आपल्याच तिरडीसाठी आपणच पैसे द्यायचं

खिलजि's picture
खिलजि in जनातलं, मनातलं
9 Jul 2018 - 6:46 pm

कॅन्सर हा आता ग्रँड रोग झाला

साल मरणाला पण सोन्याचा भाव आला

बळीराजाला दाखवून अमिष

कंपन्या पेरतायत शेतामध्ये विष

औषधे तत्पर सेवेस रुग्णांसाठी

थोडे पुढं ढकलण्यासाठी दिवस

एकास होतो खरा

पण जुंपले जाते सारे कुटुंब

कुणी विकतात शेतीवाडी

तर गिधाडांचे खिसे तुडुंब

आलो इथवर विज्ञान घेऊनि

जुने दिले केव्हाच टाकून

तेच सोने होते, माझ्या बाळा

ताजे खायचा अन शिळे द्यायचा फेकून

सरकार असो कुठलंही

कर मात्र नेमाने घेतात

कायद्याच्या नावाने बोंब सारी

येनकेन प्रकारे फक्त बळी जातात

कुठे दडली मेख सारी

भलतीकडेच सुरु इलाज त्याचा

बळीराजाचा खांदा वापरून

सरकार प्रजेवरच नेम धरी

तर मिपाकरांनो , आज कॅन्सर घराघरात पोहोचलेला आहे .. आणि याचे सर्व श्रेय आपल्यालाच जाते .. विज्ञानाची कास जी धरलीय आपण . कॅन्सर , एक असा रोग ज्यात माझे संपूर्ण कुटुंब होरपळून गेले आहे . माझी आई कॅन्सरनेच गेली .. मी स्वतः ते दिवस पाहिलेले आहेत . कुटुंबाची अक्षरशः दाणादाण उडते . मला वाटत , कॅन्सर या रोगाचे मूळ , आपल्या शेतात दडले आहे . मागे आमिर खानाचा सत्यमेव जयते हा एपिसोड बरेच काही सांगून गेला . तो सिझन मला वाटतं त्याचा शेवटचा सिझन ठरला . त्याला कारण काही अंशी हेच असावे . आज कॅन्सरची निव्वळ उलाढाल मला वाटतं करोडोमध्ये असेल . मी मागे कुमार साहेबांचा लेखही " कर्करोगाचा भस्मासुर " वाचला होता .
माझ्या आईला वाचवण्यासाठी आमचे जवळजवळ २२ लाख खर्ची पडले . यावरूनच या रोगाची आर्थिक ताकद लक्षात येईल . आईला , मी स्वतः एक नामवंत डॉक्टर केलेले होते ..
त्यांच्या मतानुसार कर्करोगग्रस्तांनी फक्त

१ ) ताजे आणि नुकतेच शिजवलेले अन्न खावे .
२) फळे पण उकडून खावीत
३) जरापण ताप आला कि लगेच इस्पितळात दाखल व्हावे
४) महिन्याकाठी सीबीसी आणि इतर चेकिंग करावीत
५ ) त्यांनी सांगितलेले केमोवरती औषध
६) इस्पितळात दाखल झाल्यावर इतर महागडी औषधे

हे सर्व करत होतो , पटत नव्हतं तरीही करत होतो , कारण एकच होते ते म्हणजे आईची जगण्यासाठी असलेली दुर्दम्य इच्छा .. तिच्या इच्छेसाठीच तर हा सारा खटाटोप चालला . आणि ती अचानक निघून गेली. मलादेखील विश्वास बसलेला नव्हता , कारण मी स्वतः तिची प्रगती माझ्या डोळ्यादेखत पाहिलेली होती. ती जाण्यासाठी कारण मात्र क्षुल्लक ठरले . काय तर घरी फ्लोरिंगचे काम चालू होते आणि त्याचे धुळीचे इन्फेक्शन झाले . त्यातच ती गेली .

ती असताना मी तिला खालील प्रमाणे शुश्रूषा करत होतो

१) सकाळी तुळशीच्या बियांचा चहा देणे
२) एक ग्लास दूध , प्रोटीन पावडर टाकून
३) तिची नेहेमीची औषधे
४) फ्रिजमधील वस्तू वापराने फार कमी केले

तिच्या आजारात आणि औषधोपचारात मी काही अनुभव घेतले ते इथे मुद्दाम शब्दबध्ध करत आहेत . अशा आहे कि अजून कुणाला कामाला येतील .

सुरुवातीला पहिल्या केमोनंतर तिला फार त्रास झाला आम्ही नंतर तिला परत इस्पितळात हलवले . तिथे जी काही प्रतिजैविके वापरण्यात आली त्यामुळे तिला इतरत्र फोड आले, ते इतके दुखायचे कि तिची वेदना बघून आमचीच भीतीने पाचावर धारण बसायची . ते असेच काही दिवस चालू होते . मी अक्षरशः देवाचा धावा करत होतो. काहीच सुचत नव्हते . तेव्हा असाच कुठेतरी एक अशेच किरण दिसला . मी आंजावर एक स्वमूत्रप्राशनाचा निबंध वाचला . मी ठरवलं , कि आईला हे सांगून बघूया , ऐकली तर ठीक नाहीतर बघू दुसरे काहीतरी .. आईला मी व्यवस्थित पटवून सांगितले . हे सांगण्यापूर्वी टाटा मेमोरिअलमधील एक शेट्ये म्हणून सद्गृहस्थ आहेत त्यांच्याशी सल्लामसलत केली . त्यांना मी माझे या क्षेत्रातील काम , माझे शोधनिबंध आणि त्यावरील सविस्तर माहिती दिली . त्यांना मी माझ्या आईच्या उपचाराची दिशा , तिची सध्याची अवस्था आणि मी घेतलेला स्वमूत्राप्राशनाचा निर्णय त्यांना समजावून सांगितला . त्यांचे मत हे होते कि यावर अजून तरी काही कुणी घातक असे नमूद केलेले नाही आहे . तेव्हा करून बघण्यास हरकत नाही . मी आईला समजावून सांगितले पण तिने त्यास साफ नकार दिला . तो केवळ लाजेखातर होता हे मला नंतर समजले .
आईने हे सर्व मला ना सांगताच स्वतःच चालू केले होते . तिचे ते दुखणे हळूहळू कमी झाल्यावर मी तिला विचारले तेव्हा तिने ते मला सांगितले .

अर्थात ते बरे होण्यामध्ये डॉक्टरांचा पण सहभाग होता . त्यांच्या औषधोपचारामुळेच हे सर्व शक्य झाले . पण सांगण्याची गोष्ट अशी कि तिला दुसर्या केमोनंतर तो त्रास झाला नाही जो पहिल्या केमोच्या झाला होता . यामध्ये मूत्राचा किती सहभाग होता हे माहित नाही पण एक गोष्ट मात्र नमूद करतो कि सीबीसी अहवाल नंतर ऍनिमिया आहे असे नमूद करत होते .. जे खरंच एक पॉसिटीव्ह चिन्ह होते . आईने जर माझे ऐकले असते आणि घराचे कामच काढले नसते किंवा ती माझ्यासोबत आली असती तर आजही ती कदाचित जिवंत असती.
कर्क रोग हा खरंच डॉक्टर कुमार म्हणतात त्याप्रमाणे आता भस्मासुर झाला आहे आणि घराघरात पोहोचला आहे . अर्थात याला आपल्या बदलेल्या जीवनशैलिही कारणीभूत आहेत.
१) हॉटेल मधील वरचेवर खाणे .
२) फ्रिजमधील खाणे
३) शेतकऱ्यांना अमिष दाखवून , पात्रता नसलेली कीटकनाशक विकणे

मागे साताऱ्याला गेलो होतो . तेव्हा एक जाहिरात पहिली . एक टन कीटकनाशक घ्या आणि बुलेट फ्री .. माझा मेव्हणा त्याच दुकानात भागीदार आहे . त्याने सांगितले कि त्याचा वर्षभराचा टर्नओवर जवळजवळ ३ करोड रुपये आहे . आता तुम्हीच सांगा , त्याला सर्व माहित आहे हे काय चाललंय ते, पण पैसे मिळतायत म्हणून तो पण गप्प आणि शेतकरीपण . तो तर हे देखिल सांगत होता कि स्ट्रॉबेरीतर चुक्कून पण खाऊ नका . इथले शेतकरी तर त्या पाण्यातल्या हौदातच कीटकनाशक मिसळतात आणि शेतातमध्ये सोडून देतात . आता मला सांगा बळीराजा जर असा अडाण्यावाणी वागायला लागला तर आपलं हाल कोण कुत्रा बी खाणार नाय.

सेंद्रियशेती फार कमी लोक करतात आणि करतात ते पण स्वतःसाठीच . मार्केटात हा असला रासायनिक खतांचा माल पडतो बघा . तो आपण खायचा आणि आपणच मरायचं . आपल्याच तिरडीसाठी आपणच पैसे द्यायचं

सिद्धेश्वर विलास पाटणकर

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

9 Jul 2018 - 9:39 pm | प्रमोद देर्देकर

सगळंच भयानक

चित्रगुप्त's picture

9 Jul 2018 - 11:10 pm | चित्रगुप्त

पूर्वी ठग पेंढारी होते, त्यांचा हा आधुनिक अवतार.
नॉन-स्टिक आणि अल्युमिनियमची भांडी- तवे, प्लास्टिक बाटल्यातील पाणी - खाद्यपदार्थ, भाजी-फळे वगैरेंवर मारले जाणारे कीटनाशक स्प्रे आणि रंग, मायक्रोवेव्ह, मोबाईल, लॅपटॉप वगैरेचे तरंग वगैरेंसारख्या आधुनिक जीवनातल्या अनेक गोष्टींचे पर्यावरणावर आणि मानवी आरोग्यावर काय दुष्परिणाम होतात, यावरील संशोधन मुळात फारसे होत नाही, झाले तरी ते लोकांपर्यंत पोहोचत नाही, हे आणखी दुर्दैव.

लेखातून मांडलेली भयानकता पोचली.

सोमनाथ खांदवे's picture

10 Jul 2018 - 11:19 am | सोमनाथ खांदवे

प्रत्येका ने आयुष्यात कधी ना कधी कॅन्सरग्रस्त पेशन्ट चे हाल आणि नातेवाईकांची ससेहोलपट पाहिलेली आहे . मुळात आपण वापरत असलेले सौंदर्य प्रसाधने किंवा खाद्यपदार्था मधील कॅन्सर ला पोषक ठरणारे कंटेंटस तपासण्या ची एक तरी कार्यक्षम प्रयोगशाळा भारतात आहे का ? बोंबलायला इथंच आपण मार खाल्लाय !! .मानवी वापरयोग्य बाजारात असलेली प्रत्येक गोष्ठ प्रयोगशाळेत तपासणी करून ' यामध्ये कंटेंट्स नाहीत ' अस ग्राहकांच्या प्रति उत्तरदायित्व असलेल्या प्रयोगशाळा चीं कमतरता भारतात आहे आणि का प्रत्येक सरकारने या गोष्ठी कडे दुर्लक्ष केले ?
ज्या यू एस मध्ये याबाबतीत नियम कडक पाळतात तेथिल घटना एक वर्षापुर्वी वाचनात आली होती . कॅन्सर होऊन एका महिलेचे निधन झाल्या नंतर तिच्या मुलाने कोर्टात याचिका दाखल करून घरातील वापरायोग्य कुठल्या वस्तू मूळे आईला कॅन्सर झाला हे शोधण्याची व त्या कंपनी ला दंड करण्याची विनंती केली . तेथील तपास पथकांनी घरातील सर्व वस्तू सील करून प्रयोगशाळेत पाठवल्या असता लिपस्टिक मध्ये ते कंटेंट्स सापडले , मग कोर्टाने त्या लिपस्टीक चे प्रॉडक्ट् बंद करून त्या मुलाला काही कोटींची नुकसान भरपाई कंपनी कडून मिळवून दिली . लिंक सापडली की मी देतो . तर असे आपल्या भोंगळ व्यवस्थेत कधी शक्य होणार आहे का ? .

टवाळ कार्टा's picture

10 Jul 2018 - 11:51 am | टवाळ कार्टा

आपल्याकडे भोपाळ दुर्घटना झाली तर मालकाला सुखरूप देशाबाहेर जाउ दिले जाते

प्रकाश घाटपांडे's picture

10 Jul 2018 - 11:56 am | प्रकाश घाटपांडे

खरच भयानक आहे.जगण्याचे जसे नियोजन करतात तसे मृत्यूचेही केले पाहिजे

साहेब तुम्हाला सांगू कॅन्सर हा एक बिझनेस झालाय आजकाल . मला हा लेख लिहिताना काहीच सुचत नव्हते म्हणून कदाचित नीट लिहिला गेला नाही. पण सुरुवातीला जेव्हा आपण एका ऑन्कोलॉजिस्टची पायरी चढतो तेव्हा परत खाली येताना तीन चार चेमिस्ट मार्केटिंगवाले उभे दिसले . मला तो प्रकार सर्व नवीन होता . मी त्यांच्या हातातले ते पोस्टर/ पॅम्प्लेट घेतले . त्यामध्ये त्यांची सेवा कशी उत्कृष्ट आणि दर्जेदार आहे , मालाच्या किमतीवर किती डिस्काउंट दिले जाते ते पद्धतशीर लिहिले होते . दोघातिघांनी माझा नंबर घेण्याचा प्रयत्न केला . हळूहळू मला त्यातील गोम समाजात गेली . सुरुवातीला मला औषध प्रमाणाबाहेर महाग पडत होती नंतर मी मी इतरत्र चौकशी करत गेलो आणि त्यामध्ये डिसकाऊन्ट मिळवत गेलो .
सुरुवातीला मला डेक्झुबा हे औषध ३०००० रुपयाला पडत होते नंतर तेच मला दुसर्या कंपनीचे १९००० रुपयाला पडत होते . तिथेही सुरुवातीला आडकाठी झाली , तेही चक्क डॉक्टरांच्या कर्मचाऱ्यांकडून . मी या क्षेत्रातला आहे म्हणून नशीब माझं पण इत्तर लोकांचं काय होत असेल ते विचार करूनच अक्षरशः वाईट वाटत होते . इथे एखाद्याला हा रोग झालाय हे कळलं कि सगळे कावळे आजूबाजूला जमा होतात . मग तुम्हाला या धंद्यातील कमिशन किती आहे याचा अंदाज येऊ लागतो . मी हे उघड पाने सांगू इच्छितो कि मी कॅन्सरवरील औषधे एकदम वितरक भावामध्ये आणायचो तरीही मला एव्हढा खर्च आला म्हणजे इतरांचे काय होत असेल याचा विचार ना केलेलाच बरा ...

जरा तुम्हा सर्वाना या मागील कमिशन सांगतो म्हणजे कळेल कि किती भयानक लूटमार आहे ते ..

ग्राफील औषध : एक सीबीसी बूस्टर आहे .. त्याची छापील किंमत आहे जवळजवळ १२०० रुपये , आणि ते या चेमिस्टवाल्यांकडे मिळते जवळजवळ १००० रुपयाला . मी तेच डिस्ट्रिब्युटरकडून ३५० रुपयाला घ्यायचो . विचार करा मित्रानो , किती कर सरकार वसूल करत असेल या औषधांमधून आणि का नाही होणार काळाबाजार . व्हायलाच पाहिजे .. जर एव्हढा ना दिसणारा पैसा बसून मिळत असेल तर का नाही खायला घालणार आपल्याला रासायनिक खात मिश्रित अन्न. अहो ते मार्केटिंगवाले ( एम आर ) त्यांना कळलं ना कि आपल्याला या पहिल्या आठवड्यात केमोथेरपी आहे , ते जातीने तुम्हाला फोन करणार आणि घरपोच सेवा . तर असा सर्व कारभार आहे . भोंगळ कारभार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे करोडोंची उलाढाल ...

Nitin Palkar's picture

10 Jul 2018 - 8:10 pm | Nitin Palkar

हे सर्व वाचून सून्न झालो.

यशोधरा's picture

10 Jul 2018 - 8:45 pm | यशोधरा

बापरे!!

कुमार१'s picture

11 Jul 2018 - 11:27 am | कुमार१

खिलजी ,तुमच्या धैर्याला सलाम .
खरे आहे संपूर्ण कुटुंबच त्यात पिचते.

औषधांच्या बाजारात इतक्या सुरस आणि चमत्कारिक कथा ऐकायला मिळतील कि मती गुंग होईल.

ग्राफिल हे औषध काही वर्षांपूर्वी आयात होत असे न्यूपोजेन(रोश कंपनीचे) म्हणून (२००६) तेंव्हा १२ हजार रुपये एका इंजेक्शनला होते. हे बायोकॉन या भारतीय कंपनीने निर्माण करायला सुरुवात केल्यावर त्याची किंमत कमी होत होत आता १००० -१२०० आहे.
आता रोश कंपनी तेच औषध २५०० ते ३००० ला विकते आहे.निर्मिती तशीच त्याच ठिकाणी औषध तेच पण किंमत एक दशांश.
एकच औषध वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या किमतीला कशा विकतात हा पण एक स्वतंत्र लेखनाचा विषय आहे.
बहुराष्ट्रीय कंपन्या औषधी क्षेत्रात कसा अफाट नफा मिळवतात आणि त्यासाठी ते पेटंट या शस्त्राचा वापर कसा करतात हा एक स्वतंत्र विषय आहे.
अमेरिकेत तर भयानक परिस्थिती आहे.
आपल्याकडे रुपये ४ ला ( चार फक्त) मिळणारे औषध (डाराप्रिम) अमेरिकेत १३.५ डॉलर्स ला मिळत असे. पण ती कंपनी एका खाजगी गुंतवणूकदाराने विकत घेतली आणि एका रात्रीत त्या औषधाचि किंमत ७५० डॉलर्स केली. (रुपये ५२हजार फक्त) म्हणजे ५००० % भाववाढ.
https://www.bbc.com/news/world-us-canada-34320413

झेन's picture

11 Jul 2018 - 12:02 pm | झेन

फारच भयानक आहे हे सगळं, खिलजी तुम्ही ज्या ताणतणावातून गेला आहात सलाम.
फक्त एकच सूचवतो... धाग्याच्या शिर्षकाची सुरुवात 'कॅन्सर' नी केलीत तर विषयाचं गांभीर्य आणि तुमची कळकळ जास्त लोकांपर्यंत पोचेल.

लई भारी's picture

11 Jul 2018 - 5:09 pm | लई भारी

खूप अवघड परिस्थिती आहे.
म्हणजे 'रसायनांचा महापूर' आणि 'औषधांचा बाजार' या दोन्ही पातळ्यांवर.

आपल्या कुटुंबावर काय परिस्थिती ओढवली असेल याची फक्त कल्पनाच करू शकतो..

अमेरिकेच्या लोकांना स्वतःचा फायदा सोडून दुसरं काहीच दिसत नाही. मग जगभरात लोक मेले तरी चालतील.
अत्यंत हलकट वृत्ती आहे.

टवाळ कार्टा's picture

12 Jul 2018 - 12:17 am | टवाळ कार्टा

+111

पुंबा's picture

12 Jul 2018 - 11:09 am | पुंबा

++१११

मोहनराव's picture

11 Jul 2018 - 5:52 pm | मोहनराव

वाचुन सुन्न झालो.

पुंबा's picture

12 Jul 2018 - 11:09 am | पुंबा

काय बोलणार!!
:(

मी कामानिमित्त बाहेरगावी असल्याने , माझ्या या महत्वपूर्ण अनुभवास प्रतिसादता आले नाही त्याबद्दल क्षमस्व .
माझ्या लेखाला प्रतिसाद देणाऱ्यांना आणि वाचकांना ( मिपाकरांना ) प्रणाम ..
खरच फार वाईट वाटते त्या लोकांचे ज्यांना यातील काहीही ज्ञान नसते आणि ते सर्व दोष नशिबाला देत असतात . मी तिथे त्यावेळी असूनही काही करू शकलो नाही कारण या कावळ्यांना ते खायची सवय झाली आहे आणि एखादा शहाणा असेल तर त्याच्या रुग्णाला त्रास देण्यातही ते मागेपुढे बघत नाहीत . माझ्या आईनेच मला त्यावेळेला शप्पथ दिली होती म्हणून मी गप्प बसलो होतो . मला दोनदा त्या सर्व कर्मचार्यानी इस्पितळाच्या मालकासमोर उभे केले होते . पहिल्यांदा मी त्याचा रोष आणि राग गप्प ऐकून घेतला पण दुसऱयांदा जेव्हा त्यांनी मला परत बोलावले तेव्हाही मी गप्प पणे ऐकत असताना त्यांनी मला माझे शिक्षण विचारले . मी माझी पदवी त्यांना सांगताच ते गप्प . घाम फुटायचा बाकी होता त्यांना . मी त्यांना हे देखील सांगितले कि डॉक्टर कधीही कंपनीच्या नावानिशी औषध लिहून देऊ शकत नाही . त्याने त्याचे कन्टेन्ट लिहून द्यायचे असते . तो आमचा प्रश्न असतो कि आम्ही कुठले औषध घ्यायचे असते ते .
मी एकदा औषध बदलले तेव्हा तेथील कर्मचारीकांनी एव्हढा गोंधळ घातला कि विचारू नका . त्यांनी थेट मला त्या इस्पितळाच्या मालकासमोर उभे केले , का तर उद्या रुग्णाला काही झाले तर आम्ही जबाबदार नाही असे तुम्ही आम्हाला लिहून द्या मगच आम्ही हे औषध देऊ . मग मीही त्यांना बोललो कि तुम्ही मला कागदावर लिहून द्या कि तुम्ही दिलेली औषधे एकदम योग्य आहेत आणि ती घेतल्यावर रुग्ण खडखडीत बरा होईल म्हणून ..
आधीच रुग्णाच्या काळजीने आपण ट्रस्ट असतो आणि या लोकांना त्यांच्या कमिशनचे पडलेले असते .

सुबोध खरे's picture

16 Jul 2018 - 9:17 pm | सुबोध खरे

मग मीही त्यांना बोललो कि तुम्ही मला कागदावर लिहून द्या कि तुम्ही दिलेली औषधे एकदम योग्य आहेत आणि ती घेतल्यावर रुग्ण खडखडीत बरा होईल म्हणून

आपण रागाच्या भरात असे बोललात इथपर्यंत ठीक आहे.

परंतु कितीही चांगले औषध असेल तरी रुग्णाचे शरीर त्याला कसा प्रतिसाद देईल हे अगदी जगातील सर्वोत्तम डॉक्टर सुद्धा सांगू शकणार नाही.

एक साधे उदाहरण देत आहे.-- आपल्या आईला प्रकृती सुधारण्यासाठी आपल्या डॉक्टरानी रोज दोन ग्लास दूध प्यायला सांगितले आहे. साधारण पणे आपण चांगल्या डेअरीचे दूध घ्यावे असा संकेत आहे. मग त्यात गोकुळ असेल वारणा असेल किंवा अमूल असेल.

पण शेजारच्या गोठ्यातील भय्याने आणलेले दूध चांगले असेल याची खात्री आपले डॉक्टर देऊ शकतील का?

त्यांनी गोकुळचेच घ्यावे असा आग्रह कदाचित चूक असेल पण तुम्ही आणलेल्या गोठ्यातील दुधाने आपल्या आईची प्रकृती सुधारली नाही तरी तुम्ही डॉक्टरांनाच जबाबदार धरणार?

तेंव्हा डॉक्टर तुम्हाला सांगणारच कि हे दूध प्यायल्याने प्रकृती सुधारली नाही तर ती तुमचीच जबाबदारी आहे.

तेंव्हा तुम्ही आणलेल्या औषधाची जबाबदारी डॉक्टरानी घेणे हि आपली अपेक्षा अतिशयोक्त आणि चूक आहे.

किंवा

तुम्ही घर बांधायला घेतले तर त्यासाठी आपला स्थापत्य अभियंता एल अँड टी किंवा बिर्ला सिमेंट वापरायला सांगेल. पण तुम्ही जर म्हणालात कि मी गुप्ता किंवा गोयल सिमेंट वापरेन तर "तो" तुम्हाला त्याच्या दर्जाची खात्री देऊ शकेल का?

आज दुर्दैवाने जेनेरिक औषधांची हि स्थिती आहे. ती औषधे चांगली असतीलही पण त्याच्या दर्जाची खात्री देणारी यंत्रणा भ्रष्टाचाराने इतकी बुजबुजलेली आहे कि कोणताही डॉक्टर जेनेरिक औषध चांगले असेलच याची खात्री देऊ शकत नाही.

According to the World Health Organisation (WHO), 35 percent of the fake drugs sold all over the world comes from India and it occupies the counterfeit drug market of nearly Rs 4,000 crore.

20 percent of the drugs sold in India are fake.

https://yourstory.com/2017/06/india-fake-drugs/

खरे साहेब काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. मी डॉक्टरांना जबाबदार धरलेले नाही आहे . मी या औषधबाजारातील दलालांना जबाबदार धरलेले आहे . यामध्ये डॉक्टर कुठेच नाही येत .
मी खाली एक उदाहरण देतो...
आईसाठी मेडोपेनंम हे औषध सांगितले होते ( कंपनी नं 1) , तेच औषध मी थोडे स्वस्तात ( ८०० रुपयाला कंपनी २ चे आणले ). कंपनी १ चे औषध मला १२०० ला पडत होते . सुदैवाने दोन्ही कंपन्या भारतीय आणि त्याही मी जेथे काम करतो तेथेच त्यांचे बायोइक्विव्हॅलंस आम्ही सिद्ध केले होते . मला माझ्या प्रयोगशाळेवर पूर्ण विश्वास आहे कारण आम्ही स्वतः बरेच ऑडिट फेस केलेले आहेत . त्यामुळे त्यांच्या दर्जाबाबत प्रश्नच येत नव्हता . प्रश्न फक्त पैसे वाचवण्याचा होता , जो मी करत होतो . त्या कर्मचाऱ्यांचे कमिशन माझ्यामुळे फुकट गेलेले होते म्हणून हा सर्व खटाटोप चालू होता त्यांचा . हे मी सर्व त्या इस्पितळाच्या मालकाशी सविस्तर बोलल्यावर आणि डॉक्टरांना त्याबद्दल सांगितल्यावर ते शांत झाले , पण माझा रागराग करणे चालूच होते .
इथे डॉक्टरांबद्दल मला काहीच म्हणणे नाही , उलट त्यांनीच माझ्या आईला कितीदातरी यातून बाहेर काढले .
ड्रॉटर निकम हे उत्कृष्ट सर्जन , त्यांनी तर माझ्या आईला ते फोड आलेले होते तेव्हा ते युरोपला चालले होते , संध्याकाळची प्लेन होती , त्याआधी त्यांनी ऑपरेशन करून ते निघूनही गेले . बिलामध्ये त्यांनी ओटी चार्जेस निशुल्क करून टाकले . अहो खरे साहेब मला या सर्व समस्येत डॉक्टर फार चांगले भेटले . त्यांना माझे कौतुकही होते आणि आई गेली तेव्हा वाईटही वाटले .
हा सर्व बाजार औषधांचा आहे आणि तोही काळा बाजार . तो कधी थांबणार ते माहित नाही .

सुबोध खरे's picture

18 Jul 2018 - 10:01 am | सुबोध खरे

शक्य आहे.
तसे असेल तर क्षमस्व.

औषध कंपन्यांच्या किमतीत फार मोठा फरक असतो हि वस्तुस्थिती आहे उदा. स्टोअरव्हास(ATORVASTATIN) हे रँनबॅक्सी कंपनीचे औषध २००० रुपयाला आहे तर तेच झिव्हास्ट हे FDC कंपनीचे(इलेक्ट्राल वाले) २५ रुपयाला आहे.

बहुसंख्य केमिस्ट महागातीलच औषध देण्याचा प्रयत्न करतात कारण कमीत कमी १५ % कमिशन हा स्थायीभाव (NORM) आहे. मग २५ रुप्याचे औषध देऊन ३.७५ रुपये मिळवण्यापेक्षा २०० रुपयाला असणारे तेच औषध दिल्यास ३० रुपये मिळतील हा विचार असतोच.त्यातून बऱ्याच कंपन्या ३०-३५ % पण कमिशन देतात.
यामुळे बरेच केमिस्ट स्वस्तातील औषधे ठेवतच नाहीत आणि वर रुग्णाला सांगतात. अमुक तमुक औषध उपलब्ध नाही पण त्या ऐवजी "हे" औषध आहे. तुमच्या डॉक्टरांना विचारून घ्या. डॉक्टरांना साधारणपणे प्रत्येक औषधाची किंमत माहित असणे शक्यच नसते. त्यामुळे ते फक्त चांगल्या कंपनीचे आहे हे पाहून "घ्या" म्हणून सांगतात.

मी डॉक्टरांनी अमुकच औषध घ्या असे सांगणे चूक आहे हे खालील वाक्यात लिहिले होतेच
त्यांनी गोकुळचेच घ्यावे असा आग्रह कदाचित चूक असेल

माझे म्हणणे एवढेच आहे कि गोकुळ दुधाच्या ऐवजी अमूल किंवा वारणा सारखे प्रमाणित दूध प्या. स्वस्त मिळते म्हणून भय्याने आणलेले दूध तुम्ही घेणार असाल तर त्याची संपूर्ण जबाबदारी तुमची स्वतःची असेल.

दुर्दैवाने औषधांच्या किमती, जेनेरिक औषधे आणि वैद्यकीय क्षेत्रातील भ्रष्टाचार या सर्वच गोष्टींना डॉक्टरांनाच जबाबदार धरले जाते.

सोमनाथ खांदवे's picture

17 Jul 2018 - 3:48 pm | सोमनाथ खांदवे

येरवडा भागात नामांकित एम डी मेडिसीन डॉक्टर आहेत , त्यांच्या ओ पी डी मध्ये सकाळ संध्याकाळ बीपी आणि शुगर च्या पेशन्ट ची भरपूर गर्दी असायची व ऍडमिट करायची सोय आहे तसेच डॉक्टरांनी सांगितलेली औषधे त्यांच्याच मेडिकल मध्ये मिळतात .
माझ्या आई ला असलेल्या बीपी साठी ट्रीटमेंट त्यांच्या कडेच चालू आहे व एका महिन्याच्या दोन तीन प्रकारच्या गोळ्या साधारण 1400 रु होतात . एकदा तपासणी झाल्या नंतर त्या मेडिकल मध्ये गेलो असता काऊंटर च्या बाहेर एक MR उभा होता व त्याने माझ्या कडून चिठ्ठी घेऊन तिचा एक फोटो काढला . नंतर मेडिकल वाल्याने गोळ्या शोधताना एक गोळी संपली आहे तर पर्याय लिहून आणा असे सांगितले असता तो MR मध्ये उतरून ' ही ' द्याकि असे सांगू लागला . त्याने चिठ्ठी चा फोटो काढला त्या वेळी मी संयम ठेवला होता पण त्याने मेडिकल वाल्याला गाईड करायला सुरुवात केल्या वर मी डायरेक्ट डॉक्टर ची केबिन गाठून त्यांना MR ची हकीकत सांगितली . डॉक्टर ने त्याला बोलवून सर्वा समोर बाहेर हाकलून दिले ( कदाचित माझ्या समाधाना साठी ) .
गेली 10 वर्ष त्यांच्या कडे आम्ही जातोय , त्यांच्या भरपूर वेळ शांत समजावून सांगण्याच्या पद्धती मूळे पेशन्ट ला चांगली उभारी येत असे .त्यांना एकच मुलगी ती ही परदेशी असते , पूर्वी ते एकटे हॉस्पिटल चालवायचे आता पार्टनरशिप / कमर्शियलायझेशन केल्या मूळे कदाचित तो MR चा अनुभव आला असेल अजून ही आम्ही त्यांच्या कडेच ट्रीटमेन्ट घेतोय . तिथे मेडिकल असताना पार्टनरशिप होण्याअगोदर त्यांनी एकदा खूप महाग गोळ्या पुण्यातील डिस्ट्रीब्युटर चा नं पत्ता देऊन स्वस्तात दिल्या होत्या .

पद्मावति's picture

17 Jul 2018 - 4:29 pm | पद्मावति

सुन्न :(

पुष्कर जोशी's picture

22 Jul 2018 - 6:56 pm | पुष्कर जोशी

कृपया सर्वांनी हा व्हिडीयो पहावा.. https://youtu.be/FzYjgGeBSQA

नाखु's picture

22 Jul 2018 - 8:42 pm | नाखु

धैर्याला प्रणाम, डॉ यांची ठराविक रुग्णालयात असलेली गूळपीठ प्रक्टिस जीवावर बेतू शकते याचा प्रत्यय घेतला आहे.

अर्थात सगळेच तसे नसलेतरी बहुतांश ठिकाणी असा अनुभव येतो हे सत्य नाकारता येत नाही

पोळलेला नाखु