MLM (मोहाचा विळखा ३/३ )

असहकार's picture
असहकार in जनातलं, मनातलं
27 Jan 2019 - 12:58 pm

मल्टीलेवल मार्केटींग स्कॅम

इन्स्टन्ट गोरेपन, इन्स्टन्ट शक्ती, इन्स्टन्ट कॉफी इत्यादीच्या इन्स्टन्ट जमान्यात कोणालाही आपले स्वप्न पूर्ण व्हावे तर ते झटपट, आताच्या आता, इन्स्टन्ट झाले तर आवडेलच. त्यात त्याला फारसे काही करायची गरज नसेल, केवळ जुजबी मिटींग्स अटेन्ड करणे, थोड्याफार लोकांना भेटणे आणि बाकी दिवस, महिने आरामात आपल्या कुटूंबासमवेत घालवणे अशी चमचमीत संधी असेल तर? कुणाला नाही आवडणार. नक्कीच आवडेल. आणि मग अशा इन्स्टन्ट सक्सेसच्या मागे लागणारा तो इन्स्टन्स्ट पैसे घालवून बसणार व मित्रनातेवाइकांशी संबंधही इन्स्टन्ट बिघडवून बसणार हेही आलेच.

हे कसे होते? पाहूया, मल्टीलेवल मार्केटींग स्किमच्या नावाखाली चाललेला एक स्कॅम. ह्या स्किमचे ढोबळमानाने रूप असे असते की तुम्हाला कोणीतरी भेटतो. जो सांगतो मी गृहोपयोगी वस्तू विकणार्याम अमूक एका आंतरराष्ट्रीय कंपनीत आता जॉइन झालो आहे. मला महिन्याला अमूक इतके पैसे चेकने येत आहेत, पण मी काम काहीच करत नाहीये, फक्त मित्र नातेवाईकांना ह्या कंपनीत माझ्या खाली जॉइन केले आहे. आणि त्यांनी आपल्या खाली प्रत्येकी दोन दोन असे मेंबर जॉइन केले आहेत. आता ही साखळी अशीच चालू राहून मला खूप पैसे मिळत आहेत. तुम्हीही यात जॉइन व्हा व आपली स्वप्ने पूर्ण करा. व्वा! किती मस्त आहे ना? काहीच काम नाही, पैसे मिळत राहणार. ही कंपनी बाजारात जाहिराती करुन, डिस्ट्रीबुटर ते रिटेलरपर्यंत दिले जाणारे कमीशन बाद करुन या साखळीतल्या मेंबर लोकांना वाटून देते. जितके जास्त मेंबर तुमच्या खाली तयार होतील तितका जास्त फायदा तुम्हाला मिळणार.

पॉन्झी स्किममध्ये आपण बघितले की कमी श्रमात, कमी वेळात खूप अव्वाच्या सव्वा रिटर्न्स ची भुरळ पडते. एमएलम स्किममध्ये कमी श्रमात, चांगला मानसन्मान पैसा व आरामदायक जीवनशैलीचे स्वप्न खुणावते. ह्यात आपण अनोळखी लोकांचे बॉस झालेले असतो व ते अनोळखी लोक आपल्या अनोळखी बॉसला उगाच च्या उगाच पैसे कमवून देण्यासाठी काम करत असतात. अशा स्किमचे पहिले ग्राहक किंवा गुंतवणूकदार फायद्यात राहतात. नंतरची सगळी स्किम ही स्कॅममध्ये बदलत जाते. सुरुवातीला आपल्या थोडे पैसे भरुन मेंबरशीप घ्यायला सांगितले जाते व नंतर आपण आपले गुंतलेले पैसे काढण्यासाठी इतरांचा बळी देत राहतो. कारण एक दिवस हे चक्र बंद पडतंच. काहीच दिवसात आपल्या लक्षात येतं की आपला गोतावळा फार मोठा नाहीये. खालचे मेंबर्स आता अपेक्षेइतके वाढत नाहीयेत.

असे अजिबात नाही की जगात यशस्वी एमएलएम कंपन्या नाहीत. आहेत नक्कीच आहेत. प्रामाणिक कंपन्या आणि फ्रॉड कंपन्यांत फरक करण्यासाठी आपण खालचे काही मुद्दे बघू या.

१. सगळे लक्ष हे वस्तू विकण्यापेक्षा मेंबर जॉइन करण्याकडे जास्त असते.
सुरुवातीलाच धोक्याची सूचना देणारी बाब म्हणजे कंपनीचा फोकस हा त्यांच्या वस्तू विकण्यापेक्षा तुमच्या खाली चेन वाढवण्यावर जास्त असतो. जर तुम्हाला तुमच्या खाली आणखी मेंबर वाढवण्यासाठी घेतलं जात असेल तर सावध व्हा. कारण प्रामाणिक कंपनी आपल्या वस्तूच्या विक्रीवर जास्त लक्ष केंद्रीत करत असते. व त्यासाठी तिला आपला ग्राहकबेस वाढवायचा असतो. मेंबरबेस वाढवण्यात उत्सुक कंपनी प्रामाणिक नव्हे.

2. ढिसाळ प्रशिक्षण
बोगस कंपन्या ह्या उत्तम दर्जाच्या प्रशिक्षणात लक्ष देत नाहीत. जर तुमचे ट्रेनिंग हे कंपनीच्या प्रॉडक्टबद्दल कमी व नवीन मेंबर जोडण्याबद्दल जास्त होत असेल तर धोक्याचा इशारा ओळखा. तुम्हाला कोणत्या दर्जाचे प्रशिक्षण आणि मदत मिळते आहे? तुमच्या प्रश्नांची उत्तरे दिली जातात का? जर तुमच्या कठीण प्रश्नांमुळे त्यांना अस्वस्थ वाटत असेल तर तो खात्रीने एक घोटाळा आहे असेच समजावे. तसेच तुम्हाला खरोखर व्यवसायासाठी लागणार्यास बाबी जसे की तंत्र आणि मदत मिळते आहे का? जर तुमचे ट्रेनिंग नव्या लोकांना 'पटवणे आणि भरती करणे' अशा स्वरुपाचे असेल तर नक्की समजा हा एक 'घरुन काम करुन कमवा' नावाचा फसवा खेळ आहे.

३. अधिक पैसे देण्यासाठीचा अवास्तव दबाव
तुम्हाला अधिकच्या उत्पादनांसाठी पैसे मोजायला भाग पाडले जात आहे का? तुम्हाला कदचित आकर्षक नावे असलेल्या स्किमखाली उत्पादनांचा एक मोठा साठा विकत घेण्याची गळ घातली जाऊ शकते. किंवा तुम्हाला अधिक व्यवसाय मिळेल, आणखी नफा मिळेल अशी प्रलोभने दाखवून भरमसाठ किमतीचे एखादे पॅकेज विकत घ्यावे असा सतत सुचवले जाऊ शकते. तुम्हाला जर स्पेशल ट्रेनिंग च्या नावाखाली सतत काही ना काही पैसे मागितले जात असतील तर धोक्याची लक्षणे समजावी.

४. निर्णय घेण्याचा दबाव आणणारी पद्धत.
साधारणपणे हा तर सर्वांनाच येणारा अनुभव आहे. एमएलएम मार्केटींग करणारे विविध पद्धतीने खूप दबाव आणून तुमच्याशी बोलत असतात. तुम्हाला वेगवेगळी कारणे दिली जातात. आणि आत्ताच्या आत्ता निर्णय घ्याल तर फायद्यात राहाल नाहीतर इतकी चांगली संधी घालवणारे तुमच्यासारखे मूर्ख तुम्हीच अशी काहीशी बोलीभाषा असते. तुमच्या पत्नी किंवा नातेवाईकांच्या उपस्थितीत प्रतिष्ठेचा प्रश्न बनवून प्रचंड दबाव आणला जातो. अशा पद्धतीने निर्णय घेण्याची जबरदस्ती किंवा घाई करणार्यांषपासून चारशे हात लांब राहावे.

५. साखरेपेक्षा गोड.
अतिशयोक्तिपूर्ण वक्तव्ये, विधाने ऐकल्यावर लगेच सावधान व्हा. जे सहज, सोपे वाटते ते तसे नसते. दोन महिन्यात पैसे दुप्पट चौपट या सारखी वाक्ये अजिबात खरी नसतात. तो एक सापळा असतो. आमच्या उत्पादनात चमत्कार घडवण्याची जगावेगळी शक्यता आहे, आमचा व्यवसाय महिन्याला काही न करता लाखो रुपये देतो, आमची सिस्टीम लाखो लोक वापरतात वगैरे दावे साफ खोटे असतात. असे आभाळापेक्षा उत्तुंत दावे तपासून पाहिल्याशिवाय खरे मानू नये. जगात सोपे, साधे, आणि भरमसाठ नफा कमी वेळात देऊ शकणार्याव गोष्टी अस्तित्वात नसतात. त्यासाठी खरोखर मेहनत, बुद्धिमत्ता आणि वेळ द्यावा लागतोच लागतो. विनासायास लाखो रुपये मिळणे शक्य असते तर जगभरातले लोक असेच श्रीमंत झाले असते. अशा दाव्यांपासून दूर राहिले पाहिजे.

समाजलेख

प्रतिक्रिया

जालिम लोशन's picture

27 Jan 2019 - 6:01 pm | जालिम लोशन

ह्या साखळीला फक्त लोभी लोक सामील होतात. बाकी स्तःचे रक्त आटवण्याचे कारण नाही.

उगा काहितरीच's picture

27 Jan 2019 - 9:30 pm | उगा काहितरीच

अशा लोकांचे पोटतिडकीने केलेले भाषण (सेमिनार) ऐकून मठ्ठ चेहऱ्याने नाही बॉ नाही करणार जॉइन . असे सांगण्यात जो असुरी आनंद असतो ना... अहाहाहा ! काय वर्णावा ? ;-)

सुचिता१'s picture

27 Jan 2019 - 11:48 pm | सुचिता१

:):)एक नंबर !!

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jan 2019 - 10:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

जोपर्यंत जगात गाढवे आहेत तोपर्यंत त्यांना हवे तसे हाकून फायदा कमावणारे चलाख निर्माण होणारच. :(

विजुभाऊ's picture

28 Jan 2019 - 6:25 pm | विजुभाऊ

आणखी काहीउदाह्रणे
https://www.misalpav.com/node/8488

प्रमोद देर्देकर's picture

28 Jan 2019 - 10:18 pm | प्रमोद देर्देकर

कोणाला ट्विंकल star विषयी माहिती आहे काय ?

विजुभाऊ's picture

29 Jan 2019 - 11:31 am | विजुभाऊ

अहो केवळ एम एल एम नसतानाही बर्‍याच स्कीम्स्/स्कॅम्स येत अस्तात.
अवास्का सोल्यूशन हा असाच एक मोठा घोटाळा. कायद्याच्या कोणत्याच कचाट्यात न बसलेला
कुठल्यातरी अमेरीकेन सरकारी कागदांचे डिजीटायजेशन हा कामाचा भाग, त्यासाठी ठरावीएक सॉफ्टवेअर विकत घ्यावे लागते. अवास्का सोल्यूशन्स ही कंपनी त्यासाठी एक किरकोळ व्ही बी मधले सोफ्तवेअर पुरवायची. कम्पनीने काही लाख लोकांना हे सोफ्टवेअर पुरवले. ( प्रत्येकी फक्त वीस हजार )
त्या नंतर तो अमेरीकन सरकारी डाटाबेस चो जॉब कधीच आला नाही.
न वटणारे चेक दिले म्हणून प्रवर्ताकांपैकी आलोक ओझा आणि त्याची सेक्रेटरी सोनाली मोरे यांना किरकोळ तुरुंगवास घडला इतकेच.
बाकी हे पैसे आणि ती कम्पनी कुठे गेली ते कोणालाही कधीच कळले नाही