सब्रका फल - स्पर्धे बाहेरची शशक

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जनातलं, मनातलं
8 Feb 2019 - 1:03 pm

तो यवन त्याच्यावर पचकन थुंकला,

याच्या डोळ्यात अंगार फुलला,

“हरामी नजर नीचे” असे म्हणत त्या यवनाने त्याच्या खाडकन थोबाडीत मारली.

यवनाच्या नरडीचा घोट घ्यायला शिवशिवणारे हात मोठ्या मुश्किलीने आवरत तो म्हणला.

“गलाती झाली हुजूर, पुढच्या वेळी तलवार चालवा माझ्या गर्दनीवर, एकडाव माफी द्या गरीबाला”

त्याला उद्दामपणे बाजूला ढकलत तो यवन पुढच्या भोया कडे वळाला.

हिच संधी साधून तो त्याच्या साथीदारासह तो जडशीळ पेटारा कसाबसा उचलत लगबगीने तिथून सटकला.

ठरलेल्या जागी पोचेपर्यंत तो घामाने अक्षरश: निथळत होता. त्याचे हृदया छाती फोडून बाहेर येवू पहात होते.

आजूबाजूला सावधपाणे पहात त्यांनी पेटारा खाली ठेवला

आणि तो म्हणाला “सगळे सुरक्षीत आहे महाराज... बाहेर या”

पैजारबुवा,

इतिहासप्रतिसाद

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

8 Feb 2019 - 1:09 pm | यशोधरा

स्पर्धेबाहेरची शशक हा प्रकार काय आणि का आहे?

आनन्दा's picture

8 Feb 2019 - 1:40 pm | आनन्दा

छान आहे

खिलजि's picture

8 Feb 2019 - 1:43 pm | खिलजि

मस्तय पैंबू काका . लै आवडेश

श्वेता२४'s picture

8 Feb 2019 - 2:50 pm | श्वेता२४

खूप आवडली

mayu4u's picture

8 Feb 2019 - 3:12 pm | mayu4u

स्पर्धेबाहेरची का?

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Feb 2019 - 3:26 pm | ज्ञानोबाचे पैजार

स्पर्धेत एक कथा आलरेडी पाडली आहे. नियमा प्रमाणे दुसरी टाकता येत नाही.
मग साठलेली मळमळ अशी बाहेर काढली
पैजारबुवा,

तुषार काळभोर's picture

8 Feb 2019 - 8:33 pm | तुषार काळभोर

मळमळ??

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Feb 2019 - 8:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

चांगली शशक आहे.

कथा स्पर्धेतली असो कि स्पर्धे बाहेरची, वाचनानंद मिळणे महत्वाचे.
आवडली!

सिरुसेरि's picture

9 Feb 2019 - 1:47 pm | सिरुसेरि

+१

बबन ताम्बे's picture

9 Feb 2019 - 6:32 pm | बबन ताम्बे

आवडली

पुष्कर's picture

11 Feb 2019 - 12:42 pm | पुष्कर

+१ :)

ज्योति अळवणी's picture

12 Feb 2019 - 5:05 pm | ज्योति अळवणी

खूप आवडली. स्पर्धे बाहेर असूनही मतदान करणार

ज्योति अळवणी's picture

12 Feb 2019 - 5:06 pm | ज्योति अळवणी

खूप आवडली. स्पर्धे बाहेर असूनही मतदान करणार

स्वधर्म's picture

13 Feb 2019 - 1:47 pm | स्वधर्म

अावडली.