राधिकेचा फोन

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
2 Oct 2018 - 8:06 am

गुरुनाथ शयाना सोबत गुटरगूं करत आहे, तेवढ्यात मोबाईलची घंटी वाजते,काहीसा वैतागून गुरुनाथ फोन उचलतो

गुरुनाथ: हं, बोल राधिका

राधिका: अहो, मला तुझी आणि शयानाची माफी मागायची आहे.

गुरुनाथ: का! म्हणून?

राधिका: तुझे शयना सोबतचे संबंध बघून मला नेहमीच वाटायचे माझा नवरा बाहेरख्याली, व्याभिचारी आहे. आज कोर्टाचा कोर्टाचा निकाल वाचला. माझे डोळे उघडले. त्या शयानाला धडा शिकविण्यासाठी, काय काय केले मी. ते आठवून माझी मलाच लाज वाटते. मला आधीच का कळले नाही, माझा गुरु कधीच चूक वागू शकत नाही. हे असेच आहे, जसे घरात रोज तेच-तेच खाऊन कंटाळा आला कि आपण हॉटेल मध्ये जातोच ना. आता मी कधीच तुमच्या आड येणार नाही. सुखानी नांदू आपण सर्व एकत्र घरात.

गुरुनाथ (कोर्टाचा निर्णय ऐकून, हिचे डोके तर फिरले नाही ना. काहीबाही बडबडते आहे - तिचे बोलणे मध्ये तोडत): राधिका, तू थकलेली वाटते, ऐक माझे, घरी ये मग आपण निवांत बोलू.

राधिका: अहो, तसे काही नाही, मी तर आज एकदम जोश मध्ये आहे. फोन करण्याचे मुख्य कारण म्हणजे, आज रात्री फाईव स्टार हॉटेल मध्ये आपल्या बिजिनेस पार्टनर सोबत रात्र भर मजा करणार. गुड नाईट, माय डियर हसबंड. मजा कर शयाना सोबत.सकाळी भेटूच.

गुरुनाथ भोवळ येऊन पडतो....

समाजआस्वाद

प्रतिक्रिया

हा हा हा , कुठलाही कायदा इतक्या लगेच लागू होतो काय?

सतिश गावडे's picture

2 Oct 2018 - 9:28 pm | सतिश गावडे

शयाना नव्हे, शनाया. अर्थात तुम्हीच पुढे शयना लिहीलं आहे त्यामुळे असो.

अभ्या..'s picture

12 Oct 2018 - 11:18 am | अभ्या..

हे तर आहेच शिवाय "अहो, मला तुझी माफी मागायची आहे" हे संबोधन काही कळले नाही बुवा.

रमेश आठवले's picture

3 Oct 2018 - 12:03 am | रमेश आठवले

सर्वोच्च न्यायालयाने व्यभिचार हा अपराध नाही असे म्हटलेले नाही. त्यांनी तो फौजदारी गुन्हा न मानता त्याला सिव्हिल गुन्हा असे ठरवले आहे. म्हणजे या निर्णयांनंतरही राधिका घटस्फोटाची सध्याची केस लढु शकते

ज्योति अळवणी's picture

6 Oct 2018 - 2:33 am | ज्योति अळवणी

झक्कास.... शेरास सव्वाशेर... कायदा आणि नियम गेले तेल लावत. जर मला असा कोणीतरी मनापासून पटला असेल तर मी देखील उगाच लग्न... एकपतित्व वगैरे मानणार नाही हे राधिकाने दाखवून दिलंय.

एकदम आवडेश

Ganesh Dwarkanath Mhatre's picture

8 Oct 2018 - 5:34 pm | Ganesh Dwarkana...

पश्चिमी संस्कृती कडे एक पाऊल ....

ज्योति अळवणी's picture

12 Oct 2018 - 10:53 am | ज्योति अळवणी

म्हणजे पुरुषाने केलं तर चालेल; स्त्री ने केलं तर पश्चिम संस्कृती अस का? पण मुळात जिथे पुरुष affair करतो तिथे स्त्री आहेच की. एका हाताने टाळी नाहीच न वाजत.

माझ्या मते आपलं सुख आपला आनंद कोणावरही अवलंबून नसावा हे महत्वाचं. बाकी affair किंवा लग्ना बाहेरील संबंध हे सगळं वयक्तिक दृष्टिकोनातून पाहावं