नक्कीच काल काहीतरी चुकलय काज
कशानं हे अंग दुखतय आज ?
कधी नाही त्या सुचल्या दोनच ओळी
दंगा घातला भलत्याच वेळी
अनावर नशा रात्रीची व ती खेळी
खेळातील ते वेडे सुख दुखतय आज !
मनातच काय तो खेळ आता डोक्यात ही नाही
सुखाचे गाव कुठे दुरवर राही
दुखती कंबर मलमची का वाट पाही
टपटप पाणी डोळ्यातून पडतय आज !
उदास चेह-याची वाकडी मान
निस्तेज झालो लचकली मान
एक नंबरी जुनं दुखणं
वर आलं उफाळून पुन्हा काल ?
प्रेरणा - आज
प्रतिक्रिया
13 Mar 2009 - 2:17 pm | सँडी
राजे!
असे होत असते सुरुवातीला! होईल सवय हळूहळू.
पण काही म्हणा बाहुबलीच्या अण्णांच्या मारहाणीच्या दुखण्यापेक्षा हे "दुखणं" सुखद आणि हवहवसं असावं! ;)
बाकी नेहमीप्रमाणे "एक णंबर!".
13 Mar 2009 - 2:20 pm | सहज
आज काल तुमचा लेखनांक बराच उसळी मारतोय राजे. :-)
बुल्स रन , बुल्स आय दोन्ही!
13 Mar 2009 - 2:34 pm | दशानन
प्रेषक : II राजे II, सोम, 03/09/2009 - 17:36
* कवितेच्या वाटेला मी जात नाही पण ज्या दिवशी जाईन त्या दिवशी सडा पडेल मिपा वर ;)
13 Mar 2009 - 3:34 pm | विंजिनेर
ते म्हणणं इतक मनावर घ्याल असं वाटलं नव्हतं.. =))
बाकी कविता जोरदार!!.
(हा मुरारराजे कवितेच्या रणांगणावर थैमान घालणार आता ... चालुद्या ...)
13 Mar 2009 - 2:38 pm | अवलिया
कधी नाही त्या सुचल्या दोनच ओळी
च्यामारी उगाच तुला कविता कशी करावी ते शिकवले यार...
--अवलिया
13 Mar 2009 - 2:41 pm | दशानन
:D
भोगा कर्माची फळे !
13 Mar 2009 - 2:41 pm | परिकथेतील राजकुमार
वाह राजे !
'ते' नाहितर नाही पण 'हे' मार्केट मात्र तेजीत आणले बॉ तुम्ही, जणु हर्षद मेहताच ;)
परा तेलगी
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
13 Mar 2009 - 2:54 pm | शेखर
सहमत आहे.
'मंदी'मुळे राजनी 'कविते'ला हाताशी धरले आहे.
शेखर
13 Mar 2009 - 2:43 pm | बिपिन कार्यकर्ते
झबर्डस्ट!!!!!!!
एक कौल टाकावा म्हणतो...
आजकाल राजे:
०१. पेटलाय
०२. वेडा झालाय
०३. भैसटलाय (म्हणजे काय ते धम्याला विचारावे, आम्हाला विचारून आमच्या डोक्याला शॉट्ट लावू नये)
०४. विस्कटलाय
बिपिन कार्यकर्ते
13 Mar 2009 - 2:47 pm | घाशीराम कोतवाल १.२
बिपिन भाउ आमी ०३ लाच मत देणार
कारण काय ते माहित नाहि अजुन .....
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
13 Mar 2009 - 3:41 pm | विनायक प्रभू
आसॅच म्हनत रातो.
13 Mar 2009 - 4:09 pm | दशानन
१. बरोबर
२. बरोबर
३. बरोबर
४. बरोबर
=))
13 Mar 2009 - 4:13 pm | घाशीराम कोतवाल १.२
अहो सगळे ऑप्शन वर मत द्यायचे नक्कि झाले काय वो तुम्हाला...........:?
लवकर बरे व्हा राव आम्ही जातो हिमालया पार्ट ३ ४ ५ ६
साठी आम्ही उत्सुक आहोत राव
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
13 Mar 2009 - 9:16 pm | प्राची
लवकर बरे व्हा राव आम्ही जातो हिमालया पार्ट ३ ४ ५ ६
साठी आम्ही उत्सुक आहोत राव
बिपिनदांच्या कौलाशी एकदम सहमत.चारही कौलांना मत दिले.
13 Mar 2009 - 9:45 pm | प्राची
लवकर बरे व्हा राव आम्ही जातो हिमालया पार्ट ३ ४ ५ ६
साठी आम्ही उत्सुक आहोत राव
बिपिनदांच्या कौलाशी एकदम सहमत.चारही कौलांना मत दिले.
13 Mar 2009 - 9:47 pm | क्रान्ति
तुमी बी आले का भौ मैदानात? हे ब्येस झाल! येकाच दुकन सम्द्या गावाला लागल! तुमी बी करा दवा-दारु इडम्बनाची! लै झ्याक केल बापा इडम्बान! लै भावल बगा!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}