माझा कावळा अजब
जीवखड्याशी खेळतो
इहलोकीच्या अंगणी
परलोक धुंडाळतो
माझा कावळा गणिती
तेरा आकडे मोजतो
आठ नख्यांच्या अष्टकी
पंचप्राण मिळवितो
माझा कावळा तत्वज्ञ
गुह्य विश्वाचे जाणतो
जे जे पिंडी ते ब्रह्मांडी
पिंड फोडून सांगतो
पैलतीरी कोकताना
हळवा का होसी काऊ
जीवखड्याची रे माझ्या
आज नको वाट पाहू
प्रतिक्रिया
30 Sep 2018 - 7:26 pm | प्रचेतस
जबरदस्त
3 Oct 2018 - 9:11 am | मूकवाचक
+१
1 Oct 2018 - 10:57 am | यशोधरा
सुर्रेख!! केवळ अप्रतिम लिहिले आहे!
1 Oct 2018 - 11:48 am | माहितगार
लिहिल चांगलय, पण रुपके अधिक नीट समजून घेणे आवडेल.
1 Oct 2018 - 7:08 pm | अत्रुप्त आत्मा
प्लस वण!
1 Oct 2018 - 1:37 pm | चांदणे संदीप
जबरदस्त!
Sandy
1 Oct 2018 - 11:26 pm | नाखु
आहे ते चांगले आहे,एक दोन मुद्दे विस्तार करून सांगितले तरी बरं होईल.
आडवाटेला असलेला नाखुयात्री
3 Oct 2018 - 8:16 am | अनन्त्_यात्री
देणार्या सर्वांना धन्यवाद.
3 Oct 2018 - 1:09 pm | अथांग आकाश
मस्त कविता!
8 Oct 2018 - 7:22 am | प्राची अश्विनी
तुमचे चित्रसाद आवडतात. :) ्
3 Oct 2018 - 2:36 pm | खिलजि
हा कावळा , बगळ्याच्या पोटी जन्माला आलेला दिसतोय . ( ह घ्या ) अजून एक आपण समर्पक चित्रे जोडता त्यामुळे तुम्ही दिलेली प्रतिक्रिया अधिक जास्त खुलून दिसते .
3 Oct 2018 - 5:40 pm | अथांग आकाश
कवितेची पहिली ओळच आहे "माझा कावळा अजब" त्यामुळे तसा अजब कावळा शोधणे भागच होते :-)
हमारे चित्रों की तारीफ के लिये शुक्रिया !
4 Oct 2018 - 11:54 pm | अत्रुप्त आत्मा
ह्यात पांडू आहे! =))
पां डुब्बा.! =))
8 Oct 2018 - 7:08 pm | अथांग आकाश
प्राची अश्विनी आपण योजलेला चित्रसाद आणि अत्रुप्त आत्मा यांनी योजलेला पांडू = पां डुब्बा. हे दोन्ही शब्दप्रयोग आवडले!
5 Oct 2018 - 12:15 pm | सिरुसेरि
छान
5 Oct 2018 - 2:43 pm | अनन्त्_यात्री
धन्यवाद!
8 Oct 2018 - 7:23 am | प्राची अश्विनी
सुरेख!
8 Oct 2018 - 6:28 pm | अनन्त्_यात्री
प्राची अश्विनी!
21 Oct 2018 - 6:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडली रचना.
-दिलीप बिरुटे
22 Oct 2018 - 12:29 am | मुक्त विहारि
काव्य आवडले....
(स्वगत : खरे सांगायचे तर, कावळ्यासारखा उत्तम पक्षी नाही. वेळेच्या बाबतीत एकदम पक्का.आमच्या सौ.आईच्या घरी ११:३० ते १२:०० पर्यंत रोज जेवायला येतो.आणि त्याच्या, ह्याच वेळेच्या बाबतीत काटेकोर रहाण्याचा फायदा माणसांनी घेतला.सध्या आमच्या डोंबोलीत तरी, ज्या ठिकाणी पिंडदान करतात तिथे ९ते सव्वा ९ च्या दरम्यान कावळा लगेच तो भात खायला येतो.पण दुपारी १२ वाजता येत नाहीत.त्यामुळे, डोंबोलीत तरी पिंडाला कावळा, ९ ते सव्वा नऊच्या सुमारास नक्की शिवतो आणि इहलोकातील मृताचे नातेवाईक, नि:श्र्वास सोडतात....... कावळ्यांच्या बाबतीत ज्या काही अंधश्रद्धा आहेत त्यात इंग्रज पण मागे नाहीत....असा एक लेख वाचनांत आला होता.)
22 Oct 2018 - 4:00 pm | अनन्त्_यात्री
धन्यवाद!