मिसळपाववरच्या श्री गणेश लेखमालेतील लेखाच्या निमित्ताने पहिल्यांना व्यनिमध्ये भेटलास आणि कळलं, आपण एकमेकांपासून एक किलोमीटरहूनही कमी अंतरावर राहतोय. मग काय, आपण दुस-याच दिवशी शिवाजी पार्काजवळच्या गोल्डनमध्ये ऐन गणपती मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर गप्पा ठोकायला भेटलो. तेव्हाच कळलं की माझे आजोबा तुझ्या आईचे शिक्षक आणि तुझी आई नि माझी आत्या वर्गमैत्रीणी, आपलं मैत्रही तिथेच पक्क जुळलं.
मिसळपाव डाॅट काॅमच्या माध्यमातून जुळलेलं मैत्र पुढे गाढंच होत गेलं. रात्रं रात्रं चालणा-या चर्चा, वाद, गप्पा, तुझ्याकडच्या माहितीच्या खजिन्यामुळे कधीच कंटाळवाण्या झाल्या नाहीत. या माहितीचा आणि तुझ्या निरनिराळ्या कार्यक्षेत्रातल्या अनुभवांचा वापर करून तू निर्मिलेल्या स्केअरक्रो, मोसादविषयक लेखमालांचं अख्खं मिपा फॅन असलं तरी मी तुझं मिपाबाह्य-लिखाणही वाखाणलं गेलेलं पाहिलंय.
गेल्या शनिवारी नूलकरकाकांबरोबर तुला भेटलो तेव्हा तुला तुझ्या राहिलेल्या मोसाद आणि इतर लेखमालिकांच्या पूर्तीसाठी आठवण केली तेव्हा प्रकृती अस्वास्थ्यातही तुझ्या चेह-यावर उमटलेलं हलकंसं स्मित फार छान दिसलेलं, वाटलं, काहीतरी शिजतंय डोक्यात.
त्यावेळी दोन वर्षांपूर्वी हनुवटीवर उमटलेली गाठ तुला आमच्यातून इतक्या तडकाफडकी हिरावून नेईल असं अजिबात वाटलं नव्हतं...
प्रतिक्रिया
30 Nov 2018 - 10:14 pm | urenamashi
बोका ए आझम यांना भावपूर्ण श्रद्धांजली
30 Nov 2018 - 10:38 pm | मारवा
बोकोबा गेला या गोष्टीवर विश्वासच बसत नाहीये. माझी त्याची व्यनितुन गप्पा झालेली आहे. मला नेहमी मारवाशेट म्हणुन बोलायचा.
अरे काय दिवस आला हा
फार फार चांगला उमदा स्वभावाचा माणुस होता.
इतने जल्दी नही जाना था दोस्त
1 Dec 2018 - 9:54 am | Jayant Naik
आमची भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांचे मोसाद वरचे आणि बाकी सर्व लिखाण कायम मनात राहील
1 Dec 2018 - 4:09 pm | मदनबाण
अश्या फार कमी व्यक्ती असतात ज्या दुसर्याला समजवुन घेउ शकतात आणि प्रचंड हुशार असुनही त्यांच्या वागण्यात कमालीचा साधेपणा असतो.
बोका अगदी असाच होता...
एक चांगला मित्र मी आणि आमच्या ग्रुप ने गमावला आहे.त्याचं अश्या पद्धतीने जाणं आणि इतक्या कमी वयात जाणं हेच मुळी फार त्रासदायक आहे.
मदनबाण.....
1 Dec 2018 - 4:40 pm | प्रमोद पानसे
बोलक्या स्वभावांच्या माणसांच अचानक जाणं अस्वस्थ करतं.
पत्कींशी व्हॉट्सअपवर दोन तीन वेळा बोलणं झालं होतं. खुप हुशार आणी मनमिळाऊ स्वभावाच्या मिपाकराच्या जाण्याने मिपावर एक पोकळी निर्माण झालीये.
2 Dec 2018 - 10:50 am | तिमा
आदरपूर्ण श्रद्धांजली!
11 Dec 2018 - 8:39 am | शित्रेउमेश
आदरपूर्ण श्रद्धांजली!
12 Feb 2019 - 1:03 am | भास्कर केन्डे
खूप वाईट वाटलं! भावपूर्ण श्रद्धांजली!
12 Feb 2019 - 2:52 am | शशिकांत ओक
आदरपूर्ण श्रद्धांजली!
12 Feb 2019 - 9:20 am | ज्ञानव
झाले. आपल्या हातातले चांगले क्षण असोत कि व्यक्ती त्या हिरावून घेण्यात देवाला असुरी आंनद मिळतो हे पदोपदी जाणवत राहते. फिल्म ह्या विषयावर बरचसं बोलणं झाल आणि प्रचंड समजून घ्यायचे राहून गेले. तुम्ही बरे व्हा मग एक कट्टा करू हाच संवादाचा शेवट असे पण योग नव्हता.
भावपूर्ण श्रद्धांजली.
24 Feb 2019 - 1:39 am | एस
बऱ्याच दिवसांनी मिपावर आलो आणि ही बातमी वाचून धक्का बसला...! बोका ए आझम यांच्याशी वैयक्तिक परिचय नसला तरी मिपावर अनेकदा त्यांच्याशी चर्चा व्हायची. त्यांच्या 'अंधारक्षण' ह्या अनुवादमालेचे उर्वरित भाग पूर्ण करा म्हणून त्यांना नेहमी सांगत असे. अतिशय विद्वान, पण साधा मनुष्य. फार वाईट वाटलं... मिपाने एक फार चांगला लेखक गमावला आहे.
विनम्र श्रध्दांजली!
30 Nov 2022 - 7:57 am | चौथा कोनाडा
अष्टपैलू मिपाकर लेखक बोका ए आझम जाऊन चक्क चार वर्षे झाली. फेबू वरील मंदार कात्रे यांच्या पोस्ट ने ही आठवण करून दिली.
बोका ए आझम यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
30 Nov 2022 - 9:54 am | श्वेता व्यास
आदरांजली!
30 Nov 2022 - 5:36 pm | मार्गी
ओहहह. . . .
चार वर्षं. . . . . निशब्द