<सत्यध्वनी>

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जे न देखे रवी...
9 Mar 2009 - 10:07 pm

प्रेरणा

तेहेरानच्या आकाशावरून उडताना
शेजारच्या काकू म्हणाल्या,
"मोबाईल वरच्या ब्यागेत राहिला,
काढतेस का?
मुलाचा एसेमेस आला का पहायचा आहे."

बदलापूर स्टेशनवर
वांगणीच्या गाडीची वाट पहाताना
चिम्या मुंबैच्या गाडीकडे धावला.
"ही गाडी वांगणीला जाईलच ना?"
त्यात केवढं मोठं तत्वज्ञान होतं.

जीएमेआरटीत पोस्टर्स समजावून देताना
अरित्रला एक विद्यार्थी म्हणतो,
"जरा बाजूला होता का?"
आणि त्याने मोबाईलवर पोस्टरचा व्हीडीओ घेतला.

संदर्भासहित थोडंसं स्पष्टीकरण:
या सर्व खरोखरच सत्यकथा आहेत, माझ्या डोळ्यांनी पाहिलेल्या आणि ऐकलेल्या. मध्य रेल्वेच्या बदलापूर स्थानकापासून वांगणी एका दिशेत आहे आणि मुंबई दुसर्‍या दिशेत! शेवटचं कडवं माझ्या विज्ञानदिनात सांगायचं राहिलं, ते इथे सांगितलं.
काव्यात प्रास, यमक काही असतं, पण विडंबनात असावं असं कोण म्हणतं?

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Mar 2009 - 10:15 pm | बिपिन कार्यकर्ते

आम्ही चाललो, रानीखेतला...

बिपिन कार्यकर्ते

मेघना भुस्कुटे's picture

9 Mar 2009 - 10:19 pm | मेघना भुस्कुटे

अरे, काय चाल्लंय काय? खरंच हसून मरायची वेळ आलीय...

प्राजु's picture

9 Mar 2009 - 10:23 pm | प्राजु

आईगं!!!!!!!
बास! संपलं....
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चतुरंग's picture

9 Mar 2009 - 10:28 pm | चतुरंग

!!!~~~##$$$||||

चतुरंग

शरदिनी's picture

9 Mar 2009 - 10:30 pm | शरदिनी

मला विडंबने आवडतात...
... विडंबन हा मूळ कलाकृतीचा सन्मान आहे असं मी समजते.

धन्स गं धन्स...
धन्यु गं धन्यु...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Mar 2009 - 10:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

शरदिनीताई, तुम्ही आमचा टाईमपास एवढ्या खिलाडूपणाने स्वीकारलात त्याबद्दल खरोखर धन्यवाद.

बाकी माझं विडंबन(?) अगदीच फडतूस आहे हे मलाही मान्य आहे, पण त्यातले प्रत्यक्षात झालेले विनोद थोडेतरी सांगण्यालायक आहेत असं वाटलं म्हणून एवढी हिम्मत केली.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

लिखाळ's picture

9 Mar 2009 - 10:38 pm | लिखाळ

शरदिनीताई, तुम्ही आमचा टाईमपास एवढ्या खिलाडूपणाने स्वीकारलात त्याबद्दल खरोखर धन्यवाद.

असेच म्हणतो.

अदिती,
विडंबन मजेदार.
-- लिखाळ.

क्रान्ति's picture

9 Mar 2009 - 10:36 pm | क्रान्ति

काकूचा मोबाईल काढला की नाही? चिम्या वांगणीला गेला की नाही? पुढील विडम्बनात अवश्य कळविणे!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

अवलिया's picture

9 Mar 2009 - 10:45 pm | अवलिया

अदिती बै लईच फार्मात आहेत...

--अवलिया

जयवी's picture

10 Mar 2009 - 2:03 pm | जयवी

अदिती....... तुझ्या विक्षिप्तपणात पण एक वेगळा स्पार्क आहे गं :) जप हो त्याला ;)

सूहास's picture

10 Mar 2009 - 2:42 pm | सूहास (not verified)

हसुन हसुन पोट दुखायला लागल!!!अरे बाबानो बस करा रे.
३_१४,
"काव्यात प्रास, यमक काही असतं, पण विडंबनात असावं असं कोण म्हणतं"
सत्य आहे.सहमत

सुहास..

"व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे,"
"वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "

निखिल देशपांडे's picture

10 Mar 2009 - 3:49 pm | निखिल देशपांडे

काल पासुन विडंबन वाचुन वाचुन वाट लागली आहे..... अरे किति हसवणार सगळे......

विनायक प्रभू's picture

10 Mar 2009 - 4:52 pm | विनायक प्रभू

होळी चाललेली दिसतेय