मराठी दिवस २०२०

कहीं दूर जब दिन ढल जाये

Primary tabs

Anand More's picture
Anand More in जनातलं, मनातलं
2 Dec 2018 - 8:27 pm

कॅन्सरशी झुंज देत ओंकारने इहयात्रा संपवली. ओंकार माझा शाळूसोबती. घट्ट गूळपीठ ज्या मोजक्या लोकांशी जमलं त्यांच्यापैकी एक.

आमची जोडी तशी गमतीदार होती. तो जगन्मित्र, मी घुम्या. तो तल्लख स्मरणशक्तीचा, मी संदर्भासाठी पुस्तक धुंडाळणारा. तो तापट आणि शीघ्रकोपी, तर आता रागवायचा हक्क मला आहे का? याच गोंधळात मी अडकलेला. पण आमच्या दोघांत एक समान दुवा म्हणजे पुस्तकप्रेम. त्याच्या घरी एन्सायक्लोपीडियाचे खंड होते. समग्र पुलं होते. दळवी होते. इतकंच काय तर गादीखाली लपवलेलं आनंदध्वजाच्या कथाही होतं. त्यामुळे किशोरावस्थेतून तारुण्यात आम्ही एकत्र प्रवेश केला.

त्याला कुठलाही विषय वर्ज्य नव्हता. आणि कुठल्याही विषयावर त्याला चटकन प्रभुत्वही मिळवता यायचं. डोकं फार वेगाने चालत असल्याने त्याला जगाच्या वेगाबरोबर जुळवून घ्यायला फार प्रयास करावे लागायचे. त्यामुळे तापटपणा वाढायचा आणि एककल्लीपणाही. पण त्याला माणसांचं फार प्रेम होतं. बोलताना शब्द वावगा निघाला तरी मुद्दा सोडत नसे पण नंतर समोरच्याला दुखावलं म्हणून पुन्हा माफी मागायला लाजत नसे.

व्यवहारात कच्चापक्का असलेला ओंकार वर्गात मात्र अतिशय लोकप्रिय शिक्षक होता. इथे त्याचं फॅनफॉलोविंग मोठं होतं. माझ्या अक्षरध्वनीच्या भाषांतर प्रकल्पावर तो सोबत काम करत होता. त्याच्या आजारपणामुळे अक्षरध्वनीचं काम मंदगतीने चालू होतं म्हणून तो ही वैतागायचा.

कॅन्सरशी त्याची झुंज आनंद चित्रपटातील आनंदसारखीच होती. शेवटपर्यंत हसतमुख रहाणाऱ्या बालमित्र ओंकारची उणीव कायम जाणवत राहील.

व्यक्तिचित्रणसद्भावना

प्रतिक्रिया

तुमच्या मित्राला श्रद्धांजली _/\_

पद्मावति's picture

4 Dec 2018 - 2:57 pm | पद्मावति

बोका-ए- आझम ची अशी अकाली एक्सिट होईल कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. अत्यंत दु:खद :(

नमस्कार,
मला बोका ए आझम यान्चे सर्व लेखन वाचावयाचे आहे.

कसे शोधू? मदत हवी आहे.. धन्यवाद..