मन आज उदास उदास झाल आहे
भावनांही काहीशा रेंगाळत आहेत.
हृदयाला ठोकेही नकोसे झाले आहेत
शब्दही ओठामगे हळूच दडले आहेत
डोळ्यांच्या कडांना मात्र ओलावा हवा आहे
चालही काहीशी संथ झाली आहे
एकांतवासाकडे वळण घेत आहे
प्रकाशही नकोसा वाटत आहे
भर दिवसा रातकीडा किरकिरत आहे.
कुणास ठाऊक आज असे का झाले आहे ?
सुखाचा सगळीकडे पसाराच पसारा आहे
पण मन पसार्यात दु:खाचा शोध घेत आहे.
प्रतिक्रिया
16 Mar 2009 - 9:46 pm | क्रान्ति
सुखाचा सगळीकडे पसाराच पसारा आहे
पण मन पसार्यात दु:खाचा शोध घेत आहे.
कल्पना आवडली आणि कविताही!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}