तुम्हाला असं कधी होते का ? भाग - १ .......

Prakashputra's picture
Prakashputra in जनातलं, मनातलं
25 Aug 2018 - 11:58 am

मी एकदा घराबाहेर पोर्चमध्ये उभा होतो. वरती एक कोळ्याचे जाळे होते. अचानक मानेवरती एक कोळी पडला. त्याला झटकून काढायला गेलो तर तो खूप जोरात चावला. विषाची काही reaction होईल का या आधी 'आपण स्पायडर - मॅन होऊ का ? हा सुखद विचार पहिल्यांदा मनात आला' ----- तुम्हाला असं कधी होते का ?

खूप उत्तेजित होऊन हि आनंदाची बातमी मी बायकोला सांगायला गेलो. आपण सुपरहीरोची बायको होणार याचा आनंद व्यक्त करण्याऐवजी तिने मला हे विचारलं कि , "ती कोळ्याची जाळी मी होऊनच कशी दिली ? " आणि "आता तरी मी जाळी साफ केलीय का ?". मी तिला हे पटवायचा खूप प्रयत्न केला की जाळी रोज जरी साफ केली तरी कोळी एका रात्रीत परत जाळी तयार करतो. दुसरा प्रश्न मात्र मी साफ टाळला, कारण जर उद्यापर्यंत मी स्पायडर मॅन नाही झालो तर परत पोर्चमध्ये जाऊन उभा राहावे असे म्हणतोय. -- तुम्हाला असं कधी वेड्यासारखे वागावे असे वाटते का ?

एकदा मी आणि माझ्या मित्राने एक Investment Property विकत घेतली. सौदा पूर्ण करून आम्ही ती प्रॉपर्टी बघण्यासाठी गाडीतून चाललो होतो. ज्या रस्त्यावर ती प्रॉपर्टी होती त्या रस्त्यावर वळण्याआधी आमच्या समोरच आगीचे २-३ बंब त्या रस्त्यावर वळले. त्याक्षणी मी आणि माझ्या मित्राने एकमेकांकडे बघितले आणि आम्ही एकदम हसलो. आम्ही दोघेही असाच विचार करत होतो कि "च्यायला , आपल्याच प्रॉपर्टीला आग लागली कि काय ?" --- तुम्हालाही असे कधी "मन चिंती ते वैरी न चिंती" असे विचार डोक्यात येतात का ?

अशाच उडपटांग गोष्टी असलेला दुसरा भाग लवकरच.......

हे ठिकाणलेख

प्रतिक्रिया

च्यायला मला कोळी चावला होता तेव्हा 10 दिवस आजारी पडलो होतो.

टवाळ कार्टा's picture

26 Aug 2018 - 3:45 pm | टवाळ कार्टा

तो कोळी मॅन स्पायडर झाला कि नाही ते चेकवलेत का =))

तुम्हाला असं कधीपासून होतंय?

Prakashputra's picture

28 Aug 2018 - 7:54 am | Prakashputra

कायमच होते हो

भाग दोन इथे : https://www.misalpav.com/node/43273

Prakashputra's picture

8 Sep 2018 - 8:39 am | Prakashputra

दुसरा भाग इथे : https://www.misalpav.com/node/43273