चुलीवरील जेवणाचा घरगुती आस्वाद....
धकाधकीच्या दैनंदिन जीवनातला आजचा दिवस माझ्यासाठी अतिशय खास राहिला. सकाळीच दिपकदादांचा (आमचे पुणे येथील मोठे बंधु) फोन आला. माईंना खास वैदर्भीय खणखणीत डाळभाजी आणि पोळी चुलीवरचं जेवण करायचे आहे म्हणुन. आमच्या माई सौ. सिंधुताई सपकाळ यांना आज अमरावती आल्यावर खास वर्हाडी जेवणाचा आस्वाद घ्यायचा होता. मग लागलो तयारीला. सरोज चौकातील रुक्मिणी वल्लभ झुणका भाकर केंद्रात ऑर्डर दिली. माई, दिपकदादा, शामराव दादा, विनय दादा, मी, अधिक्षिका मॅडम, पांडा भाऊ, चालक नितीन दादा, असे आम्ही सर्व एकसाथ जेवायला बसलो. डाळभाजी, झुणका, पाटोळी, पोळी, भाकरी, ठेचा, लिंबुचे लोणचं असं अस्सल महाराष्ट्रीयन चुलीवरचं घरगुती जेवणं बऱ्याच दिवसांनी मिळाल्याने माईंनी शिरभाते कुटुंबियांचे भरभरून कौतुक केले. झुणका भाकर केंद्राच्या संचालिका सौ.माधवी घनश्याम शिरभाते, रितेश घनश्याम शिरभाते, अमित घनश्याम शिरभाते यांनी स्वतःअपार कष्ट करून उभं केलेलं रुक्मिणी वल्लभ झुणका भाकर आज अमरावतीकरांसाठी जेवणाची खास पर्वणी ठरत असल्याचे उदगार काढले. तोवर जेवण सुरू असताना अनेक लोक जेवायला येत होते. ह्या तर माई आहेत. म्हणून जो-तो माईंचे दर्शन घेत होता. जेवण होईस्तोवर झुणका भाकर केंद्रात माईंना चाहणाऱ्या, प्रेम करणाऱयांची चांगलीच गर्दी जमली. होती. माईंनी चुलीवरचं जेवण घेतल्यावर पुढील प्रवासाला सुरुवात केली. तेव्हा शिरभाते काकूंनी आज माईंनी आमच्या भोजनालायत भेट दिली. त्यामुळे आम्ही धन्य झाल्याचे सांगितले. त्यांचे मोठे चिरंजीव रितेश शिरभाते हे ग्रॅज्युएट झाले असून स्वतः किचनरूम मध्ये भाजी बनवितात. तर थोरला मुलगा अमित कुणाला काय हवं, काय लागतं कोणी काय ऑर्डर दिली, ती व्यवस्थित दिली की नाही यावर सतत बारीक लक्ष्य ठेवून असतो. तर शिरभाते काकू काउंटर सांभाळतात. हे दोन्ही बंधुराजे आईला कामात हातभार लावंतांनाचे दृश्य पाहून माईंनी दोघांचं कौतुक केलं. एवढंच नव्हे तर लेकरांनो असेच जन्म देणाऱ्या माऊलीला कामात हातभार लावत रहा, तुम्ही तिघे ही पुण्याच काम करत आहात अस माई म्हणाल्या.
रुक्मिणी वल्लभ झुणका भाकर केंद्राच जेवढं कौतुक केलं तेवढं कमीच आहे. महाराष्ट्रायिन अस्सल वर्हाडी चुलीवरील घरगुती भोजनाचा आस्वाद घ्यायचा असेल तर एकदा नक्कीच इथे भेट देऊन आस्वाद घेतला पाहिजे.
मुकेश चौधरी,
मेळघाट अमरावती!!
मो. न. 9049068803
प्रतिक्रिया
16 Jul 2018 - 10:57 pm | चौथा कोनाडा
साक्षात माई सिंधूताई सपकाळ यांचा सहवास मिळाला मोठी गोष्ट आहे !
सेलिब्रेटी येती घरा ..... तोचि दिवाळी दसरा !
(मी त्यांना सेलिब्रेटी गंमतीनं म्हणत नसून त्यांची भेट हाच एक मोठा उत्सव, हेच एक सेलिब्रएशन या अर्थाने म्हणत आहे.)
भेट वृतांत (छोटासा का होईना) आवडला.
तुमचे अजून अनुभव वाचायला आवडतील !
लिहित रहा,वाचत रहा,
मिपा एन्जॉय करत रहा !
31 Jul 2018 - 1:39 pm | मुकेश चौधरी मेळघाट
धन्यवाद आपले प्रोत्सहन असेच सदैव असुद्या
17 Jul 2018 - 6:05 am | रमेश आठवले
खानावळीत ऑर्डर देऊन त्याप्रमाणे जेवण बनवुन घेऊन त्याचा आस्वाद आलेल्या पाहुण्यां बरोबर घेतला असेल तर त्याला घरगुती जेवण कसे म्हणता येईल ? अगदी ते जेवण चुलीवर शिजवले असले तरीसुद्धा .
31 Jul 2018 - 1:41 pm | मुकेश चौधरी मेळघाट
एकदा आपण जेवायला यावे मग आपणच ठरवा घरगुती कि हॉटेलचे ते??
17 Jul 2018 - 5:13 pm | चिनार
अमित शिरभाते हा माझा वर्गमित्र आहे.
17 Jul 2018 - 9:33 pm | नाखु
मी चिनार्याला ओळखतो,
तो ओळखतो का नाही ते माईंना विचारावं लागेल
ओळखी पाळखीतला नाखु
31 Jul 2018 - 1:42 pm | मुकेश चौधरी मेळघाट
अरे वा खूप छान मग तर अधिक चांगले मित्राला मदत करा मग
19 Jul 2018 - 11:52 am | Ram ram
आठवले भौ आपुलकी आत्मीयता असली तर व्यवहारी खाणावळ न राहता घरगुती संबंध निर्माण होतात. शालींचा अन्नपुर्णा वसंत शिंदेंविषयीचा लेख वाचा.
23 Jul 2018 - 12:05 am | रमेश आठवले
' तोवर जेवण सुरू असताना अनेक लोक जेवायला येत होते.' मूळ लेखक असे म्हणतात.
तरीसुद्धा आपण त्याला घरगुती जेवण म्हणणार असला तर माझी हरकत नाही.
31 Jul 2018 - 1:44 pm | मुकेश चौधरी मेळघाट
आहो साहेब जेवन घरच्या सारखं शक्यता बाहेर मिळत नाही हा माझा पर्सनल अनुभव आहे असो आपण एकदा जेवायला या मी लिहिलेल्या लेखाचे महत्त्व आपणास तेव्हाच कळेल
19 Jul 2018 - 3:56 pm | पक्षी
माईंना प्रत्यक्ष भेटलो आहे, म्हणजे त्यांची एक मुलाखतीत उपस्थित होतो. त्यांचा अनुभव ऐकतांना अक्षरश अंगावर काटा येतो. त्यांचं कार्य खरंच अफाट आहे.
पण हा धागा निवळ एका खानावळीचा जाहिरात करण्यासाठी असल्यासारखा वाटला. म्हणजे ज्या प्रकारे इतर मिपावरच्या धाग्यांमध्ये प्रामाणिकपणा जाणवतो, तसा प्रामाणिकपणा इथे नाही जाणवला.
(धागाकर्त्याच्या भावना दुखावल्या असल्यास क्षमस्व, मला जे जाणवले ते इथे मांडले.)
21 Jul 2018 - 10:40 pm | चौथा कोनाडा
अहो, आहेच हा धागा खानावळीची माहिती देण्यासाठी (जाहिरात साठी नाय) याला टिपिकल जाहिरात नाय म्हणता येणार !
धाग्याचा मथळाच "चुलीवरचे जेवन..." असा आहे. तपशिलपण खानावळीचेच दिलेत. बघा, तिकडं कधी गेलात तर उपयोग होइल याचा.
अनेक गिर्हाइकांपैकी माई एक व्हीआयपी कस्टमर !