय म्हणूनच निव्वळ अजून आपण तग धरून आहोत. काय वाट्टेल ते केले पाहिजे पण मूडीला हरवलेच पाहिजे.

फुरफुर:(एकदम ओरडल्यासारखे करत): अरे एफ१६ मध्ये दोन वैमानिक असतात अस आपण भासवत आलोय. आपली विमाने भारतापेक्षा खूप प्रगत असल्याचं आपल्या लोकांना पटविण्याच्या नादात आपण अस खोट बोलत आलोय. तुम्हाला हे सगळं माहितीय.
एफ१६ चे दोन व मिग२१ चा एक असे तीन वैमानिक आहेत अस गणित करताहेत ती लोकं.
अरे तो वैमानिक खरं बोलतोय.
आपलीच लोकं आपल्याच वैमानिकाला मारताहेत.
सगळ्या पाकिस्तानातच आपणच आपल्याला मारत सुटलोय.
इथंही तेच घडतंय.
तो मूडी सैतान आहे.
त्याच्याकडे काळी जादू आहे.
आपल्या लोकांची डोकी फिरवायची कोणतीतरी काळी जादू वापरतोय तो.

(थोडं थांबून) अरे बघताय काय? आपले रेंजर्स ताबडतोब पाठवा. आणि त्या वैमानिकाला ताब्यात घ्या.
आपलाच आहे तो. त्याला लोकांपासून दूर ठेवा.
उरलेले दोघेही पकडा. त्या दोघांना लोकांपासून दूर ठेवा.
आपला हुकमी एक्का ठरणारा भारतीय वैमानिक आपल्याला जिवंत पाहिजे.

फुरफुर (स्वगत): पण ते तिसरे पॅराशूट कोणाचे असावे?

दुसरा: होय सर,
(कोणालाच काही न सुचल्याने पुन्हा एकदा सन्नाटा)

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

शाम भागवत's picture

5 Mar 2019 - 10:09 am | शाम भागवत

एफ१६ चे दोन व मिग२१ चा एक असे तीन वैमानिक आहेत अस गणित करताहेत ती लोकं.
हे वाक्य अस पाहिजे होत
एफ१६ चे दोन व मिग२१ चा एक असे तीन वैमानिक आहेत अस गणित आता आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे.

शाम भागवत's picture

5 Mar 2019 - 10:36 am | शाम भागवत

त्यावेळच्या आपल्या भारतातील मित्रांनी आपल्याला मदत केलीय म्हणूनच निव्वळ अजून आपण तग धरून आहोत. ते वाक्य खरे असेल किंवा खोटे असेल. पण त्या वाक्याला राजकारणाचा वास येतोय. हे वाक्य कृपया वगळावे अशी संपादकांना विनंती आहे.

उपेक्षित's picture

5 Mar 2019 - 8:07 pm | उपेक्षित

वाचून तेच सांगणार होतो, ते वाक्य खड्यासारखे लागले मध्ये.

आनन्दा's picture

5 Mar 2019 - 10:18 am | आनन्दा

मस्त

Prajakta Yogiraj Nikure's picture

5 Mar 2019 - 4:06 pm | Prajakta Yogira...

मस्तच आहे.