बांबूच्या झाडाला फुले येणे हि एक विलक्षण घटना आहे. बरीच बांबूची झाडे त्यांच्या संपूर्ण आयुष्यात ठराविक कालावधीत बहरतात व मग नष्ट होऊन जातात. हा ठराविक कालावधी बांबूच्या प्रजाती निहाय वेग-वेगळा आहे.
जसे;
1. Bambusa bambos या प्रजातीचा फुले येण्याचा कालावधी दर ३२ वर्षांनी एवढा आहे.
2. Phyllostachys bambusoides या प्रजातीचा फुले येण्याचा कालावधी दर १३० वर्षांनी एवढा आहे.
3. Chusquea abietifolia या प्रजातीचा फुले येण्याचा कालावधी दर ३२ वर्षांनी एवढा आहे.
4. Phyllostachys nigra f. henonis या प्रजातीचा फुले येण्याचा कालावधी दर ६० वर्षांनी एवढा आहे.
5. Arundinaria wightiana या प्रजातीचा फुले येण्याचा कालावधी दर ३ वर्षांनी एवढा आहे.
6. Melocanna baccifera या प्रजातीचा फुले येण्याचा कालावधी दर ५० वर्षांनी एवढा आहे.
केवळ ठराविक कालावधीने फुले येणे एवढच विलक्षण नसून, एक प्रजाती एकाच वेळी सगळी कडे फुलांनी बहरते मग ती पृथ्वीवर कोठेही असो.
झाडाला फुले येण्याबाबात जी प्रचलित थेअरी आहे त्या थेअरीने बांबूच्या झाडाला फुले येण्याचे स्पष्टीकरण देता येत नाही.
बरीचशी बांबुची झाडे समुहाने ठरावीक उच्च कालावधीत फुले उगवणारी याप्रकारात मोडत असली तरी, फुले येण्याच्या पद्धतीवरून बांबूच्या झाडांचे तीन प्रकार पडतात
1. दरवर्षी फुले येणारी बांबूची झाडे
2. समुहाने ठरावीक उच्च कालावधीत फुले उगवणारी बांबूची झाडे
3. अ-ठराविक कालावधीने फुले उगवणारी बांबूची झाडे
भारतातील मिझोरम राज्यातील जवळपास ४९% भू भाग हा Melocanna baccifera या प्रजातीच्या बांबूच्या झाडाने व्यापलेला आहे. या प्रजातीचा फुले येण्याचा कालावधी दर ५० वर्षांनी एवढा आहे. ज्यावेळी बांबूच्या झाडांना फुले येतात त्यावेळी उंदीर आणि तत्सम (rodent प्रवर्गात मोडणारे) प्राणी त्यावर तुटून पडतात. विशेषतः उंदीर यात आघाडीवर असतात. ही फुले खाऊन उंदीर खूप माजतात व त्यांचा प्रजननाचा वेग खूप वाढून जातो. कमी कालावधीतच उंदरांची संख्या जबरदस्त वाढून जाते. मग ते गोदामातील, शेतातील पिके फस्त करत सुटतात. बांबूच्या झाडाला आलेल्या फुलांच्या बहराच्या वेळी एकाच वर्षात २५ लाख उंदर गावक-यांनी मारली होती. म्हणूनच भारताच्या उत्तर पूर्व भागातील राज्यात बांबूच्या झाडाला फुले येणे म्हणजे संकट येणे असे मानले जाते.
बांबूच्या झाडांची समुहाने ठरावीक उच्च कालावधीत फुलण्या संबंधी Ecologist Mr Daniel Janzen यांनी दिलेली कारणमीमांसा, जी ब-यापैकी जगमान्य सुद्धा आहे, ती पुढील प्रमाणे आहे.
बांबूच्या झाडाला फुले उगविण्यासाठी खूप उर्जेची आवश्यकता लागते, दरवर्षी फुले उगवले तर ते खूपच अल्प असतात व इतर प्राण्यांच्या भक्षणा मुळे पुढील वंशवाढीला बीजच उरत नाहीत. म्हणून मग बांबूच्या झाडात म्युटेशन होत गेले. हे म्युटेशन, प्रामुख्याने फुले उगविण्याचा कालावधी वाढवून समुहाने एकत्रित प्रचंड प्रमाणात फुले उगवायचे जेणे करून कितीही प्राणी यावर तुटून पडले तरी पुढील वंशवाढीसाठी बीज उरतीलच, अश्या स्वरूपाचे आहे. फुले उगविण्याचा कालावधी वाढविल्याने बांबूच्या झाडाला प्रचंड प्रमाणात फुले उगविण्यासाठी आवश्यक उर्जा साठविता येते.
हे जर ग्राह्य धरलं तर, बांबूच्या झाडाने वंशवाढ व्हावी म्हणून निसर्गाच्या सहज नियमात बदल करुन स्वत:साठी वेगळी पद्धत तयार केली याला विलक्षणच म्हणावे लागेल.
अश्या विलक्षण पद्धतीने फुलणा-या बांबूच्या झाडांची फुले खाण्यासाठी त्यावर तुटून पडण्याची प्रेरणा उंदरांना होणे हे ही विलक्षणच म्हणावे लागेल. कारण ५० वर्षापूर्वी ही फुले त्यांच्या कित्येक पर पर...............पर दादांनी खाल्ली असणार!
मिझोरमच्या संकटाबाबत अधिक येथे वाचातायेईल
Ecologist Mr Daniel Janzen बाबत अधिक येथे वाचता येईल
बांबूच्या झाडांच्या फुलण्याबाबत अधिक येथे वाचता येईल 1
प्रतिक्रिया
11 Jan 2019 - 3:54 pm | ज्ञानोबाचे पैजार
लेखमाला रोचक होणार यात काही शंका नाही
पुभाप्र
पैजारबुवा,
11 Jan 2019 - 6:01 pm | दुर्गविहारी
छान माहिती. यावेळच्या साप्ताहिक सकाळच्या दिवाळी अंकात अनिल अवचट यांनी बांबुवर उत्तम लेख लिहीला आहे. त्या माहितीत आणखी थोडी भर पडली.
11 Jan 2019 - 7:47 pm | अर्धवटराव
बांबुच्या फुलांबद्दलचं आकर्षण उंदरांमधे त्यांच्या पुर्वजांकडुनच संक्रमीत होत असावं :)
11 Jan 2019 - 8:22 pm | प्रमोद देर्देकर
खूप विलक्षण.
पण मग एव्हढं बांबू येतात कसे. लागवड कशी करतात.
ते अवचट सर भारी अभ्यासपूर्ण लिखाण करतात. मागे त्यांचं पुस्तक वाचलं होतं. त्यात खायची नाग्वेलीच्या पानांवर लिहलं होतं . आताच बांबू साठी हा अंक बघायला हवा.
11 Jan 2019 - 8:37 pm | डॉ सुहास म्हात्रे
निसर्गात अश्या अनेक विलक्षण गोष्टी खजिना आहे... त्यापैकी ही एक रोचक गोष्ट आवडली. पुभाप्र.
11 Jan 2019 - 9:47 pm | Blackcat (not verified)
पण बांबूचे प्रजनन त्याच्या मुळातून कंद उगवूनही होत असेल ना ? म्हणजे बिया गरजेच्या असतीलच असे नाही ना ?
कर्दळीला बियाही येतात अन मुळातून नवे रोपही येते.
11 Jan 2019 - 9:51 pm | Blackcat (not verified)
What is the process of reproduction of Bamboo?
Answer
2
3
Follow
Request
More
Ad by BenchSci
A new antibody search engine with publication data.
Easily find antibodies from publications. Free online platform for academic scientists!
Learn More
2 ANSWERS
Jack Stone
Jack Stone, Writer
Answered Jun 10, 2016
Bamboo plants grow in clumps and then form bamboo stalks. They grow from rhizomes or seeds. As bamboo stalks grow larger, they form rhizomes. The rhizomes can spread out around the mature stalks of bamboo and grow new bamboo stalks.Bamboo plants can also self-seed. This occurs asexually whenever environmental changes affect the soil and plant growth. As the environment changes, the bamboo clump stops growing, and it instead forms flowers. The flowers fall to the ground, and their seeds then germinate in the soil. After a few weeks, a new bamboo clump can form and produce new bamboo stalks.
12 Jan 2019 - 6:09 pm | डॉ सुहास म्हात्रे
Rhizome म्हणजे seeds नव्हे तर तो जमिनीखालून जमिनीला समांतर वाढत जाणार्या खोडाचा एक प्रकार असतो. अश्या खोडाला, थोड्या थोड्या अंतरावर, जमिनीवर वाढणार्या फांद्या व जमिनीखाली राहणारी मुळे फुटत राहतात.
(Rhizome is a continuously growing horizontal underground stem which puts out lateral shoots and adventitious roots at intervals.)
थोडक्यात, एकाच Rhizome उत्पन्न झालेले बांबूचे सर्व बेट एकच झाड असते... त्याला असेक्शुल रिप्रोडक्शन बोलणे शास्त्रिय नाही... वैयक्तिक कल्पनाविलास आहे.
अवांतर : तुम्ही जेथून हा मजकूर उचलला आहे ते, Quora, एक मुक्त पोर्टल आहे. तेथिल प्रश्नाचे कोणीही उत्तर देऊ शकतो... त्यासाठी कोणतीही चाळण लावली जात नाही. म्हणून, प्रत्येक उत्तर बरोबर असेलच असे नाही. तेव्हा त्याची स्वतंत्रपणे खात्री करून घेतलेली बरी असते. :)
12 Jan 2019 - 10:53 pm | Blackcat (not verified)
They grow from rhizomes or seeds.
रायझोम म्हणजे बी नव्हे , जमिनीलगत असलेला खोडाचा भाग , ज्याला मुळे असतात , रायझोम हे अलैगिक प्रजननसाठी आहे आणि बीपासून झाड हे लैगिक प्रजनन आहे ,
रायझोम किंवा बी असे दोन ऑप्शन्स । प्रकार आहेत
12 Jan 2019 - 10:57 pm | Blackcat (not verified)
a horizontal plant stem with shoots above and roots below serving as a reproductive structure
मराठीत प्रकंद असे नाव आहे.
https://www.shabdkosh.com/mr/translate/rhizomes/rhizomes-meaning-in-Mara...
13 Jan 2019 - 12:37 am | डॉ सुहास म्हात्रे
रायझोम हे अलैगिक प्रजननसाठी आहे
Rhizome म्हणजे जमिनीखालून जमिनीला समांतर वाढत जाणार्या खोडाचा एक प्रकार असतो. अश्या खोडाला, थोड्या थोड्या अंतरावर, जमिनीवर वाढणार्या फांद्या व जमिनीखाली राहणारी मुळे फुटत राहतात.
(Rhizome is a continuously growing horizontal underground stem which puts out lateral shoots and adventitious roots at intervals.)
झाडाच्या खोडाला आलेल्या फांद्यांना अलैंगिक प्रजनन म्हणत नाही ! Rhizome (या एका प्रकारच्या झाडाच्या खोडा)ला नवीन फांद्या येऊन बांबूचे बेट बनते... जमिनीवर दिसणारा प्रत्येक बांबू केवळ Rhizomeवर फुटलेली एक फांदी असते... स्वतंत्र नवीन झाड नसते.
कोणत्याही (लैंगिक किंवा अलैंगिक) प्रजननपद्धतीमध्ये स्वतंत्र नवीन जीव निर्माण व्हावा लागतो, (किंबहुना, केवळ स्वतंत्र नवीन जीव निर्माण होण्याच्याच प्रक्रियेला प्रजनन म्हणतात,) हे सांगण्याची वेळ येईल असे वाटले नव्हते... पण असो. =))
Rhizomeपासून अलैंगिक प्रजनन करण्यासाठी, मानवी हस्तक्षेपाने त्याचे काही नोड्स असलेले तुकडे करून, ते स्वतंत्रपणे जमिनीत रुजवले जातात... ती बांबूच्या बेटात नैसर्गिकरित्या होणारी प्रक्रिया नव्हे.
याशिवाय, त्या दुव्यातले खालील वाक्य, लेखात दिलेल्या, फुलोरा येण्याच्या बांबूच्या दर प्रजातीच्या ठराविक वर्षांच्या चक्रांशी ताळमेळ खात नाही...
This occurs asexually whenever environmental changes affect the soil and plant growth.
13 Jan 2019 - 7:01 am | Blackcat (not verified)
तुमच्या बॉटनीचया पुस्तकात असेल तसे,
13 Jan 2019 - 7:42 am | Blackcat (not verified)
रायझोमचे तुकडे स्वतंत्रपणे रुजवणे हे मनुष्य निसर्गातूनच शिकला. प्राण्यांच्या हस्तक्षेपाने , इतर नैसर्गिक घटनांनी किंवा मूळ झाड मेल्यावर पुढची 'प्रजा' स्वतंत्रपणे जगते, त्यासाठीच ही सोय आहे,
13 Jan 2019 - 1:39 pm | डॉ सुहास म्हात्रे
निसर्ग आपल्या (नसलेल्या) हातांनी र्हायझोमचे तुकडे बनवून त्यांचे रोपण करत आहे, असे चित्र डोळ्यासमोर तरळून गेले ! =))
रच्याकने, निसर्गात कोणी कोणाची सक्रियपणे सोय/मदत/विरोध करत नसते. जीवामध्ये अंतर्गत आणि/अथवा बाह्य (पर्यावरण किंवा एन्व्हिरॉनमेंट) परिस्थितींमध्ये असणार्या/बदललेल्या परिस्थितीत जे जीव तगून राहू शकतात व प्रगती करू शकतात ते जगतात, इतर नष्ट होतात.
असो, संदर्भग्रंथ कोरा आहे तुमचे बॉटनीचे पुस्तक जगावेगळे आहे (कदाचित संदर्भग्रंथाच्या नावाप्रमाणेच आहे), तेव्हा खुष रहा. शुभेच्छा !
13 Jan 2019 - 3:02 pm | Blackcat (not verified)
तुमचेही पुस्तक वेगळेच दिसते आहे , गाई गुरे गवत खातात , त्यांच्या पायाला तोंडाला लागून काही भाग दुसरीकडे जातात, त्यातूनच रायझोम स्वतंत्र होतात , एखाद्या ठिकाणचा भाग वाळून तुटतो , दुसरीकडचा भाग स्वतंत्र होतो,
लैगिक प्रजननासाठीही मध्ये भटजी ( काझी किंवा पाद्री किंवा जो असेल तो ) लागतो , वारा , पाणी यातून परागकण पसरतात , काहींच्या बाबतीत कीटक , पक्षी , प्राणी हेही मदत करतात , हे सगळे पुस्तकात आहे , वाचून पहावे.
13 Jan 2019 - 7:39 pm | डॉ सुहास म्हात्रे
चालू द्या ! =))
14 Jan 2019 - 10:43 pm | स्वलिखित
दगड हि कविता आठवली
14 Jan 2019 - 11:52 am | जानु
औषधी म्हणून देखील बांबूच्या फुलांचा उपयोग आयुर्वेदात सांगितलेला आहे. या फुलांपासून वंशलोचन तयार होते हे वंशलोचन सितोपलादि चूर्ण तयार करताना कफनाशक म्हणून वापरले जाते.
14 Jan 2019 - 4:30 pm | विनिता००२
छान माहिती!
अधिक वाचेन या बद्दल :)
15 Jan 2019 - 8:28 am | यशोधरा
बांबूच्या प्रजननावरून मिपावर वाद वाचायला मिळतील असे वाटले नव्हते =))! उठा ले रे बाबा, असे देवाला म्हणायची पण सोय नाही! =))
15 Jan 2019 - 2:04 pm | चिर्कुट
मिपावर कुठल्याही विषयावर वाद होऊ शकतो =))
15 Jan 2019 - 10:29 pm | वीणा३
हसले मनापासून तुमच्या प्रतिसादावर :D
15 Jan 2019 - 11:17 pm | स्वलिखित
तरी अजून पोकळ बांबू आणि फटक्यांवर विषय गेला नाही
15 Jan 2019 - 2:31 pm | मराठी कथालेखक
बांबूवरुन आठवलं की १०२ नॉट ऑट चित्रपटात एक पात्र बांबू बद्दल माहिती देतो. कोणत्यातरी प्रजातीचे बांबू अगदी अचानक म्हणजे क्षणार्धात जमिनी पासून वर खूप वाढतात .
हे असे अचानक वाढणारे बांबू खरंच असतात का ? असल्यास बांबू अचानक वाढतानाचे एखादे चलतचित्र (व्हिडिओ) आहे का ?
15 Jan 2019 - 7:55 pm | राघव
छान माहिती. धन्यू. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. :-)
15 Jan 2019 - 8:46 pm | दीपक११७७
प्रोत्साहन दिल्याबद्दल सर्वांचे अभार.
म्हात्रे सरांनी शंकांना स्पष्ट उत्तरे दिलेली आहेत.
तरी एकदा एकत्रित उत्तर देत आहे
बांबुची झाडे ही प्रथम बियां पासुन उगवतात आणि मग पुढचा फुलांचा (बिया उपलब्ध होईपर्यंत) सिझन येईपर्यंत बांबुच्या मुळान पासुन इतर बांबु उगवत राहतात. नंतर जेंव्हा फुले उगवण्याची वेळ येते तेंव्हा मुळान पासुन बांबु उगवण्याची क्रिया थांबते. फुलांच्या सिझन नंतर बांबूचे मुळ झाडही मृत पावते. मग नविन बियांन पासुन पुन्हा नविन बांबूचे झाड उगवते.
बांबुची वाढ हि झपाट्याने होते, उघड्या डोळ्यांनी पाहता येईल इतकी जलद ती असते. साधारण बांबू चा वाढीचा वेग हा स्पेसिज निहाय १० सेंटीमीटर पासुन ते १०० सेंटीमीटर प्रति दिन एवढा असतो.
@जानु यांनी चांगली माहिती दिली
16 Jan 2019 - 11:00 am | टर्मीनेटर
लेख मालिकेचं शिर्षक सार्थ ठरवताय...२.० हि खूप छान ! आता ३.० च्या प्रतीक्षेत.