<आजच्या जेवणात>

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जे न देखे रवी...
14 Mar 2009 - 4:01 pm

प्रेरणा: चैत्रालीताईंची सुंदर कविता आताशा जीवनात.

आजच्या जेवणानंतर खूप अस्वस्थ वाटतंय।
सगळं जेवल्यानंतरसुद्धा खायचं राहिल्यासारखं वाटतंय॥

बनवत असताना बनवलेलं संपणारच नाही वाटतंय।
तेच जेवताना मात्र "किती पटकन संपतंय" असं वाटतंय॥
आजच्या जेवणानंतर खूप अस्वस्थ वाटतंय।
सगळं जेवल्यानंतरसुद्धा खायचं राहिल्यासारखं वाटतंय॥

ज्याच्यासाठी बनवायला घेतलं तोच फोनवर बोलत बसला।
"दुर्दैव त्याचं, पुरणपोळी माझ्यासाठीच आहे" असं वाटतंय॥
आजच्या जेवणानंतर खूप अस्वस्थ वाटतंय।
सगळं जेवल्यानंतरसुद्धा खायचं राहिल्यासारखं वाटतंय॥

समोर ठेवलेल्या डब्यातलं किलोभर तूप दिसतंय।
"मरो ना का डाएटींग" तूप ओरपावसं वाटतंय॥
आजच्या जेवणानंतर खूप अस्वस्थ वाटतंय।
सगळं जेवल्यानंतरसुद्धा खायचं राहिल्यासारखं वाटतंय॥

लोक म्हणतात "नाउमेद होऊ नकोस तूही होशील बारीक"।
पण ते तंग कपडे आपल्यासाठी नाहीच असं वाटतंय॥
आजच्या जेवणानंतर खूप अस्वस्थ वाटतंय।
सगळं जेवल्यानंतरसुद्धा खायचं राहिल्यासारखं वाटतंय॥

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

14 Mar 2009 - 4:06 pm | विनायक प्रभू

काय विक्षिप्त त्रास आहे?

सालोमालो's picture

16 Mar 2009 - 11:00 am | सालोमालो

=))

सालो

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Mar 2009 - 4:14 pm | बिपिन कार्यकर्ते

वा!!!!!!!!!!!!

=))

बिपिन कार्यकर्ते

निखिलराव's picture

14 Mar 2009 - 4:14 pm | निखिलराव

लई भारी....
च्या मारी धरुन फट्याक..........

अवलिया's picture

14 Mar 2009 - 4:14 pm | अवलिया

जेवल्यावर परत जेवत चला... अस्वस्थता दूर होते लगेच.

--अवलिया

नितिन थत्ते's picture

14 Mar 2009 - 4:15 pm | नितिन थत्ते

संपादकच विडंबू लागले तर कवींना वाली कोण हो?
खराटा
(रंग माझा वेगळा)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Mar 2009 - 5:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तसं नाही हो... विडंबन केलं विटंबना नाही. :-)

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

विजुभाऊ's picture

15 Mar 2009 - 6:25 pm | विजुभाऊ

जै अवखळकर पाटील तै( तै हे लिहिणे मष्टच)
आता तुम्हीही पंक्तीत आलात.
जे न देखे रवी ते देखे अवकाश शास्त्रज्ञ

आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी

परिकथेतील राजकुमार's picture

14 Mar 2009 - 4:16 pm | परिकथेतील राजकुमार

वा वा कविता वाचुन पोट भरले ;)

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

लिखाळ's picture

14 Mar 2009 - 4:20 pm | लिखाळ

मस्त..मस्त :) एकदम मजेदार.

आपल्या जीवनसहचराच्या सोडून जाण्याच्या व्यथेतून उमटलेल्या शब्दवेदना मूळ कवितेतून वाचकाला भिडतात तर एकदम वेगळ्याच विनोदी शैलीत आलेल्या मौजभावना आपल्या कवितेतून फेर धरुन सामोर्‍या येतात. फोनवरील संभाषण हा आजच्या शहरी जीवनातील प्रत्यक्ष भेटीगाठीतील उदासिनता आणि कौटुंबिक नातेसंबंधातील शहरी प्राधान्यक्रम अधोरेखित करुन जातो.

उत्तम प्रकृतीचे निदर्शक असलेला सडपातळ बांधा हे एक मृगजळ खरेच. यामागे धावताना अनेकांचे तोंड कोरडे पडले तर अनेकींचे अवसान जीमच्या दरवाजातच गळाले. पण कवितेमध्ये मात्र या मृगजळाला एक रंगीत वर्ख चढवून कवयित्रीने पुरणाच्या पोळीचे पानच मांडले आहे. डाएटींग हा आजच्या तरुण पिढीच्या तोंडी असलेला इंग्रजी शब्द, संवाद रुपात अवतरणात मांडून कवयित्री तिला असलेल्या शुद्धमराठी लेखनाचे भान खुबीने मांडते. याबद्दल तिचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच!
-- लिखाळ.

विसोबा खेचर's picture

14 Mar 2009 - 4:22 pm | विसोबा खेचर

अदिती मावशीची कविता आणि लिखाळभावजींचा प्रतिसाद, दोन्ही जोरदार! :)

तात्या.

सहज's picture

16 Mar 2009 - 7:42 am | सहज

हेच म्हणतो. :-)

-------------------------------------------------
बर त्या पुरणाचे सारण संपेपर्यंत काव्य येत रहाणार की काय ;-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Mar 2009 - 5:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

लिखाळ, एक लंबर हुच्च समीक्षा रे! वाचून हहपुवा झाली. (तेवढ्यासाठीतरी आता जास्तीत जास्त विडंबनं पाडली पाहिजेत.) असो, तुमच्या समीक्षेत एक चूक सापडली.

डाएटींग हा आजच्या तरुण पिढीच्या तोंडी असलेला इंग्रजी शब्द, संवाद रुपात अवतरणात मांडून कवयित्री तिला असलेल्या शुद्धमराठी लेखनाचे भान खुबीने मांडते. याबद्दल तिचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच!

आपण फोन हा इंग्रजी शब्द अवतरणाबाहेर आहे हे खूबीने विसरलात.
तरीही अभिनंदनाबद्दल आभार आणि तुम्हाला ही पुरणपोळी आणि तूप बक्षिसः

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

लिखाळ's picture

14 Mar 2009 - 5:23 pm | लिखाळ

लिखाळ, एक लंबर हुच्च समीक्षा रे! वाचून हहपुवा झाली.

समिक्षा वाचून हहपुवा ??? मराठी संकेतस्थळांवरील (स्वघोषित) शब्दप्रभू समिक्षकावर अशी वेळ का यावी! याचा पुरणपोळी खात विचार करत आहे. साहित्याचा रसास्वाद घेण्याबाबतची ही उदासीनता आहे की उचित मुल्यमापनाकडे केलेली डोळेझाक? साहित्याच्या महापुरात समिक्षक वाहून न जावोत हीच अन्नपूर्णेपाशी प्रार्थना ! कटाची आमटी केली नव्हती का? :)

आपण फोन हा इंग्रजी शब्द अवतरणाबाहेर आहे हे खूबीने विसरलात.

शहरी मराठी जीवानात समरस झालेले फोन, बस या सारख्या शब्दांचा स्वीकार हा काळाच्या कसोटीवर मराठीच्या स्वास्थ्यासाठी पोषक ठरेल असे आमचे मत आहे. (पुरणपोळी खात प्रतिसाद देत असल्याने रसास्वाद, पोषक असे शब्द आपसूक येत आहे हो ! :) )

-- लिखाळ.

विसोबा खेचर's picture

14 Mar 2009 - 5:27 pm | विसोबा खेचर

च्यामारी, लिखाळ ऐकतच नाय भेन्डी! फुल्ल फॉर्मात आहे! :)

तात्या.

जयवी's picture

15 Mar 2009 - 2:40 pm | जयवी

विडंबनकार तर हुच्च आहेतच....पण समिक्षक तर बाप रे बाप.....!! मजा आ रहा है यारो :)

निखिल देशपांडे's picture

16 Mar 2009 - 11:10 am | निखिल देशपांडे

वा.... पुरण पोळि चा फोटो बघुन मजा आली.....
बाकि विडंबन हि भारि जमलेच आहे....

अमोल खरे's picture

14 Mar 2009 - 4:47 pm | अमोल खरे

>>आजच्या जेवणानंतर खूप अस्वस्थ वाटतंय।

काय कविता केलेय अदिती तू...........फिल्ड बदललेले दिसत आहेस......आकाशातून डायरेक्ट स्वयंपाकघरात...... सहीच...........

आंबोळी's picture

14 Mar 2009 - 5:10 pm | आंबोळी

लोक म्हणतात "नाउमेद होऊ नकोस तूही होशील बारीक"।
पण ते तंग कपडे आपल्यासाठी नाहीच असं वाटतंय॥

अगदी मनामनातली व्यथा मांडलीस बघ.... सुंदर....
जियो...

संपादकच विडंबू लागले तर कवींना वाली कोण हो?
हेही खरेच....
असो...

आंबोळी

क्रान्ति's picture

14 Mar 2009 - 6:32 pm | क्रान्ति

एकदम भन्नाट विडम्बन! चतुर्थी मोडली माझी!
ता.क. मिपावर फोटो जिवंत करण्याची म्हन्जे प्रत्यक्षात आणण्याची काही सोय नाही का हो? पुरणपोळीचा नुस्ता फोटो पाहून पोट भरण कठीण आहे ना!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Mar 2009 - 7:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कविता आणि लिखाळची समिक्षा...उच्च :)

प्राजु's picture

14 Mar 2009 - 9:03 pm | प्राजु

धन्य आहेस आदिती.
कशाला विचार करतेस इतका.. खा ओरपून. :)
खाण्यासाठीच जन्म आपुला.. कसं??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

हेरंब's picture

15 Mar 2009 - 1:57 pm | हेरंब

प्रसंगी कायम ओरपून खावे.
माझ्या मित्राने बायपास नंतर शुध्दीवर येताच डाक्टरांना पहिला प्रश्न विचारला होता," मी बटाटेवडा कधी खाऊ शकीन? (जराही अतिशयोक्ति नाही) खाण्यावर अशी निष्ठा पाहिजे.
(बाय द वे, माझी खात्री आहे की आदितीताई नक्कीच बारीक असतील.)

शितल's picture

15 Mar 2009 - 1:20 am | शितल

अदिती,
विडंबन वाचुन अजुन दोन पोळ्या अगदी पुर्णतः तुपाने भिजलेल्या खाव्या वाटत आहेत, त्याच्या त्रास कमी म्हणुन फोटो ही प्रतिसादातुन दिला आहेस. :(

आनंदयात्री's picture

15 Mar 2009 - 1:39 am | आनंदयात्री

मस्त .. एक नंबर :)

नाना बेरके's picture

15 Mar 2009 - 12:12 pm | नाना बेरके

आजकाल कोणीही विड्मबन करतय.

स्वगत : तुपाऐवजी दुध घालून 'विड्मबीत पुरणपोळी' खाणारी मंडळी आम्ही पाहीली आहेत.

स्नेहश्री's picture

16 Mar 2009 - 10:34 am | स्नेहश्री

छान आहे विडंबन.

--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी