Wavy Bob - माझी पहिली कादंबरी आता उपलब्ध!

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
15 Jun 2018 - 3:00 pm

नमस्कार!

बर्‍याच दिवसांनी भेट होतेय. तसे अधून-मधून मी डोकावून जात होतो पण बर्‍याच व्यवधानांमुळे इकडे येणे थोडे कमीच झाले होते. आता माझी पहिली कादंबरी प्रकाशित झाली म्हणून त्याची जाहिरात करायला म्हणून आलोय असा आळ माझ्यावर येण्याची शक्यता आहे. :-) खोटे कशाला बोला; अगदी तसे नाहीच असे ठामपणे म्हणायला मी धजावणार नाही. मिपाकरांसमोर खोटे बोलायला जिवावर येते. अर्थात, अधून-मधून माझी हजेरी होतीच आणि वावर, प्रतिक्रिया आणि वाचनापुरता का असेना पण होता. तरी माझे मिपा कुटुंब मला समजून घेईल अशी खात्री आहे. मागील १.५-२ वर्षांपासून वैयक्तिक आणि नोकरीच्या आघाड्यांवर काही महत्वाच्या (आंबट-गोड) घडामोडींमध्ये अडकलो होतो. त्यातच लेखनाचा प्रयत्न, शब्दांशी झटापट, आणि वाक्यांशी कुस्ती असले बरेच हिंस्त्र प्रकार चालू होतेच. शेवटी माझ्या लिखाणाला एक मूर्त स्वरूप मिळाले.

Wavy Bob ही माझी पहिलीच कादंबरी (अजून येतील असा भाबडा आशवाद आहे). इंग्रजीत का? कारण असं काही विशेष नाही. मला खूप चांगलं इंग्रजी येतं असंही नाही. वाघिणीच्या दुधात आईच्या दुधापेक्षा जास्त जीवनरस आहे असा ही माझा दावा नाही. इतकी वर्षं इंग्रजी लिखाणात (तांत्रिक आणि कारकुनी पद्धतीच्या) घालवल्यानं आणि त्याच लिखाणानं आजवर मला दोन वेळची भाकरी दिली असल्यानं माझा कल इंग्रजीकडे जास्त होता. म्हणून इंग्रजीत.

आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे शक्य झालेली कादंबरी आता आपणासमोर सादर करतांना मला आनंद होतोय. खूप दिवसांपासूनचे हे स्वप्न सत्यात उतरलेले पाहून बरे वाटते आहे. Wavy Bob हा पुस्तकलेखनाचा माझा पहिलाच प्रयत्न. कितपत जमला आहे हे माझ्यापेक्षा आपणांसारखी जाणकार मंडळी जास्त चांगल्या प्रकारे जोखू शकतील.

आपण ही कादंबरी वाचून आपले मत इथे आणि अॅमेझॉनवर नोंदवू शकलात तर नवोदित लेखक म्हणून मला खरंच खूप बरे वाटेल. ही तसदी आपण सर्वांनी अवश्य घ्यावी ही आपणा सगळ्यांना नम्र विनंती!

Wavy Bob ही कादंबरी केतन नावाच्या संगणक क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणाच्या आशा - आकांक्षांची आणि यशापयशाची कहाणी आहे. सगळ्यांना निश्चितपणे आवडेल असे या कादंबरीचे कथानक आहे. प्रत्येक पानावर वाचकांची उत्कंठा वाढेल अशा पद्धतीने या कादंबरीचे कथानक रचण्यात आले आहे. शिवाय Wavy Bob कोण हे रहस्य पुरेसे इंटरेस्टिंग आहेच.

कृपया आपण ही कादंबरी वाचून आपला अभिप्राय द्यावा ही विनंती! एका नवोदित लेखकासाठी आपला अभिप्राय आशीर्वादापेक्षा कमी नसेल.

ही कादंबरी खालील साईट्सवर उपलब्ध आहे.

https://www.amazon.in/dp/1643243616/ref=sr_1_1?ie=UTF8&qid=1528912467&sr...

https://www.flipkart.com/wavy-bob/p/itmf63em2h7ystut?pid=9781643243610&l...(e+16)1528912615367&qH=ec95ba38260a08db

https://www.amazon.co.uk/dp/B07DM2B2ZZ/ref=sr_1_1?ie=UTF8&qid=1528912558...

https://notionpress.com/read/wavy-bob

https://www.infibeam.com/Books/wavy-bob-sameer-suryakant-kulkarni/978164...

Ebook: https://play.google.com/store/books/details/Sameer_Suryakant_Kulkarni_Wa...

Ebook: https://www.kobo.com/in/en/ebook/wavy-bob

Ebook: https://www.amazon.com/dp/B07DM2B2ZZ

Ebook: https://www.amazon.co.uk/dp/B07DM2B2ZZ/ref=sr_1_1?ie=UTF8&qid=1528912558...

Ebook: https://itunes.apple.com/us/book/id1396501228

शतशः धन्यवाद!

वाङ्मयअनुभव

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Jun 2018 - 3:10 pm | ज्ञानोबाचे पैजार

अरे वा मस्त बातमी
अभिनंदन
पैजारबुवा,

टवाळ कार्टा's picture

15 Jun 2018 - 3:53 pm | टवाळ कार्टा

+1

विकत घेऊन वाचतो. अभिनंदन!

यशोधरा's picture

15 Jun 2018 - 3:22 pm | यशोधरा

अभिनंदन!

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jun 2018 - 5:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरे वा ! अजून एका मिपाकराच्या टोपीत मानाचा तुरा खोवलेला पाहून आनंद झाला ! अभिनंदन आणि वर्धिष्णू यशासाठी शुभेच्छा !

जयंत कुलकर्णी's picture

15 Jun 2018 - 5:21 pm | जयंत कुलकर्णी

मनापासून अभिनंदन !

कपिलमुनी's picture

15 Jun 2018 - 6:06 pm | कपिलमुनी

प्रकाशनाच्या शुभेच्छा !
उत्तरोत्तर यश मिळू दे !

सतिश गावडे's picture

15 Jun 2018 - 8:15 pm | सतिश गावडे

अभिनंदन !!!

अंतु बर्वा's picture

15 Jun 2018 - 8:55 pm | अंतु बर्वा

अभिनंदन आणि खुप सार्या शुभेच्छा ..!!

पिवळा डांबिस's picture

15 Jun 2018 - 11:08 pm | पिवळा डांबिस

तुमच्या अशा अनेक कादंबर्‍या प्रकाशित होवोत ही सदिच्छा,

अनन्त्_यात्री's picture

16 Jun 2018 - 11:02 am | अनन्त्_यात्री

लिहिते रहा!

कंजूस's picture

16 Jun 2018 - 12:43 pm | कंजूस

छान!
स्टोरवरचं १०३ पानांचं साम्पल घेतलं, वाचलं थोडं.

समीरसूर's picture

25 Jun 2018 - 1:50 pm | समीरसूर

काही सूचना असल्यास अवश्य सांगाव्यात. :-)

समीरसूर's picture

18 Jun 2018 - 4:57 pm | समीरसूर

सगळ्यांना मनापासून धन्यवाद! जमल्यास अ‍ॅमेझॉनवर नक्की परीक्षण टाकावजीही विनंती!

समीर

श्वेता२४'s picture

18 Jun 2018 - 5:27 pm | श्वेता२४

.

मनिमौ's picture

19 Jun 2018 - 1:07 pm | मनिमौ

किंडल वर शोधून वाचते

मंदार कात्रे's picture

19 Jun 2018 - 7:09 pm | मंदार कात्रे

मनापासून अभिनंदन !

समीरसूर's picture

24 Jun 2018 - 2:27 pm | समीरसूर

सगळ्यांना मनापासून धन्यवाद! :-) आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत ही खूप आनंददायी बाब आहे. कृपया वाचून अ‍ॅमेझॉनवर रिव्ह्यू टाकावा ही नम्र विनंती. आणि आपल्या मित्र-आप्तेष्टांमध्ये आपण जर हे पुस्तक सुचवू शकलात तर फार बरे होईल. पुन्हा एकदा धन्यवाद!

समीर

ज्ञान's picture

24 Jun 2018 - 7:59 pm | ज्ञान

abhinandan sameer

समीरसूर's picture

25 Jun 2018 - 1:51 pm | समीरसूर

धन्यवाद! :-) भेटू आपण पुण्यात असलात तर...

वरुण मोहिते's picture

25 Jun 2018 - 12:18 pm | वरुण मोहिते

मागवत आहे आजच पुस्तक

समीरसूर's picture

25 Jun 2018 - 1:50 pm | समीरसूर

वरूणजी - धन्यवाद! कृपया आपला अभिप्राय कळवावा ही विनंती! :-)

स्वलेकर's picture

25 Jun 2018 - 5:46 pm | स्वलेकर

अभिनंदन