ऑफिस मध्ये नेहमी पडणारे प्रश्न.

बाप्पू's picture
बाप्पू in काथ्याकूट
18 Jan 2019 - 12:51 am
गाभा: 

मला कार्यालयात काम करताना नेहमी पडणारे प्रश्न खाली देत आहे. माझ्याबरोबर हे प्रश्न इतर लोकांना देखील पडत असतीलच. जाणकार उत्तरे देऊ शकतील का?

1) ऑफिस मध्ये पुरुषांना ड्रेस कोड आहे हे माहिती आहे. माझ्या मते फॉर्मल शर्ट आणि पॅन्ट, आणि फॉर्मल शूस. त्यात परत शर्ट आणि पॅन्ट प्लेन पाहिजे. डिझाईन किंवा ब्रॉड लायनिंग नासावी, शूस पॉलिश केलेले असावेत. इ इ खूप बारकावे आहेत. बहुतांश पुरुष लोक हे कटाक्षाने पाळतात. हेच स्त्रियांच्या नेमकी फॉर्मल ची डेफिनेशन काय आहे? त्यांनी काहीही म्हणजे अगदी निम्म्या नग्न असलेल्या शॉर्ट घातल्या तरी ते फॉर्मल च आणि पंजाबी ड्रेस घातला तरी ते फॉर्मल. एच आर लोक पुरुष कर्मचारी वर्गाला कित्येकदा फॉर्मल नाहीये म्हणून समज देतात. तेच महिलांच्या बाबतीत बोटचेपे धोरण का?

2) ऑफिस मध्ये मुस्लिम लोकांनी डोक्यावर टोप्या घालणे (त्यांच्या स्वतःच्या :D) हे कुठपर्यंत ठीक आहे?
हे फॉर्मल च्या डेफिनेशन मध्ये बसते का? आणि मग बसत असेल तर आपण गांधी टोपी किंवा भगवी टोपी घालून गेले तर चालेल का?
इमॅजिनेशन करून हसू येईल पण आजकाल आमच्या ऑफिस मध्ये या टोप्या जास्तच होत चालल्या आहेत. त्यामुळे सिरिअसली हा प्रश्न विचारत आहे. HR मधले कोणी मिपाकर त्यांच्या कंपनी तील अश्या टोप्याबद्दलची policy सांगू शकतील का ? कि धार्मिक सौदार्ह्य या नावाखाली हे चालवावे लागते?

3) इंग्रजी लोकांची भाषा आपण बोलतो हे ठीक आहे पण ओढून ताणून त्यांच्या अक्सेंट ची कॉपी करण्याचा प्रयत्न करणे ठीक आहे का? माझ्या ऑफिस मध्ये काही लोक विनाकारण काही उच्चार चुकीचे (माझ्या मते ) करतात. जसे कि डाउन ला डॉsssन, कॅन ला खैन किंवा शेवटचा एखादा शब्द अस्पष्ट बोलणे जसे कि टूगेदर ला टुगेद. अश्या पद्धतीने बोलून पुढच्यावर छाप पडता येते का? कि हा निव्वळ एक फार्स आहे,? मी जी इंग्रजी बोलतो ती समोरच्या ला नीट समजते. पण असे तोंड वेडेवाकडे करून बोलल्यावर जास्त चांगली समजते का?? :D

4) ऑफिस मध्ये तुम्ही एखादा प्रोजेक्ट वर काम करता आणि अचानक कोणीतरी येऊन तो प्रोजेक्ट किंवा ती आयडिया हायजॅक करून स्वतः च्या नावावर खपवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्यात यशस्वी होतो. अश्या सिच्युएशन कश्या पद्धतीने हाताळाव्यात?

5) माझे असे निरीक्षण आहे कि साऊथ चे लोक तामिळ, मल्याळी, हैदराबादी, ओरिया (ओडिसा ) हे लोक आपल्या इकडच्या लोकांना आप आपल्या ऑफिस मध्ये व्यवस्थित रित्या प्लांट (किंवा सेटल ) करण्याचा प्रयत्न करतात. मराठी लोक या बाबतीत खूप मागे आहेत. किंवा मराठी लोक एक दुसऱ्याला मागे पडायला बघतात. मिपाकरांची मते काय आहेत?

6) एखादी व्यक्ती ऑफिस मध्ये आवडत नसेल, त्याला करणे अनेक असू शकतात पण मी फक्त ऑफिस च्या कामाशी निगडित असलेल्या कारणांबाबत बोलतोय. अश्या लोकांना कसे हॅन्डल करावे? त्यांच्याशी साप भी मरे और लाठी भी ना तुटे या उक्ती नुसार कसे वागावे?

बस तूर्तास इतकेच.

प्रतिक्रिया

चावटमेला's picture

18 Jan 2019 - 12:02 pm | चावटमेला

हेच प्रश्न थोड्या फार फरकाने पडतात.

इंग्रजी लोकांची भाषा आपण बोलतो हे ठीक आहे पण ओढून ताणून त्यांच्या अक्सेंट ची कॉपी करण्याचा प्रयत्न करणे ठीक आहे का? माझ्या ऑफिस मध्ये काही लोक विनाकारण काही उच्चार चुकीचे (माझ्या मते ) करतात. जसे कि डाउन ला डॉsssन, कॅन ला खैन किंवा शेवटचा एखादा शब्द अस्पष्ट बोलणे जसे कि टूगेदर ला टुगेद. अश्या पद्धतीने बोलून पुढच्यावर छाप पडता येते का? कि हा निव्वळ एक फार्स आहे,?

अगदि अगदि. हे लोक तर लैच्च डोक्यात जातात. जाणकारांच्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत..

समीरसूर's picture

18 Jan 2019 - 12:33 pm | समीरसूर

1) ऑफिस मध्ये पुरुषांना ड्रेस कोड आहे हे माहिती आहे. माझ्या मते फॉर्मल शर्ट आणि पॅन्ट, आणि फॉर्मल शूस. त्यात परत शर्ट आणि पॅन्ट प्लेन पाहिजे. डिझाईन किंवा ब्रॉड लायनिंग नासावी, शूस पॉलिश केलेले असावेत. इ इ खूप बारकावे आहेत. बहुतांश पुरुष लोक हे कटाक्षाने पाळतात. हेच स्त्रियांच्या नेमकी फॉर्मल ची डेफिनेशन काय आहे? त्यांनी काहीही म्हणजे अगदी निम्म्या नग्न असलेल्या शॉर्ट घातल्या तरी ते फॉर्मल च आणि पंजाबी ड्रेस घातला तरी ते फॉर्मल. एच आर लोक पुरुष कर्मचारी वर्गाला कित्येकदा फॉर्मल नाहीये म्हणून समज देतात. तेच महिलांच्या बाबतीत बोटचेपे धोरण का?

हा प्रकार आमच्या कार्यालयातदेखील आहे. मुली अतिशय भडक कपडे घालून येतात. तरी नशीब शॉर्ट स्कर्ट पूर्ण बंद केला आहे. काही मुलींचे टॉप्स इतके खोल असतात की खोलवर श्वास घेतल्यावरच चित्त जरा थार्‍यावर येते. मुळात असे कपडे घालण्यामागची मुलींची मानसिकता मला कळलेली नाही. तोकडे कपडे घालण्यामागची मुलींची भूमिका आणि कारणमीमांसा काय असते हे कळायलाच हवे.

2) ऑफिस मध्ये मुस्लिम लोकांनी डोक्यावर टोप्या घालणे (त्यांच्या स्वतःच्या :D) हे कुठपर्यंत ठीक आहे?
हे फॉर्मल च्या डेफिनेशन मध्ये बसते का? आणि मग बसत असेल तर आपण गांधी टोपी किंवा भगवी टोपी घालून गेले तर चालेल का?
इमॅजिनेशन करून हसू येईल पण आजकाल आमच्या ऑफिस मध्ये या टोप्या जास्तच होत चालल्या आहेत. त्यामुळे सिरिअसली हा प्रश्न विचारत आहे. HR मधले कोणी मिपाकर त्यांच्या कंपनी तील अश्या टोप्याबद्दलची policy सांगू शकतील का ? कि धार्मिक सौदार्ह्य या नावाखाली हे चालवावे लागते?

हे चालवूनच घ्यावे लागते. नो ईलाज!

3) इंग्रजी लोकांची भाषा आपण बोलतो हे ठीक आहे पण ओढून ताणून त्यांच्या अक्सेंट ची कॉपी करण्याचा प्रयत्न करणे ठीक आहे का? माझ्या ऑफिस मध्ये काही लोक विनाकारण काही उच्चार चुकीचे (माझ्या मते ) करतात. जसे कि डाउन ला डॉsssन, कॅन ला खैन किंवा शेवटचा एखादा शब्द अस्पष्ट बोलणे जसे कि टूगेदर ला टुगेद. अश्या पद्धतीने बोलून पुढच्यावर छाप पडता येते का? कि हा निव्वळ एक फार्स आहे,? मी जी इंग्रजी बोलतो ती समोरच्या ला नीट समजते. पण असे तोंड वेडेवाकडे करून बोलल्यावर जास्त चांगली समजते का?? :D

हा निव्वळ फार्स असतो आणि हा फक्त भारतीय लोकं करतात.

4) ऑफिस मध्ये तुम्ही एखादा प्रोजेक्ट वर काम करता आणि अचानक कोणीतरी येऊन तो प्रोजेक्ट किंवा ती आयडिया हायजॅक करून स्वतः च्या नावावर खपवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्यात यशस्वी होतो. अश्या सिच्युएशन कश्या पद्धतीने हाताळाव्यात?

आरडाओरडा करावा. ज्यांना कळायला पाहिजे त्यांना येनकेनप्रकारे कळेल अशी व्यवस्था करावी. प्रोजेक्ट फेल्युअर असल्यास असले काहीही करू नये. ;-)

5) माझे असे निरीक्षण आहे कि साऊथ चे लोक तामिळ, मल्याळी, हैदराबादी, ओरिया (ओडिसा ) हे लोक आपल्या इकडच्या लोकांना आप आपल्या ऑफिस मध्ये व्यवस्थित रित्या प्लांट (किंवा सेटल ) करण्याचा प्रयत्न करतात. मराठी लोक या बाबतीत खूप मागे आहेत. किंवा मराठी लोक एक दुसऱ्याला मागे पडायला बघतात. मिपाकरांची मते काय आहेत?

मराठी लोक बर्‍याच बाबतीत मागे आहेत. माजोर्डेपणा, आळस, दुही, विविध प्रकारचे न्यूनगंड, इतरांना क्षुल्लक लेखणे या बाबतीत मराठी लोक आघाडीवर आहेत. बाकी दक्षिण लोक्स चांगले असतात हे निरीक्षण नोंदवतो.

6) एखादी व्यक्ती ऑफिस मध्ये आवडत नसेल, त्याला करणे अनेक असू शकतात पण मी फक्त ऑफिस च्या कामाशी निगडित असलेल्या कारणांबाबत बोलतोय. अश्या लोकांना कसे हॅन्डल करावे? त्यांच्याशी साप भी मरे और लाठी भी ना तुटे या उक्ती नुसार कसे वागावे?

सापाला मारायची गरज नाही. त्याला डोलवत ठेवले तरी भागते. अशी व्यक्ती बॉस असेल तर त्याची स्तुती करून काम साधून घ्यावे. ज्युनिअर असेल तर अंतर ठेवावे. सोबतची असेल तर तेवढ्यापुरते हसून-खेळून संबंध ठेवावेत. उगीच तत्व म्हणून भांडण करू नये. ८-९ तास संबंध असणार्‍या लोकांविषयी फार विचार करू नये. अर्थात, गरज असेल तर बोलून वाद मिटवावेत. अगदीच गरज पडली तर असे भांडण करावे की पुन्हा आपल्या वाट्याला जायची कुणाची हिम्मत होऊ नये. वाद होणारच नाहीत असे बघणे सगळ्यात फायदेशीर!

मुळात असे कपडे घालण्यामागची मुलींची मानसिकता मला कळलेली नाही. तोकडे कपडे घालण्यामागची मुलींची भूमिका आणि कारणमीमांसा काय असते हे कळायलाच हवे.

योग्य प्रश्न..मलाही हा नेहमी पडतो..
म्हणजे जे दिसतं ते पुरुष बघतील हे माहिती असतं. मग पुररूषांनी बघावं की नाही बघावं की बघून न बघितल्यासारखं करावं ह्याविषयी मुलींना काय वाटतं नेमकं? आणि हा प्रश्न फक्त प्रचलित तोकड्या कपड्यांविषयी नाही तर साडी आणि नववारी विषयी पण आहे.

अर्थात काहीही दिसत नसताना सुद्धा काहीतरी दिसेलच ह्या आशेने बघणाऱ्या पुरुषांची मानसिकता हा सुद्धा तितक्याच अभ्यासाचा विषय आहे.

कंजूस's picture

18 Jan 2019 - 12:44 pm | कंजूस

जेवढ्यास तेवढे काम करून सहकाऱ्यांशी कोणतेही संबंध न ठेवल्यास प्रश्नच पडत नाहीत. जे काही मिळत असते ते कंपनी देत असते, सहकारी नाहीत. पिकनिकना अजिबात जाऊ नये. बाहेरच्या लोकांबरोबर जावे. वाटसप ग्रूपचा डबा उडवावा.

प्रश्न 4 साठी - जेव्हा जेव्हा तुम्ही प्रोजेक्टचे काही काम कराल, त्याचे अपडेट्स, अख्ख्या टीमला, तुमच्या म्यानेजराला, स्टेक होल्डर लोकांनां व त्यांच्यापैकी जे तिथले म्यानेजर असतील, लीड्स वगैरे असतील त्यांना पाठवावीत. इमेल्स ची सुरुवात तुम्ही काय काय काम केले आहे - आठवड्यात, मोड्यूल/ ट्रेंच वाईज वगैरे हे थोडक्यात लिहावे, जर काही अडचणी आल्या असतील तर त्यावर काय सोल्यूशन काढले व त्यामुळे किती फायदा झाला - अमके म्यान अवर्स वाचले वगैरे हे जरूर हायलाईट करा. अर्थात हे प्रत्येक वेळी करता येणार नाही पण दोन तीन महिन्यातून एकदा तरी करा.

ईमेल पाठवताना त्याचा समारोप, काही अडचणी असतील तर मला संपर्क करा, हे अवश्य सांगून करा. स्टेक होल्डर लोकांबरोबर अतिशय उत्तम संबंध प्रस्थापित करा.

बाकी आपल्याकडे कधी खरेखुरे व्यावसायिक वातावरण बघायला मिळेल का, ह्याबद्दल खूप शंका आहेत.

अवांतर आणि हलके घेण्यासाठी : कामात लक्ष द्या, स्त्री सहकाऱ्यांचे कपडे, इतरांच्या डोक्यावरील टोप्यांकडे लक्ष देऊ नका. तुम्ही पाहण्यासाठी आणि श्र्वासांचे व्यायाम करण्यासाठी कोणी काही परिधान करून येत नाही, हे पक्के लक्षात असूद्या. कारण actual काम आणि त्यासंबंधित इमेल्स - हे जर केले तर ह्या आणि इतर negative extra curricular activitiesसाठी फारसा वेळ राहणार नाही, असे वाटते.

समीरसूर's picture

18 Jan 2019 - 1:53 pm | समीरसूर

अवांतर आणि हलके घेण्यासाठी : कामात लक्ष द्या, स्त्री सहकाऱ्यांचे कपडे, इतरांच्या डोक्यावरील टोप्यांकडे लक्ष देऊ नका. तुम्ही पाहण्यासाठी आणि श्र्वासांचे व्यायाम करण्यासाठी कोणी काही परिधान करून येत नाही, हे पक्के लक्षात असूद्या. कारण actual काम आणि त्यासंबंधित इमेल्स - हे जर केले तर ह्या आणि इतर negative extra curricular activitiesसाठी फारसा वेळ राहणार नाही, असे वाटते.

हाहाहा...मस्त प्रतिसाद. पण असं होत नाही. कार्यालयात आल्यानंतर निरीक्षण करण्याची वृत्ती, भावभावना ऑफ करून ठेवणे शक्य नसते. कुठल्याही घटनेवर, दृष्यावर, आवाजावर, मजकूरावर वगैरे विचार करून मते बनवणे, तुलना करणे, त्यात आपल्या फायद्याचे काय आहे हे बघणे हा नैसर्गिक मनुष्यस्वभाव आहे. तो कसा बदलता येईल? पाहणे, श्वासांचे व्यायाम वगैरे परिणाम आहेत, कारणे नाहीत.

ऑफिसमध्ये तुम्हांला तुमच्या भावभावनांचा विचार करणे, आपल्या स्त्री सहकाऱ्यांचे निरीक्षण करणे, मते बनवणे ह्यासाठी बोलावत नाहीत आणि त्याचा पगार देत नाहीत, इतके लक्षात घेता आले तरी पुरेसे आहे.

बाप्पू's picture

18 Jan 2019 - 2:36 pm | बाप्पू

भावभावनांचा विचार करणे, आपल्या स्त्री सहकाऱ्यांचे निरीक्षण करणे, मते बनवणे ह्यासाठी बोलावत नाहीत

तुमचे वाक्य ऐकायला छान वाटते. पण ऑफिस मध्ये जिथे आपण काम करतो तिथे एटीकेट नावाचा देखील काही प्रकार असतो. ऑफिस मध्ये ऑफिस सारखे वातावरण ठेवणे he देखील महत्वाचे आहे हो..

उद्या समजा मी ऑफिस मध्ये बर्मुडा पॅन्ट घालून गेलो आणि कोणी त्याबाबत प्रश्न विचारला तर मी त्याला असे उत्तर नाही देऊ शकत कि - तुम्हाला इथे माझ्या बर्मुडा पॅन्ट चे निरक्षण करण्यासाठी नाही बोलावलेले. कृपया त्याचा पगार कंपनी देणार नाहीये त्यामुळे तुम्ही तुमचे काम करा...!!!

समीरसूर's picture

18 Jan 2019 - 3:09 pm | समीरसूर

स्त्री सहकारी: अरे वा, आज बर्म्युडात एकदम? काय विशेष? दिसतोयस भारी पण...

पुरुषः हे बघा, कृपया माझ्या बर्म्युडाचे निरीक्षण करू नका; कंपनी तुम्हाला मी कुठले कपडे घालतो याचे निरीक्षण करण्याचा पगार देत नाही.

स्त्री सहकारी: हो का? मग "ट्रॅडिशनल डे"च्या दिवशी मी साडी घातली होती तेव्हा मला दिवसातून चार वेळा "ऑस्सम, जबरदस्त, नेवर-सीन-बिफोर" असे म्हटला होतास त्याचे वेगळे पैसे दिले का तुला कंपनीने?

पुरुषः तेव्हा मी अजाण बालक होतो. आता मी सुजाण, प्रगल्भ वगैरे झालोय! त्यामुळे आता माझ्या बर्म्युडाविषयी बोलणे टाळलेस तर बरे होईल.

(तिची एक रेशमी बट डोळ्यांवरून पुढे येते. पुरुष कर्मचारी अत्यवस्थ!)

पुरुषः हे बघा, ती बट मागे नीट खोचून ठेवा.

स्त्री सहकारी: जास्त वटवट करू नकोस. माझी बट! माझी वट! जिथे पाहिजे तिथे ठेवीन नाहीतर कापून टाकीन. जास्त खटपणा करशील तर 'ओम फट स्वः' करून टाकीन!

(ती फणकार्‍याने निघून जाते. जातांना तिचा सुगंध त्याच्या नाकाला त्रास देऊन जातो)

पुरुषः (त्रासून) अवघड आहे. ये थांब, सॉरी! चल कॉफी प्यायला जाऊ. बाकी तुझे डोळे आज निराळेच दिसतायेत...एकदम...

स्त्री सहकारी: कातिल? (डोळा मारते)

(दोघेही हसतात)

हीच तर गंमत आहे. प्रेम असेच तर फुलते. जसे प्रेम फुलते तसाच द्वेषही फुलतो. हे चालायचेच! अखंड! अनंत काळापर्यंत! जोपर्यंत माणूस नावाचा प्राणी या पृथ्वीवर आहे तोपर्यंत! कृत्रिम बांध घालून हे थांबवता थोडेच येते...

उगा काहितरीच's picture

18 Jan 2019 - 9:57 pm | उगा काहितरीच

उद्या समजा मी ऑफिस मध्ये बर्मुडा पॅन्ट घालून गेलो आणि कोणी त्याबाबत प्रश्न विचारला तर मी त्याला असे उत्तर नाही देऊ शकत कि - तुम्हाला इथे माझ्या बर्मुडा पॅन्ट चे निरक्षण करण्यासाठी नाही बोलावलेले. कृपया त्याचा पगार कंपनी देणार नाहीये त्यामुळे तुम्ही तुमचे काम करा...!!!

मी जातो अॉ फिसला बर्मुडा घालून काही फरक पडत नाही. (पुणे स्थित , MNC,नाव पाहिजे असेल तर व्यनि करा. ) रच्याकने जेव्हा एखादा सुटाबुटातला त्रस्त चेहरा आजूबाजूला बघतो तेव्हा गळ्यात आयडी आणि खाली ३/४ लै भारी वाटते. आयडी पण गळ्यात घालणे सक्तीचे नाही. पण उगाच आपलं घालायचं ;-)

तसं तर कंपनी आपल्याला फक्त आणि फक्त कामाचा पगार देते. कामानिमित्त सहकाऱ्यांशी बोलणे कंपनीत मान्य असते.
पण त्याव्यतिरिक्त सहकाऱ्याच्या कौटुंबिक अडचणी ऐकून घेणं, त्यावर सल्ले देणं, राजकारणावर गप्पा मारणं ह्यापैकी कुठल्याही गोष्टी साठी कंपनी पगार देत नाही. पण हे खरंच शक्य आहे का?
त्यासाठी कंपनीला रोबोट्स बसवावे लागतील.
त्यामुळे तुम्ही म्हणताय ते ऐकायला छान आहे..अनुसरायला नाही..

कंपनीत बसून मिपावर प्रतिसाद द्यायला सुद्धा कंपनी पगार देत नाही.

-- कंपनीत बसून मिपा मिपा खेळणारा चिनार..

समीरसूर's picture

18 Jan 2019 - 2:50 pm | समीरसूर

जे प्रॅक्टीकली शक्य आहे त्याचाच आग्रह धरायला हवा. जे शक्यच नाही त्याचा आग्रह धरणे म्हणजे अकारण दुराग्रहीपणा झाला...असं सगळं शक्य असतं तर जग हे आदर्श झालं असतं...

समीरसूर's picture

18 Jan 2019 - 2:45 pm | समीरसूर

बरोबर आहे...पण...

कार्यालयांमध्ये कित्येक प्रेमप्रकरणे, लिव-इन, ब्रेक-अप, मैत्री, वगैरे गुंतागुंतीची प्रकरणे घडत असतात. यामध्ये स्त्री सहकार्‍यांचा सहभागही तितकाच असतो. फक्त पुरुषच त्यांच्या स्त्री सहकार्‍यांचे निरीक्षण करतात असे नाही. स्त्री कर्मचारीदेखील पुरुष कर्मचार्‍यांना जोखत असतात हे ही तितकेच खरे; अन्यथा अतिशय तोकडे कपडे घालण्याचे कुठलेच तार्किक कारण दिसत नाही. मुळात मी अजूनही मुलींनी असे कपडे घालण्याचे कारण शोधतोय. याचे पटण्याजोगे कारण एकच आहे - आकर्षक, अधिकाधिक आकर्षक दिसावे हेच! म्हणजे उद्देशच तो असेल तर पुरुष कर्मचार्‍यांनी निरीक्षण केल्यास वावगे वाटण्याचे कारण नसावे असे माझे मत. बाकी "मुलींनी कपडे कसे घालावे यावर बंधन नको; मुलांनीच नीट, सभ्य वागणे शिकले पाहिजे" हे आजकालचे एक तद्दन फालतू लॉजिक आहे. ते एकदा तोंडावर मारून फेकले की सगळे बोलणेच खुंटते.

* माझ्या विभागात काम करणारा बंगळूर कार्यालयातील एक अतिशय हुशार कर्मचारी गेल्या शुक्रवारी (११ जाने २०१९) कार्यालयात येत असतांना एका भीषण अपघातात मृत्यू पावला. मी त्याच्यासोबत खूप काम केले होते. काल आमच्या विभागाने २० मिनिटांची शोकसभा आयोजित केली होती. त्याच्या शेजारी बसणारा त्याचा सहयोगी पण ज्युनिअर कर्मचारी अक्षरशः रडला. सगळ्यांच्याच डोळ्यांच्या कडा ओलावल्या. हा सगळा मूर्खपणाच म्हणायचा! भावभावना ऑफ करून ठेवणे महत्वाचे!

* आमच्या कार्यालयात एका कँटीनमध्ये काम करणार्‍या महिला कर्मचारीने मागे एका सोबतच्या पुरुष कर्मचार्‍यावर त्याने तिच्यावर कँटीनमध्येच बलात्कार केल्याचा घणाघाती आरोप केला होता. प्रकरण पोलीसात गेले. नंतर उघडकीस आले की त्यांचे सगळे संगनमताने चालले होते. पुरुष कर्मचार्‍याने व्हिडिओ काढल्याचा संशय आल्याने त्या महिलेचे धाबे दणाणले. बदनामीची भीती! तिने लगेच बलात्काराचे आरोप ठोकले. म्हणजे भावभावना असतातच. त्या टाळू शकणे कुणालाच जमले नाही; मग ते कार्यालय असो; घर असो; ट्रेन असो; लग्नाचा मंडप असो; अथवा स्मशान!. शिवाय तितक्याच तीव्र भावभावना स्त्री कर्मचार्‍यांच्यादेखील असतात. फक्त पुरुषांनाच धारेवर धरणे ही आजकाल फॅशन झाली आहे.

फक्त पुरुषांचच चुकतं हा गैरसमज आहे. स्त्रियांचंदेखील तितकंच चुकत असतं. सोनी टीव्हीवरील 'क्राईम पट्रोल' ही मालिका (सत्य घटनांवर आधारित) पाहिल्यास लक्षात येतं की स्त्री-पुरुष हे दोन्ही सारख्याच प्रमाणात चुकत असतात. काही काही केसेसमध्ये स्त्रियांची क्रूरता बघून अंगावर काटा येतो. आजच्या टाईम्समधली शबनमची बातमी वाचून मन सुन्न झाले. २००८ मध्ये या शबनमने (अमरोहा, उत्तर प्रदेश) आपल्याच घरातील ९ जणांचा आपल्या प्रियकराच्या साथीने निर्घृण खून केला. त्यावेळेस ती ७ महिन्यांची गरोदर होती. त्या खून झालेल्या ९ जणांमध्ये एक ८ महिन्यांचे बाळ होते! त्या गावात त्यानंतर कुणीच आपल्या मुलीचे नाव 'शबनम' ठेवलेले नाही. टाईम्स ऑफ इंडिया, १८-जाने-२०१९, पुणे आवृत्ती.

मुद्दा हा की भावभावना, चुका, गुन्हे, अविचार, अनाचार हे मानवी जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. यात पुरुष-स्त्री असा भेद करता येत नाही. असो.

हर्षद खुस्पे's picture

18 Jan 2019 - 3:44 pm | हर्षद खुस्पे

+++++1111111111111111
अत्यंत सुंदर मुद्दा. अशी सकस चर्चा मिपा वर कायम येण्यासाठी प्रेरित करते

बाप्पू's picture

18 Jan 2019 - 3:00 pm | बाप्पू

प्रश्न 4 चे उत्तर आवडले. धन्यवाद. :)

सुबोध खरे's picture

22 Jan 2019 - 10:02 am | सुबोध खरे

एक विनोद --
एक मुलगी आपल्या मैत्रिणीला सांगते," अगं, तो मुलगा मला त्रास देतो आहे
मैत्रीण -- पण तो तर तुझ्याकडे बघतही नाहीये
मुलगी -- त्याचाच तर मला त्रास होतोय.

वस्तुस्थिती
-- आपण चांगले कपडे घालावे आणि सुंदर दिसावे आणि आपण सुंदर दिसतो आहोत हे इतरांनी पाहावे आणि आपल्याला "दाद" द्यावी हि स्त्रियांची (थोडीफार पुरुषांची सुद्धा) नैसर्गिक उर्मी (इन्स्टिंक्ट) असते. यामुळेच मुली जिथे तिथे सेल्फी आणि फोटो काढत असतात. (हे प्रमाण पुरुषांपेक्षा बरेच जास्त आहे)
स्वतुष्टीकरण(self gratification) हा स्त्रीच्या स्वभावाचा एक भाग असतो. "सांगा राया मी कशी दिसते" किंवा "राग मेरे रूप के तू गाये जा" या तर्हेची गाणी या स्वभावाचे निदर्शक आहे.
कोणतीही मुलगी सकाळी साधं दूध आणायला केस विंचरून थोडेफारतरी नीटनेटके झाल्याशिवाय बाहेर पडणारच नाही याउलट मुलगे काय घातलंय त्याची चिंता ना करता किंवा "कोण बघतंय" म्हणून कसेही बाहेर पडतात. हा स्त्री आणि पुरुष व्यक्तिमत्त्वातील मूलभूत फरक आहे.एखाद्या समारंभात स्त्रीच्या कपड्यावर थोडासा जरी डाग पडला असेल तर पूर्ण समारंभ भर ती स्त्री फार त्रस्त असते. याउलट पुरुष दोन मिनिटं विचार करतील आणि सोडून देतील.

आपण चांगले दिसावे हि प्रत्येक मुलीची अपेक्षा असतेच पण त्यासाठी तोकडे कपडे घालून अतिरेक होत नाही ना हे पाहणे प्रत्येक मुलीचे कर्तव्य आहे. दुर्दैवाने स्त्रियांच्या पोशाखाची पाश्चात्य परंपरेत संहिता (code) अशी नाही. त्यातून जेथे या संहिता निर्माण केल्या गेल्या तेंव्हा तेथे फारशा स्त्रिया काम करत नसत आणि तेथे १० महिने थंडी असल्याने अंगभर कपडे घालणे हे जास्त सोयीचे होते.

आता कपड्याबद्दलची आणि एकंदर वैचारिक स्वातंत्र्याची कल्पना शिथिल झालेली असल्याने काही मुली त्याचा गैरफायदा घेताना आढळतात हि वस्तुस्थिती. त्यातून एखादा कपडा अंगभर असूनही उदा. साडी अंगभर असली तरी झिरझिरीत साडी नेसणे सारखा पदर जागेवरून "चळणे" अशा तर्हेच्या गोष्टी "सहज" होऊ शकतात. यात कपड्यापेक्षा त्या मुलीची वैचारिक पातळी हि महत्त्वाची असते.

"स्त्रीत्वाचा गैरफायदा" घेणाऱ्या मुलीसुद्धा आपल्याला असंख्य वेळेस दिसतात. यात एखाद्या रांगेत घुसणे (उदा. तिकिटाच्या) पासून आपली कामे भिडस्त सहकार्याच्या गळ्यात टाकणे पर्यंत येते.

बरेच पुरुष लघळपणा करतात हे जगजाहीर असते पण स्त्रिया मर्यादा ओलांडतात तेंव्हा सहानुभूती स्त्रीकडेच जाते.

रुग्णालयात येणाऱ्या मुली जेंव्हा असे तोकडे कपडे घालतात तेंव्हा त्याबद्दल नक्की काय ते सांगणे कठीण जाते. पवई येथे मी काम करीत असलेल्या रुग्णालयात एक मुलगी इतक्या खोल गळ्याचा टॉप घालून आली होती कि माझ्या दोन महिला सहकार्यांना पण लाज वाटली. गम्मत म्हणजे झाडूवाल्यापासून ते क्षकिरण तंत्रज्ञापर्यंत सर्व लोक तिच्या कडे "पाहत" होते आणि तिला त्याची काही फिकीर नव्हती. काही वेळेस मुली इतक्या तोकड्या अर्ध्या चड्ड्या घालून येतात कि अंतर्वस्त्राची कड त्याच्या खालून दिसावी.

दुर्दैवाने सौंदर्य हे "मोहक" असावे "मादक" नव्हे हा विचार आता जुनाट वाटू लागला असून प्रसिद्धी (मग ती चांगली असो कि वाईट ते गौण आहे) हि महत्त्वाची झाली आहे.
असो
हा विषय फार गहन आहे

माझ्या कामाच्या ठिकाणी १२ मोठ्या इमारती आहेत. एका इमारतीत साधारण दोन-तीन हजार कर्मचारी आहेत. मी ज्या इमारतीत बसतो तिथेच अजून एक मुलगी काम करते. ही मुलगी रोज, न चुकता अतिशय तंग टी-शर्ट आणि जीन्स घालते. टी-शर्ट इतका कमालीचा तंग असतो की विचारता सोय नाही. इतका तंग टी-शर्ट घालण्याचे खरे कारण म्हणजे तिच्या पोटावरच्या अणि मानेखालच्या विशिष्ट भागावर उपरवालेने अतिशय सढळ हाताने सौंदर्य दिले आहे. जाऊ द्या. उगीच कोडी घालण्यात अर्थ नाही. स्पष्टपणे सांगायचे म्हणजे तिचा स्तनप्रांत हा अतिउन्नत (आणि, खोटे का बोला, आकर्षकदेखील!) असून तिच्या पेहरावावरून नक्कीच हे अनुमान काढता येते की तिच्या या मालमत्तेची जाहिरात करण्यासाठीच ती तंग टी-शर्ट घालून येते. तिची लिफ्टमधून येतांना-जातांना, बाहेर लंचला, चहाला जातांना बहुतेक सगळे पुरुष कर्मचारी त्या मुलीच्या छातीकडे लपून-छपून बघत असतात. लिफ्टमध्ये तर खरी मजा येते. उभे असलेले पुरुष कर्मचारी एवढ्याशा जागेत शिताफीने तिच्याकडे (?) चोरून बघत असतात. कुणाच्या लक्षात न येऊ देता ही कसरत एवढ्या छोट्या आणि गच्च भरलेल्या लिफ्टमध्ये करायची म्हणजे खायचं काम नाही. ही मुलगी अगदी रोज असाच पेहराव करून येते. आता तिला आपल्याकडे पुरुष सहकारी कसे बघत असतील हे कळत नसेल? अर्थात, अशा बर्‍याच मुली असतात म्हणा. त्यांच्याकडे नाही पाहिलं तर त्यांना खरोखर 'त्रास' होतो.

टवाळ कार्टा's picture

22 Jan 2019 - 8:28 pm | टवाळ कार्टा

तुमच्यासारख्या बुरसटलेले विचार असलेले लोक हापिसातल्या स्त्रियांना "आयकँडी" समजतात....स्त्रीला तिने काय कसे आणि किती कपडे घालावे हे व्यवस्थित समजते

- माशे धरा

त.टी. - हा फक्त टाईमपास प्रतिसाद आहे...वस्कन बोचकारू नये :D

समीरसूर's picture

23 Jan 2019 - 10:21 am | समीरसूर

हाहा...अहो अशा स्त्रियांना पुरुषांनी आयकँडी समजावे म्हणूनच तर त्या असले उत्तेजक कपडे घालतात; यात आयकँडी समजणार्‍यांचा काय दोष? :-)

सगळ्याच स्त्रियांना कपडे किती आणि कसे परिधान करावे हे कळले असते तर वर डॉक्टरसाहेब म्हणतात त्याप्रमाणे कपडे घातले नसते आजकालच्या मुलींनी! कितीतरी बायका अतिशय झिरझिरीत साडी घालून पोट दिसेल अशा पद्धतीने साडी अ‍ॅडजस्ट करतात. याला काय म्हणावे? दुपट्टा कशासाठी असतो याबद्दल मुलींचं शिक्षण घेण्यासाठी आमच्या कंपनीत ईमेल्स पाठवले गेले होते. आजकाल किती मुली/बायका दुपट्टा तो ज्या कामासाठी वापरायचा असतो त्या कामासाठी वापरतात? अगदी नगण्य! दुपट्टा सहसा अगदी वर गळ्याभोवती गुंडाळलेला असतो. एकदम कुणी अनोळखी माणसे असल्यास तो उगीच खाली ओढण्याचा फक्त अभिनय केला जातो. हे सगळे कशासाठी? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी शोधतोय पण मिपावर तरी अजून या प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीतयेत. मला वाटलं इथेतरी खरी, प्रामाणिक उत्तरे मिळतील पण ती उत्तरे सोडून बाकीची चर्चा फक्त होतेय...ती उत्तरे तशी जगजाहीरच आहेत फक्त पब्लिकली मान्य करण्याचे धाडस बहुधा नाहीये.

मी अगदीच आयकँडी समजतो असे नव्हे पण आकर्षक चेहरा दिसल्यास कोण मान फिरवतो? असे महान आत्मे या जगात किती असतील? अशा महान (आणि बहुधा ढोंगी) आत्म्यांचा मी जाहीर सत्कार करायला तयार आहे. :-)

हा प्रतिसाद "वस्कन बोचकारणे" कॅटेगरीमध्ये बसतो का याचा कृपया खुलासा करावा. असल्यास मोठ्या मनाने क्षमा करावी. (नेहमीप्रमाणे, कृ. ह. घे. :-))

दुपट्टा कशासाठी असतो याबद्दल मुलींचं शिक्षण घेण्यासाठी आमच्या कंपनीत ईमेल्स पाठवले गेले होते. आजकाल किती मुली/बायका दुपट्टा तो ज्या कामासाठी वापरायचा असतो त्या कामासाठी वापरतात? अगदी नगण्य! दुपट्टा सहसा अगदी वर गळ्याभोवती गुंडाळलेला असतो.

विषय निघालाच आहे म्हणून विचारून घेतो..लगेच वसकन बोचकारु नका..
आजकाल (म्हणजे दहा-बारा वर्षांपासून) साधारण गुढघ्याच्या खालपर्यंत येईल असे कुर्ते घालण्यात येतात. हा पेहराव एकंदरीत पंजाबी ड्रेसचा चुलत घराण्यातला वाटतो. ह्यात ओढणी घेण्यात येत नाही.
मज पामराला प्रश्न असा आहे की कुर्त्यात असं काय वेगळं असतं ज्यामुळे ओढणीची गरज नाही असं पेहराव करणाऱ्यांना वाटतं?

थोडा जाड कापडाचा आणि अंगासरशी बसणारा नसावा अशी "अपेक्षा"असते. त्यामुळे "अंगप्रदर्शन" होणार नाही.
वस्तुस्थिती तशी "असतेच" असे नाही

लौंगी मिरची's picture

25 Jan 2019 - 12:27 am | लौंगी मिरची

योग्य प्रतिसाद . ते श्वासांचे व्यायाम करायला ऑफिसात न जाता
पैसे भरुन योगा क्लास लावावेत ;)

लौंगी मिरची's picture

25 Jan 2019 - 12:29 am | लौंगी मिरची

माझा प्रतिसाद तशोधरा च्या प्रतिसादाला आहे .

लौंगी मिरची's picture

25 Jan 2019 - 12:36 am | लौंगी मिरची

नक्कि धागा कश्यावर आहे ? स्त्रियांनी काय घालावे कि ऑफिस मध्ये काय घालुन यावे ?

कन्फुजन आहे .

....

लौंगी मिरची's picture

25 Jan 2019 - 1:20 am | लौंगी मिरची

कुणी त्ये ??

स्त्रियांनी ऑफिसात काम करताना वेशभूषेची आचारसंहिता काय आहे? आणि असेल तर त्याचे पालन का बहुतांश स्त्रिया का करत नाहीत? यामागे नेमकी काय मानसिकता आहे??
आणि या बाबतीत HR वाले इथे स्त्रियांना सॉफ्ट कॉर्नर का देतात?
नेमका हा चर्चे चा विषय आहे तरी बरेच स्त्री मिपाकर या चर्चे ला " स्त्रियांनी काय परिधान करावे आणि काय करू नये " या विषयाकडे खेचत आहेत.

स्त्रियांनी ऑफिस च्या बाहेर काय परिधान करावे आणि काय नको हा त्यांचा वयक्तिक प्रश्न आहे. पण ऑफिस मध्ये हा निश्चित च वयक्तिक प्रश्न नही.. !! ऑफिस चे नाव, रेप्युटेशन हे सगळे पणाला लागू शकते. !

लौंगी मिरची's picture

28 Jan 2019 - 8:06 am | लौंगी मिरची

हा विचार एच आर करतिल कि , आपण का भांडतोय ?
नेहेमी मुलींनी काय घालावे हा प्रश्न येतो . मुलेहि ऑफिसमध्ये
लोव वेस्ट पँट्स घालुन येतात , विचित्र दिसतं बसताना पण हे
कुणी सांगायचं त्यांना ??
मुलींवर नेहेमीच कसले विषय हे... :(

सतिश पाटील's picture

18 Jan 2019 - 3:54 pm | सतिश पाटील

1) ऑफिस मध्ये पुरुषांना ड्रेस कोड आहे हे माहिती आहे. माझ्या मते फॉर्मल शर्ट आणि पॅन्ट, आणि फॉर्मल शूस. त्यात परत शर्ट आणि पॅन्ट प्लेन पाहिजे. डिझाईन किंवा ब्रॉड लायनिंग नासावी, शूस पॉलिश केलेले असावेत. इ इ खूप बारकावे आहेत. बहुतांश पुरुष लोक हे कटाक्षाने पाळतात. हेच स्त्रियांच्या नेमकी फॉर्मल ची डेफिनेशन काय आहे? त्यांनी काहीही म्हणजे अगदी निम्म्या नग्न असलेल्या शॉर्ट घातल्या तरी ते फॉर्मल च आणि पंजाबी ड्रेस घातला तरी ते फॉर्मल. एच आर लोक पुरुष कर्मचारी वर्गाला कित्येकदा फॉर्मल नाहीये म्हणून समज देतात. तेच महिलांच्या बाबतीत बोटचेपे धोरण का?

आमच्या सध्याच्या ऑफिसमध्ये असाच व्हायचं, आमचं शर्टाचे एक बटन उघडे दिसले कि hr आरडा ओरड करायची, एक दिवशी डोके सटकले आणि ४ चौघात झापले,- आमच्या शर्टाचे एक बटन उघडे चालत नाही, मग या बायका एवढ्या खोल गळ्याचे कपडे घालतात ते कसे चालते? आणि स्लीव्ह लेसच्या नावाने हि अशी बगलेतले केस दाखवणे हि कुठले फॅशन ? हे हि चालते का तुम्हाला? तेव्हा सगळ्या बायका खिदळल्या पण परत कधी hr ने या हा विषय काढला नाही.

2) ऑफिस मध्ये मुस्लिम लोकांनी डोक्यावर टोप्या घालणे (त्यांच्या स्वतःच्या :D) हे कुठपर्यंत ठीक आहे?
हे फॉर्मल च्या डेफिनेशन मध्ये बसते का? आणि मग बसत असेल तर आपण गांधी टोपी किंवा भगवी टोपी घालून गेले तर चालेल का?
इमॅजिनेशन करून हसू येईल पण आजकाल आमच्या ऑफिस मध्ये या टोप्या जास्तच होत चालल्या आहेत. त्यामुळे सिरिअसली हा प्रश्न विचारत आहे. HR मधले कोणी मिपाकर त्यांच्या कंपनी तील अश्या टोप्याबद्दलची policy सांगू शकतील का ? कि धार्मिक सौदार्ह्य या नावाखाली हे चालवावे लागते?

माझ्या हनुवटीवर आलेली थोडीशी दाढी बघून ती hr किरकिर करत होती, मग म्हटले ते टोप्या घालून दाढ्या वाढवून येतात तेव्हा डोळे बंद होतात का तुमचे? तेव्हा ती hr म्हणाली कि ते त्यांचे धार्मिक कारण आहे, मग म्हटले ठीक आहे, आणि मी शेंडी राखली, अगदी २ वर्ष, hr आली होती विचारायला मी म्हटले माझ्या धार्मिक गोष्टीत लुडबुड नको.२ वर्ष सगळे हसायचे पण मी शेंडी तेव्हाच काढली जेव्हा सगळे दाढीवाले सोडून गेले.

3) इंग्रजी लोकांची भाषा आपण बोलतो हे ठीक आहे पण ओढून ताणून त्यांच्या अक्सेंट ची कॉपी करण्याचा प्रयत्न करणे ठीक आहे का? माझ्या ऑफिस मध्ये काही लोक विनाकारण काही उच्चार चुकीचे (माझ्या मते ) करतात. जसे कि डाउन ला डॉsssन, कॅन ला खैन किंवा शेवटचा एखादा शब्द अस्पष्ट बोलणे जसे कि टूगेदर ला टुगेद. अश्या पद्धतीने बोलून पुढच्यावर छाप पडता येते का? कि हा निव्वळ एक फार्स आहे,? मी जी इंग्रजी बोलतो ती समोरच्या ला नीट समजते. पण असे तोंड वेडेवाकडे करून बोलल्यावर जास्त चांगली समजते का?? :द

त्यांच्या तोंडावर हसून निघून जायचे , दुर्लक्ष करायचे, कारण त्यांच्या घराच्या छपरावरून इंग्रजांचे विमान गेलेले असते.

6) एखादी व्यक्ती ऑफिस मध्ये आवडत नसेल, त्याला करणे अनेक असू शकतात पण मी फक्त ऑफिस च्या कामाशी निगडित असलेल्या कारणांबाबत बोलतोय. अश्या लोकांना कसे हॅन्डल करावे? त्यांच्याशी साप भी मरे और लाठी भी ना तुटे या उक्ती नुसार कसे वागावे?

कामापुरतेच संबंध ठेवायचे, उगाच सकाळी तोंड वर करून गॉड मॉर्निंग, वेगैरे म्हणायचे सोपस्कार देखील पार पाडू नयेत.

बाप्पू's picture

19 Jan 2019 - 12:01 am | बाप्पू

सतिश पाटील,
तुम्ही मुद्दाम शेंडी वाढवलीत कि फक्त HR वर खुन्नस म्हणून???
तुम्हाला वाढवायची इच्छा असेल म्हणून वाढवली असेल तर ठीक आहे. पण खुन्नस म्हणून वाढवली असेल तर मात्र - कुछ ज्यादा ही हो गया यह तो... !!!!

लौंगी मिरची's picture

28 Jan 2019 - 8:09 am | लौंगी मिरची

मला तरी त्यांनी फक्त इथे लिहिन्यापुर्ती वाढवलेली वाटतेय ( शेंडी )
=))

सतिश पाटील's picture

30 Jan 2019 - 4:29 pm | सतिश पाटील

फुकट आमचे कौतुक करा किंवा उगाच लक्ष वेधून घ्याव्या अश्या सवयी नाहीत आम्हाला.

ऑफिस ला आपण कशाला जातो हे कधीच विसरता कामा नये.
आपण आपलं काम चोख करणे कामापुरता च स्टाफ शी संबंध ठेवणे
कान डोळे उघडे ठेवून आपल्या शी कोण राजकारण करत नाही ना ह्या वर लक्ष ठेवणे .
आणि थोडा जरी वास आला तरी विरोध करने ओपनली नाही गुप्तपणे .
स्त्री ह्या प्राण्या पासून खूप खूप लांबच अंतर ठेवणे .सुंदर स्त्रिया office chya बाहेर पण आसतात हे सत्य मान्य करने .
बस सर्व सोप आसात मग manage Karne

खिलजि's picture

21 Jan 2019 - 2:01 pm | खिलजि

1) ऑफिस मध्ये पुरुषांना ड्रेस कोड आहे हे माहिती आहे. माझ्या मते फॉर्मल शर्ट आणि पॅन्ट, आणि फॉर्मल शूस. त्यात परत शर्ट आणि पॅन्ट प्लेन पाहिजे. डिझाईन किंवा ब्रॉड लायनिंग नासावी, शूस पॉलिश केलेले असावेत. इ इ खूप बारकावे आहेत. बहुतांश पुरुष लोक हे कटाक्षाने पाळतात. हेच स्त्रियांच्या नेमकी फॉर्मल ची डेफिनेशन काय आहे? त्यांनी काहीही म्हणजे अगदी निम्म्या नग्न असलेल्या शॉर्ट घातल्या तरी ते फॉर्मल च आणि पंजाबी ड्रेस घातला तरी ते फॉर्मल. एच आर लोक पुरुष कर्मचारी वर्गाला कित्येकदा फॉर्मल नाहीये म्हणून समज देतात. तेच महिलांच्या बाबतीत बोटचेपे धोरण का?

असे नाही कि महिलांबद्दल बोटचेपे धोरण असते . त्यांनाही नियम लागू असतात पण काही स्त्रिया इतक्या बिनधास्त आणि बदमाश असतात कि काही विचारू नका . त्यांना हे असे काही भव्यदिव्य करून , कायम चर्चेत राहायला आवडते . त्यामुळे त्या बहुधा अश्या वागत असाव्यात . आणि हे नियम बनवणारे लोकहि त्यांना सांगून सांगून थकतात आणि नंतर दुर्लक्ष करतात .

पुरुष हे सर्व निमूटपणे सहन करतात त्यामागे त्यांचा कुटुंबप्रमुखपणा कारणीभूत असतो . त्यांना अशी अचानक या अश्या फालतू मुद्दयांमुळे गादीवर लाथ बसलेली चालत नाही . आणि अचानक बसलेली तर मुळीच नाही .. कारण एकच इ एम आय .. हा इ एम आय च पुरुषीपणाची आयमाय एक करतो आणि मग त्या पुरुषाचं बनतंएक भू भू करणारं पॉमेरियन पिल्लू . जे फक्त शेपटी हलवू शकत आणि भू भू करू शकत ..जास्तीत जास्त कुणाच्या तरी उघड्या दानपेटीत एक रुपयाची दक्षिणा टाकू शकत आणि मग बाथरूम मध्ये जाऊन हलकं होऊ शकत दुसरं काही नाही ..

2) ऑफिस मध्ये मुस्लिम लोकांनी डोक्यावर टोप्या घालणे (त्यांच्या स्वतःच्या :D) हे कुठपर्यंत ठीक आहे?
हे फॉर्मल च्या डेफिनेशन मध्ये बसते का? आणि मग बसत असेल तर आपण गांधी टोपी किंवा भगवी टोपी घालून गेले तर चालेल का?
इमॅजिनेशन करून हसू येईल पण आजकाल आमच्या ऑफिस मध्ये या टोप्या जास्तच होत चालल्या आहेत. त्यामुळे सिरिअसली हा प्रश्न विचारत आहे. HR मधले कोणी मिपाकर त्यांच्या कंपनी तील अश्या टोप्याबद्दलची policy सांगू शकतील का ? कि धार्मिक सौदार्ह्य या नावाखाली हे चालवावे लागते?

बरोबर आहे .. हा मुद्दा पटण्यासारखा आहे . आमच्या इथेही हे चालते . आम्ही बाहेर गेलो हुंदडायला कि मज्जाव , आणि हे नमाज पढून आले तरी ठीक .. मी विरोध केला होता तेव्हा कुठे आता त्यांना तो वेळ ज्यादा काम करून भरून द्यावा लागतो .. टोपी वगैरेवर माझा आक्षेप नाही कारण मी स्वतः पाच सहा महिने दाढ्या मिश्या वाढवून फिरत असतो .

3) इंग्रजी लोकांची भाषा आपण बोलतो हे ठीक आहे पण ओढून ताणून त्यांच्या अक्सेंट ची कॉपी करण्याचा प्रयत्न करणे ठीक आहे का? माझ्या ऑफिस मध्ये काही लोक विनाकारण काही उच्चार चुकीचे (माझ्या मते ) करतात. जसे कि डाउन ला डॉsssन, कॅन ला खैन किंवा शेवटचा एखादा शब्द अस्पष्ट बोलणे जसे कि टूगेदर ला टुगेद. अश्या पद्धतीने बोलून पुढच्यावर छाप पडता येते का? कि हा निव्वळ एक फार्स आहे,? मी जी इंग्रजी बोलतो ती समोरच्या ला नीट समजते. पण असे तोंड वेडेवाकडे करून बोलल्यावर जास्त चांगली समजते का?? :द

मी अश्या लोकांची यथेच्छ टेर खेचतो तेही गावंढळ भाषेत .. एकदा वादही झाला होता.

4) ऑफिस मध्ये तुम्ही एखादा प्रोजेक्ट वर काम करता आणि अचानक कोणीतरी येऊन तो प्रोजेक्ट किंवा ती आयडिया हायजॅक करून स्वतः च्या नावावर खपवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्यात यशस्वी होतो. अश्या सिच्युएशन कश्या पद्धतीने हाताळाव्यात?

मुळात अश्या गोष्टी हाताळणे कठीण आहे .. त्यासाठी तूम्हाला तुमचे इतर नेटवर्क नीट ठेवावे लागते. हे पोपटराव जिथेतिथे असतात . पण त्यांना तुमच्या साहेबासमोर आणणे आणि त्याचे व्यवस्थित सत्कार करणे तोही योग्यवेळी गरजेचे असते .. सुदैवाने मी अश्या ठिकाणी काम करतो जिथे तुम्हाला तुम्ही काम केलेल्या गोष्टी इतक्या सहजासहजी चोरता येत नाहीत आणि चोरल्या तरी काहीतरी लूपहोल मी स्वतःकडे राखून ठेवतो म्हणजे त्या पोपटरावाला माझे पाय धरणे आले . .

5) माझे असे निरीक्षण आहे कि साऊथ चे लोक तामिळ, मल्याळी, हैदराबादी, ओरिया (ओडिसा ) हे लोक आपल्या इकडच्या लोकांना आप आपल्या ऑफिस मध्ये व्यवस्थित रित्या प्लांट (किंवा सेटल ) करण्याचा प्रयत्न करतात. मराठी लोक या बाबतीत खूप मागे आहेत. किंवा मराठी लोक एक दुसऱ्याला मागे पडायला बघतात. मिपाकरांची मते काय आहेत?

मला हे मान्य नाही कारण असे जरी केले तरी त्याने फारसा पडत नाही . जर तो उमेदवार त्या लायकीचाच नसेल तर त्याविरुध्ध आवाजही उठवत येतो .. सरकारी दफ्तारी हे सर्व ठीक आहे पण संशोधनामध्ये आपल्याला हे माझे लोक ते त्यांचे असे करत येत नाही . तिथे तुम्हाला जे चांगले आहे तेच घ्यावे लागते अन्यथा वाटोळे अटळ आहे . तुमचेही आणि त्या प्रयोगशाळेचेही . मी तुम्हाला सांगतो , आजही माझ्या इथे संपूर्ण भारत सामावला आहे .. अक्षरशः मिझोरामवरूनही लोक इथे काम करत आहेत . पण तुम्हाला सांगू , ते अक्षरशः सोडून जाताना ढसाढसा रडतात .. कारण एकंच , राजकारण मुक्त वातावरण .. याच ओढीने बरेचसे सोडून गेलेले परतही येतात .. तात्पर्य , तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला परत मिळेल आणि तेही लाखपटीने ..

6) एखादी व्यक्ती ऑफिस मध्ये आवडत नसेल, त्याला करणे अनेक असू शकतात पण मी फक्त ऑफिस च्या कामाशी निगडित असलेल्या कारणांबाबत बोलतोय. अश्या लोकांना कसे हॅन्डल करावे? त्यांच्याशी साप भी मरे और लाठी भी ना तुटे या उक्ती नुसार कसे वागावे?

यात मला वाटत मी बराच निपुण आहे .. हे माझे नाही तर माझ्या साहेबाचे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱयांचे हि मत आहे .. मी कामावरून अंबरेच वाद घालतो इतके कि त्याची आईबहिणही काढतो पण नंतर कसे ते देव जाणे पण त्याच्याबरोबर चहापाणी आणि खेळमेळीने बोलतो .. असे कि जणू काह्ही झालेच नाही आहे .. मिठी काय मारतो आणि जोक काय .. एकंदरीत वातावरण निवळून जाते आणि परत शक्यतो त्याच्याकडूनतरी असे घडत नाही ..

नाखु's picture

21 Jan 2019 - 10:24 pm | नाखु

प्रतिसाद आवडला.

उघडपणे धर्माधिष्ठित कार्यप्रणाली असूनही नसल्याचेच भासवणार्या कंपनीतील य:किंशचित कर्मचारी वाचकांची पत्रेवाला नाखु पांढरपेशा

वीणा३'s picture

22 Jan 2019 - 1:38 am | वीणा३

समीरसूर आणि चिनार, हा तुम्हाला व्यक्तिगत प्रतिसाद नाही, आतापर्यंत अनेक लोकांकडून या प्रकाचे प्रश्न ऐकलेत तेव्हा मनात आलेले विचार
===================================================
हा प्रकार आमच्या कार्यालयात देखील आहे लोक अतिशय छान छान जेवण घेऊन येतात. तरी नशीब चिकन मटण बंद केलाय. तरी काही जण रसमलाई घेऊन येतात कि बादलीभर लाळ गाळल्यावरच चित्त थाऱ्यावर येत. मुळात स्वतःच्या डब्यात जेवायला असे छान पदार्थ घेऊन येणार्यांची मानसिकता मला कळलेली नाही. डब्यात स्वतःसाठी चांगले पदार्थ घेऊन येणार्यांची भूमिका / मानसिकता कळलीच पाहिजे.
- योग्य प्रश्न. म्हणजे जे काही डब्यात आणाल ते सर्वाना दिसेल हे माहित आहे. मग बाकीच्यांनी डब्याकडे बघावं कि नाही, कि बघून न बघिल्यासारखं करावं ह्याविषयी त्या डबेवाल्याला काय वाटत नेमकं? आणि हा प्रश्न फक्त फक्त चिकन मटण बद्दल नाही तर पोळी भाजी बद्दल पण आहे.
=======================================================
यात जेवणाच्या ऐवजी कार / महागडी घड्याळ / महागडे कपडे / महागडे फोन या सगळ्या गोष्टी येतात. मुळात आपल्या कडे जे काही चांगलं आहे त्याच लोकांनी कौतुक करावं हि प्रत्येकाची अपेक्षा असते. फेसबुक उगाच लोकप्रिय नाहीये. पण त्याचबरोबर ते कौतुक व्यक्त करण्याची एक पद्धत पण असते. त्या पद्धतीच्या बाहेर गेलं कि प्रॉब्लेम चालू होतो. असं गृहीत धारा कि प्रतिक्रिया देणारी व्यक्ती फक्त कलीग आहे, जास्त ओळख नाही मैत्री नाही. तुम्हाला खालीलपैकी कुठली प्रतिक्रिया आवडेल ?
उदा
१. तुम्ही दिसायला खूप हँडसम आहेत, ६ पॅक इ आहेत आणि ते दाखवणारा शर्ट घातलाय
अ . छान दिसतोयस - तो माणूस / बाई पुढे आपल्या कामाला लागले.
ब . काहीच प्रतिक्रिया दिली नाही फक्त कामाचं बोलून निघून गेला / गेली
क. सतत, जेव्हा जेव्हा तुम्ही समोर आलात तेव्हा तेव्हा तुमच्या बरगड्यात डोळे खुपसून बघत राहिला /ली. आपल्या मित्र मैत्रिणीबरोबर तुमच्या कडे बघून हसत खिदळत राहिला /ली.

२. .तुम्ही महागडी कार ऑफिस ला नळीत
अ . कार छान आहे आणि काही जुजबी प्रश्न - पुढे आपल्या कमला लागला/ली
ब . काहीच प्रतिक्रिया दिली नाही फक्त कामाचं बोलून निघून गेला / गेली
क. सतत तुमच्या कार कडे बघत राहिला/ली. सतत कार चा विषय काढत राहिला / ली

मला वाटतं २नाही केसेस मध्ये बऱ्याच लोकांना अ आणि ब प्रतिक्रिया चालतील.
अ आवडेल, ब - ठीक आहे , क -राग येईल, विचित्र (inappropriate ) वाटेल.

थोडक्यात फेसबुक वर लाईक च बटण दाबण्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढाच वेळ द्यावा अशी साधारण अपेक्षा असते असं वाटतं.

- एचआर काय करतात हा वेगळा विषय आहे. तुम्हाला चूक वाटलं/ तुमच्यावर अन्याय होतोय असं वाटलं तर तुम्हालाही तक्रार करण्याचा अधिकार आहे. बायकांच्या कपड्याबद्दल एचआर पोलिसी document बघून घ्या, त्यात काय चालतं काय नाही ते नीट दिलेलं असेल. खूप उत्साही असाल तर आणि कोणी नियम मोडताना दिसल्यावर तातडीने एचआर कडे जा. नसाल तर लक्ष ठेवा कोण नियम मोडत ते, आणि एचआर तुमच्याकडे तक्रार करायला आल्यावर आम्हालाच का नियम म्हणून भावनेला हात घाला :P . हाच प्रकार टोप्यांच्या बाबतीत पण करता येईल.

आमच्या सोसायटीत मी एकदा दिवाळी ला माझ्या घराबाहेर रांगोळी काढली तर मला सोसायटीच्या मॅनेजमेंट ने नोटीस दिली. मी जाऊन सांगून आले कि सगळ्यांना ख्रिसमस, हॅलोविन डेकोरेशन बाहेर ठेवायला बंदी करा मी रांगोळी साफ करते. काय बोलले नाहीत. बोलल्याविण होत नाही रे आधी बोलालेची पाहिजे :D

मुद्दा ३ - या लोकांकडे दुर्लक्ष करा. कामाचं बोलत असाल तर स्वतःला समजेपर्यंत सांगायला लावा. आत्मविश्वासाने यांच्या समोर वागा.
मुद्दा ४. हि शिकण्याची गोष्ट आहे. स्वतःच्या कामाची जाहिरात करायला शिका. त्यासाठी ढोल बडवायची गरज नसते. नेमक्या वेळी एखाद्या वाक्याने सुद्धा काम होऊ शकत
मुद्दा ५ - काय विशेष अनुभव नाही. "डोक्यावर बर्फ तोंडात साखर" हा नियम पळाला तर सगळे मदत करतात. तुमच्या बरोबर सगळ्यांची मैत्री होते.
मुद्दा ६. जेवढ्यास तेवढे. त्याशिवाय इलाज नाही.

बाप्पू's picture

23 Jan 2019 - 9:24 am | बाप्पू

प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद.
चर्चा काहीशी नैतिकता आणि पुरुषांची स्त्रियांबद्दल ची मानसिकता याकडे वळली. परंतु या चर्चे चा विषय हा नव्हता तरीही उठसुठ पुरुषांवर तोंडसुख घेणाऱ्या लोकांनी काही काळासाठी हा धागा हायजॅक केला होता. या लोकांचे म्हणणे आहे कि ऑफिस मध्ये कोण काय घालतो हे पाहण्यापेक्षा आपण आपले काम करावे ज्याचा आपल्याला पगार मिळतो. परंतु ऑफिस मध्ये ऑफिस सारखे वातावरण ठेवावे लागते. त्यामध्ये ड्रेस कोड हा फॅक्टर महत्वाचा आहे. आणि पुरुष वर्ग नियम व्यवस्थित पाळत असतील तर मग स्त्री वर्गाचे नेमके नियम कोणते आणि ते त्या पाळताना का दिसत नाहीत? त्यांनी खोल गळ्याचा ब्लॉउज किंवा तोकडा स्कर्ट घातला तर त्यामुळे ऑफिस मधील ड्रेस कोड शिस्त नक्कीच बिघडत असते. फॉर्मल च्या नावावर काहीही (स्कर्ट, पंजाबी, चुडीदार, साडी, शर्ट पॅन्ट, जीन्स,
सॅंडल, स्लीपर, खोल गळ्याचे फॅन्सी ड्रेस, उघड्या पाठीचे सलवार, लेहंगा, कोपरापर्यंत च्या रंगेबेरंगी बांगड्या, स्लीपर आणि सॉक्स कॉम्बिनेशन, भडक ज्वेलरी इ इ ) परिधान करण्याचे स्वातंत्र्य स्त्रियांनाच का? याबाबत HR लोक इतकेसे का सवेंदनशील नाहीयेत?

बाकी इतर प्रश्नांची मिपाकरांनी दिलेली उत्तरे आवडली.

स्त्रियांच्या वेगवेगळ्या पोषाखाबद्दल ज्यांना विरोध करायचा आहे त्यांनी आपापल्या मनुष्यबळ विभागाला इपत्र लिहून स्त्री-पुरुष सगळ्यांना कंपनीने ठरवून एकच प्रकारचा गणवेश द्यावा असे सुचवावे.
इथे चर्चा करून काय होणार?

स्त्रियांच्या वेगवेगळ्या पोषाखाबद्दल ज्यांना विरोध करायचा आहे त्यांनी आपापल्या मनुष्यबळ विभागाला इपत्र लिहून स्त्री-पुरुष सगळ्यांना कंपनीने ठरवून एकच प्रकारचा गणवेश द्यावा असे सुचवावे.

तुमची जळजळ समजली.

विरोध वेगवेगळ्या पोशाखाला नसून, फॉर्मल च्या डेफिनेशन मध्ये आपल्या आपल्या कपाटातले सगळे ड्रेस बसतात या स्त्री - मानसिकतेला आहे. बाकी मी याबद्दल वेळो वेळी Hr कडे आवाज उठवलाच आहे पण अजूनपर्यंत कसलीच कारवाई झालेली नाहीये. हाच प्रकार जर पुरुष कर्मचाऱ्याबद्दल झाला असता तर एव्हाना वॉर्निंग ई-मेल आली असती.

इथे चर्चा करून काय होणार?

हेच लॉजिक सगळ्या चर्चांना वापरले तर मिपावर काथ्याकूट नावाचा विभाग बंद करावा लागेल, कारण इथे चर्चा करून प्रत्यक्षात काहीही होत नाही. कोणताही विषय निवडा. पण चर्चा करून इतर लोकांची त्या त्या विषयावरील मते समजून येतात.

जळजळ? कोणावर? कशासाठी?

पुरुषांना खोल गळ्याचे ब्लाउज घालता येत नाहीत म्हणून माझी जळजळ होतेय?

कि त्यांना स्तन नसतात म्हणून माझी जळजळ होतेय?

एनिवे कोणते कपडे फॉर्मल आहेत आणि कोणते नाही हे प्रत्येक स्त्रीचा वॉर्डरोब चेक करून सांगणार आहे का HR?
एवढे करत बसण्याऐवजी सरळ बल्क प्रोड्यूस केलेले गणवेश देऊन टाकलेलं बरं होईल. पुरुष स्त्री दोघांना फॉर्मल शर्ट ट्राऊजर ब्लेझर.
एकेक वारासाठी एकेक रंग किंवा पॅटर्न द्या हवे तर ;)

सतिश म्हेत्रे's picture

24 Jan 2019 - 9:22 am | सतिश म्हेत्रे

थोड तरी लॉजिकल बोला.

काय इलॉजिकल वाटतंय तुम्हाला यात?

वरची सगळी चर्चा फॅट लॉजिकली आणि काहीतरी सोल्युशन मिळवण्यासाठी चालली आहे का?
असेल तर चांगला इंप्लिमेंट करता येण्यासारखा उपाय सुचवतेय.

कि उपाय नकोच आहे फक्त पब्लिकली गॉसिप करायचंय?
पण मग हे तर फारच 'बायकी' झालं कि! यु नो बायकांना फक्त त्यांची दुःखं उगाळायची असतात, त्यावर काही उपाय शोधायचा नसतो (म्हणे)....

टवाळ कार्टा's picture

24 Jan 2019 - 3:11 pm | टवाळ कार्टा

यु नो बायकांना फक्त त्यांची दुःखं उगाळायची असतात, त्यावर काही उपाय शोधायचा नसतो (म्हणे)....

खरेच आहे ते =))

ते खरेच आहेच की नाही कोण म्हणतंय?
पण इथे पुरुष कशाला बायकांसारखं दुःख उगाळत बसलेत? उपाय शोधायचा सोडून.... आणि सुचवलेल्या उपायावर जळजळ, लॉजिकल बोला वगैरे रडारड....

पुरुषांसाठी फॉर्मल कपडे ठरवताना पुरुषांचा वॉर्डरोब चेक करून ठरवतात का HR वाले??

वाद घालायचा म्हणून काहीही???

पुरुषांच्या वॉर्डरोबमध्ये किंवा एकंदरच पुरुषांच्या कपड्यांमध्ये काय काय पर्याय असतात?
शर्ट पॅन्ट, टीशर्ट जीन्स, बर्मुडा खेरीज?

सॅगी's picture

24 Jan 2019 - 1:03 pm | सॅगी

पुरुषांच्या वॉर्डरोब मध्ये जनरली कोणते कपडे असतात हे HR ला माहीत असतं आणि त्यातले फॉर्मल कोणते आणि इंफॉर्मल कोणते हे पुरुषांच्या बाबतीत व्यवस्थित ठरवलेलं असतं, कंपनीच्या ड्रेस कोड रूल्स मध्ये लिहिलेलं असतं.

स्त्रियांच्या वॉर्डरोब मध्ये जनरली कोणते कपडे असतात हे ही HR ला माहीत असतं, मग त्यातले फॉर्मल कोणते आणि इंफॉर्मल कोणते हे स्त्रियांच्या बाबतीत का ठरवले जात नाही?

मुळात हाच तर प्रश्न आहे ना धाग्याचा?

माझ्याकडे शर्ट (हाल्फ, फुल्ल, प्लेन, लायनिंग, चित्रे असणारे, रंगीबेरंगी ) टी शर्ट ( हाल्फ, फुल्ल, व्ही नेक , गोल गळ्याचे, कॉलर चे, बनियान सारखे, मेसेज लिहिलेले, चित्रे असलेले)
पॅन्ट ( फुल्ल, हाल्फ, 3/4th, बर्मुडा, नाडी असलेली, पायात घोळणारी, कॉटन ची, जीन्स ची, गुढघ्याजवळ फाटलेली, कार्गो पॅन्ट, पायजमा, ट्रॅकसूट इ )

सलवार, कुर्ता, लग्नातला ब्लेझर, धोतर, टोपी, संग्राम फेम कुर्ता आणि अजून बरेच काही आहे. इतके ऑपशन आहेत परंतु तरीही ऑफिस ला जाताना यापैकी फक्त ऑफिस च्या policy मध्ये बसणारे शर्ट आणि पॅन्ट घालतो.

हाच न्याय शूज ला pan आहे. ( स्लीपर, सॅन्डल, स्पोर्ट्स शूज, जॉगिंग शूज इ असून सुद्धा रोज तेच तेच काळे शूज घालावे लागतात. )

आणि हे सर्व बऱ्यापैकी पुरुष कर्मचारी वर्ग फॉलो करतो...

आता प्लीज तुमचा वॊर्डरॉब चेक करा आणि पहा तुम्ही ऑफिस ला जाताना काय घालून जाता , आणि नक्की ते फॉर्मल च आहेत का? कंपनी च्या ड्रेस कोड पोलिसी मध्ये त्या सर्वांचा उल्लेख आहे का हे सर्व एकदा चेक करा.

या सर्वातून बहुतांश स्त्री वर्ग ड्रेस कोड फॉलो करत नाही हे एवढेच सांगायचे होते.

> आणि हे सर्व बऱ्यापैकी पुरुष कर्मचारी वर्ग फॉलो करतो... > मी सांगतेय तसा गणवेश दिला सगळ्यांना तर पुरुष कर्मचाऱ्याला नक्की काय फरक पडणार आहे? फॉलो करताचयना तुम्ही सगळे नियम आधीच?

गणवेश दिला तर फरक कोणाला पडणार आहे? स्त्रियांना! मग झाला ना तुमचा प्रॉब्लेम सॉल्व? कोणाच्या ड्रेसचा गळा कसा आहे, तो किती तंग आहे, मागे/ खांद्यावर खिडक्या आहेत का, ओढणी घेतली आहे का, मांड्या दिसतायत का वगैरे सगळे प्रॉब्लेम एका फटक्यात संपले ना?

===
बादवे माझी जळजळ कशामुळे झाली होती त्याचे उत्तर देऊन कृतकृत्य करा कि मला....

तुमची जळजळ होतेय कारण तुम्ही वा विषय म्हणजे स्त्री च्या कपडे परिधान करण्याच्या स्वातंत्र्यावर हल्ला आहे या नजरेतून पाहत आहात. पण ही चर्चा फक्त कार्यालय आचारसंहिते बद्दल ची आहे.!

तुमचे वाक्य " इथे चर्चा करून काय उपयोग? हे मिपाकरांनी जर जास्त च मनावर घेतले तर मग मिपावर चर्चा करणेच बंद करावे लागेल.

उदा.
पेट्रोल डिझेल चे भाव वाढले - मोदींना तक्रार करा. मिपावर चर्चा करून काय होणार??

घरात मेडिकल प्रॉब्लेम आहे - डॉक्टर ला जाऊन भेटा. मिपावर चर्चा करून काय होणार??

काही कायदेशीर अडचणी आहेत - वकिलाला जाऊन विचारा मिपावर चर्चा करून काय होणार??

गाडी घ्यायचीय - शोरूम मध्ये जाऊन सेल्समन ला भेटा. मिपावर चर्चा करून काय होणार??

जवळपास प्रत्येक चर्चेला एक फटक्यात संपवू शकते हे वाक्य.

> तुमची जळजळ होतेय कारण तुम्ही वा विषय म्हणजे स्त्री च्या कपडे परिधान करण्याच्या स्वातंत्र्यावर हल्ला आहे या नजरेतून पाहत आहात. पण ही चर्चा फक्त कार्यालय आचारसंहिते बद्दल ची आहे.! >
गंडलय उत्तर आणि अझमप्शन.
माझे सगळे प्रतिसाद वाचले तर मी फक्त हापिसातील कपड्यांबद्दलच बोलतेय, आणि अल्टरनेट सोल्यूशन सुचवतेय हे लक्षात येईल.

स्मिता.'s picture

24 Jan 2019 - 5:34 pm | स्मिता.

माझं तरी मत असं आहे की ऑफिसमधे पोषाखाची संहिता नक्कीच असावी. त्यामुळे ऑफिसात 'प्रोफेशनल' वातावरण टिकून राहतं.

मी आधुनिक विचारांची स्त्री असूनही हे सागावसं वाटतं की ऑफिसमधे तोकडे कपडे घालणे हे खालची वैचारीक पातळीच दाखवत असते. अनेकींचा पहेराव इतका तोकडा किंवा विचित्र असतो की पुरुषच काय स्त्रियासुद्धा त्यांच्याकडे वळून वळून बघत असतात. भारतात स्त्रियांना पंजाबी ड्रेस किंवा साडी नेसण्याची परवानगी असते कारण बर्‍याच स्त्रिया पाश्चात्य पोषाख कधीच करत नाहीत (किंवा नव्हत्या म्हणू). पुरुषांना त्याची गरज नाही कारण असंही पुरुषांनी रोजच्या व्यवहारात धोतर नेसणं अनेक वर्षांपूर्वी सोडलंय.

आमच्या ऑफिसात तरी स्त्रियांकरतासुद्धा पोषाखसंहिता होती आणि ती पाळली जायची. एकदा तर HRने संहितेबाहेरचे कपडे घातलेल्या कर्मचार्‍यांना रू. ५०० चं गिफ्ट वाउचर दिलं होतं, योग्य कपडे घेण्यासाठी मदत म्हणून ;)

थोडक्यात काय, तर कश्याप्रकारचा पोषाख चालवून घ्यावा हे पूर्णपणे ऑफिसच्या पॉलिसीवर अवलंबून असते.

समीरसूर's picture

25 Jan 2019 - 11:17 am | समीरसूर

अतिशय संतुलित आणि वास्तवदर्शी प्रतिसाद. आवडला. आपण मुलींनी (कार्यालयात का असेना) तोकडे कपडे घालण्याविषयी खरा प्रतिसाद दिलात त्याबद्दल अभिनंदन! इथे काहींना हे मान्यच नाहीये की अशा तोकड्या कपड्यांमुळे प्रॉब्लेम्स होतात/होऊ शकतात. त्यांचा आपला एकच धोशा "मुलींनी वाट्टेल ते कपडे घातले तरी सगळ्यांनी त्यांचे कौतुकच केले पाहिजे आणि त्यांच्याकडे अजिबात न बघता संतपुरुषासारखे स्थिर राहिले पाहिजे". काहीतरी बिनडोक अपेक्षा!

मी जिथे राहतो तिथल्या एका इमारतीजवळ सकाळी बहुतेक सगळ्या शाळांच्या बसचा स्टॉप असतो. ही इमारत जेव्हा बांधली जात होती तेव्हा तिथे एक वॉचमन होता. परप्रांतीय होता. या इमारतीजवळ बर्‍याच तरुण स्त्रिया त्यांच्या मुला/मुलींना सोडायला येतात. मी चालून परत येत असतांना त्या वॉचमनकडे बघत असे. कित्येक स्त्रिया घरच्या किंवा जिमच्या कपड्यांवर यायच्या. अजूनही येत असतील. माझे सकाळचे चालणे १० महिन्यांपासून बंद आहे. त्यावेळेस मी रोज निरीक्षण करायचो. वॉचमनच्या नजरेत वखवख स्पष्ट दिसायची. जिमचे किंवा जिममध्ये घालतात तसे तंग कपडे घालून स्त्रिया अर्धा तास तिथे उभ्या असायच्या. काहींच्या थोड्या मोठ्या मुलीदेखील तिथे असायच्या. तो वॉचमन अधाशासारखा हे सगळं पाहत असायचा. तो त्याच्या युपी किंवा बिहारच्या घरापासून हजार किलोमीटर लांब! एकटा. तरुण. जेमतेम २५ च्या आतबाहेर. गरीब. महिन्याचा जेमतेम सात-आठ हजार पगार. त्यातून एक-दोन हजार तो त्याच्या घरी पाठवत असणार. दिवसभर रस्त्यावरची सुखवस्तू, सुखद वर्दळ पाहतांना त्याला काय वाटत असेल याची कल्पना सहजच करता येते. भयंकर उपासमार झालेल्या माणसासमोर कुणी जर सुग्रास अन्नावर ताव मारत असेल तर त्याच्या तोंडाला पाणी सुटणारच. त्याचा तसा दोष नाहीच पण म्हणून अशा भावनांना वेसण घालणे जमले नाही तर काय होऊ शकते याची हजारो उदाहरणे भारतात आहेत. रोज अशी कित्येक उदाहरणे जन्म घेतच असतात. अशा कृत्यांना सरसकट विकृती म्हणणे योग्य असले/नसले तरी अशा विकृती/अविचार जगात असतातच; त्या कधीच जाणार नाहीत. अशी अपेक्षा ठेवणंच मुळी भाबडेपणाचं आहे.

आमच्या कार्यालयात २९ जानेवारी २०१७ (रविवार) रोजी एका सेक्युरिटी गार्डने एका तरुण मुलीचा एका मीटींग रूममध्ये काँप्युटरच्या वायरने गळा आवळून खून केला होता. तो तिच्याकडे एकटक बघत असायचा. तिने त्याला तक्रारीची धमकी दिली होती. त्याच्याशी भांडली होती. मुळात तो गार्ड होता. गरीब. कमी शिकलेला. घरापासून हजारभर किलोमीटर लांब. कार्यालयात तरुण, आकर्षक, उत्तेजक कपड्यांमधल्या मुली बघून त्याचे डोळे न दिपते तर नवलच. पण तो एक किरकोळ गार्ड आहे म्हणून त्याच्याशी पातळी सोडून भांडणे हे त्याला रुचले नाही. त्या मुलीने त्या गार्डच्या नकळत त्याच्या वरिष्ठांना सांगीतले असते तर त्याची ताबडतोब दुसर्‍या इमारतीत किंवा दुसर्‍या लांबच्या कंपनीमध्ये उचलबांगडी झाली असती. किंवा त्याला रजा दिली असती. त्या मुलीचा जीव सहजच वाचला असता. समोरच्याच्या साध्याशा चुकीवर भडकून तमाशे करणे हे काही प्रत्येक समस्येवरचे उत्तर असू शकत नाही. दुर्दैवाने त्या मुलीला ही समज नव्हती.

आजकाल वयाच्या ७-८ वर्षांपासून पुढच्या मुलींचे कपडेदेखील चिंतेचा विषय वाटतो. या वयात मुली झपाट्याने वाढत असतात. सुखवस्तू कुटुंबातल्या असल्याने या वयातल्या मुलींची वाढ शरीरावर दिसत असते. पार्किंगमध्ये, पार्कमध्ये, बाहेर कुठेही अशा मुली तंग कपडे घालून फिरतात तेव्हा आसपासच्या लोकांचे निरीक्षण करा. अक्षरशः सत्तरीतले म्हातारे ज्यांच्या दिव्यातले तेल संपत आलेले आहे ते देखील अगदी न्याहाळून निरखून बघत असतात. अर्थात सगळेच असे असतात असे अजिबात नाही. मी जिथून कंपनीची बस घेतो तिथे सकाळी एक आजोबा बसलेले असायचे. वय ७०-७५ च्या घरात. सकाळी बर्‍याच कंपन्यांच्या बसेस तिथे येतात. हे आजोबा तिथे वाट बघणार्‍या मुलींना न्याहाळत असायचे. समोरून जर कुणी मुलगी/स्त्री गेली तर अपादमस्तक ती नजरेच्या टप्प्याआड जाईपर्यंत तिला बघत बसायचे.

काही गोष्टी आपल्या हातात नसतात पण काही सोप्या गोष्टी नक्कीच असतात. अगदी घाबरून, आपले स्वातंत्र्य सोडून जगायचे असे अजिबात नाही पण थोडे तरी तारतम्य ठेवून जगावेच लागते ना! आपली आणि आपल्या जवळच्या माणसांची काळजी आपण नाही घेणार तर कोण घेणार? कुचकामी सल्ले आपण प्रत्येक व्यक्तीला तर देऊ शकत नाही. ते प्रॅक्टिकल नाहीच. असे निरर्थक सल्ले देऊन दुनिया सुधरली असती तर तर आज चित्र वेगळे दिसले असते. प्रत्येक क्षणी जगाचं भान असणं आवश्यक!

गवि's picture

25 Jan 2019 - 12:09 pm | गवि

अशा भीतीने आपल्या बिल्डिंगमध्येही जिमचे कपडे घालणं टाळून किंवा अन्य काही प्रकारचे कपडे टाळून बचावात्मक पवित्र्याने सेफ कपडे घालणं हे दुर्दैवी आहे.

असं करण्याची आवश्यकता पडू नये. कोणा वॉचमन किंवा थेरड्याच्या वासनयुक्त नजरांमुळे आपल्या सवयी बदलाव्या हे फारच वाईट आहे.

ऑफिसातला मुद्दा वेगळा. तिथे कामातून विचलित न होऊ देण्याचा प्रयत्न म्हणून संकेत ठरवले जातात. ते पाळले जात नसतील किंवा एका गटालाच लागू होत असतील तर ते चूकच.

समीरसूर's picture

25 Jan 2019 - 12:27 pm | समीरसूर

पण जिमचेच कपडे असं मी म्हणत नाहीये; मी ते एक फक्त उदाहरण दिलं. अतिशय तंग कपडे हा मुद्दा आहे. इतके तंग की त्यामुळे अशा नजरा जास्तच प्रमाणात वळाव्यात. प्रत्येक अंग अगदी ठाशीवपणे दिसेल असे जर कपडे असतील तर मग मात्र नजरा वळणारच. बाकी जिमचे किंवा इतर कुठलेही नॉर्मल, बर्‍यापैकी कंफर्टेबल, स्टायलिश पण व्यवस्थित कपडे घालणं याला बंधनं नसावीत हे योग्यच. आणि नाहीतच. अजूनही ६०-७० टक्के बायका असेच कपडे घालून वावरतात.

सेफ कपडे घालायला लागणं हे दुर्दैवी खरं पण त्याला पर्याय नाही असं मला वाटतं. आणि अनसेफ कपडे (तोकडे, खोल गळ्याचे, अतितंग वगैरे) घालण्याचं तसं काही तार्किक, पटेल असं कारणही दिसत नाही. असे कपडे सर्रास घतले जातात हा मुद्दा अलाहिदा!

स्वलेकर's picture

25 Jan 2019 - 12:34 pm | स्वलेकर

छान प्रतिसाद!!!

बुर्ख्याची निर्मिती यातुनच झाली असेल ना?

समीरसूर's picture

26 Jan 2019 - 2:06 pm | समीरसूर

माहिती नाही. तो मुद्दा निराळा आणि धर्माशी निगडित आहे. इथे सुरु असलेल्या चर्चेशी तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचा अर्थाअर्थी संबंध नाही असे वाटते. एनीवे, तुम्हाला या प्रश्नाचे कधी उत्तर मिळाल्यास नक्की सांगा.

शब्दबम्बाळ's picture

25 Jan 2019 - 5:43 pm | शब्दबम्बाळ

रॉंग ऑन सो मेनी लेव्हल्स!!!!
प्रतिसाद द्यायचा कंटाळा होता खर तर पण हे सगळं वाचलं आणि खरोखर धक्काच बसला!!
किती आणि काय काय बोलायचं याच्यावर?!
विषय कार्यालयीन पोषाखावरती होता पण तो आपण बराच पुढे नेला आहे आणि त्यातूनही खूप चुकीची उदाहरणे दिलेली आहेत!

१. "

मुलींनी वाट्टेल ते कपडे घातले तरी सगळ्यांनी त्यांचे कौतुकच केले पाहिजे आणि त्यांच्याकडे अजिबात न बघता संतपुरुषासारखे स्थिर राहिले पाहिजे. काहीतरी बिनडोक अपेक्षा!

=>कौतुक करायला कोणीही सांगितले नाहीये पण "अजिबात न बघता संतपुरुषासारखे स्थिर राहायक्ला कोणाला काही प्रॉब्लेम?"
मुळात फक्त संतपुरुषच स्थिर राहू शकतात हा सिद्धांतच "गुन्हेगारांना सहानुभूती देणारा आहे"

उद्या एखादा मुलगा रात्री बर्मुडा घालून चहाला जाताना मुलींच्या घोळक्याने त्याला अडवून जबरदस्ती केली तर चालेल? "मुली चंचल असतात" असा काहीसा युक्तिवाद करून "मुलांचेच चुकले" हि गाडी रेटत नेता येईल पुढे?

कपड्यांचे भान असावे पण कमी कपडे म्हणजे सगळ्या पुरुषांना आमंत्रण असतात का? सलवार कुर्ता घातलेल्या मुली नजरेतून सुटल्या आहेत का लोकांच्या? कि साडी घातलेल्या सुटलेल्या आहेत?

२. "वॉचमनच्या नजरेत वखवख स्पष्ट दिसायची", "तो वॉचमन अधाशासारखा हे सगळं पाहत असायचा. "
=>हे आपल्याला दिसत असून आपण त्याला कधी दम दिल्याचे लिहिले तरी नाहीये (म्हणजे प्रसंग तुम्ही लिहिला आहे म्हणून तुम्हाला विचारतोय) किंवा सोसायटीला सांगून त्याला कामावरून घालवला का?
का जोपर्यंत काही घटना घडत नाही तोपर्यंत काहीच करायचं नाही?
यावर कहर म्हणजे "तो त्याच्या युपी किंवा बिहारच्या घरापासून हजार किलोमीटर लांब! एकटा. तरुण. जेमतेम २५ च्या आतबाहेर. गरीब."

त्याला कोणी आमंत्रण देऊन बोलावलंय नोकरी करायला? त्याने एखादी चोरी केली तरी याच न्याय लावाल? हे म्हणजे गुन्हेगारीला अधिकृत अधिष्ठान देणे झालं!
आणि बदल कोणी करायचा तर जे लोक जिम चे कपडे घालून बाहेर येतायत त्यांनी (त्यात पण स्त्रियाच नाही का?), वॉचमन मध्ये बदल करणे गैरच असावे.

३. "भयंकर उपासमार झालेल्या माणसासमोर कुणी जर सुग्रास अन्नावर ताव मारत असेल तर त्याच्या तोंडाला पाणी सुटणारच. त्याचा तसा दोष नाहीच"
=>काही लिहायची पण गरज नाही खर तर!! असं कोणी लिहू शकत याचाच आश्चर्य वाटतंय! "तोंडाला पाणी सुटणार?" "त्याचा दोष नाही?"
काय मानसिकता आहे हि? आणि कुठून येतेय?

४. मुलीचा खून झाल्याची घटना बहुतेक पुण्यात इन्फी मध्ये झालेली त्यानंतर तुमची वाक्य पहा.
वॉचमनच्या साठी : "मुळात तो गार्ड होता. गरीब. कमी शिकलेला. घरापासून हजारभर किलोमीटर लांब. कार्यालयात तरुण, आकर्षक, उत्तेजक कपड्यांमधल्या मुली बघून त्याचे डोळे न दिपते तर नवलच. "

आणि मुलीच्या बाबतीत: "त्या मुलीचा जीव सहजच वाचला असता. समोरच्याच्या साध्याशा चुकीवर भडकून तमाशे करणे हे काही प्रत्येक समस्येवरचे उत्तर असू शकत नाही. दुर्दैवाने त्या मुलीला ही समज नव्हती."

भडकणे! तेही दुसऱ्याच्या चुकीवर.... हि मुलीची चूक होती तुमच्या मते! म्हणजे तो बघतोय तर बघु देत पण भडकू नका... धन्य आहात!

शेवटचे वाक्य पटले तुमचे त्यात भर घालून म्हणेन "लोकांनी असे निरर्थक सल्ले न देऊन दुनिया सुधरली असती तर तर आज चित्र वेगळे दिसले असते. "

राग तुमच्यावर नाही पण गुन्हेगारांना सहानुभूती देऊन मुलींनाच दोषी ठरवणारी मनोवृत्ती फारच चुकीची आहे.

बाकी, कार्यालयात कपड्यांचे नियम असावेत कि नसावेत हा त्या व्यवस्थापनाचा निर्णय आहे जर असतील तर सगळ्यांना असावेत आणि नसतील तर कोणालाही नसावेत.

स्रुजा's picture

25 Jan 2019 - 10:14 pm | स्रुजा

चला ! एक तरी विवेकी प्रतिसाद दिसला या धाग्यावर .. समीरसूर चे प्रतिसाद वाचून हबकायलाच झालं होतं. येता जाता दिसणार्‍या दुर्दैवी उदाहरणांवर पण सोयीस्कर मानसिकतेने कसा नॅरेटीव बदलता येतो याचं उत्तम प्रदर्शन आहे त्यांचे प्रतिसाद म्हणजे. एनिवे , हे काही एवढ्यात बदलत नाही. मिपावर चर्चा करुन काय होणार आहे ;)

मिपावर चर्चा करुन काय होणार आहे ;) हे खरंच पण ज्या आपल्या हातातल्या गोष्टी आहेत त्यावर चर्चेने उपयोग होऊ शकतो. :-)

बाकी मला अजून मुली तोकडे, खोल गळ्याचे, वगैरे कपडे का घालतात याचं उत्तर मिळालेलं नाहीये. अतिशय सोयिस्करपणे या प्रश्नाला बगल दिली जातेय. :-) असो.

एमी's picture

26 Jan 2019 - 6:29 am | एमी

अगदी माझ्या मनातलं!

आपला प्रतिसाद वैचारिक आणि सैद्धांतिक पातळीवर अगदी बरोबरच आहे; माझा मुद्दा आहे की आजच्या काळात व्यावहारिकदृष्ट्या शक्य आहे का? वैचारिक, सैद्धांतिक, तात्विक वगैरे पातळीवर अनेक आदर्श गोष्टी १००% बरोबरच असतात. दुर्दैवाने खर्‍या जगात त्यांना फारशी किंमत नसते. आणि जग आपल्या तत्वांनुसार चालत नाही.

स्थिर रहाण्याला काय प्रॉब्लेम हाच प्रश्न किती सैद्धांतिक आहे. असं शक्य आहे का? असं खरंच जगात घडतंय का? बाहेर ९५% स्थिर प्रवृत्तीची माणसे आहेत असे चित्र आहे का?

बाकी जी विषमता मी सांगीतली तो एक सामाजिक प्रश्न आहे. गुन्हेगारीची पाळेमुळे तिथे रुजतात हे सत्य नाकारून कसे चालेल? आपण त्याबाबतीत काय आणि किती तात्विक विचार करतो याला खरोखर किती महत्व आहे?

मुलींकडे बघणे ही सर्वांसमोर भांडण करण्याएवढी घटना आहे? हेच जर तिच्या एखाद्या वरिष्ठ अधिकार्‍याने केलं असतं तर ती अशीच वागली असती? गार्ड चुकीचाच होता पण त्याला अधिक संयतपणे हँडल करता आलं असतं हे माझं मत. आणि कंपनीमध्ये एकंदरित बर्‍याच लोकांचं असच मत होतं. जीव गेला त्या मुलीचा हे विसरून कसं चालेल?

प्रश्न मी दम देण्याचा - असे कितीतरी वॉचमन, गार्ड्स असतात. असे अजून कितीतरी लोक असतात. जो दिसेल त्याला मी दम देत सुटणे किती सयुक्तिक आहे तुम्हीच विचार करून बघा. शिवाय असं बेधडक कन्फ्रण्ट करायला लोकं बिचकतात कारण आजकाल कोण कसे डूख मनात धरून काय करेल याचा नेम नाही. असं सिंबागिरी करायला हा सिनेमा नाही. कथा-कादंबरी नाही.

असो.

माझा वरील प्रतिसाद शब्दबंबाळ यांच्या प्रतिसादासाठी आहे.

पुंबा's picture

30 Jan 2019 - 1:29 pm | पुंबा

++++१११११
गुन्हेगारांना, गुन्हेगारीच्या मागच्या विकृत वृत्तीला खतपाणी घालणारे प्रतिसाद आहेत लेखकाचे.

स्मिता.'s picture

25 Jan 2019 - 6:36 pm | स्मिता.

समीरसूर, तुमचे इतर ठिकाणी लिखाण पटत असले तरी वरचा प्रतिसाद काहीसा खटकला. (तुमची कळकळ पोहोचली ... पण कारणमीमांसा नाही)

मी मा़झं मत कार्यालयातल्या पहेरावावर दिलं, रस्त्यावरच्या कॅज्युअल पोषाखासाठी नाही. तुम्ही कदाचित विचार करता करता सगळीकडच्याच स्त्रियांच्या पोषाखावर पोहोचलात. तुम्ही सांगितलेलं बचावात्मक धोरण बहुतेक मध्यमवर्गीय घरांमधून दिसतं, मीसुद्धा तेच करते. पण येवढं सांगू शकते की वरच्या वॉचमनच्या उदाहरणात बसस्टॉपवरच्या स्त्रिया अंगभर, ढगळ, ओढणी 'व्यवस्थित' पांघरलेला असा पंजाबी ड्रेस घालून आल्या असत्या तरी त्या वॉचमनने त्यांना तसंच पाहिलं असतं. त्याची कारणं शोधणं हा वेगळा विषय. पण त्यात त्या वॉचमनचा दोष नाही हे मात्र मनाला पटत नाही. दुसर्‍या एका प्रतिसादात आल्याप्रमाणे जर त्या वॉचमनने सोसायटीत चोरी केली तरी त्याला अशीच सहानुभूती दाखवाल का?

दुसरा विचारः पण सध्या हीच दुर्दैवी वस्तुस्थिती आहे हे सुद्धा नाकारता येत नाही.

समीरसूर's picture

26 Jan 2019 - 1:34 pm | समीरसूर

ढगळ कपड्यातल्या मुलीकडेही त्याने तसंच पाहिलं असतं हे खरंच. पण तोकडे कपडे घातलेल्या मुलीकडे त्याचं तसं बघण्याची इंटेसिटी जास्त असू शकेल का? कुठलेतरी गैरकृत्य करण्यास तो धजावेल इतकी?

बाय द वे, आपले प्रतिसाद सगळ्यात संयत, दोन्ही बाजूंचा विचार करून लिहिलेले, आणि वैयक्तिक इज्जत न काढणारे आहेत हे नमूद करू इच्छितो. :-) धन्यवाद.

पिलीयन रायडर's picture

26 Jan 2019 - 12:20 am | पिलीयन रायडर

समोरच्याच्या साध्याशा चुकीवर भडकून तमाशे करणे हे काही प्रत्येक समस्येवरचे उत्तर असू शकत नाही. दुर्दैवाने त्या मुलीला ही समज नव्हती.

त्या मुलीने केला तो तमाशाच होता आणि त्या गार्डने केली ती साधीशीच चूक होती हे इतक्या ठामपणे कसं काय म्हणताय तुम्ही? आणि ते ही इतक्या सहजपणे की त्यातून एक खून झाला ही गोष्टच नॉर्मलाईज करून टाकलीत!

बायकांनी घातलेल्या कपड्यांचा पुरुषांच्या वागणुकीशी फारसा संबंध नसतो हे कैकवेळा सिद्ध झालंय. बुरखा घातलेल्या बायकांना वळून वळून बघणाऱ्या पुरुषांचा एक फोटो सतत फिरत असतो इंटरनेटवर. बायकांनी तंग कपडे घालणं म्हणजे त्यांच्या लोकांनी आपल्याला बघावं आणि कौतुक करावं ह्या स्वभावाचा भाग आहे हे ठासून सांगितल्या जातं आणि त्या स्वभावाला बायकांनी मुरड घालायलाच हवी हे ही. पण पुरुषांच्या स्वभावाला मात्र "स्वभावच आहे त्यांचा तो, काय करणार बिचारे" ,"भुकेला माणूस, घरापासून लांब" , "boys will be boys" अशी अत्यन्त "लॉजिकल" कारणं दिली जातात.

बायकांनी घातलेल्या कपड्यावर पानं भरून लिहिताय तुम्ही. पण पुरुषांनी कसं वागावं ह्यावर 1% सुद्धा बोललं जात नाही. पुरुषांचे मेंटल कंडिशनिंग करणं जणू काही शक्यच नाहीये. बायकांनी मात्र सेफ कपडे घालावेत कारण ते "प्रॅक्टिकल" आहे. स्पष्ट म्हणा ना की ते पुरुषांच्या सोयीचं आहे. तुम्ही बायकांसाठी असलेल्या असुरक्षित वातावरणा करिता पुरुषांना जबाबदार कधी ठरवणार? पुरुष कधी जबाबदारी स्वीकारणार? दुसऱ्या माणसाने घातलेले कपडे हा आपल्या नाक खुपसण्याचा विषय नाही हे पुरुष कधी शिकणार? आणि पुरुषांमुळे त्रास होत असेल (आपल्या जवळच्या माणसांना वगैरे..) तर त्याचा भार बायकांवरच टाकायचं कधी बंद करणार? अरे एकदा तरी म्हणा की आम्ही पुरुषांनी वागणुकीत काही बदल केले पाहिजेत. (जिलेटच्या ऍडला मिळालेला रिस्पॉन्स बघता ते अवघडच आहे)

आणि एक मिनिट, तुम्ही ऑफिसमध्ये घातलेल्या कपड्यांबद्दल बोलत होतात (कितीही असभ्यपणे अनावश्यक वर्णनं करत होतात) तोवर एकवेळ ठीक होतं. पण आता तुम्ही जिमला जाणाऱ्या बायका आणि देव जाणे अजून कोण कोण ह्या चर्चेत ओढून आणलं आहे. तेव्हा मुद्दा हा तुम्हीच समस्त बायकांच्या पेहराववर नेलाय.

फक्त ऑफिस पुरता विषय असेल तर HR ला "सभ्य" भाषेत मेल करता येईल. अमी म्हणतात तसं युनिफॉर्म ठरवून देता येईल. स्त्रियांना गाईडलाईन देता येईल. ऑफिस मध्ये सगळं काही सगळ्यांसाठी समान नसतंच. जगभर स्त्रिया नाही का समान वेतना साठी लढा देत आहेत. तुम्ही ड्रेस कोडसाठी द्या. पण बायकांना वळून बघता त्याचा दोष बायकांवर काय टाकता? तसं असतं तर लहान लेकरू किंवा बुरख्यातल्या बाईला भयंकर गोष्टींना सामोरे जावे लागले नसते कधी. जगाचं भान असावं म्हणे...

तुम्ही जे जे लिहिलं आहे तसलं मी काहीही करत नाहीये. :-) तुमचं अ‍ॅनॅलिसिस वाचून मला धक्काच बसला. कृपया असला विचार करू नका. वॉचमनचं चुकलंच आहे. प्रश्नच नाही. मी दोन्ही बाजूंमधला फरक नमूद करून तिथे गुन्हा घडण्यासाठी किती पोषक वातावरण आहे हे सांगतोय. मी पुरुषांच्या मनोवृत्तीचं समर्थन वगैरे करत नाहीये. असे अगदी "स्त्रीमुक्ती" टाईप मला पुरुषी मानसिकतेचे समर्थक वगैरे लेबलं लावू नका. मी तसा नाहीये. तुमच्या प्रतिसादात तुम्ही अतिअ‍ॅनॅलिसिस (जरा जास्तच) करून अगदी संबंध नसलेले निष्कर्ष काढता आहात.

मी फक्त बाहेरच्या जगात काय चाललंय आणि त्यातलं फारच थोडं आपल्या हातात आहे हे सांगतोय. तुमच्या सगळ्या सुपर अ‍ॅनॅलिसिसचं माझ्याकडे हेच उत्तर आहे.

"कितीही असभ्यपणे अनावश्यक वर्णनं करत होतात" - असभ्य वगैरे अजिबातच नाहीये. अशी बरीच वर्णनं मिपावर आधी येऊन गेलीयेत आधी. शिवाय ते कसं सांगायचं हा प्रश्न होताच. कित्येक अनौपचारिक गप्पांमध्ये (मेन + वुमेन) कुठल्याप्रकारची भाषा नॉर्मल आहे हे बघूनच मी असे लिहिले. मला वैयक्तिकरीत्या यात आक्षेपार्ह काहीच वाटत नाही.

* आमच्या कार्यलयातल्या एका मुलीने आम्ही चहा पिऊन येत असतांना थोड्या विचित्र आडनावांचा विषय निघाला आला असता आम्हाला सांगीतले "मला सगळ्यात कॉमेडी आडनाव महाडिक वाटतं." आणि असं सांगून ती खदाखदा हसली होती आणि बाकीचे सगळेदेखील.

बाकी मला अजून मुली तोकडे, खोल गळ्याचे, वगैरे कपडे नक्की कशासाठी घालतात याचं उत्तर मिळालेलं नाहीये. अतिशय सोयिस्करपणे या प्रश्नाला बगल दिली जातेय. :-) असो.

नेत्रेश's picture

27 Jan 2019 - 1:02 am | नेत्रेश

तुमचे कळकळ समजली पण तुमच्या प्रतिसादा मागची भावना समजुन घेण्यापेक्षा शब्दाचा कीस काढला गेलेला पाहुन वाईट वाटले.

"बाकी मला अजून मुली तोकडे, खोल गळ्याचे, वगैरे कपडे नक्की कशासाठी घालतात याचं उत्तर मिळालेलं नाहीये. अतिशय सोयिस्करपणे या प्रश्नाला बगल दिली जातेय. :-) असो."

तुमच्या या प्रश्णाने उत्तर अजुनही कुणी दीले नाही, ते द्यायचा प्रयत्न करतो:

कदाचित आपण बाकीच्यांना आकर्षक वाटावे, लोकांनी आपल्याकडे वळुन पहावे अशी अशी सर्वांचीच सुप्त ईच्छा असते. त्यासाठी काही केस रंगवतात, मेकप, कपडे, हेअरस्टाईल, इत्यादीवर वेळ व पैसा खर्च करतात. (त्यात काही चुकीचे करत आहेत असे म्हणायचे नाही). अंगप्रदर्शन करणारे कपडे घालण्यामागे आपण ४ जणांत जास्त उठुन दीसावे, जास्त लोकांनी आपल्याला नोटीस करावे, आपल्या सुडौल व प्रमाणबध्द शरीराला अ‍ॅप्रिशीएट करावे हा उद्येश असावा.

पण 'मी कसेही कपडे घालेन, लोकांनी माझ्याकडे वाईट नजरेंने बघु नये' हे म्हणणे आणी 'चोरी करणे गुन्हा आहे, व तो कुणी करु नये, मी माझ्या घराला कडी / कुलुप लावणार नाही' असा पवित्रा घेणे यात फारसा काही फरक नाही. उघडे टाकलेले घर म्हणजे चोरी करण्यासाठी परवानगी नव्हे, पण झालेल्या चोरीसाठी काही प्रमाणात घरमालक जबाबदार ठरतो. (ईंशुरंस कंपन्या कायदेशीररीत्या मालकाला जबाबदार ठरउन भरपाई नाकारु शकतात). आपल्या मालमत्तेचे व शरीराचे संरक्षण करण्याची प्राथमीक जबाबदारी आपली स्वतःची असते हे वाद घालण्यासाठी प्रतिसाद देणार्‍यांना हे समजावणे अशक्य आहे. ज्या समाजात लोकांना बेसिक डीसेंसी समजत नाही (कुठेही थुंकणे / कचरा टाकणे, वहातुकीचे नियम पाळणे, ईत्यादी ) त्या समाजातील सर्वांचा आपल्या भावनांवर, विचारावर, ईंद्रींयांवर १००% काबु असावा ही भाबडी (व अवास्तव) अपेक्षा आहे.

* वरील प्रतिसाद स्त्री व पुरुष दोघांनाही लागु पडतो.

अनन्त अवधुत's picture

27 Jan 2019 - 10:15 am | अनन्त अवधुत

मुळात इथे चर्चा इन्शुरन्स कंपनीने भरपाई बद्दल नाही, तर दरोडेखोरांची बाजू घेण्याबद्दल आहे. घर बंद असले तरी जबरी चोरी होते, आणि दार उघडे ठेवले तरी चोरी होते. दार उघडे होते म्हणून चोर आत शिरले यात चोरांचा काय दोष असे म्ह्णून चोरीचे नैतिक समर्थन देता येत नाही.

समीरसूर's picture

27 Jan 2019 - 1:40 pm | समीरसूर

अहो दादा, इथे दरोडेखोरांची बाजू कुणीही घेत नाहीये! ते माझे नातेवाईक नाहीत. मुद्दा हा आहे की दरोडेखोर कधी, कुठे, किती क्रूर पद्धतीने हल्ला करतील याचा नेम नाही म्हणून आपल्या घराची सुरक्षा व्यवस्थित ठेवणे हा आहे. दरोडे पडले तरी चालतील, मी माझे घर सताड उघडे ठेवेल; हे माझं घर आहे आणि मी ते वाट्टेल तसे उघडे ठेवेल असे करून नाही ना चालत? जरा मुद्दा समजून घ्या. नैतिक-बितिकचा संबंधच नाहीये इथे!

स्वलिखित's picture

27 Jan 2019 - 10:53 pm | स्वलिखित

नाण्याला दुसरी बाजू असते हे यांना कोण सांगणार ,
तुम्ही यांना घराचे उदाहरण देताय , हे काय काय उघडे ठेवतील याचा भरवसा नाही ..

समीरसूर's picture

27 Jan 2019 - 12:10 pm | समीरसूर

आपण माझा मुद्दा योग्य पद्धतीने समजून घेतल्याबद्दल धन्यवाद! बाकी बहुतेकांनी नानाविध अ‍ॅनॅलिसिस करून अतार्किक असे निष्कर्ष काढून मुद्दा नीट समजून न घेता नुसते ठोकण्याचे धोरण ठेवले. मुद्दा निष्कारण पोलिटिसाईझ केला गेला. काही मुद्दे असे असतात की त्यांविषयी तुम्ही थोडे वेगळे मत मांडले की समाजाच्या आणि ठोकळेबाज विचार करणारांच्या दृष्टीने खलनायक, देशद्रोही, पुरुषप्रधान संस्कृतीचे पाईक, वगैरे लगेच ठरता. सध्या वुमन एमपॉवरमेंट हा असाच एक सेन्सेटिव्ह मुद्दा आहे. एक अक्षर वेगळे बोला; सगळे पॉलिटिकली करेक्ट लोक तुमच्यावर तुटून पडतात. हे दुर्दैवी आहे. वर एका प्रतिसादात तर कसले भयंकर अ‍ॅनॅलिसिस केलेले आहे. ते विद्वत्ताप्रचूर अ‍ॅनॅलिसिस वाचून मला हसावे की रडावे हेच कळेना. :-) असो. आपण अतिशय समर्पक प्रतिसाद दिलेला आहे हे नमूद करतो.

माझा वरील प्रतिसाद नेत्रेश यांच्या प्रतिसादाला आहे


अजून मुली तोकडे, खोल गळ्याचे, वगैरे कपडे नक्की कशासाठी घालतात


त्याच कारणासाठी ज्यासाठी काही तरुण दंडावरच्या बेडक्या , शेहेचाळीस इंच छाती आणि चार-सहा-आठ पॅकचं पोट उठून दिसेल असे टीशर्टस घालतात. त्याच कारणासाठी ज्यासाठी काही तरुण केविनक्लेन अंडरवेअरची पट्टी दाखवण्यासाठी लो वेस्ट जीन्स घालतात. पण त्यांच्याकडे स्त्रिया वखवखलेल्या नजरेने पाहत नसाव्यात. त्यांचा विनयभंगही होत नसावा. त्यांच्यावर बलात्कार होत नसावेत आणि त्यांचा खूनही होत नसावा.

म्हणजे प्रॉब्लेम कपड्यांचा नसून ज्यांच्या नजरेत वासना आणि मनात विकृती आहे त्यांचा आहे.

समीरसूर's picture

27 Jan 2019 - 1:52 pm | समीरसूर

माझ्या कंपनीत असे तरुण आणि अशा तरुणी याचे गुणोत्तर १:१०० असे असेल. एकूण कर्मचारी संख्या २५,०००. शिवाय, तरुण शर्टलेसदेखील वावरू शकतात; मुली वावरू शकतात काय? फरक आहेच आणि तो असणारच आहे. नाकारण्यात काय हशील? आपल्या देशात बलात्कार स्त्रियांवर होतात; पुरुषांवर होतात का? होतही असतील तर प्रमाण काय? दिवसाला संपूर्ण देशात शेकडो बलात्कार स्त्रियांवर होतात. अहो, माझा मुद्दा समजून घ्या. प्रत्यक्ष जगात काय चालतं हे बघायला पाहिजे. मी रात्री १ वाजता बिनधास्त मंगला टॉकीजवरून एकटा घरी येऊ शकतो. वाटेत लघूशंकेला थांबू शकतो. मुली/स्त्रिया हे करू शकतील काय? करू शकतील; नाही असं नाही पण किती रिस्की आहे याची कल्पना आहे का? आमच्या इथली एक मुलगी आठ दिवस कामासाठी दिल्लीला जायला तयार नाही कारण तिला दिल्लीची भीती वाटते. हे वास्तव आहे. हे तुम्ही आम्ही आपल्या स्वप्नाळू तत्वांनी नाही बदलू शकत. म्हणूनच आपण काळजी घ्यायला हवी हा माझा मुद्दा! वास्तव नाकारण्याने ते बदलत नाही.

नेत्रेश's picture

27 Jan 2019 - 2:03 am | नेत्रेश

"समोरच्याच्या साध्याशा चुकीवर भडकून तमाशे करणे हे काही प्रत्येक समस्येवरचे उत्तर असू शकत नाही. दुर्दैवाने त्या मुलीला ही समज नव्हती.

त्या मुलीने केला तो तमाशाच होता आणि त्या गार्डने केली ती साधीशीच चूक होती हे इतक्या ठामपणे कसं काय म्हणताय तुम्ही? आणि ते ही इतक्या सहजपणे की त्यातून एक खून झाला ही गोष्टच नॉर्मलाईज करून टाकलीत!"

"समोरच्याच्या साध्याशा चुकीवर भडकून तमाशे करणे हे काही प्रत्येक समस्येवरचे उत्तर असू शकत नाही." हे समिरसुर यांचे म्हणणे बरोबर आहे.

१. वाईट नजरेने बघणे ही खुन करण्याच्या तुलनेत साधी चुक वाटते.

२. विशेषतः हा गुन्हा पुरुष श्रेष्ठत्वाच्या मानसिकतेमुळे झालेला वाटतो आहे. त्या मुलीच्या ऐवजी एखाद्या मुलाने गार्डचा पाणउतारा केला तर कदाचित त्याने गुपचुप सहन केला असता. पण एका मुलीने सर्वांसमोर केलेला पाण उतारा त्याला खुप जास्त झोंबला असावा. कारण स्त्री म्हणजे पुरुषापेक्षा कमीच हे मनात कायम भीनलेले. अशी माणसे खुप धोकादायक असु शकतात हे लक्षात ठेवायला हवे. हळुहळु प्रबोधनाने लोकांचि मेंटॅलिटी बदलेल, पण ही मानसिकता उच्चशिक्षीतांमध्येही अद्यापही बर्‍याच प्रमाणात आहे. अशा माणसांचे प्रबोधन करणे सोपे काम नाही. अपमान करुन ही मेंटॅलिटी बदलणे कदापी शक्य नाही, उलट आपण स्वतःला धोक्यात घालत असतो. (पाळीव हतींना माहुत अंकुश लाउन कंट्रोल करु शकतो, पण जंगली हत्ती त्याला चिरडुन मारतील. तेव्हा जंगली हती प्रशिक्षीत होईपर्यंत वाट पहाणे ईष्ट.)

३. म्हणुनच अशा केसेसमध्ये कंपनी पॉलीसी फॉलोकरणे केव्हाही सेफ. सर्व कंपन्याची पॉलिसी असे मॅटर HR व Legal कडे रीपोर्ट करणे अशीच असते. त्याचे कारण employees ची सुरक्षीतता सर्वात महत्वाची. त्या मुलीची चुक ही की तीने कंपनी प्रोटोकॉल फॉलो केला नाही. गार्डला स्वतः जाब विचारायला गेली व त्याचा सर्वांसमोर पाणउतारा केला, परीणामतः स्वतःचा जीव गमाउन बसली. त्यात गार्डची चुक आहेच, पण त्या गार्डला फारतर ५ - १० वर्षांची शीक्षा होईल. मुलीचा गेलेला जीव काय परत येणार आहे का?

तुषार काळभोर's picture

27 Jan 2019 - 7:33 am | तुषार काळभोर

१००% सहमत.

आमची विचारसरणी अशी आहे, त्याचा कार्यकारण भाव समजून घ्या, पण तुम्ही आम्हाला उत्तेजित करणारे कपडे घालू नका. शिवाय आम्हाला चारचौघात/एकट्यानेही समज देऊ नका. नाहीतर जे काही परिणाम होतील त्याला आमची विचारसरणी कमी आणि तुमचे कपडे जास्त कारणीभूत असतील.

ही विचारसरणी केवळ घातकच नव्हे तर विकृतीचे समर्थन करणारी आहे.

'त्या' मुलीने प्रोटोकॉल फॉलो केला असता तरी, नोकरी गेल्याने/समज, दंड, शिक्षा दिल्याने त्या गार्डने सूड उगवला असता, याची शक्यता खूप जास्त आहे. एखादया पुरुषाने हेच केलं असतं तरी त्या गार्डने गुपचूप ऐकून घेतलं असतं, असं काही नाहीये.

दुसरीकडे, समजा तशाच नजरेने स्टाफ पैकी कोणी वारंवार बघितले असते, तरी त्या मुलीने/कोणत्याही मुलीने तक्रार केलीच असती. करायलाच पाहिजे.
गार्डने बघितलं, मुलीनं तक्रार केली/तमाशा केला, त्याने खून केला यात गार्डची सांस्कृतिक जडणघडण समजून घेऊन त्याला सहानुभूती दाखवण्याचा प्रश्नच येत नाही!

समीरसूर's picture

27 Jan 2019 - 1:59 pm | समीरसूर

विकृतीचे समर्थन? :-) तो गार्ड काही माझा भाऊ नव्हता. मला त्याचं नावही आठवत नाही. त्या मुलीचं मात्र आठवतं. तिचा चेहरादेखील आठवतो. आणि ती या जगात नाहीये हे ही आठवतं. माझ्या इतर प्रतिसादात मी माझा मुद्दा मांडलेला आहे त्यामुळे नव्याने या प्रतिसादाला प्रतिसाद देत नाही.

माझ्या कुठल्याच प्रतिसादात मी गुन्हेगाराचे समर्थन केलेले नाही; त्यांना सहानुभूती दिलेली नाही. मी फक्त मानसिक पातळीचं विश्लेषण करून गुन्हे घडण्यास विशिष्ट परिस्थिती/घटना कशी पोषक असते हे नमूद केलं आहे.

खून करणार्‍या गार्डचं मी समर्थन करतोय??????????????????? अहो, किती विनोदी आहे हे. :-) दहा वर्षे झाली मला मिपावर. थोडातरी विचार करा....

आमच्या कार्यालयात २९ जानेवारी २०१७ (रविवार) रोजी एका सेक्युरिटी गार्डने एका तरुण मुलीचा एका मीटींग रूममध्ये काँप्युटरच्या वायरने गळा आवळून खून केला होता. तो तिच्याकडे एकटक बघत असायचा. तिने त्याला तक्रारीची धमकी दिली होती. त्याच्याशी भांडली होती. मुळात तो गार्ड होता. गरीब. कमी शिकलेला. घरापासून हजारभर किलोमीटर लांब. कार्यालयात तरुण, आकर्षक, उत्तेजक कपड्यांमधल्या मुली बघून त्याचे डोळे न दिपते तर नवलच. पण तो एक किरकोळ गार्ड आहे म्हणून त्याच्याशी पातळी सोडून भांडणे हे त्याला रुचले नाही. त्या मुलीने त्या गार्डच्या नकळत त्याच्या वरिष्ठांना सांगीतले असते तर त्याची ताबडतोब दुसर्‍या इमारतीत किंवा दुसर्‍या लांबच्या कंपनीमध्ये उचलबांगडी झाली असती. किंवा त्याला रजा दिली असती. त्या मुलीचा जीव सहजच वाचला असता. समोरच्याच्या साध्याशा चुकीवर भडकून तमाशे करणे हे काही प्रत्येक समस्येवरचे उत्तर असू शकत नाही. दुर्दैवाने त्या मुलीला ही समज नव्हती.

सिरियस्ली????
समीरसूर, तुम्हाला नक्की हेच म्हणायचे आहे का? धक्कादायक विचार आहेत तुमचे.

एकुलता एक डॉन's picture

19 Feb 2019 - 3:01 pm | एकुलता एक डॉन

त्यांचे विचार आदर्शवाडी
नसले तरी वास्तव वादी आहे

स्मितातै, धन्यवाद सर्वप्रथम तुम्ही विषयाला अनुसरून प्रतिसाद दिल्याबद्दल.. !!

चर्चेचा विषय हा आहे कि बहुतांश स्त्रिया कार्यालयात काम करताना वेशभूषेची आचारसहिंता का पाळत नाहीत? या गोष्टीमुळे ऑफिस चे वातावरण नक्कीच बिघडते तरीही दुर्लक्ष का केले जाते या विषयावर?
हा माझा प्रश्न होता, पण नेमक्या हा मुद्दा सोडून धागा इकडे तिकडे भरकटत राहिला.
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!

धर्मराजमुटके's picture

25 Jan 2019 - 7:42 pm | धर्मराजमुटके

" मी म्हणे उगा रहावे, जे जे दिसेल ते ते पहावे"

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jan 2019 - 3:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शेवटी सारांश काय ? काय ठरलं ?

-दिलीप बिरुटे

उगा काहितरीच's picture

27 Jan 2019 - 7:54 am | उगा काहितरीच

किंचित अवांतराबद्दल क्षमस्व !

"स्त्रीयांना कसेही कपडे घालण्याचे स्वातंत्र्य हवे , त्यांच्याकडे बघताना पुरूषांना तारतम्य हवे"
असे स्पष्ट मत असलेल्या लोकांना एक साधा प्रश्न :
मी बॉडी बिल्डर आहे (समजा) अगदी पार्श्व भागावर फुलपाखरू निघण्या एवढा . तर मला दैनंदिन कामकाज करताना (बस , आॕफिस , भाजी मंडई इत्यादी ठिकाणी वावरताना ) बॉडी बिल्डर घालतात (माझे फुलपाखरू दिसेल अशी) तशी शॉर्ट घालता येईल का ?

झेन's picture

27 Jan 2019 - 8:21 am | झेन

समीरसूर यांचा सूर जरा चूकल्यासारखा वाटतो पण त्यांचा उद्देश वाईट नसावा.

जसे ट्रॅफिक मधून जाताना कोण बरोबर कोण चूक या पेक्षा आपले नूकसान न होता वेळेत पोचणे महत्त्वाचे. यात नियम न पाळणा-या माजूर्ड्या कूत्र्यांचे समर्थन नाही. त्यांचे प्रबोधन वगैरे जन्मात शक्य नाही.

तुषार काळभोर's picture

27 Jan 2019 - 10:49 am | तुषार काळभोर

म्हणून ते माजोरडे कुत्रे बिचारे किती गरीब आहे, बिचाऱ्याला वीस सेकंद सिग्नलला थांबायलासुद्धा वेळ नव्हता, बिचाऱ्याला पेट्रोल परवडत नसल्यामुळं 200 मीटर पुढे जाऊन यूटर्न घेण्याऐवजी 150 मीटर उलट्या दिशेने यावं लागलं, बिचाऱ्यांना गाडी आणि पेट्रोल परवडत नसल्यामुळे एका मोटारसायकलवर तीन जण जातात. आणि त्यांच्यामुळे तुमच्या सजवलेल्या गाडीला अपघात झाला तर तुम्ही चूक आहात. हे गरीब बिचारे असतील तिथे तुम्ही जायला नको होतं किंवा तुमची गाडी महिंद्रा जीप सारखी दणकट हवी, जेणेकरून तुमच्या गाडीला ते गरीब बिचारे धडकणार नाहीत किंवा धडकले तरी तुमच्या गाडीचं फारसं नुकसान होणार नाही किंवा झालंच तर ते सोसलं पाहिजे किंवा धडकल्यावर त्या गरीब बिचाऱ्यांना तिथेच थांबण्याची विनंती करून तुम्ही वाहतूक पोलिसांना सांगायला हवं.
पण तुम्ही तुमची नाजूक गाडी रस्त्यावर नाही आणायची आणि सजवायची तर बिलकुल नाही.

समीरसूर's picture

27 Jan 2019 - 2:19 pm | समीरसूर

अहो, तुमचं म्हणणं पटतं मला पण याला आपण काहीही करू शकत नाही हे लक्षात घ्या. हे असंच चालणार आहे. हे आपण बदलूच शकत नाही. म्हणून आपण आपली काळजी घ्यायची. माझा बंगळूरचा सहकारी हेल्मेट घालून होता. नीट चालला होता. कुठलीतरी एसयुव्ही वेगात आली आणि आदळली त्याच्या बाईकच्या मागे. कुठलीही चूक नसतांना तो गेला.

आपण हे सगळं बदलूच शकत नाही हे ल्क्षात घ्या. एक वेळ होती मला आशा होती की हे कधीतरी बदलेल पण भारतीय लोकं हे बदलण्यापलिकडे आहेत. आपण कधीच बदलणार नाही. भ्रष्टाचार, जातीभेद, गलिच्छ राजकारण, पाणीटंचाई, बकालपणा, प्रदूषण, मुजोरी, ढोंगीपणा, स्त्रीभ्रूणहत्या, गटारं झालेल्या नद्या, अप्रामाणिकपणा, आळस, वशिलेबाजी, मग्रुरी...हे सगळं असंच चालू राहणार आहे. हे आपण बदलूच शकत नाही कारण कुणाचीच बदलण्याची मुळात इच्छाच नाहीये.

समीरसूर's picture

27 Jan 2019 - 2:11 pm | समीरसूर

मी माझा मुद्दा वेगवेगळी उदाहरणे देऊन विशद केला आहे. त्यातून लोकांना माझ्या लिखाणाचा उद्देश कळू नये हे मोठे आश्चर्यच आहे.

कसलं प्रबोधन हो? जगात कुणाकुणाचं प्रबोधन करत फिरणार आहोत आपण? भारतात तरी ती अशक्य गोष्ट आहे. उगीच आदर्शवादाच्या नादाला जाण्यात काही अर्थ नाही. फूटपाथवरून बेफाम दुचाकी नेणार्‍यांना आवरून बघा म्हणा एकदा. मग कळेल आपले प्रबोधनाचे प्रयत्न किती सफल होतायेत ते. एखादा येऊन कानफाटात देऊन जाईल ते एक वेगळंच. नेमकं हेच काही लोकांना कळत नाहीये. ते आपले गुन्हेगारांचं समर्थन, पुरुषप्रधान संस्कॄतीचे समर्थक, बुरखा संस्कृतीचे समर्थक, दरोडेखोरांचं समर्थन, स्त्री स्वातंत्र्यावर घाला, विकृतीचे पुजारी वगैरे काय काय बरळत चाललेत...धन्य आहेत सगळे.

काही प्रतिसादातले अ‍ॅनॅलिसिस्/निष्कर्ष्/आरोप वगैरे वाचून मला आश्चर्यच वाटले. हसूही आले. काही प्रतिसादांमधला अतिआदर्शवाद तर भाबडेपणाचा कळस होता.

बहुतेकांनी नानाविध अ‍ॅनॅलिसिस करून अतार्किक असे निष्कर्ष काढून मुद्दा नीट समजून न घेता नुसते ठोकण्याचे धोरण ठेवले. मुद्दा निष्कारण पोलिटिसाईझ केला गेला. काही मुद्दे असे असतात की त्यांविषयी तुम्ही थोडे वेगळे मत मांडले की समाजाच्या आणि ठोकळेबाज विचार करणारांच्या दृष्टीने खलनायक, देशद्रोही, पुरुषप्रधान संस्कृतीचे पाईक, गुन्हेगारांचे समर्थक, विकृतीचे पुजारी, स्त्री स्वातंत्र्याचे विरोधक वगैरे वगैरे अगदी लगेच ठरता. सध्या वुमन एमपॉवरमेंट हा असाच एक सेन्सेटिव्ह मुद्दा आहे. एक अक्षर वेगळे बोला; सगळे पॉलिटिकली करेक्ट लोक तुमच्यावर तुटून पडतात. हे दुर्दैवी आहे. वर एका प्रतिसादात तर कसले भयंकर अ‍ॅनॅलिसिस केलेले आहे. ते विद्वत्ताप्रचूर अ‍ॅनॅलिसिस वाचून मला हसावे की रडावे हेच कळेना. :-)

४९८ अ या एका कलमाच्या आधारे कित्येक स्त्रियांनी अकारण पुरुषांना अडकवले. इतके की कोर्टाने या कलमावर विचार करण्याचे ठरवले. पण हे कुणी बोलले की सगळे स्त्री स्वातंत्र्यवादी चवताळून अंगावर येतात. ह्युमन राईट्सवाले जसे दहशतवादी मेले की गळे काढत येतात, अगदी तसे! अशा सरफेस-लेव्हलवर विचार करणार्‍या लोकांना आपली विचारशक्ती प्रगल्भ करण्याची गरज आहे. निदान मुद्दा काय आहे हे तर समजून घ्या...पण लगेच यांचा उद्धटपणा, तिरकसपणा, कुजकटपणा, वैयक्तिक हल्ले, उद्दामपणा वगैरे चालू. विनोदी आहेत आहेत सगळे! :-)

मी गुन्हेगाराचं समर्थन करत नाहीये. आपण काळजी घेणं आवश्यक आहे हे सांगतोय तर काय काय दिव्य प्रतिसाद आलेत...मजाच आहे सगळी! :-)

आय रेस्ट माय केस हिअर!

..आणि आता दहशतवादी आणि ह्युमन राईट्सवाल्यांना तुम्ही मध्ये आणलेत.. म्हणजे अजून २० - २५ प्रतिसादरूपी क्षेपणास्त्रे तुमच्यावर डागली जाणार. :D

हो, एका बाजूने ऍटोमॅट कलाश्निकोव्ह आणि दुसऱ्या बाजूने मेणबत्त्या, जय हो

एकुलता एक डॉन's picture

19 Feb 2019 - 1:59 pm | एकुलता एक डॉन

मी सामीर्सूर ह्यांच्या सहमत आहे ,आपली काळजी आपण घ्यावी

उपेक्षित's picture

28 Jan 2019 - 3:52 pm | उपेक्षित

समीर भाऊ तुम्हारा चुक्याच...

हापिस कि गाडी आईसा कैसा तुम घर पे और जिम कि तरफ लेके जाता ? फिर हमारा घोटाळा होता न ;) ;)

काही आवेशपूर्ण प्रतिसाद पाहून लयी दिसांनी मजा आली.

ट्रेड मार्क's picture

30 Jan 2019 - 7:50 am | ट्रेड मार्क

१. ऑफिसमधील ड्रेसकोड: याचे भारतात उगाच अवडंबर माजवले आहे असं वाटतं. क्लायंट येणार असेल तर किंवा तुम्हाला अगदी कुठल्या वरच्या पातळीवरच्या मीटिंग मध्ये जायचं असेल तर ठीक आहे. पण उगाच आपलं रोज एवढ्या गर्दीतून फॉर्मल घालून येणं जरा त्रासाचंच आहे. खरं तर पाय गरम आणि डोकं थंड ही झोप येण्यासाठी आदर्श स्थिती आहे. एसी मुले डोके मस्त थंडगार झालेले असते आणि सतत बुटात राहून पाय गरम झालेले असतात. अश्या परिस्थितीत मला तरी मस्त झोप येते, दुपारी जेवण झाल्यावर तर नक्कीच गपागप डोळे मिटतात.

या बाबतीत मुलींची चंगळ असते हे मात्र खरंय. विविध प्रकारचे ड्रेस आणि पादत्राणे घालता येतात आणि त्यांना कोणी बोलतही नाही. इथे आम्ही नुसता टीशर्ट घातला किंवा शर्ट खोचला नाही तर लगेच इन्फॉर्मल म्हणून सूचना मिळते. ज्यांना नियमांना बगल द्यायचीच आहे ते कसेही करून देतात. आजच Quora वर या विषयाशी संबंधित एक उत्तर वाचलं. एका ऑफिसमध्ये एक मुलगी असेच तोकडे कपडे घालून यायची, जे सरळ सरळ नियमांचं उल्लंघन होतं. पण त्याची समज त्या मुलीला देणे हे त्यावेळी उपस्थित असेल त्या सुपरवायझरचे काम असायचे. बहुतेक वेळा पुरुष सुपरवायझर असायचा आणि त्यांना हे अवघड जायचं, पण तरीही सांगितले जायचेच. एक दिवस प्रकरण जरा जास्त झाल्यावर आरडाओरडा झाला, म्हणून त्या मुलीने आपण असे तोकडे कपडे घालणार नाही म्हणून कबुल केलं. दुसऱ्या दिवशी ती मुलगी पायघोळ झगा घालून आली ज्याला अगदी वरपर्यंत स्लीट होती. त्यामुळे कोणाला कल्पना करायला पण वाव ठेवला नव्हता. आता ती स्कर्टच्या लांबीच्या नियमात बसत होती आणि ऑफिसनी बाकी अंगप्रदर्शन करू नये असे काही नियम बनवले नव्हते. तात्पर्य काय - तर ज्यांना जे करायचे असते ते ते करतात. आपण आपली खोल श्वास घ्यायची सवय ठेवायची.

२. टोप्या तर घालतातच पण विचित्र दाढी वाढवतात, २ इंच लांडी प्यांट घालतात आणि वर हातातले काम सोडून अगदी मीटिंग असली तरी नमाज पढायला जातात. अगदी पॅसेजमध्ये किंवा जागा मिळेल तिथे चादर अंथरून चालू होतात. एवढंच नव्हे तर वॉशरूममध्ये वर पाय करून बेसिनमध्ये पाय धुतात.

३. विनोदी वाटतं खरं... आपल्या सहकाऱ्यांसोबत असं बोलायची खरंच गरज नाही.

४. सर्व गोष्टी लिखित स्वरूपात ठेवाव्यात. कोणी उगाच गोड बोलत असेल तर ती धोक्याची घंटा समजावी. म्हणजे लगेच प्रतिकार करावा असे नाही, पण सावध राहावे हे नक्की.

५. तामिळ लोकांबरोबर काम करणे हा एक दिव्य अनुभव असतो. ऑफिसमध्ये, लिफ्टमध्ये एवढंच नव्हे तर मीटिंगमध्ये सुद्धा त्यांचे भाषाप्रेम उफाळून येते. ते प्रेम जपण्यासाठी शक्य तेवढे तामिळ त्यांना टीममध्ये हवे असतात. तामिळ म्यानेजर असेल तर त्याला तामिळ लोकच टीम मध्ये पाहिजे असतात. अमेरिकेत आमचा एक क्लायंट मीटिंगमध्ये सर्वांसमोर सांगायचा की त्याला टीममध्ये फक्त तामिळ लोकच पाहिजेत. मग त्याला पाहिजे ते काम आलं नाही तरी चालेल. तामिळ नसेलच तर हैद्राबादी किंवा नाईलाज म्हणून कन्नड किंवा केरळी चालेल. पण इतर राज्यांमधील कितीही चांगला रिसोर्स मात्र नाकारला जायचा.

६. न आवडणे हे दोन्ही बाजूने असू शकते. पण आपल्याला काही तिकडे कोणाशी लग्न करायचे नसते त्यामुळे जेवढ्यास तेव्हढे संबंध ठेवणे चांगले. सगळ्यात वाईट म्हणजे तुमचा बॉस किंवा तुमच्या पेक्षा वरच्या पदावरील व्यक्तीला तुम्ही न आवडणे. अशावेळेला तुम्हाला कॉर्नर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. माझे संपूर्ण २०१८ साल अश्या परिस्थितीत गेले. एवढा त्रास झाला की तो एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे.

king_of_net's picture

22 Feb 2019 - 6:36 pm | king_of_net

२. टोप्या तर घालतातच पण विचित्र दाढी वाढवतात, २ इंच लांडी प्यांट घालतात आणि वर हातातले काम सोडून अगदी मीटिंग असली तरी नमाज पढायला जातात. अगदी पॅसेजमध्ये किंवा जागा मिळेल तिथे चादर अंथरून चालू होतात. एवढंच नव्हे तर वॉशरूममध्ये वर पाय करून बेसिनमध्ये पाय धुतात.
^^^^^^^^^^^^^^^^
Wipxx का???

बाप्पू's picture

30 Jan 2019 - 7:24 pm | बाप्पू

ट्रेड मार्क,.
तुमची उत्तरे आवडली.

मुद्दा क्रमांक 2 :
पूर्ण सहमत. डोक्यावर टोपी, पायात सॅंडल, अंगात झब्बा आणि खाली पायजमा टाईप पॅन्ट, अश्या अवतारातील एका कलीग ला मला क्लायंट ला इंट्रोड्युस करावे लागले होते.. त्याला नंतर काय वाटले असेल देव जाणे..
पण त्यावेळी HR कडे मी गेलो नव्हतो कारण त्या कंपनीत तो माझा शेवटचा महिना होता.. पण जरी गेलो असतो तरी वाटत नाही कि काही ऍक्शन घेतली गेली असती...!!

काही वर्षापूर्वी, एकदा ऑफिस वॉशरूमध्ये " Do not wash legs in wash basin" असे प्रिंट करून पेपर चिटकवलेला दिसला त्यावेळी मी शॉक झालो होतो कि कायच्या काय बोर्ड लावलाय.. असे कोणी कधी करते का..
पण त्यानंतर थोड्याच दिवसात तो साग्रसंगीत पायधुनी सोहळा पाहिला आणि धन्य झालो... त्या व्यक्तीला खटकल्यानंतर तो फक्त बोलला कि करना पडता है.. वूडु का लिये..!

ट्रेड मार्क's picture

31 Jan 2019 - 3:26 am | ट्रेड मार्क

अमेरिकेत ऑफिसमध्ये मी हा पायधुनी सोहळा बघितला आणि त्या इसमाला सांगितलं की बाबारे तळमजल्यावर एक पूर्ण बाथरूम आहे जिथे तू अंघोळही करू शकतोस. पण त्याचं आपलं "नही, इधरही ठीक है" चालू झालं. मग त्याला विचारलं की इथे प्रेयर रूम आहे का? तर म्हणे तो ५-७ मैल लांब असलेल्या मशिदीत जाणार आहे. मग ऑफिसमध्ये पायधुनी करायचं प्रयोजन काय? उगाच आम्ही किती कट्टर हे दाखवणे का ते दाखवूनही कोणीच विरोध करत नाही व करू शकणार नाही म्हणून आनंद मिळवणे?

खंडेराव's picture

19 Feb 2019 - 1:00 pm | खंडेराव

"

2) ऑफिस मध्ये मुस्लिम लोकांनी डोक्यावर टोप्या घालणे (त्यांच्या स्वतःच्या :D) हे कुठपर्यंत ठीक आहे?
हे फॉर्मल च्या डेफिनेशन मध्ये बसते का? आणि मग बसत असेल तर आपण गांधी टोपी किंवा भगवी टोपी घालून गेले तर चालेल का?
इमॅजिनेशन करून हसू येईल पण आजकाल आमच्या ऑफिस मध्ये या टोप्या जास्तच होत चालल्या आहेत. त्यामुळे सिरिअसली हा प्रश्न विचारत आहे. HR मधले कोणी मिपाकर त्यांच्या कंपनी तील अश्या टोप्याबद्दलची policy सांगू शकतील का ? कि धार्मिक सौदार्ह्य या नावाखाली हे चालवावे लागते?

हे फरकाने सगळीकडेच आहे हो. इथे सौथमध्ये ४० दिवस काळे कपडे आणि बिना पादत्राणांचे भरपूर लोक्स ऑफिसला येतात..डिव्हर्सिटी चा भाग म्हणून HR या बाबतीत मोठ्या कंपन्यांमध्ये तरी सढळ असतात..

इरसाल's picture

20 Feb 2019 - 1:47 pm | इरसाल

कशाला एक रन ने आउट म्हणुन हा शंभरावा.