कालची गोष्ट, उत्तम नगर मेट्रो स्टेशनवर उतरल्यावर नेहमीप्रमाणे घरी येण्यासाठी इलेक्ट्रिक रिक्षा घेतला. दिवाळीचे दिवस साहजिक आहे, रस्त्यावर ट्राफिक वाढणारच. दिल्लीकरांची एक अत्यंत वाईट सवय, रस्त्यावर जरा हि ट्राफिक दिसले कि लगेच वाहन रॉंग साईट वर घ्यायचे. रिक्षावाला हि त्याला अपवाद नाही. पंखा रोड वर ट्राफिक पाहून, सवयीनुसार रिक्षा चालकाने, समोरून येणार्या बसची पर्वा न करता, रिक्षा रॉंग साईड वर टाकला. चालक शेजारी बसलेल्या सवारीने त्याला टोकले, रिक्षा बस खाली असती तर, तू तर वर गेला असता, सोबत आम्हाला हि घेऊन गेला असता. रिक्षा चालकाने लगेच उत्तर दिले, साहेब विमा घेतलेला आहे, काळजी करू नका. चालक शेजारी बसलेला माणूस उद्गरला, गाढवा विम्याचे पैशे तू मेल्यावर तुझ्या बायकोला मिळतील आणि त्या पैश्याने ती तुझ्या सारखाच एक गाढव नवरा पुन्हा विकत घेईल. मोठ्या मुश्कीलने हसू आवरले.
काही वेळ विचार करून रिक्षा चालक म्हणाला, साहेब मला दोन मुले आहेत, सरकारी शाळेत शिकतात. बायको तीन-चार घरी झाडू-पोंंछा करून चार-पाच हजार घरी आणते. मला काही झाले तर, विम्याचे पैशे पोरांच्या शिक्षणाच्या कामी येतील, असा विचार करून मी बँक खाते उघडले आणि विमा हि घेतला. त्याच्या उत्तराने आम्ही सर्व निरुत्तर झालो.
घरी येऊन विचार केला. बँक खाते आणि १२ रुपयात मिळणारा सुरक्षा विमा, गरीब आणि अडाणी माणसाच्या विचार करण्याच्या पद्धतीत क्रांती घडवितात आहे. तो हि आता आपल्या परिवाराचा, मुलांचा भविष्याचा सकारात्मक रूपेण विचार करू लागला आहे.
प्रतिक्रिया
27 Oct 2018 - 10:56 am | अभ्या..
नेक्स्ट टाइम मोलकरणीला झालेला आणि जनधन खात्यात जमा झालेला उज्ज्वला योजनेचा फायदा येऊ द्या.
मेक इन इंडियातल्या रिक्षातून फिरताना तुम्हाला आठवलेले अटल पेंशनचे फायदे लिहिल्यास सोन्याहून पिवळे.
2 Nov 2018 - 8:57 pm | mayu4u
मोदींचा फोटो असलेली जर्षि बनवण्याची ऑर्डर तुला देणार होतो, पण 2024 च्या विलेक्शन पर्यंत काय ती मिळणार नाही.
27 Oct 2018 - 1:49 pm | मार्मिक गोडसे
आता अडाणी माणसंही आपल्या मुलांचा सकारात्मक विचार करू लागलेत.त्यांना पेन्शन नकोय एकरकमी विमा हवाय. मस्त सरकारी जाहिरात.
27 Oct 2018 - 2:25 pm | कंजूस
मरावे परी अटलरुपी उरावे.
नेहरु घराण्यातल्या लोकांची नावं सगळ्या दानधर्म योजनांना आहेत यावर ओरड होत असे॥ आता बाळासाहेब ठाकरे रोजगार योजना भाजपने आणली मागच्या आठवड्यात. काल युती निश्चित झाल्याची बातमी आहे.
सर्व राज्यांत काळजीवाहू सरकारे आहेत॥
29 Oct 2018 - 3:01 pm | विवेकपटाईत
अभ्या आणि कंजूषजी, पहिली गोष्ट हि सत्य घटना आहे, कुणाचा प्रचार नव्हे. दुसरी विम्यासाठी त्याने पैशे भरले आहे. अश्या लोकांचे पूर्वी खातेच उघडत नव्हते किंवा बँकेत शिरण्याची त्यांची हिम्मतच नव्हती. या लोकांपैकी २५ टक्के लोक जरी भविष्याच्या आर्थिक बाबींबाबत विचार करू लागले तरी मोठी आर्थिक क्रांती होईल. अर्थात अनेक खाते ठेवणार्या सुशिक्षित मध्यमवर्गीय लोकांना हे कळणार नाही. त्याच्या साठी दिल्लीच्या अनधिकृत कोलोनीत एका खोलीच्या घरात भाड्यावर राहणाऱ्यांचे अध्ययन करावे लागेल. याचा अर्थ तो मोदीजींना वोट देणार असे हि नाही. गेल्या निवडणूकीत अधिकांश रिक्षाचालकांने या दुसर्या शब्दांत अधिकांश गरीब लोकांनी आप पार्टीला वोट दिले होते.
29 Oct 2018 - 8:55 pm | चित्रगुप्त
खरे आहे. माझ्या एका दिल्ली पोलीसमधील मित्राकडून अनेक सत्यकथा ऐकायला मिळतात, ते सगळे अगदी वेगळेच, कल्पनातीत, भीषण विश्व आहे.
29 Oct 2018 - 9:36 pm | यशोधरा
दिल्लीचा बकाल भाग बाहेरूनच पाहिला आहे. ( प्रवासात) पण जे किनाऱ्यावरून झालेले दर्शन होते ते खरेच विदारक आणि फार त्रास देणारे होते, हे आठवते. चित्रगुप्त काका म्हणतात ते खरेच असावे.
30 Oct 2018 - 7:36 am | प्रमोद देर्देकर
आणि केली त्यांनी जाहिरात तरी ते तुमच्या घरी येवुन लगेच विमा घ्या म्हणुन पाठीस नाही ना लागलेत.
गोरगरिब ज्यांचे खरेच कधीही बॅन्केत खाते नव्हते ते कधी विमा काढु शकत नव्हते आता सग़ळे व्यवहार करु लागलेत हे चांगलेच आहे ना ?
भलेही सरकार कोणाचेही असु दे.
31 Oct 2018 - 3:46 pm | संजय पाटिल
+१
31 Oct 2018 - 6:19 pm | चौथा कोनाडा
+१
सर्व सामान्य, गरिब यांच्यासाठी या अतिशय महत्वाच्या योजना आहेत.
या विमा योजनांद्वारां किती रक्कम जमा होते, त्याचा विनियोग कसा होतो व विमाधारकांना कशी वागणूक मिळते, किती रकमा वितरित होतात या तपशिलाची उत्सुकता आहे.